आम्हाला चांगले चित्रपट सुचवा ना!

Submitted by aschig on 16 March, 2009 - 02:36

(आशिष महाबळ LAMAL १२ एप्रील २००८ विषय: चित्रपट [२])

स्नेहसम्मेलनांमध्ये गप्पा-गोष्टि रंगल्या की विषय चित्रपटांकडे वळायला फारसा वेळ लागत नाही. ‘ह्रित्तिक रोशन आणि ग्रेटा गार्बो कित्ती छान दिसतात ना!’ (अर्थात वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये) नंतर कोणीतरी हमखास म्हणतं ‘आम्हाला सांगा ना काही छान चित्रपट’ आणि मग लगेच याद्या बनवल्या जातात. अशा याद्या वापरुन जे चित्रपट पाहिल्या जातात त्यात अनेकदा सडके आंबे जरी नाही तरी आंबट बोरं नक्कीच असतात. ते कसे टाळायचे हे सांगण्याकरता हा खटाटोप.

चांगल्या चित्रपटाची लक्षणं काय असे विचारल्यास, चांगली कथा, चांगले अभिनय, चांगले नट, चांगल्या नट्या, चांगली गाणी, चांगले लोकेशन्स अशा अनेक चांगल्या गोष्टि, व त्याबरोबरच वेगळी कथा, वेगळा अनुभव, वेगळा विषय अशी अनेक वेगळी अंग समोर येतात. समोरची व्यक्ति यातील नेमके कोणते मुद्दे पाहुन चित्रपट सुचवतेय हे यादी पाहुन कळण्याची सुतराम शक्यता नसते. त्याचबरोबर ‘चांगले’ व ‘वेगळे’ यांची वेगवेगळ्या लोकांची व्याख्या अगदिच वेगळि असु शकते. अनेक गोष्टिंचा त्यावर प्रभाव पडलेला असु शकतो. त्यांना ‘गोविंदा फ़नि वाटतो का’, ‘शाहरुख आवडतो का अमिर’ पासुन ते ‘ते ईंग्रजी माध्यमातुन शिकले आहेत की कन्नड मध्ये’, ‘त्यांच्या घरचे वातावरण कसे होते’, ‘त्यांनी कोणत्या लेखकांची कोणती पुस्तकं वाचली आहेत’, ‘ते ईंग्रजी सिनेमे सबटायटल्स सहित पहातात का’, ‘फावल्या वेळात ते काय करतात’, ‘मृत्युबद्दलच्या त्यांच्या काय कल्पना आहेत’ पर्यंतच्या गोष्टिदेखिल तुम्हाला माहित हव्यात.

एखाद्या चित्रपटाला जेंव्हा तुम्हि १ ते १० ई. गुण देता, तेंव्हा नकळत वरील सर्व गोष्टि त्यास हातभार लावुन जातात. त्याचमुळे नेटफ्लिक्स सारख्या ठिकाणी तुम्हि कोणत्या चित्रपटांना किति गुण दिले ते पाहुन ते तुम्हाला प्रत्येक चित्रपटाकरता २ आकडे देवु करतात. (१) इतरांनी त्या चित्रपटाला किति गुण दिले आणि (२) तुम्हि किति गुण द्याल असा त्यांचा कयास आहे.

तर इतरांचे फ़ेवरेट सिनेमे विचारण्याआधि एकतर त्यांचा पर्सनल ईंटरव्यु घ्या किंवा तुम्हाला आवडलेले चित्रपट त्यांना कसे वाटले हे चाचपडुन पहा.

अभिनंदन! या पुढे असा विषय जेंव्हा निघेल तेंव्हा तुम्हि अगदि तय्यार असाल.

गुलमोहर: 

हे पटले, ज्यांना सिनेमा सुचवायला सांगायचय त्यांच्या आवडीनिवडी बद्दल महिती असेल ते काय सुचवतील याचा अंदाज येतो. मी कुठल्या व्यक्तीने सिनेमा सुचवलाय यावरुन अंदाज घेते आणि ठरवते बघायचा की नाही किंवा काय अपेक्षा ठेवायच्या त्या सिनेमाकडुन . हाच नियम माझ्यामते पुस्तकांनापण लागु होतो.

मग इथे ही चांगले, वेगळे चित्रपट सुचवायचे का?

पटलं.
('अंदाज अपना अपना' न आवडलेले लोकही आहेतच :()
-----------------------------------
Its all in your mind!

दक्षिणा, भविष्य बाफ वर देतात त्याप्रमाणे जन्मवेळ, तारीख, जागा, शिक्षण ई. नमुद करुन जरुर तसे चित्रपट सुचवा Happy

--------------------------------------------------------------
... वेद यदि वा न वेद

अरे लोकांनी सुचवलेल्या सिनेमाची IMDB यंन्ट्री बघायची. बर्‍याचश्या गोष्टी समजतात. माणसाची आख्खी कुंडली बघण्यापेक्षा सिनेमाची कुंडली बघणं तिथे हे सोपं आणि पटकन होतं.

-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

नी,
>>IMDB यंन्ट्री << म्हणजे नक्की काय? जरा विस्कटून सांग...

अश्चिग - तुम्ही 'हरीभरी' पाहीलाय का? पहा... मला खूप आवडला होता. शबाना आझमी आणि नंदिता दास आहेत. फार अपेक्षा न ठेवता सीडी आणली होती, पण वर्थ किपिंग इन कलेक्शन.. असं मला वाटतंय...