हे घडतं कसं?

Submitted by केअशु on 16 January, 2018 - 09:58

या पोस्टचा विषय ज्योतिषशास्त्र असला तरी ज्योतिष आणि विज्ञान यांचा संबंध तपासण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे.त्यातून काही मार्गदर्शक किरणे मिळाल्यास त्यादृष्टीने अधिक संशोधन करता येईल.

खालील चर्चेत सहभागी होण्यासाठी ज्योतिषशास्त्राचा थोडाफार अभ्यास गरजेचा आहे.किमान पूर्वग्रहदूषित,अनाभ्यासाने बनलेली मते नसावीत.

ज्योतिषशास्त्रातल्या काही गोष्टींचा(सर्वच नव्हे!)
प्रत्यय बर्‍यापैकी येतो.

उदाहरणार्थ,

१.धनु राशीचा जातक बर्‍यापैकी उंच आणि तब्येतीनं दणकट असा असतो.निदान या दोन्हीतलं एकतरी असतोच.पण उंचीही कमी आहे आणि तब्येतीनं देखील किरकोळ आहे असा धनु राशीचा जातक सहसा मिळणार नाही.

२.रेवती नक्षत्रावर जन्मलेला जातक हा उंचीने कमी शरीराने स्थुल,दिसायला चांगला,गोरा असा असतो.

३.जन्म किंवा लग्नरास मेष असेल तर दात थोडेतरी पुढे आलेले असतात.

४. पत्रिकेत द्वितीय स्थानात केतु असेल तर दातांचा आजार,विकार असतोच.

५. तूळ लग्न असेल तर डोळे काहीसे मोठे व नाकही मोठे,टोकदार असते.

६. तूळ लग्न असेल तर कपड्यांचा(पोषाख)सेन्स चांगला असतो.

७. दशम स्थानात हर्षल असेल तर बर्‍याचदा पितृसुख फार काळ मिळत नाही.तसेच व्यक्ती इलेक्ट्रिक किंवा इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात काम करणारी असू शकते.

८. शुक्र-मंगळ एकाच घरात असतील तर प्रेम जुळण्याची शक्यता दाट असते.यातून विवाह होईलच हे निश्चित सांगता नाही येणार पण असा योग असणार्‍याच्या प्रेमात एखादीतरी भिन्नलिंगी व्यक्ती कधी ना कधी पडतेच!

९. कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे.चंद्र धारिष्ट्य देत नाही.शिवाय ही जलराशी आहे.त्यामुळे राग आला तर कर्क राशीच्या लोकांचा संयम पटकन् सुटतो.अशावेळी ते फटकळपणे बोलून रिकामे होतात.

१०.जन्म किंवा लग्न रास कर्क असेल तर वैद्यकीय क्षेत्रात किंवा वैद्यक शास्त्राला सहाय्यभूत अशा क्षेत्रात चांगलं करिअर होतं.(उदा.MR,Pharma मधील नोकरी)

"ज्योतिष हे शास्त्र नाही थोतांड आहे असं काही लोक म्हणतात.किमान ९०% वेळा प्रत्यय येणारे साधेसोपे ठोकताळे वर दिले आहेत.हे शास्त्र नसेल तर यातल्या एकाही भाकिताचं प्रत्यंतर येता कामा नये;पण वरच्या बर्‍याचशा ठोकताळ्यांमधून ज्योतिषशास्त्र नावाचं जे काही आहे ते काही अंशी खरं असावं हे पटतं.जन्मवेळ,जन्मतारीख,जन्मठिकाण या तीन गोष्टींचा यासाठी उपयोग केला आहे.जगाच्या कोणत्याही ठिकाणी याचा समान प्रत्यय येतो.

जर तसं असेल तर एका गोष्टीवर सांगोपाग चर्चा व्हावी की कोट्यावधी मैलांवरुन ग्रह एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील घडामोडी किंवा वर दिल्याप्रमाणे शरीराचं विशिष्ट रुप कसं काय ठरवतात? एकाच घरात दोन व्यक्तींपैकी एकाला गुरुची महादशा सुरु असेल आणि दुसर्‍याला साडेसाती सुरु असेल तर गुरुदशेतील व्यक्तीची बरीचशी कामे सहज होतात आणि साडेसातीवाल्याला अडथळे येतात.

या ग्रह,नक्षत्रांकडून येणार्‍या लहरी कोणत्या असतात?एखाद्या अरुंद गल्लीत काहीवेळा प्रकाश,वारा,मोबाईलचं नेटवर्क नसतं पण राशीनुसार बरे वाईट परिणाम मात्र मिळत राहतात.हे कसं काय? अशा अरुंद ठिकाणीसुध्दा या लहरी कशा काय पोहचतात?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

केअशुंना ज्योतिष संशोधन करण्यापेक्षा आणि ते शास्त्र आहे हे सिद्ध करण्यापेक्षा वादविवादातच अधिक रस दिसतोय. नाहीतर त्यांनी मेघपाल यांच्या व्यतिरिक्त इतरही प्रतिसादांची दखल घेतली असती.

तसं नाही भरत,

ज्या विज्ञानाच्या जोरावर हे विरोधक भांडतायत ते पूर्ण ताकदीचं आहे का?आज सिध्द होत नाही म्हणून उद्याही सिध्द होणारंच नाही अशी दर्पोक्ती इथे विरोधकांमधे दिसतेय.
मी वर नागरत्ना हेगडेंचं उदाहरण दिलंय.त्या विज्ञान संशोधक असूनही त्यांनी ज्योतिषशास्त्राचा आधार घेतलाय.कालचं विज्ञानिक तत्व उद्या तसंच राहिल असंही नाही.त्याचीही दोन उदाहरणं दिलेत वर.

विरोधकांना एवढा त्रास होत असेल तर ए पी जे अब्दुल कलाम हे सत्यसाईबाबांना भेटायला का गेले? त्यांनी केलेल्या समाजसेवेबद्दल कौतुक करायला असेल तर सत्यसाईबाबांनी ज्या हातचलाख्या करुन भारुन टाकून भक्त जमा केले त्या भक्तांच्या पैशातूनच सगळी समाजसेवा केलीय.म्हणजे समाजसेवेसाठी पैसा कुठून आला.लोकांच्या फसवणूकीतून.यांचं कौतुक कलामांसारख्या शास्त्रज्ञानं करावं हे आक्षेपार्ह नाही का?

अजून एक कोणीतरी शास्त्रज्ञ भारतानं मंगळावर यान सोडण्यापूर्वी बालाजीला जाऊन आले होते.जे आक्षेपार्ह नाही का? हे लोक तर इथल्या विरोधकांपेक्षा विज्ञानाशी अधिक जवळचे होते.मग त्यांनी असं का केलं?

इथले विरोधक कलामांपेक्षा जास्त विज्ञान जाणतात का?

यांचं कौतुक कलामांसारख्या शास्त्रज्ञानं करावं हे आक्षेपार्ह नाही का? >> हे चुकीचे आहे
अजून एक कोणीतरी शास्त्रज्ञ भारतानं मंगळावर यान सोडण्यापूर्वी बालाजीला जाऊन आले होते.जे आक्षेपार्ह नाही का? >>हे चुकीचे आहे
वरच्या कोणी या गोष्टी चुकीच्या नाही असे म्हटलेय का?

इथले विरोधक कलामांपेक्षा जास्त विज्ञान जाणतात का? >> म्हणून त्यांनी केलेले सगळेच बरोबर का? जे चुक ते चुक म्हणणे का जड पडावे? व्यक्तीपूजा करणे चुकीचेच आहे.

<आज सिध्द होत नाही म्हणून उद्याही सिध्द होणारंच नाही अशी दर्पोक्ती इथे विरोधकांमधे दिसतेय.> एखादी गोष्ट उद्या सिद्ध होऊ शकेल, म्हणून विज्ञान त्यावर विश्वास ठेवा असं विज्ञान सांगतं का?
त्यांचा स्टँड हा आहे, की आधी सिद्ध करा, मग विज्ञान म्हणून दावा ठोका. त्यात मला काही वावगं दिसत नाही
विज्ञानातला कोणताही सिद्धांत पडताळून पाहता आला पाहिजे. तो चुकीचा आहे हे सिद्ध करता येण्याची सोय त्या सिद्धांतात असायला हवी. म्हणजे त्या सिद्धांतात न बसणारी गोष्ट आढळली तर तो सिद्धांत चूक आहे , त्यात सुधारणेला वाव आहे, असं मान्य करायची तयारी असते.
आपल्याल माहीत झालेलं ज्ञान अंतिम आहे, हा विज्ञानाचा दावा नसतो. पण जे अजून सिद्ध झालेलं नाही, ते सत्य आहे हे अमान्यच असतं.
(हे खूप ढोबळमानाने लिहिलंय)

ज्योतिषाला जर विज्ञानाची कसोटी लावायची तर
१. कार्यकारणभाव सांगता आला पाहिजे.
२. एकाच पत्रिकेवरून वेगवेगळ्या लोकांनी सारखंच भविष्य सांगायला हवं. (यातल्या वेगवेगळ्या स्कूल्सना वाव देऊन)

>>इथले विरोधक कलामांपेक्षा जास्त विज्ञान जाणतात का?
इथले डॉक्टर/सर्जन नक्कीच कलामांपेक्षा जास्त शरीरविज्ञान जाणतात. कलाम म्हणजे देव नव्हेत, त्यांच्याही चुका होऊ शकतात/होतात.
विज्ञानावर माझी काय कोणाचीच मक्तेदारी नाहीये. तुम्ही संशोधन करा, त्याचे निष्कर्ष प्रसिद्ध करा, बाकीच्यांना तुमचे निष्कर्ष आणि तुमच्या संशोधन पद्धती तपासु दे, त्यावर चर्चा/टीका होउदे आणि यातुन तावुन सुलाखुन निघेल ते आपसुकच विज्ञान म्हणुन मान्यता पावेल.
काही दिवसांपुर्वी इथे डॉ. बावसकरांनी कोकणात विंचुदंशावर एकट्याने केलेल्या संशोधनाचा लेख कोणी दिलेला. या संशोधनानंतर विंचुदंशाने मरणार्‍या लोकांचं प्रमाण कित्येक पटीने कमी झालं. सिद्ध झाल्यास ज्योतीषाचा फायदा अब्जावधी लोकांपर्यंत पोहोचु शकतो. हजारो ज्योतिषी इकडेतिकडे बागडत असताना असं ठोस संशोधन एका कडुनही होऊ नये??
नंतर कधीतरी सिद्ध होऊ शकेल म्हणुन आज जो स्पष्ट मुर्खपणा दिसतोय त्याला विरोध करुच नका या आर्ग्युमेंटला काय अर्थ आहे?

एकदा सहज यांच्या व्हाट्सअप ग्रुपवर राहू केतू हे कुठले ग्रह म्हणून प्रश्न विचारला तर एखादा गुन्हा केल्यासारखे हे ज्योतिष्यतज्ज्ञ माझ्या अंगावर आले, एव्हडा साधा गोष्ट तुम्हाला कळत नाही का? एव्हडे अज्ञानी कसे तुम्ही असे टोमणे मारले यांनी मला. एक महाभाग होता तो दर आठवड्यात एक मेसेज टाकायचा मनशांती की कसल्या कोर्सचा फी 100 रुपये सांगायचा, त्याच्याविरोधात जर जरी काही कोणी बोललं तर भडकायचा, हा माणूस काय शांती देणार दुसऱ्यांना. लोकांच्या मनात भीती घालून अमुक तमुक ग्रहाची शांती करायला सांगायची आणि पैसे उकळून घ्यायचे या बेसिसवर हे शास्त्र उदयाला आले.

कल्पतरु,
चिल्लर प्रश्न विचारले तर कोणीही चिडेलंच. टाईमपास अंगलट आला दुसरं काय?

<<लोकांना घाबरवून त्यांच्या मेहनतीचं पैसे उकळवताना लाज कशी नाही वाटत या लोकांना>>

लोक का घाबरतात? विज्ञान धाडसी बनवण्यात कमी का पडतं? कोणत्याही ज्योतिषाकडे जातक स्वत: जातो. ज्योतिषी जातकाच्या डोक्याला पिस्तुल टेकवून थोडेच पैसे वसुल करतो? शिवाय ज्योतिषी जी सेवा देतो त्याचे पैसे घेतो. जसं तुम्ही नोकरी,व्यवसाय करुन मिळवता तसेच; की तुम्ही फुकट काम करुन देता? कष्टाचे पैसे घ्यायला लाज का वाटावी?

वेल वेल वेल. "बाप दाखव नाहितर श्राद्ध कर" हि अ‍ॅटिट्युड एखादी कल्पना जोम धरायच्या आधिच निकालात काढली जाते; इथे तसाच नाहि पण जवळपास जाणारा प्रकार चाललेला आहे.

ज्योतिष शास्त्र आहे कि नाहि वगैरे वाद थोडावेळ बाजुला ठेवु. माझा स्वतःचं अ‍ॅनलिटिकल बॅकग्राउंड नेहेमीच मानत आलेलं आहे कि ज्योतिष सांगण्याच्या काहि पद्धती (कुंडली काढणे सोडा, ते ऑल्रेडी काँप्युटरवर होतंय) मॉडेल करुन त्यांचं संगणिकिकरण करणं सहज शक्य आहे. ज्या कोणाला थोडंफार अ‍ॅनलिटिक्सचं ज्ञान आहे, त्यांना मी काय म्हणतोय हे समजायला कठिण जाउ नये. शेवटी ज्योतिष हे एका फिक्स डेटा (जन्म तारीख्/वेळ्/स्थळ) आणि तत्सम पॅरामिटर्सवर भाकित करते. आता ज्योतिष थोतांड आहे अशी बोंब लोकं का मारतात, तर त्याची कारणं पुढील प्रमाणे असु शकतात -
१. सध्यातरी हे पॅरामिटर्स (ग्रह/तारे, त्यांचं भ्रमण इ.) शास्त्राच्या कसोटीवर तावुन-सुलाखुन निघालेले नाहित
२. समाजात अभ्यासु ज्योतिषांपेक्षा कुडमुड्या ज्योतिषांचा सुळसुळाट भरपुर आहे
३. सर्वसामान्य लोकांच्या ज्योतिष विषयी असलेल्या अवाजवी अपेक्षा (ज्योतिषाचं काम मार्ग दाखवणे, सुचना देणॅ. अंतीम परिणाम सांगणे नाहि)

तर सांगायचा मुद्दा हा कि, ज्योतिष हे डोमेन एखादा चांगला अभ्यासु ज्योतिषी (एसएमइ) आणि टेक्निकल टीम्च्या मदतीने अ‍ॅडवांस्ड अ‍ॅनलिटिक्सच्या मदतीने मेनस्ट्रीममध्ये वापरात आणले जाउ शकते. काहिंना आश्चर्य वाटेल पण त्या दिशेने नावाजलेल्या विध्यापिठातुन प्रयत्न/संशोधन होत आहेत.

आज उपलब्ध असलेला एआय्/अ‍ॅडवांस्ड अ‍ॅनलिटिक्स प्लॅट्फॉर्म माझ्या वयावरुन, लोकेशन वरुन मी काय करावं, कुठे जावं, कसं जावं, काय खावं इ. अनेक पर्याय सुचवतो (मार्ग दाखवतो) पण शेवटी निर्णय मलाच घ्यायचा असतो. याच फाउंडेशन्वर उध्या मला भविष्यातल्या आजाराचे, आर्थिक गुंतवणुकींचे, व्यवसाय/नोकरी मार्गदर्शनाचे अलर्ट्स आले तर मी त्याला ज्योतिषी सल्ला समजु शकतो का? सध्याचं ज्योतिषशास्त्र यापेक्षा वेगळं काय सांगतं?.. Wink

>>सध्यातरी हे पॅरामिटर्स (ग्रह/तारे, त्यांचं भ्रमण इ.) शास्त्राच्या कसोटीवर तावुन-सुलाखुन निघालेले नाहित

तात्या, हाच तर मूळ मुद्दा आहे.

>>सध्याचं ज्योतिषशास्त्र यापेक्षा वेगळं काय सांगतं?.

कुठली पद्धत वापरून सांगतं यावर काय सांगतं याची अचूकता ठरणार ना. तुम्ही चालले पोपट वाल्याला ऍडव्हान्स ऍनालिटिक्स चा दर्जा द्यायला

>>तुम्ही चालले पोपट वाल्याला ऍडव्हान्स ऍनालिटिक्स चा दर्जा द्यायला<<

मी वर म्हटलंय कि ज्यांना अ‍ॅनलिटिक्सचं थोडंफार ज्ञान आहे त्यांना माझा पॉइंट समजेल. पोपट वाल्याचा उदाहरण इथे आणुन माझा पॉइंट सिद्ध केल्याबद्दल आभार.

ज्योतिष आणि अ‍ॅनलिटिक्सचा बेस कोरिलेशन आणि कॉजेशन वर आहे. या दोन्हिंचं बेसिक ज्ञान असणार्‍यांना माझा मुद्दा पटणं जड जाउ नये...

लोकांच्या भाबडेपणाचा फायदा उचलून त्यांना लुबाडणाऱ्या लोकांना मे महिन्याच्या भर दुपारी गर्दीच्या चौकात आणि सगळ्या ग्रहांच्या किरणात चाबकाने फटकवला पाहिजे. म्हणजे ताळ्यावर येतील हे लोक.

{अनेक पर्याय सुचवतो (मार्ग दाखवतो) पण शेवटी निर्णय मलाच घ्यायचा असतो. ...... सध्याचं ज्योतिषशास्त्र यापेक्षा वेगळं काय सांगतं?..}
पोपटवाला पण मार्ग दाखवतो पण शेवटी निर्णय तुम्हालाच घ्यायचा असतो. तो यापेक्षा वेगळं काय सांगतो? पण त्याचं उदाहरण दुखतं.

एकीकडे तुम्ही म्हणता ग्रह/तारे, त्यांचं भ्रमण इ पॅरामीटर शास्त्राच्या कसोटीवर तावुन-सुलाखुन निघालेले नाहित, दुसरीकडे दावा करता की ज्योतिषचा बेस कोरिलेशन आणि कॉजेशन वर आहे. पण कसलं कॉजेशन यावर अळी मिळी गुप चिळी. उगाच कुठेतरी ऐकलेले टेक्निकल टर्म्स फेकायचे आणि स्व:ताच्या आरग्यूमेंट मधला विरोधाभास दाखवला की दुसऱ्यालाच पुरेसं ज्ञान नाही अशी पळवाट काढायची.

ज्याला थोडी अक्कल आहे त्याला माझं म्हणणं लगेच कळेल पण इगो हर्ट झाल्याने तुम्ही चुकीचंच घोडं दामटत राहणार हे माझं प्रेडिक्शन. Lol

पुन्हा एकदा केअशुंनी भांडायची सोय असेल तेच प्रतिसाद निवडलेत.
मी पुन्हा एकदा सांगतो, ज्योतिष हे विज्ञान आहे अशी मान्यता मिळवायची असेल, तर ती वादविवादांतून मिळणार नाही (गेले ते दिन कधीच गेले, जेव्हा वादविवादात जिंकून आपल्या थियरीला मान्यता मिळवता यायची)
त्यासाठी तुम्हाला वैज्ञानिक संशोधनाची सर्वसामान्य पद्धतच चोखाळावी लागेल. मला वाटतंं, शंतनू यांनी लिहिलंय त्याबद्दल. राज यांनीही वाट दाखवलीय. त्याला एक पुस्ती - तुम्ही जे साधन वापराल (कुंडली, हस्तरेषा, इ. त्यावरून भविष्यासोबतच जातकाच्या भूतकाळाचाही थांग लावता येतो का, हे पाहणं सोपं असावं).
तुमचे प्रतिसाद वाचून तुम्हाला विज्ञानाबद्दल फार माहीत नाही आणि ज्योतिषाबद्दलही, असा माझा ग्रह होऊ लागलाय.

मला या दोहोंबद्दल फार माहीत आहे, असा माझा दावा नाही. पण जेवढं वाचलंय आणि त्यातलं जेवढं कळलंय, त्यावरून तरी मला असंच वाटतंय.

राहुकेतू म्हणजे कोणते ग्रह हा फालतू प्रश्न आहे आणि ग्रहतारे आपल्या आयुष्यावर परिणाम करतात (त्यांचे किरण बिरण) किंवा त्यांच्या स्थिती आपल्या आयुष्यातल्या घटनांची निर्देशक असते ही दोन्ही वाक्ये एकाच मुशीत कशी बसवायची?

कल्पतरु,

तुमची कोणतीतरी समस्या लाख प्रयत्नांनी सुध्दा न सुटल्याने तुम्ही ज्योतिषाकडे गेला असाव्यात.पण तिथूनही मनासारखं समाधान न मिळाल्याने जळफळाट होत असावा.तुम्हाला गुण आला नाही म्हणजे इतरांना येणार नाही असं थोडीच आहे?प्रत्यक्षात ज्योतिषांना मारणं काही शक्य होणार नाही तुम्हाला.तस्मात घरात एखादी पंचबॅग अडकवून त्यावर ठोसे मारावेत.राग शांत होईल.

दत्तु,

आधीही सांगितलं.परत सांगतो,
एवढं असेल तर माबोला हा ज्योतिष विषयक विभागंच का बंद करायला सांगत नाही?
तुम्ही म्हणता ज्योतिष हे शास्त्र नाही.ठिक आहे.मग ते कला या प्रकारात येतं का? पण तुमच्यामते लोक ज्योतिषामुळं नागवले जातात.कलेमुळे आनंद मिळायला हवा.नागवंलं जाता कामा नये.म्हणजे ज्योतिष ही कलाही नव्हे.मग ज्योतिष आहे तरी काय? थोतांड आहे का? तसं असेल तर स्वतंत्र विभाग उघडून माबो या थोतांडाला मदतच करत नाही का? माबोवर ज्योतिषविषयक पोस्टला परवानगी आहे म्हणून हा विषय मांडला.ज्योतिष शास्त्र नाही,कलाही नाही.मग माबोच्या ज्योतिष विभागामुळे लोक नागवले जाण्याला मदत होत असली पाहिजे.त्यामुळे आधी माबोलाच का नाही सांगत हा विभाग बंद करायला? समाजाला शहाणं करण्याची सुरुवात तिथूनच का नाही करत?

जमणाराय का दत्तु हे तुम्हाला?

<या ग्रह,नक्षत्रांकडून येणार्‍या लहरी कोणत्या असतात?एखाद्या अरुंद गल्लीत काहीवेळा प्रकाश,वारा,मोबाईलचं नेटवर्क नसतं पण राशीनुसार बरे वाईट परिणाम मात्र मिळत राहतात.हे कसं काय? अशा अरुंद ठिकाणीसुध्दा या लहरी कशा काय पोहचतात??>

हे कधी आणि कसं शोधून काढणार? सिद्ध करणार?

आधीही सांगितलं.परत सांगतो,
एवढं असेल तर माबोला हा ज्योतिष विषयक विभागंच का बंद करायला सांगत नाही?
तुम्ही म्हणता ज्योतिष हे शास्त्र नाही.ठिक आहे.मग ते कला या प्रकारात येतं का? पण तुमच्यामते लोक ज्योतिषामुळं नागवले जातात.कलेमुळे आनंद मिळायला हवा.नागवंलं जाता कामा नये.म्हणजे ज्योतिष ही कलाही नव्हे.मग ज्योतिष आहे तरी काय? थोतांड आहे का? तसं असेल तर स्वतंत्र विभाग उघडून माबो या थोतांडाला मदतच करत नाही का? माबोवर ज्योतिषविषयक पोस्टला परवानगी आहे म्हणून हा विषय मांडला.ज्योतिष शास्त्र नाही,कलाही नाही.मग माबोच्या ज्योतिष विभागामुळे लोक नागवले जाण्याला मदत होत असली पाहिजे.त्यामुळे आधी माबोलाच का नाही सांगत हा विभाग बंद करायला? समाजाला शहाणं करण्याची सुरुवात तिथूनच का नाही करत?>>>>>>>

हे नागावले जाते कुठे लिहीले बरं? जरा दाखवा आजकाल लोकांना जास्त दिसू लागले वाटते
दुसरीगोष्ट मायबोलीवर कुठला विभाग काढायचा कुठला नाही हे वेमा ठरवतात मी नाही ही माहीती टाळक्यात ठेवा.

तुम्हाला निष्कर्षाचा बेस विचारल्यावर भाजप प्रवक्त्यांसारखे मुद्दा दुसरीकडे का नेत आहे?

एक तर तुमच्याकडे उत्तर नाही अथवा तुम्हाला बोलबच्चन खेरीज दुसरे काही जमत नाही या निष्कर्षावर मी आता पोहचत आहे. एक उदाहरण घेऊन त्याचा बेस इतर काही उदाहरण मध्ये कसे वापरतात हे मुद्देसूद सांगायचे सोडून तुमची अवांतर पोपटपंची (हा शब्द ज्योतिषी लोकांमुळे निर्माण झाला असेल) सुरू आहे.
डाटा अॅनॅालिसिस या प्रकारात ठोस बेस असतो ज्यावर अंदाजाचे ठोकताळे बांधले जातात. फक्त मनात येईल म्हणून बोंब मारत नाही.

तुम्हाला पोपटपंची पेक्षा काही अतिरिक्त येत असेल तर लिहून सिध्द करा... नाहीतर पोपट विकत घ्या

विरोधकांनी वरील फोटोतील ठिकाणी जाऊन विरोध करुन दाखवावा.सांगावं तिथे अरे बाबांनो हे थोतांड आहे म्हणून.बघू जमतंय का!

ओके. तुम्हाला ज्योतिष हे विज्ञान आहे हे सिद्धबिद्ध करायचं नाहीए हे लक्षात आलं. करता येणं शक्य नाहीए, हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे; हे कळलं.
खूप वेळ वाया घालवला इथे.

संशोधन आणि सिद्धता बाजूला राहू द्या आधी तुम्ही सूर्याला ग्रहांच्या पंगतीतून उठवून ताऱ्यांच्या पंगतीला बसवा. एव्हडी बेसिक गोष्ट आधी करा नंतर हे घडतं कसं विचारा.बेत बादशहाचा आणि दुकान फुटाण्याचा अशी गत झाले या लोकांची. हे काय सिद्ध आणि संशोधन करणार .फावला वेळ मिळाला कि असे टाईमपास म्हणून धागे काढायचे आणि चार पुस्तकातून दोन ओळी वाचून दाखवायच्या आणि कंटाळा आला कि दुपारी मस्त जेऊन तीच चार पुस्तके डोक्याखाली घेऊन मस्त ताणून द्यायची.

लेखाचा उद्देश पुरता उघडा पडलाय, संशोधन करा म्हटल्यावर फक्त इकडच्या तकडच्या गप्पा मारत आहेत.
परत परत तेच लिहिण्यात काय अर्थ नाही.
शेवटचं सांगेन, पाहिजे तसे संशोधन करा आणि पुढे मांडा. त्या संशोधनाचा सर्व बाजूने अभ्यास होईल. ते सत्य असले तर पुढे येईल, पूर्ण सत्य नसले तरी काही बेसिस मिळेल, कुठे तरी एक लॉजिक सेट होईल, ज्यावर पुढचा अभ्यास सुरू होऊ शकेल, त्यांनन्तर मग असे प्रचारकी धागे काढा

ज्योतिष हे शास्त्र आहे म्हणताना, हा स्कोप फक्त कुंडलीपूरता मर्यादित आहे? की टॅरो कार्ड, अंक शास्त्र,हस्त सामुद्रिक, पायावरील रेषा, चहा पत्ती पाहून, रमल मांडून भविष्य वगैरे सगळे प्रकार यात मोजले आहेत?

प्रत्येक दशकाच्या सुरुवातीला माणसाला माहीत नसलेल्या ( आणि म्हणून दैवी समजल्या गेलेल्या )गोष्टींची यादी केली, आणि शतकाच्या शेवटीत्यातल्या मानवाला अवगत झालेल्या गोष्टी टिक ऑफ केल्या तर मानव देवाच्या जवळ सरकलेला दिसेल.दर दिवसागणिक माणूस जास्त जास्त औथोरिटी आपल्या हातात घेताना दिसतो.
आज शास्त्र म्हणून गणलेल्या सगळ्या गोष्टींमध्ये ही एक गोष्ट कॉमन आहे,

ज्योतिषा "शास्त्रा" मध्ये गेल्या दशकात, शतकात अशा टिक ऑफ झालेल्या गोष्टी कोणत्या?
शास्त्राला अमुक गोष्टी माहीत नाहीत हे नीट माहीत असेल तर त्या दृष्टीने शोध सुरू होतो.
आपल्याला अमुक गोष्टी माहीत नाहीत अशा गोष्टींची लिस्ट जागतिक पातळीवर तयार आहे का?

तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आज उत्तर देताना 100% ऍक्युरसी नाही आहे, शतकभरापूर्वी सुद्धा ती 100% नव्हती.
गेल्या शतकात कोणते नावे योग, ठोकताळे , पद्धत शोधली गेली ज्याद्वारे ही अचूकता वाढून आजच्या पातळीला आली?
या नवीन पद्धतीची विश्वासार्हता कोणत्या पद्धतीने तपासून पहिली, त्याचे काही डॉक्युमेंटेशन /पिअर रिव्युड पेपर वगैरे आहे का?

जर गेल्या काही दशकात या "शास्त्राची" ज्ञान पातळी सारखीच असेल तर एक तर हे परिपूर्ण शास्त्र असले पाहिजे (जे ते नाही कारण कित्येक प्रश्नांची त्याला उत्तरे देत येत नाहीत), किंवा मृत शास्त्र असले पाहिजे आणि तेही नसेल तर बनवाबनवी असली पाहिजे.

जर हे शास्त्र आहे असे जगभरातील लोकांना वाटते, तर वर म्हंटल्या प्रमाणे जागतिक पातळीवर असे मटेरियल उपलब्ध आहे का? की आधी हे शास्त्र आहे हे जाहीर करा, मगच आम्ही हे " संशोधन" करू असा दृष्टिकोन आहे?

प्रत्येक दशकाच्या सुरुवातीला माणसाला माहीत नसलेल्या ( आणि म्हणून दैवी समजल्या गेलेल्या )गोष्टींची यादी केली, आणि शतकाच्या शेवटीत्यातल्या मानवाला अवगत झालेल्या गोष्टी टिक ऑफ केल्या तर मानव देवाच्या जवळ सरकलेला दिसेल>>>>>

म्हणजे नक्की काय?

1. शतकाच्या सुरुवातीला जी गोष्ट दैवी वाटत होती ती गोष्ट त्याबद्दलचे ज्ञान मिळवून माणूस आता स्वतःच करू लागला असे असेल तर ती गोष्ट मुळात दैवी राहिलीच नाही. मग ती करणारा माणूस देव कसा होऊ लागला?

2. विज्ञानाच्या जवळ जाणाऱ्याने देव या कल्पनेवर विश्वास ठेवायचा नाही असा इथे मायबोलीवर लिखित संकेत आहे. इथे देव आहे का नाही या विषयावर धागे निघून त्यात वैज्ञानिक असूनही देवळात जाणाऱ्या, पूजा वगैरे कार्यक्रमात भाग घेणाऱ्या लोकांवर भरपूर कोरडे ओढले गेले आहेत. आता तुम्ही म्हणतात विज्ञान कळल्यामुळे माणूस देवाच्या जवळ जातोय.

दर दिवसागणिक माणूस जास्त जास्त औथोरिटी आपल्या हातात घेताना दिसतो.>>>>>>
माणसाला कसलीही औथोरिटी मिळालेली नाही. निसर्गातली कुठलीही गोष्ट अजून त्याला निर्माण करता येत नाहीय. मात्र निर्माण झालेली गोष्ट तोडून मोडून टाकण्याची कला त्याने हस्तगत केलीय. तोडून मोडून टाकल्यामुळे जे परिणाम होताहेत त्यावर त्याला नियंत्रण मिळालेले नाही. माणूस निसर्गात अजूनही क:पदार्थ आहे. कुठलाही नैसर्गिक कायदा त्याला बदलता आला नाही. हजारो वर्षे जिथे राहिला तिथले कायदे ओळखण्यात मात्र त्याने गेल्या पन्नास वर्षात भरपूर यश मिळवलंय. हे जे टिक ऑफ तुम्ही म्हणताय ते एवढेच आहे. बाकी 100 वर्षांपूर्वी ग्रहण राहुकेतूमुले लागते असे (भारतीय) माणसाला वाटत होते. आज ज्यामुळे ग्रहण होते ते सूर्य-पृथ्वी-चंद्र यांचे कायदे कळले. ह्या कायद्यात काडीचाही बदल करण्याची औथोरिटी त्याला अजून लाभली नाही.

Pages