ट्रम्प प्रशासन आणि भारतीयांच्या नोकर्‍या व त्यांचे भवितव्य

Submitted by अजय अभय अहमदनगरकर on 15 May, 2017 - 04:01

' आपल्या देशाचे बघा , जगाचे जाउ द्या तेल लावत ' या धोरणाला मिळालेल्या पाठिम्ब्यानुसार व त्या नवीन राजकीय सूत्रानुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या आश्वासनास कौल देऊन अमेरिकन नागरिकांनी त्यांना सत्ताधिष्टीत केले. प्रचारातही ट्रम्प काकांचे पत्ते उघड होते आणि त्याला जनमताचा कौल मिळाल्याने त्याचे पालन त्याना करायला काहीच अडचण नव्हती. त्यानुसार त्यानी हळूहळू नखे बाहेर काढायला सुरुवात केलेली आहेच.

त्यातले ' अमेरिका फर्स्ट ' या धोरणानुसार उपर्‍याना हळू हळू बाहेरचा रस्ता दाखवायचा, येणार्‍यांवर अधिक बंधने आणण्याचा अजेन्डा सुरूही झाला आहे. याचा नेमका तपशील काय आहे हे इथे तरी कळेनासे झाले आहे. भारतातले अनेक जण अमेरिकेत व्यवसाय, नोकर्‍या, उच्च शिक्षण या निमित्ताने आहेत, काही जातीलही. या सर्वांबाबत ट्रम्प महाराजांचे धोरण नक्की काय आहे. याबाबत तिथल्या लोकांकडून फर्स्ट हॅन्ड माहिती मिळवण्याच्या दृष्टीने हा धागा काढला आहे. कारण बरीच मुले पदव्युत्तर शिक्षणाचे तसेच जमलेच तर तिथेच करीअर करण्याचे प्लॅनिन्ग करीत आहेत ( हा आरक्षणाचा परिणाम आहे की नाही हा चर्चेचा विषय नाही Happy ) . त्यांच्या मनात संभ्रम झाला आहे नक्की. विशेष्तः सॉफ्ट्वेअर /आय टी क्षेत्राचे भवितव्य याबाबत संभ्रम आहे. त्यात विप्रो , इन्फोसिस या कंपन्यानी ले ऑफ द्यायला सुरुवात केल्याच्या बातम्या इथे प्रसिद्ध होत आहेत
सबब, ट्रम्प धोरणाचे ह काय गौड बण्गाल आहे, ऑन् साईट जॉब आणि अमेरिकन जॉब यासाठी वेगळे धोरण आहे का ? अगदी स्पष्टच विचारायचे म्हणजे तिकडच्या मंडळीना जॉब गेले म्हणून परत यावे लागणार आहे काय , याची कृपया जाणकार लोकांनी माहिती द्यावी ही विनन्ती.....

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एच१ आणि एच४ एअडी ह्यातली गोच समजणे खरेच इतकं कठिण आहे का? कि अग्दी स्वतःच्याच दुखःचे(?) गळे काढण्यात दंग असल्याने मुद्दे कळत नाहियेत (समजून घ्याय्चे नाहियेत) आणि अगदी व्यक्तिगत शेरे ते हि इतक्या खालच्या पातळीवर आणलेत.. शेपटावर पाय वगैरे अगदीच हिन शेरे आहेत. असे असेल तर ,मग चला तर 'एच४ एअडी' ला 'शिडी विसा' म्हणायला हरकत नाही जर शेपटावर पाय घातलाच आहे तर...

नोटः हे फक्त आणि फक्त "आयटी". मधीलच नाहिये. मी तरी आयटी मधले लिहित नाहीये.

मुळात म्हणजे, 'शिडी विसा' नोकरी करण्यास परवानगी देवून एच १ विसाचा परपज डेफीट होतोच. ते कसं ते खाली लिझितेय,

१)मूळात एच१ हा एक्स्क्लुसिव स्किल विसा आहे. अमेरीकेत येताना ठराविक मुल्यमापन करूनच त्यांना प्रवेश मिळतो. तर शिडी विसाला काहीच त्रास नाही. लग्न करा, या इथे. आहे ना तुमचे उच्च शिक्षण, मग करा ना तो एच१. आयत्या बिळावर नागोबा कशाला? एच१ अप्लायचा प्रवास सुद्धा मग कळेल. एच१ वर आल्यावर सुद्धा झुंज संपत नाही कारण सगळ्यांना अमेरीकेतील अनुभव हवा असतो. फारमा आणि रीसर्च कंपन्या पण जोर धरतात. ह्यातून गेल्यावर सुद्धा आता ह्या शिडी विसामुळे, नोकरी मिळणे कठिण झालेय.

कित्येक फारमा आणि रिसर्च मधील लोकांना जे एच १ वर आहेत, त्यांचे जॉब मिळणे मुश्किल झालेय. शिडी विसा हा कामचा अनुभव असो वा नसो पण त्यांना जॉन्ब मिळतो कारण, आता कंपन्याना स्वस्तात मजूर मिळतो शिडी विसामुळे. शिडी विसाचे मजूर हे प्रामुख्याने. "सेकंडरी अरनर " असतात त्यामुळे कमी पगार घेवून , सॅलरी रेंज खाली आणतात. सर्वे बघा. फारमा , आयटी ते रीसर्च मधील सॅलरी रेंज घटायचे प्रमाण.
२) कित्येक शिडी विसा वाले, सरळ सरळ वेगळ्ञा क्षेत्रातून येवून सुद्धा आयटीत घुसलेत. का तर पैसा म्हणून. घुसा ना, आमची ना नाही. पण अगदी घाण केलीय. सगळेच शिडी विसावाले असे नसले तरी केलेय ना असे.... आयटी मधील कारभार हा दुसरा विषय आहे पण बरेच सेक्टर पोळले आहेत शिडी विसाच्या कायद्याने.
मूळात म्हणजे, एच१ वाल्यांनी ब्र काढूच नये त्यांच्या त्रासाविषयी आणि काढलाच तर शेपटीवर पाय... हे कसेकाय/?
आणी शिडी विसावाल्यांनी आम्ही कसे भोगतोय हे अगदी बोलून दाखवावे. वा! छान.

३). जर शिडी विसा वाल्यांना नंतर ग्रीन कार्ड मिळत असेल जोडीदारामुळे तरी, त्यांचा प्रवास हा एझीच आहे. पण त्यांच्या अ‍ॅडीशन मुळे, कित्येकांची इएडी नंतरच्या स्टेपमधली ग्रीन कार्ड प्रोसेस लांबली आहे. एच १ इएडी ला पुन्हा एक्स्टेंशन मिळायला वेळ लागतोय. मग ए च१ ठेवावाच कशाला? सरळ फक्त जाहिर सागांयचे की, शिडी विसाच ठेवतो म्हणून.

४) एच४ आलेल्यांना जर नोकरी अथवा काम करायची असेलच तर, लेट देम गो थ्रू थ सेम प्रोसेस ऑफ सिलेक्शन लाईक एच१. नुसते लग्न झाले आणि आले की द्या एच४ इएअडी असे कशाला? कुठलेही मुल्यमापन न होता द्या कशाला हा आयता कामाचा विसा? जस्ट बिकाज जोडीदार लीगली "एच१ इएडी धारक" आहे म्हणून? इतकी 'हलकी" प्रोसेस कशाला?

घ्या ना एच४ वाल्यांची परीक्षा... त्यांची सुद्धा हुशारी बघा आणि मगच द्या नोकरी विसा... उलट तो परवलंबी विसा (एच४ इएडी हा जोडीदाराच्या लीगल स्टॅटस मुळे आहे) ठरणार नाही. द्या काहितरी नाव आणि वेगळी कॅटगरी म्हणून बघा ना. 'शिडी विसा' , 'एस विसा' म्हणून नाव द्या, एच१ वाल्यांना ढिम फरक पडत नाही. Wink एच १ वरील हा अन्यायच आहे असे डायरेक्ट इएडी शिडी वाल्यांना देवून.
सॅलरी रुल्स सुद्धा हवेतच. नाहितर सगळा अंधा धुंद कारभार आहे.
जर एच४ इएडी असेल तर मिनिमम वेजेस. इतके इतके.... ते सुद्धा कुठल्या शाखेत असेल तरच चांगलय.

हो, आणि इतका लढा दिलाय तर, सांगा ट्रंप काकांना की 'एस' विसा सुरु करून वेगळी ट्रीटमेंट द्या म्हणून. उगाच लोकं येडी आहेत म्हणून एच ४ इएडी बंद करताहेत असे आळत बसायचा मार्ग आहेच नाहितर.

बेकारी निर्देशांक ऐतिहासिक नीचांकी पातळीवर असताना हे पॉप व्हावं >> १००० मोदक.. सकाळपासून हे लिहायचं होतं पण थयथयाटात विसरून गेलो Proud
एकीकडे म्हणतात H4-EAD लोक माठ आहेत दुसरीकडे म्हणतात ते H1 वाल्यांची जागा घेतील.. एक पे रैना या तो घोडा बोलना या चतूर Lol

मला H1 वाल्या रडक्यासुरांच्या आख्यानाचे नेमके मर्म चांगले माहिती आहे. Wink

१) तीनेक वर्षे झाली... ग्रीनकार्ड फाईल झाले की हे लोक सेट होतात आणि मग पाट्या टाकू कामे करू लागतात.
२) ह्यांना नवीन ताज्या दमाच्या H1 लोकांशी कंपीट करण्यासाठी लागणारी मेहनत घेण्याची ईच्छा ऊरलेली नसते आणि एनर्जी तर त्याहून आजिबातच नसते.
३) आपले पाट्या टाकण्याचे राखीव कुरण सांभाळत ह्यांचे काम जेवढ्यास तेवढे चालू असते... कंपनीने ह्यांच्यावर बर्‍यापैकी ईन्वेस्टमेंट केलेली असल्याने (रिन्युवल, जीसी वगैरे) पुन्हा नव्या दमाचे H1 लोक आणण्याचा खर्च करण्यास कंपनीची तयारी नसते आणि ते कामही तेवढे महत्वाचे राहिलेले असतेच असे नाही... पुन्हा लीडींग एज टेक्नॉलॉजी नसल्यास नव्या दमाचे सजग 'पाट्या टाकू' मँट्यालिटी नसलेले लोक हे काम घेण्यास तयारही होत नाहीत .. म्हणून मग ह्यांचे धकून जाते. अमेरिकन लोकांचा पर्यायही ऊपलब्ध नसतोच.
४) मग जेव्हा H4-EAD सारखे काम करण्याची ईच्छा असणारे... कामाचा थोडाफार अनुभव गाठीशी असणारे आणि कामासाठी जरूरी असलेले शिक्षण मिळवलेले... ब्रेक थ्रू मिळावा म्हणून पगाराची घासाघीस न करणारे... कंपनीवर खर्चाचे ओझे न टाकणारे लोक ह्यांच्या पाट्या टाकू कामासाठी तयार होतात तेव्हा मात्र आपले राखीव कुरण धोक्यात आल्याने ह्यांचे धाबे दणाणते आणि थयथयाट चालू होतो.

एकदा का 'Skilled Labor' टॅग लाऊन अटलांटिक किंवा पॅसिफिक ओलांडला आणि आपले स्किल व मेहनतीवरचा विश्वास कायम जिवंत ठेवला तर मग H4 येवो नाहीतर Z40 येवो... कायकु रोना पडेंगा तुमको रे बाबा ?

मूळात एच-४ व्यक्तीस नोकरी करू द्यावी असे धोरण हवे. >> Amen!... Let it be a fair game..

हे वरचे रडक्यासुर H1 लोकांना ऊद्देशून लिहिले आहे जे तसे मोजके आहेत... बहुतांशी H1 होल्डर्स स्किल्ड, मेहनती आणि हुशारच असतात असाच अनुभव आहे.

कुठलेही मुल्यमापन न होता द्या कशाला हा आयता कामाचा विसा? >> इतर अनेक देशात जोडीदारास नोकरीची मुभा आहे. व्यक्ति तसेच कुटूंब हे समाजाचा एकक (युनिट) मानून धोरणे आखली जातात. जोडीदारास नोकरीची परवानगी न देण्याने कुटूंबावर आणि पर्यायाने समाजावर दूरगामी परिणाम होतात. उदा: एच-४ धारक अनेक वर्षे मेडिकेयर/सोशल इ. मध्ये पैसे न भरता नंतर हे फायदे आयते घेतात. त्यापेक्षा आता आयता कामचा परवाना देणे फायद्याचे आहे. अगदी किमान वेतनावर काम केले तरी हरकत नाही.

कित्येक फारमा आणि रिसर्च मधील लोकांना जे एच १ वर आहेत, त्यांचे जॉब मिळणे मुश्किल झालेय. शिडी विसा हा कामचा अनुभव असो वा नसो पण त्यांना जॉन्ब मिळतो कारण, आता कंपन्याना स्वस्तात मजूर मिळतो शिडी विसामुळे. शिडी विसाचे मजूर हे प्रामुख्याने. "सेकंडरी अरनर " असतात त्यामुळे कमी पगार घेवून , सॅलरी रेंज खाली आणतात. सर्वे बघा. फारमा , आयटी ते रीसर्च मधील सॅलरी रेंज घटायचे प्रमाण. >>> शिडी म्हणा बीडी म्हणा... ताडी माडी काहीही म्हणा... कायदेशीर मार्गाने आत आलेल्या सगळ्या अ‍ॅडल्ट्सना काम करण्याचा.. आपल्या अनुभव आणि शिक्षणाबर हुकूम काम करून प्रगती करण्याचा, कुटुंबाला हातभार लावण्याचा फेअर चानस द्या... हे न्याय्य बोलणे समजणे आजिबात अवघड नाहीये. भलेही अब्यूजर्स ना क्रॅक डाऊन करून शिक्षा द्या.. विजा नंबर्स मागणी नुसार दरवर्षी बदला काहीही करा पण न्याय्य करा.
प्रायमरी आणि सेकंडरी अर्नर वगैरे लॉजिक हास्यास्पद आहे.
ही भांडवलशाही आहे.... खर्च कमी नफा जास्त एवढे एकच सत्य त्यांना माहित आहे... तुम्ही सेकंडरी असा नाहीतर अजून सतरावे असा... कोण विचारतो.
घ्या ना एच४ वाल्यांची परीक्षा... त्यांची सुद्धा हुशारी बघा आणि मगच द्या नोकरी विसा >>> 'मी हुशार आहे मलाच नोकरी/अ‍ॅडमिशन द्या' असे असते हे तुम्हाला कोणी सांगितले Lol
फार मजेशीर पोस्ट आहे तुमचे.

Telugu

झंपी ह्यांच्या मते ,
H1 application मध्ये 'मी आजन्म ब्रह्मचारी राहीन' असा clause असावा असे दिसते ? Lol
म्हणजे बघा bachelor असताना H1 वर नोकरी मिळाली आणि 10-12 वर्षे ग्रीन कार्ड होणार नसेल तर, H1 लोकांना matrimonial ad मध्ये 'उच्चशिक्षित पण फक्त घरकाम करणारी वधू हवी, नोकरी करण्याची आजिबात इच्छा नको ' किंवा 'कमी शिकलेला घरगडी वर हवा आहे' असेच लिहावे लागेल. Wink
Eggs freezing आहेच आता Sperm freezing चा धंदाही जोमात चालू करावा लागेल बिचार्‍या H1 लोकांसाठी. Sad

आणि spouses ना विसा मिळाला की नोकरी तर हात जोडून हजर असते त्यांच्या समोर असा ही एक विनोदी विचार दिसला आहे प्रतिसादात. तुमचे so called skilled jobs असे काढून सोम्यागोम्या H4 ला देत असतील तर त्याचा अर्थ एक तर तुमच्याकडे स्किल राहिले नाहीये किंवा तुमच्या स्किलची कंपनी ला गरज उरलेली नाही.

हाबा - खूप जॉब्स असे असतात आयटी मध ज्यात काही खास स्किल्स लागत नाहीत. L1, L2 सपोर्ट, काही प्रोजेक्ट मध्ये मॅन्युअल Qa .. anyone can do with on job training.
आमच्या इथे बिल्ड मॅनेजर रोल आहे जे फक्त एका टूल वर क्लीक करतात , रिलीज मॅनेजर जे एक एक्सेल शीट शेरपॉइंट वर टाकतात, सगळ्या टिम आपापले प्रोजेक्ट त्यात भरतात मग हे रिलीज मॅनेजर सर्विस मॅनेजर टूल मध्ये जाऊन चेंज request create करतात.
रिलीज co ordinator जॉब तर नुसता रिलीज नाईट काँफेरेन्स कॉल रन करून शेवटी कंमुनिकेश पाठवणे इतकाच आहे. क्लायंट ला चु बनवायची कामे आहेत बिलिंग मिळवण्यासाठी.

>>>>>>> क्लायंट ला चु बनवायची कामे आहेत बिलिंग मिळवण्यासाठी. >>>>>>>
मग ते पवित्र कर्म फक्त H1 धारकांनीच करावे असा वाद आहे का ? ते काम सहजी कमी पगारात होत असेल तर त्या कामासाठी तेवढाच मोबदला योग्य ना ? मग H1धारकांसारख्या कुशल लोकांनी इतर अधिक कौशल्याची कामं करावीत की ....

Again, as Raj has said earlier, because of threat to their own jobs, by people on H4 EAD, some people are really scared and are opposing this system.
It is understandable that when your own job is threatened you will get uneasy.
However, this is a capitalistic set up and if companies can reduce cost they will, by hiring someone for whom they do not have to spend money on visa processing etc.

As for now, the rule is there and unless it is cancelled, it will be there.

Another positive aspect, it is beneficial to H4 dependent children of Indian immigrants, who otherwise will be out of status when they turn 21 and will not be able to study/work/live here without getting their own F or H visas.

So overall, this is a good rule and must be continued and improved upon, if possible.

Another positive aspect, it is beneficial to H4 dependent children of Indian immigrants, who otherwise will be out of status when they turn 21 >> असुफ, माझ्या माहितीप्रमाणे H4-EAD फक्त स्पाऊससाठी आहे. २१+ डिपेंडंट मुलांना होणार्‍या ह्याच्या फायद्या बद्दल ऐकले नाही पण ह्याबाबतीत माझी माहिती तोकडी असू शकते.

There is a Facebook group that talks about this, I should clarify that my information is also limited from what I have seen on that Facebook group, and haven’t read into it myself.

<<< bachelor असताना H1 वर नोकरी मिळाली आणि 10-12 वर्षे ग्रीन कार्ड होणार नसेल तर, H1 लोकांना matrimonial ad मध्ये 'उच्चशिक्षित पण फक्त घरकाम करणारी वधू हवी, नोकरी करण्याची आजिबात इच्छा नको ' किंवा 'कमी शिकलेला घरगडी वर हवा आहे' असेच लिहावे लागेल. >>>
तुम्ही लिहिले आहे ते पटले. पण माझ्या माहितीप्रमाणे पूर्वी एच-४ ना नोकरी करताच येत नसे (जोपर्यंत ४८५ मध्ये जात नाहीत तोपर्यंत). आताचा नियम ही पूर्वीचीच आवृत्ती आहे, नाही का?

अति अवांतरः 'कमी शिकलेला घरगडी' हे प्रकार अगदीच नगण्य बघितले आहेत. मुलांनी भारतात जाऊन एच-४ वर बायकोला आणले, हे खूप माहित आहे, पण मुलीने भारतात जाऊन लग्न केले आणि एच-४ वर नवर्‍याला आणले, अशा केसेस हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या माहीत आहेत. असे का?

<<< खूप जॉब्स असे असतात आयटी मध ज्यात काही खास स्किल्स लागत नाहीत. .......क्लायंट ला चु बनवायची कामे आहेत बिलिंग मिळवण्यासाठी.>>>
तेच तर. त्याच्यासाठी एच-४ कशाला, एच-१ ची पण फारशी गरज नाहीये. पण आय.टी.तल्या लोकांचा Holier than thou प्रकार बघितला की हसायला येते. आय.टी.तले सुवर्णयुग संपले नसले तरी झळाळी नक्कीच कमी झाली आहे आता. उघडा डोळे बघा नीट.

च्रप्स, कुठल्याहि कामाला हलके लेखू नये. अगदी घर साफ करणारे लोकहि महत्वाचे काम करत असतात नि त्यांना जास्त पैसे मिळतात. तेंव्हा कुणाचे काम तुम्हाला सोप्पे वाटत असले तरी ते करावे लागते नि त्यासाठी मोबदला द्यावा लागतो.
बिलिंग तासांतून कॉफी ब्रेक, बाथरूम ब्रेक, इतर गप्पा, इतर सटरफटर कामे, फोन यात जो वेळ जातो तो त्या तासांतून कमी करता का?
बर्‍याचश्या कामांचे पैसे काम होण्यावर असतात, किती तास खर्च केले, काय स्किल वापरलीत त्यावर नसतात.

जे लोक चू बनतात त्यांना माहित असते की उगाच पैसे देतो, पण ती रक्कम त्यांच्या दृष्टीने नगण्य असते, त्यांना तिकडे लक्ष देण्यात वेळ नि अधिक पैसे घालवण्यापेक्षा इतर गोष्टी जास्त फायदेशीर वाटतात.

आता नैतिक दृष्ट्या, भारतीय कंपन्या हे करतात ते योग्य नाही असे वाटत असेल तर एकदा कंपनीच्या मालकांना सांगून बघा त्यांचे काय मत आहे. नंतर मग भारतातल्या लोकांना सांगून बघा लाच घेणे किती अनैतिक आहे.

पण म्हणून काय एच. ४ वाल्यांनी घरे साफ करत बसायचे काय? ते पण उच्चशिक्षित असतात. त्यांना किमान संधी तरी मिळाली पाहिजे, असे माझे वैयक्तिक मत आहे.

विचार स्तुत्य आहेत, पण सध्या अमेरिकेला तसे वाटत नाही. विशेषतः इतर देशांतून आलेल्या लोकांबद्दल. परवा तर वाचले की ज्यांना नागरिकत्व मिळाले आहे त्यांचेहि अर्ज नीट तपासून, त्यांनी खोटी माहिती दिली असेल तर त्यांना हाकलून द्यावे. थोडक्यात हा देश गोर्‍या लोकांचा असे मत असणार्‍यांची सध्या इथे चलती आहे.
बाकी एच ४, इएडी इ. एबीसीडी वाल्यांसाठी कायदे बदलत नाहीत. ते न आल्याने कुणा मोठ्या कंपन्यांचे फार नुकसान होते असे त्या कंपन्यांना वाटले तर ते भरपूर पैसे चारून तसा कायदा करून घेतील. नाहीतरी "जण्तेची शेवा" करायला सरकार, कायदे नसतात.

येथे अमेरिकन बिझनेसेस, त्यांची आर्थिक परिस्थिती, बाहेरून आलेल्या लोकांचे कल्याण कसे होईल, त्यांना जास्त चांगल्या (पगाराच्या) नोकर्‍या कश्या मिळतील, त्यांना संधी देणे कसे महत्वाचे आहे इ बद्दल उद्बोधक माहिती वाचली.

अमेरिकेत सध्या त्याचा काही उपयोग होणार नाही याची खात्री आहे. त्या कंपन्या मुळातच धंद्यात हुषार असल्याने, कायदे काहीहि असले तरी स्वतःचा फायदा करून घेण्याचा मार्ग आधी काढतीलच. कारण फायदा वाढवण्या साठी भारतीय लोकच असायला पाहिजेत असे नाही, ते इथे येण्यापूर्वीच इथले धंदे अत्यंत फायदेशीरपणे जोरात चालू होते. आता भारतीय नाही आले तर इतर काही मार्गाने हेच करता येईल.

अशी चर्चा भारतीय उद्योगधंदे, भारतातच या तथाकथित उच्चशिक्षित, लायक लोकांना जास्त संधी मिळावी, चांगल्या (पगाराच्या), कल्पकतेला वाव देणार्‍या नोकर्‍या कश्या मिळतील यावर हि असाच एखादा धागा कुणि काढला तर वाचायला आवडेल.

च्रप्स, कुठल्याहि कामाला हलके लेखू नये. अगदी घर साफ करणारे लोकहि महत्वाचे काम करत असतात नि त्यांना जास्त पैसे मिळतात. तेंव्हा कुणाचे काम तुम्हाला सोप्पे वाटत असले तरी ते करावे लागते नि त्यासाठी मोबदला द्यावा लागतो.
>>> मी कमी लेखत नाही आहे. H1 हा स्पेशालाईसद नॉलेज आणि स्किल साठी मिळतो. त्याचा दुरुपयोग केला जातो. LCA file करताना वेगळेच जॉब डिस्क्रिपशन आणि प्रत्यक्षात काम वेगळे असते.

मग ते पवित्र कर्म फक्त H1 धारकांनीच करावे असा वाद आहे का ? ते काम सहजी कमी पगारात होत असेल तर त्या कामासाठी तेवढाच मोबदला योग्य ना ? मग H1धारकांसारख्या कुशल लोकांनी इतर अधिक कौशल्याची कामं करावीत की>>>
स्नेहमयी - तुम्ही आयटी मध्ये नसाव्यात असा माझा अंदाज आहे. कमी मोबदला नाही, बिलिंग रेट फिक्स असतात आणि मजबूत असतात. आणि मी h1 आणि ह4 याबद्धल बोलतच नाही आहे. कोणीही करत असेल तरी माझं म्हणणं इतकंच होते की आयटी म्हणजे technical strong पाहिजेच असे नाही.

बोका आणि बर्ग - आपणास माझा मुद्दा कळला हे दिसत आहे . धन्यवाद.

अशी चर्चा भारतीय उद्योगधंदे, भारतातच या तथाकथित उच्चशिक्षित, लायक लोकांना जास्त संधी मिळावी, चांगल्या (पगाराच्या), कल्पकतेला वाव देणार्‍या नोकर्‍या कश्या मिळतील यावर हि असाच एखादा धागा कुणि काढला तर वाचायला आवडेल. >>>
@नन्द्या४३
बुल्स आय, एकदम सहमत. एखाद्या सार्वभौम देशाने त्यांचे कायदे कसे करावेत हे इतरांनी सांगण्याची गरज नाही. मागे एकदा इथेच कुणीतरी गळा काढला होता की भारत आम्हाला OCI साठी कित्ती कित्ती त्रास देतो, भ्यां...

Oci चा बाऊ केला आहे. मी पण ऐकून होतो खूप डोकमेंट्स लागतात, खूप टाईम लागतो. असल्या अफवा मूळे लोक व्हिसा अँप्लाय करतात oci पेक्षा.
मी स्वतः फक्त 2 दिवसात अँप्लाय केला, आणि 1.5 महिन्यात oci आला पण. काही जास्त डोकमेंट्स लागत नाहीत.

एखाद्या सार्वभौम देशाने त्यांचे कायदे कसे करावेत हे इतरांनी सांगण्याची गरज नाही>>>This.
H4 चे नियम जाचक वाटतायत?
H1 चे नियम जाचक वाटतायत?
GC चे नियम जाचक वाटतायत?
Citizenship चे नियम जाचक वाटतायत?
डेल्टा, लुफ्तान्सा, कॉंटिनेंटल तुमच्या सेवेला उभ्या आहेत. मायदेशाचं दार अजून खुलं आहे. पहा विचार करा!

डेल्टा, लुफ्तान्सा, कॉंटिनेंटल तुमच्या सेवेला उभ्या आहेत. मायदेशाचं दार अजून खुलं आहे. पहा विचार करा! >> बघा आलीच ना पुन्हा प्लांटेशन मालकाची मानसिकता ऊफाळून. मी म्हंटले नव्हते काल Lol

बाजीरावास आज जे आयते टायपायला मिळते त्यासाठी थोरल्यांनी दशकोन दशके अश्याच खस्ता खाल्या आहेत, लढे ऊभारले आहेत. (पर्स्नल पर्स्नल म्हणत थयथयाट करू नका.. 'बाजीरावास आज जे आयते गिळायला मिळते' हा जुना ईडिअम आहे जसा 'शिंगरू मेलं हेलपाट्यानं', 'काय घोडं मारलं', 'शेपटीवर पाय पडला' वगैरे....)
ते जर 'सार्वभौम देशाचे नियम' म्हणत कच खाऊन गप पडले असते तर तुम्ही ईथे पाऊल ठेवण्याआधी डेल्टा, लुफ्तान्सा, कॉंटिनेंटल चा ईकॉनॉमी क्लास सोडा चार महिन्यात लिबर्टीला पोचणार्‍या भंगारवाहू जहाजाच्या गंजलेल्या कंटेनरमध्येही बसू शकला नसता. Proud

तुमच्या प्लांटेशन वरून बाहेर निघून बघा ह्या सार्वभौम राज्याची स्वागतिका काय म्हणते...

Keep, ancient lands, your storied pomp!” cries she
With silent lips. “Give me your tired, your poor,
Your huddled masses yearning to breathe free,
The wretched refuse of your teeming shore.
Send these, the homeless, tempest-tossed to me,
I lift my lamp beside the golden door!”

२२/७ साहेब, इतकं टोकाचं बोलायची आवश्यकता नाही. माझं म्हणणं इतकच आहे की जे काय नियम आहेत ते पाळावेत आणि कुणी काय नियम करावा ते आपण ठरवू शकत नाही. (हे अमेरिकेला पण लागू आणि भारताला पण लागू आहे, इतकच सांगायचं होतं.)
हे बघा जरा. https://youtu.be/LNBjMRvOB5M

डेल्टा, लुफ्तान्सा, कॉंटिनेंटल तुमच्या सेवेला उभ्या आहेत. मायदेशाचं दार अजून खुलं आहे. पहा विचार करा!
>>>>
Were you born here? Just curious, you don’t have to answer if you don’t want to.

बघा आलीच ना पुन्हा प्लांटेशन मालकाची मानसिकता ऊफाळून>>> Rofl Rofl
आज फुप्फुसांचं काही खरं नाही बुवा!! Rofl
मला django unchained मधल्या लिओनार्दो च्या जागी कल्पून हहपुवा झाली !!!!
Rofl
पुन: एकदा थॅंक्यु ! _/\_

Upashi boka aho mi tumachyashich tar sahamat ahe! Not being sarcastic.

<<< बघा आलीच ना पुन्हा प्लांटेशन मालकाची मानसिकता ऊफाळून. >>>

<<< तुम्ही ईथे पाऊल ठेवण्याआधी डेल्टा, लुफ्तान्सा, कॉंटिनेंटल चा ईकॉनॉमी क्लास सोडा चार महिन्यात लिबर्टीला पोचणार्‍या भंगारवाहू जहाजाच्या गंजलेल्या कंटेनरमध्येही बसू शकला नसता. >>>

अहाहा, काय ती प्रतिभा. मोगँबो खुश हुआ. Rofl

Were you born here?>>> Nahi. Mi ranget varshanuvarshe rahoon, sagle niyam palatach alo ahe. Annachatrat ubhe rahoon 'toop ka nahi?' mhanoon bombalayachi manasikata mazi nahi.
No offense to you personally sir.

Pages