हे घडतं कसं?

Submitted by केअशु on 16 January, 2018 - 09:58

या पोस्टचा विषय ज्योतिषशास्त्र असला तरी ज्योतिष आणि विज्ञान यांचा संबंध तपासण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे.त्यातून काही मार्गदर्शक किरणे मिळाल्यास त्यादृष्टीने अधिक संशोधन करता येईल.

खालील चर्चेत सहभागी होण्यासाठी ज्योतिषशास्त्राचा थोडाफार अभ्यास गरजेचा आहे.किमान पूर्वग्रहदूषित,अनाभ्यासाने बनलेली मते नसावीत.

ज्योतिषशास्त्रातल्या काही गोष्टींचा(सर्वच नव्हे!)
प्रत्यय बर्‍यापैकी येतो.

उदाहरणार्थ,

१.धनु राशीचा जातक बर्‍यापैकी उंच आणि तब्येतीनं दणकट असा असतो.निदान या दोन्हीतलं एकतरी असतोच.पण उंचीही कमी आहे आणि तब्येतीनं देखील किरकोळ आहे असा धनु राशीचा जातक सहसा मिळणार नाही.

२.रेवती नक्षत्रावर जन्मलेला जातक हा उंचीने कमी शरीराने स्थुल,दिसायला चांगला,गोरा असा असतो.

३.जन्म किंवा लग्नरास मेष असेल तर दात थोडेतरी पुढे आलेले असतात.

४. पत्रिकेत द्वितीय स्थानात केतु असेल तर दातांचा आजार,विकार असतोच.

५. तूळ लग्न असेल तर डोळे काहीसे मोठे व नाकही मोठे,टोकदार असते.

६. तूळ लग्न असेल तर कपड्यांचा(पोषाख)सेन्स चांगला असतो.

७. दशम स्थानात हर्षल असेल तर बर्‍याचदा पितृसुख फार काळ मिळत नाही.तसेच व्यक्ती इलेक्ट्रिक किंवा इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात काम करणारी असू शकते.

८. शुक्र-मंगळ एकाच घरात असतील तर प्रेम जुळण्याची शक्यता दाट असते.यातून विवाह होईलच हे निश्चित सांगता नाही येणार पण असा योग असणार्‍याच्या प्रेमात एखादीतरी भिन्नलिंगी व्यक्ती कधी ना कधी पडतेच!

९. कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे.चंद्र धारिष्ट्य देत नाही.शिवाय ही जलराशी आहे.त्यामुळे राग आला तर कर्क राशीच्या लोकांचा संयम पटकन् सुटतो.अशावेळी ते फटकळपणे बोलून रिकामे होतात.

१०.जन्म किंवा लग्न रास कर्क असेल तर वैद्यकीय क्षेत्रात किंवा वैद्यक शास्त्राला सहाय्यभूत अशा क्षेत्रात चांगलं करिअर होतं.(उदा.MR,Pharma मधील नोकरी)

"ज्योतिष हे शास्त्र नाही थोतांड आहे असं काही लोक म्हणतात.किमान ९०% वेळा प्रत्यय येणारे साधेसोपे ठोकताळे वर दिले आहेत.हे शास्त्र नसेल तर यातल्या एकाही भाकिताचं प्रत्यंतर येता कामा नये;पण वरच्या बर्‍याचशा ठोकताळ्यांमधून ज्योतिषशास्त्र नावाचं जे काही आहे ते काही अंशी खरं असावं हे पटतं.जन्मवेळ,जन्मतारीख,जन्मठिकाण या तीन गोष्टींचा यासाठी उपयोग केला आहे.जगाच्या कोणत्याही ठिकाणी याचा समान प्रत्यय येतो.

जर तसं असेल तर एका गोष्टीवर सांगोपाग चर्चा व्हावी की कोट्यावधी मैलांवरुन ग्रह एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील घडामोडी किंवा वर दिल्याप्रमाणे शरीराचं विशिष्ट रुप कसं काय ठरवतात? एकाच घरात दोन व्यक्तींपैकी एकाला गुरुची महादशा सुरु असेल आणि दुसर्‍याला साडेसाती सुरु असेल तर गुरुदशेतील व्यक्तीची बरीचशी कामे सहज होतात आणि साडेसातीवाल्याला अडथळे येतात.

या ग्रह,नक्षत्रांकडून येणार्‍या लहरी कोणत्या असतात?एखाद्या अरुंद गल्लीत काहीवेळा प्रकाश,वारा,मोबाईलचं नेटवर्क नसतं पण राशीनुसार बरे वाईट परिणाम मात्र मिळत राहतात.हे कसं काय? अशा अरुंद ठिकाणीसुध्दा या लहरी कशा काय पोहचतात?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

भरत, व्यत्यय,मेघपाल
मला वाटते आता आपण सोडून देऊ,
आपण काही मुद्दे समोर ठेवलेत, त्याला धागालेखकाने उत्तरे दिली नाहीत, राज जे सांगतायत त्यामुळे ज्योतिष हे शास्त्र आहे हे prove होत नाहीये हे पण आपण समोर मांडलय, (ते त्यांना पटत नाहीये ते सोडा, )
वाचणारे लोक काय ते समजून घ्यायला सुज्ञ आहेत,
आणि ज्याला शेवटी ज्योतिषाकडे जायचंय तो ते शास्त्र आहे की कसे हे न पाहता त्याच्या बजेट प्रमाणे पोपटवाल्या पासून ज्योतिषरत्ना पर्यंत कोणीतरी शोधलेच,
तेव्हा उगा तोंडाची वाफ का दवडा.

त्यातून कोणी वेगळा मुद्दा आणलाच तर पुढे पाहू.

साधना,
कल्पतरुंचं काहीतरी मोठं नुकसान झालं असावं त्यामुळे चरफड साहजिक आहे.

पण तुमच्या मताच्या पुष्ट्यर्थ ही माहिती,

ज्योतिषी सुहास गोखले यांनी त्यांच्या ब्लॉगवर खालील माहिती दिली आहे.

मी अमेरिकेत असताना ज्योतिष विषयक सॉफ्टवेअर लिहणार्‍या एका बलाढ्य कंपनी साठी ‘विषय तज्ञ – Domain Expert’ म्हणून काम पाहिले होते. कॉम्प्युटर च्या साह्याने भविष्य सांगणे हा प्रकल्प होता. मी आणि माझ्या सहकार्‍यांनी अनेक प्रयत्न केले, न्युरल नेटवर्क्स, आर्टीफिशियल इंटेलिजन्स , पॅटर्न मॅचींग / पॅटर्न रेकक्झीशन, फजी लॉजीक अशी अनेक अत्याधुनिक तंत्रे वापरली गेली पण यश मिळाले नाही. दोन वर्षे काम केल्या नंतर आम्ही तो प्रकल्प बंद केला! कारण: एखाद्या पत्रिकेचे विश्लेषण मानवी बुद्धी ज्या पद्धतीने करते ते केवळ अनाकलनिय आहे आणि व्यक्ती – स्थळ-काळ- परिस्थिती सापेक्ष आहे . म्हणूनच कितिही प्रयत्न केले तरी या विश्लेषणााचे ‘मॉडेल’ कोणत्याही ‘लॉजीक/ पॅटर्न’ च्या माध्यमातून बनवता येणार नाही !

लिंक : http://blog.suhasjyotish.com/जेनीचा-किस्सा-भाग-४/

मी तर फक्त संशोधन कोण पुढं ठेवतं त्याची वाट बघत आहे. वादविवाद करण्याचा विषय मुळातच नव्हता व नाही.

गमभन,

माझा अभ्यास तपासण्यासाठी मुळात तुमचा अभ्यास हवा ज्योतिषशास्त्राचा!

शाळेतच न गेलेल्या मुलाला शाळेत १ लीत गेलेल्या मुलाने मी २ रीत आहे म्हणून सांगितलं तर त्याला काय कळणार?

https://www.buzzfeed.com/amphtml/kjh2110/the-10-most-bizarre-correlations

1. Ice cream consumption leads to murder.
2. A pirate shortage caused global warming.
3. Living in a poor country increases penis size.

मजा आहे सगळी, वाचा. आम्हाला statistics शिकवताना अशी खूप उदाहरणे दिली होती. काहीही डेटा घ्यायचा नी त्यावर काहीही कोरिलेशन करायचे आणि त्याप्रमाणे पुढच्या डेटा चे भविष्य सांगायचे. आम्ही खूप भविष्य सांगितली होती. बरीचशी खरी पण आलेली.
तर, हे असच, ज्योतिष देखील शास्त्र आहे.
त्या लिंकवरचे पाहिले वाक्य जे मी खाली देतेय ते मात्र वाचू नका.
One of the first things you learn in any statistics class is that correlation doesn't imply causation.

ज्योतिषी आडाखे जन्माच्या आणि सध्याच्या पॅरामिटर्स (ग्रहस्थिती, फेज, इ.) वरुन आखले जातात याची कल्पना आहे. >> बरोबर आहे, पण हा डेटा रिलिवंट आहे हे कुणी सिद्ध केले आहे? की अॅनेलाईज करून हे सिद्ध होते की नाही ते पहायचे आहे? तसं असेल तर खरंच हे करून बघावं.

अजुन मज्जेशीर उदाहरणे इथे बघा http://www.tylervigen.com/spurious-correlations

>> One of the first things you learn in any statistics class is that correlation doesn't imply causation.
सोनुतै, मी हे आधी म्हणालो इथे पण प्रो. राज यांनी बालिश अज्ञानी असण्याचं सर्टफुकट देउन माझा प्रतिसाद केराच्या टोपलीत टाकला आणि शेपुट घालुन पळ काढला.

असो नवीन सांगण्यासारखं काही नसल्यामुळे लेखनसीमा....

शाळेतच न गेलेल्या मुलाला शाळेत १ लीत गेलेल्या मुलाने मी २ रीत आहे म्हणून सांगितलं तर त्याला काय कळणार?

अहो लोकांना व्यवहारज्ञान असते. अडाणी पालक सुध्दा शाळेत जाणार्या पाल्याचा अभ्यास घेतात. उगाच मी काहीतरी भारी करतोय असला आव आणू नये. 1-2रीत जाणार्याला साधे बेस सांगता येत नसेल तर शाळा सोडून पकोडे तळायची गाडी टाकावी. काय शिकलोय हे समोरच्याला व्यवस्थित सांगता येत नसेल तर असल्या फुकाच्या शिक्षणाचा उपयोग काय?
उगाचच मुद्दे न मांडता निव्वळ वाद घालणे चालू आहे.
एकतरी मुद्दा पटवून सांगितलात का? प्रयत्न तरी केले का? फक्त सोईचे प्रतिसाद उचलून त्यातला हवा तो मजकूर उचलून त्यावर शब्दखेळ केला. मुळ मुद्दा समजावून सांगायची पात्रता नाही आहे का?
ज्याच्याकडे ज्ञान असते तो ते सगळ्यांचे प्रश्न ऐकून स्वतची उत्तरे पडताळणीच्या मापावर देऊन म्हणणे सिध्द करतो आणि ज्याच्याकडे ज्ञान नसते तो व्यक्ती निव्वळ तोंडाची वाफ वाया घालवतो.
तुम्हाला कुणामध्ये सामिल व्हायचे आहे ते तुम्ही ठरवा.

राॅकेट लाॅंच, मोठमोठी विज्ञानची कामे सुरू करताना ते सुरळीत व्हावे म्हणून सत्यनारायणची पुजा घालणे ठीक आहे. एक भावनिक आधारासाठी हे केले म्हणू शकू पण त्या पुजेमुळेच का्य व्यवस्थित झाले हा समज करून घेणे मुर्खपणा ठरतो.

सोनुतै, मी हे आधी म्हणालो इथे पण प्रो. राज यांनी बालिश अज्ञानी असण्याचं सर्टफुकट देउन माझा प्रतिसाद केराच्या टोपलीत टाकला आणि शेपुट घालुन पळ काढला.
>>
पण तुम्ही अवजड शब्द / वैज्ञानिक संज्ञा वगैरे वापरलेत का? लिंका फेकल्या का? असच कसं शास्त्र नाही हे सिद्ध होणार? तुम्हालातरबैकैकळतचनै.

आज ज्योतिष कुठल्याही जातीची मक्तेदारी राहिली नाहीय>>>>>>साधनाताई जात हा शब्द कुठून आला मधेच. मी तर कधी जात शब्द नाही वापरलाय. आता तुम्ही हवे तसे शब्द पण फिरवायला लागलाय. तुम्ही चुकीचं लिहिलंय कि जात या शब्दावर भलत्याच कुठल्यातरी ग्रहाची किरण पडलेत म्हणून हा शब्द फक्त तुम्हालाच दिसतोय आम्हाला तर नाही दिसला आधीच्या प्रतिसादात.अस असेल तर आम्हाला पण शिकवा ग्रहांच्या किरणात शब्द कसे वाचायचे ते. आणि सगळेच लफंगे उचक्के नसतात लोकांना लुटण्यासाठी ज्योतिषाचा दुकान मांडून बसतील

गमभन,

माझा अभ्यास तपासण्यासाठी मुळात तुमचा अभ्यास हवा ज्योतिषशास्त्राचा!

शाळेतच न गेलेल्या मुलाला शाळेत १ लीत गेलेल्या मुलाने मी २ रीत आहे म्हणून सांगितलं तर त्याला काय कळणार?

>>>

केअशु,

मी हे यासाठी विचारले होते की तुम्ही करत असलेल्या कमेंट अपरिपक्व वाटत होत्या. शिवाय वर लेखात दिलेली माहितीदेखील अपूर्ण होती किंवा अचुक वाटत नव्हती.
जसे धनु राशीचा जातक बर्‍यापैकी उंच आणि तब्येतीनं दणकट असा असतो, यात कोणती रास धरायची? लग्न रास? चंद्र रास की सुर्य रास? ( अनेक लोकांना चंद्र रास ठाऊक नसते. पाश्चिमात्य पद्धतीनुसार जन्मतारखेनुसार रास मिळते, ती रासच चंद्र रास मानुन गुणधर्म जुळतात की नाही हे पाहतात. )

नुसत्या जुजबी माहितीवरुन किंवा इथेतिथे वाचलेल्या माहितीवरुन वाद घालून ती माहिती (आणि ती माहिती देणारे शास्त्र/पद्धत्/कला वगैरे) सत्यच आहे हे ठामपणे सांगण्यात काही अर्थ नाही. त्याने काही साध्य न होता उलटे हसेच होईल.

त्यापेक्षा ज्योतिषाचा सखोल अभ्यास करा, त्यातील तत्व, सुत्र नीट समजुन घ्या, कारणमिमांसा जाणून घ्या, आणि मगच ज्योतिषशास्त्र हे शास्त्र की थोतांड हे सिद्ध करायच्या वादात पडा. (हा सखोल अभ्यास म्हणजे एखाददुसरे पुस्तक्/ब्लॉग वाचणे, फेसबुक्/व्हाटसाप ग्रुपवरच्या चर्चा नव्हे!)

समर्थ रामदास लोकांना एकदाच राम नाम जपायला सांगायचे, लोक ते ऐकायचे आणि खरोखर आयुष्यभर जप करायचे. तुम्ही आम्ही आयुष्यभर लोकांना कानीकपाळी ओरडून रामनाम घ्यायला सांगु, पण कोणी एकवेळ सुद्धा नाम घेणार नाही. कारण समर्थांचा अभ्यास, अनुभव, साधना! जी तुम्हा आम्हाकडे नाही

असो, बहुतेक मी सांगायचा मुद्दा तुम्हाला कळला असावा. तेव्हा समर्थांचेच वचन म्हणून मी निरोप घेतो
अभ्यासोनी प्रकटावे | अथवा झाकोनी असावे|
प्रकटोनी नासावे | हे बरे नोहे||

मस्त प्रत्युत्तर दिलंय गमभन. मुळात या ज्योतिषांना साधा प्रश्न साधेपणाने जरी विचारला तरी दात ओठ खाऊन अंगावर का येतात हे न उलगडलेलं कोडं आहे. कदाचित ज्योतिषशास्त्राबद्दल यांना तेवढ ज्ञान नसावं. कारण ज्ञानी माणूस हा अथांग सागरासारखा असतो विचलित न होणारा. हे सगळे डबकी आहेत.

>>बरोबर आहे, पण हा डेटा रिलिवंट आहे हे कुणी सिद्ध केले आहे? की अॅनेलाईज करून हे सिद्ध होते की नाही ते पहायचे आहे? तसं असेल तर खरंच हे करून बघावं.<<
१. मी वर दिलेल्या लिंकमध्ये एका केस स्टडीचा उल्लेख आहे. त्यांचा फोकस होमिसाइड्स पुरता मर्यादित आहे आणि त्या अनुषंगाने डेटाबेस बिल्ड करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरु आहे हे दिसुन येतंय.

२. आता कोरिलेशन आणि कॉजेशन बाबत. बरीच राळ उडवली गेलीय मी या दोन टर्म्सचा उल्लेख केल्यापासुन. माझं मूळ वाक्य - ज्योतिष आणि अ‍ॅनलिटिक्सचा बेस कोरिलेशन आणि कॉजेशन वर आहे. या वाक्याचा अर्थ सोयीनुसार कोरिलेशन प्रुव्ज्/इंप्लाय्ज कॉजेशन असा काढणार्‍यांना दंडवत. इंटरेस्टिंगली कान्वर्स कुड बी ट्रु जो बर्‍याचवेळा डेटा मायनिंग करताना उजेडात येतो. उदा: टेराडेटाच्या बीअर-डायपर, उन्हाळा-चोर्‍या थिअरीज. आणि हो या थिअरीज बिझार नाहित... Happy

२.१ इथलंच उदाहरण बघा ना; मुद्दा समजुन न घेता असंबद्ध बाबींचा दाखला देऊन तो खोडुन काढण्याचा केविलवाणा प्रकार चालला आहे (कॉजेशन). त्याकडे बारकाईने लक्ष दिलं तर या आय्डींचे आणि माझे मागे कधितरी "प्रेमळ" संवाद झालेले आहेत (कोरिलेशन) हे उजेडात येतं... Wink

३. आणि शेवटी, केअशु - डँग! अरे मी इथे तुमच्यासाठी एकहाती किल्ला लढवतोय आणि तुम्ही त्या सुहास गोखल्यांचं उदाहरण देऊन गडाचे दरवाजे उघडुन देताय? (दरवाजा उघडा असुनहि शिड्या लावतायत तो भाग अलाहिदा) याला तुमचा नाइवनेस म्हणु कि फितुरी?.. Lol

राज, तुमच्यासारख्या प्रचंड हुशार व्यक्तिंनी अशा नाइव लोकांच्यात कशाला बरे मुशाफिरी करावी? आपल्या उत्तुंग प्रतिभेला असा नीम्नवर्गीय संचार शोभत नाही.

आज ज्योतिष कुठल्याही जातीची मक्तेदारी राहिली नाहीय>>>>>>साधनाताई जात हा शब्द कुठून आला मधेच. मी तर कधी जात शब्द नाही वापरलाय. आता तुम्ही हवे तसे शब्द पण फिरवायला लागलाय. तुम्ही चुकीचं लिहिलंय कि जात या शब्दावर भलत्याच कुठल्यातरी ग्रहाची किरण पडलेत म्हणून हा शब्द फक्त तुम्हालाच दिसतोय आम्हाला तर नाही दिसला आधीच्या प्रतिसादात.अस असेल तर आम्हाला पण शिकवा ग्रहांच्या किरणात शब्द कसे वाचायचे ते. आणि सगळेच लफंगे उचक्के नसतात लोकांना लुटण्यासाठी ज्योतिषाचा दुकान मांडून बसतील>>>>>

बाबो, किती वायफळ लिहिता तुम्ही.

तुम्ही आरामाचा धंदा म्हटले, त्यावर मी कुठलाही धंदा आरामाचा नाही हे म्हटले. भीक मागणे हाही धंदाच आहे व तोही आरामाचा नाही.

ज्योतिष हा धंदा आता कोणीही करू शकते, कुठल्याही जातीची मक्तेदारी राहिली नाही हे मी मुद्दाम म्हटले कारण पूर्वापारपासून लोक भटाकडे ज्योतिष विचारायला जायचे, पण आता भटाव्यतिरिक्त इतर कोणीही हा धंदा उघडून बसू शकतो. सगळ्यांना ग्राहक मिळतात.

असे असताना तुमच्या मते जो आरामाचा आहे व प्रत्येक प्रश्नाचे शे, दोनशे, ५०० रुपये कमावून देऊ शकतो व आरामात जिंदगी प्राप्ती करून देऊ शकतो तो सगळ्यांनीच करायला हवा होता. पण आपल्या लोकसंख्येच्या तुलनेत फार थोडे लोक या धंद्यात आहेत. लोकांच्या मते आरामाचा नाही बहुतेक Happy

आणि सगळेच लफंगे उचक्के नसतात लोकांना लुटण्यासाठी या तुमच्या मतावर मी फक्त हसू शकते.

असो.

<या ग्रह,नक्षत्रांकडून येणार्‍या लहरी कोणत्या असतात?एखाद्या अरुंद गल्लीत काहीवेळा प्रकाश,वारा,मोबाईलचं नेटवर्क नसतं पण राशीनुसार बरे वाईट परिणाम मात्र मिळत राहतात.हे कसं काय? अशा अरुंद ठिकाणीसुध्दा या लहरी कशा काय पोहचतात?>
याला गडाचे दरवाजे म्हणतात का?

>>>>>रे मी इथे तुमच्यासाठी एकहाती किल्ला लढवतोय आणि तुम्ही त्या सुहास गोखल्यांचं उदाहरण देऊन गडाचे दरवाजे उघडुन देताय>>>>

Ok... इकडे एक भूमिका घेऊन ती डिफेन्ड करणे असा खेळ चालू आहे तर, आधी आपल्या बाजूने बोलणाऱ्या id दुसऱ्या बाजूचा पुरावा देतोय म्हंटल्यावर त्याला डायरेक्त फितूर म्हणायचे?
मला वाटलेले आपण दोन्ही बाजू पाहण्यांचा प्रयत्न करतोय , पण राज यांच्या प्रतिसादानंतर त्यांना असे काही करण्यात रस आहे असे वाटत नाही.

मला तो प्रतिसाद खूप आवडला.
त्याचा सारांश,
<<साधना,
तुमच्या मताच्या पुष्ट्यर्थ ही माहिती,
एखाद्या पत्रिकेचे विश्लेषण मानवी बुद्धी ज्या पद्धतीने करते ते केवळ अनाकलनिय आहे आणि व्यक्ती – स्थळ-काळ- परिस्थिती सापेक्ष आहे . म्हणूनच कितिही प्रयत्न केले तरी या विश्लेषणााचे ‘मॉडेल’ कोणत्याही ‘लॉजीक/ पॅटर्न’ च्या माध्यमातून बनवता येणार नाही !>>

वैज्ञानिक तथ्य ही व्यक्तिनिरपेक्ष असतात. म्हणजे कोणती व्यक्ती एखादा प्रयोग करून पाहतेय, यावर त्याचं अनुमान अवलंबून नसतं.

आमचे एक ज्योतिषी मित्र खूप प्रामाणिक आहेत. ते म्हणाले की ज्योतिष सांगणार्‍याचीही कुंडली अनुकूल हवी, त्याचा चंद्र (?) त्यावेळी तमुकात हवा असतो. असे सगळे योग जुळून आले की भविष्य सांगणे उचित असते. अन्यथा नाही.

<<समर्थ रामदास लोकांना एकदाच राम नाम जपायला सांगायचे, लोक ते ऐकायचे आणि खरोखर आयुष्यभर जप करायचे.>

गमभन

तुम्हाला काय माहित? तुम्ही होतात रामदासांच्या काळात?

<<आणि शेवटी, केअशु - डँग! अरे मी इथे तुमच्यासाठी एकहाती किल्ला लढवतोय आणि तुम्ही त्या सुहास गोखल्यांचं उदाहरण देऊन गडाचे दरवाजे उघडुन देताय? (दरवाजा उघडा असुनहि शिड्या लावतायत तो भाग अलाहिदा) याला तुमचा नाइवनेस म्हणु कि फितुरी?>>

नाही राज, कृपया गैरसमज नको.
धाग्याचा मूळ उद्देश संशोधनाला प्रेरणा मिळून हे घडतं कसं या मागचा शोध घेणं हाच आहे.इथले विरोधक मी ज्योतिषाला विज्ञान म्हणा तरच खरं असं मी म्हणत असल्याचं सिध्द करु पाहतायत. जे की नाहीये.

सुहास गोखले यांनी प्रयत्न केलेत एवढेच सांगायचंय.अगदीच पुस्तकी,ग्रंथिक स्तरापुरता हा विषय राहिलेला नाही हे सांगण्यासाठी ही माहिती दिलीय.सुहास गोखले यांनी विज्ञानाचा आधार घेऊन काही गोष्टी शास्त्रीय पध्दतीने सिध्द होऊ शकतात का हे पाहण्याचा प्रयत्न केला.पण "सध्याच्या" विज्ञानाची तेवढी क्षमताच नाही.यामागे यंत्राच्या बुध्दिपेक्षा मानवी बुध्दी अधिक प्रगत आहे हे सांगण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.किंबहुना भाकित करण्याच्या मानवी क्षमतेइतकी तोलामोलाची यंत्राची बुध्दिमत्ता नाही म्हणजेच विज्ञान निदान याबाबत सध्या तरी मागे आहे हे सांगण्याचा गोखले यांचा प्रयत्न आहे.पण मशिनला मानवी बुध्दिपेक्षा जास्त महत्व देऊन त्यातून उलटाच म्हणजे मानवी बुध्दीच कमी पात्रतेची आहे असा निष्कर्ष काढून कोणी आपल्याच विश्वात आनंदात चित्कारत असेल तर त्याला आपण काय करणार?

<<मुद्दा समजुन न घेता असंबद्ध बाबींचा दाखला देऊन तो खोडुन काढण्याचा केविलवाणा प्रकार चालला आहे.>>

हे मी कधीच अोळखलंय.म्हणून मी सुध्दा विरोधकांना उत्तरं देणं थांबवलं होतं.विचार पूर्वग्रहदूषित असू नयेत,अनाभ्यासाने मते बनवू नयेत असं सुरुवातीला लिहिण्यामागे उद्देशही तोच होता.
विरोधकांना सतत उत्तरे देऊन फक्त ऊर्जा संपेल.बाकी काही नाही.कारण त्यांचं ठरलेलं आहे."काहीही होऊ दे विरोधच करायचा."

दुसरं असं की विरोधक संशोधन,डेटा यांचे पुरावे मागतायत.ज्योतिष हे थोतांड म्हणतात.पण माबोने आख्खा विभागच उघडलाय ज्योतिषाचा.त्यावर यांचं काहीच उत्तर नाही.विरोध करायचा तर तो सगळीकडे हवा.आपल्याला माबोवरुन उडवतील म्हणून तर ही दुटप्पी भुमिका नसेल विरोधकांची?

अरे काय चाललंय काय? एक व्यक्ती इथे मनाला येईल ते दावे करतोय, त्याला पुरावे मागितले फक्त. तर इतका झंझनाट?

उगाच बालिशपणे आकांडतांडव करून आपलं हसू करून घेताय केअशु...

ज्योतिष हे थोतांड म्हणतात.पण माबोने आख्खा विभागच उघडलाय ज्योतिषाचा.त्यावर यांचं काहीच उत्तर नाही.>>>>

माबो वर विभाग असणे म्हणजे एखाद्या गोष्ट खरी असण्याचा पुरावा असतो हे आजच कळले.

साहेब, माबो ही कमर्शिअल साईट आहे, जितक्या हिट्स जास्त तितके चांगले, त्यामुळे सामान्य लोकांना आवडणाऱ्या, उत्सुकता असणाऱ्या सगळ्या गोष्टींचा विभाग, धागे सापडतील.
कोणते विभाग काढावेत हे मालकांच्या मनावर आहे, उद्या त्यांची खिट्टी सरकली आणि त्यांनी " गुलबकावली चे फुल आणताना आलेले अनुभव " असा विभाग काढला तर तो गुलबकावली अस्तित्वात असण्याचा पुरावा समजणार का?

लेटेस्ट प्रतिसाद अगदीच लोलवा आहे.
१. संशोधनांला प्रेरणा मिळावी म्हणून लिहिली.
२. ज्योतिष हे विज्ञान आहे असं मी म्हटलंच नाही.्
३. विज्ञान म्हणजे मानवी मेंदूचं काम य़त्राने करणं.
Rofl

>>नाही राज, कृपया गैरसमज नको.<<

गैरसमज नाहि हो, थोडी गंम्मत केलेली. माझा खोडकर प्रतिसाद राइट स्पिरिटमध्ये घेऊन त्यावर टोन्ड डाउन उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद.

वंदन, मी हुशार वगैरे नाहि परंतु गोफरच्या काळापासुन इंटरनेट वाद हँडल करण्याचा अनुभव मात्र गाठीला आहे. फरक एव्हढाच कि गोफरवर बहुतांशी टेक्नीकल टॉपिक्स्वर वाद झडायचे पण आता तर कुठलाहि विषय चालतो. त्यामुळे तुमचा सल्ला (उपरोधिक असला/नसला तरीहि) अवलंबायचा प्रयत्न नेहेमीच असतो. या निमित्ताने तुमचेहि आभार मानतो... Happy

Pages