प्रेमाचे गणित- 1

Submitted by navya on 8 January, 2018 - 00:58

गेली दोन वर्षे मी ही मायबोलीकर आहे, पण आजपर्यंत बाहेरूनच हे कथांचे जग बघत होते ..आज पहिल्यांदाच दरवाजा ओलांडून पलीकडे यायची हिम्मत करतेय आवडलं की नाही हे नक्की कळवा ।।।।

जग घुमिया थारे जैसा ना कोई .......
Ringtone ऐकली आणि नुकत्याच भरलेल्या जेवणाच्या ताटावरून वैभव उठला .
आत्ताच तर बोलून झालं ना, उद्याचं ही सगळं ठरलंय मग परत का phone केला असेल !!
विचारांच्या नादातच त्याने phone कानाला लावला
हा hello बोल..
Kay!!! अगं पण तू असं कसं म्हणू शकतेस आधीच आपण गेले दोन महिने भेटलो नाहीये।।
Hello ..ऐकून तर घे.. hello please hello
रागात phone तसाच बेडवर फेकून तो विचार करत बसला
तसं हे हल्ली नेहमीचंच झालेलं खूप मिनतवाऱ्या करून तीचं भेटायला तयार होणं आणि ऐनवेळी काहीतरी कारण देऊन ते cancel करणं...
प्रेमच काय तर कुठल्याही नात्याला पुरेसा वेळ नाही दिला तर ते कोमेजून जाते हे त्याचं ठाम मत .
Phone chat चालू असले तरी तिच्या डोळ्यात बघत, तिची बडबड ऐकत घालवलेला एक तास पण त्याच्यासाठी जास्त मौल्यवान होता।।
एका शहरात राहून पण तिची भेटायला टाळाटाळ करण्याचं कारण त्याला समजत नव्हतं...
तिच्यावर वैभवचं कितीही प्रेम असलं तरी नेहमी मीच का आणि किती समजून घ्यावं ही भावना त्याच्या मनात दिवसेंदिवस वाढणं तर स्वाभाविकच होते ...त्यांची भांडणं आणि नेहमी त्यानेच माघार घेऊन तिला समजावणे ह्याचा वैताग आलेला त्याला...
खास तीला आवडतो म्हणून उद्यासाठी white colour चा व्यवस्थित इस्त्री करून ठेवलेला shirt त्याला जणू चिडवत होता
ह्यावेळी काहीही झालं तरी मी फोन करणार नाही हे ठरवूनच तो बेडवर आडवा झाला..
नक्की काय चुकत गेलं, कुठे कमी पडलो मी तिच्या प्रेमात, जे सगळं गणितच चुकत गेलं हा विचार पुन्हा एकदा त्याच्या मनात उसळी मारू लागला.
आज पुन्हा एकदा तो भूतकाळात शिरून त्यांच्या प्रेमाचा हिशेब मांडत बसला
पण या सगळ्यात आज पुन्हा एकदा जेवणाचं ताट त्याची वाट बघत तसच पडून राहिले ...
क्रमशः....

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users