अमेरिकेतील चालू घडामोडी (राजकीय)

Submitted by नन्द्या४३ on 3 February, 2017 - 18:15

ट्रंप निवडून आल्यानंतर अमेरिकेत राजकीय घडामोडी काय होत आहेत याची माहिती, त्यावर आपले मत इथे नोंदवावे अशी अपेक्षा आहे.
वादविवाद नकोत, मत पटले नसेल तर सोडून द्या. भांडायला उठल्यासारखे नावे ठेवून लिहू नका, नुसते सांगा की माझे बुवा असे मत आहे, किंवा माझ्या मते सत्य हे आहे.
धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

शेंडेनक्षत्र, अहो केवळ गुलामगिरीशी संबंध ठेवला तर ठीक आहे तुमचे म्हणणे. पण जसे इतरांना ट्रंपचे समर्थक वेडे वाटतात तसेच तुम्हालाहि त्याचे विरोधक वेडे वाटतात का? ते केवळ एकाच मुद्द्यावर सर्व निर्णय घेतात का? ट्रंपचे सगळेच समर्थकहि तसेच केवळ एकाच मुद्द्याला धरून बसतात का?

हे गुलामगिरी, व्हाईट सुप्रिमसी, देशाची दुफळी हे प्रयोग या देशात करून झालेले आहेत. ते गैर आहेत असे जास्त लोकांना वाटते. त्यात अभिमान बाळगण्यासारखे काही नाही, त्या वृत्तीचा समूळ नाश करायला हवा असेच इथल्या बर्‍याच लोकांचे मत आहे. उगीच कुणि माथेफिरू ते धरून गर्दीत गाडी घुसवत असेल तर ते निंदनीय आहे. नि त्यांनी असे करायचे नि त्यांच्या विरोधकांनी महात्मा गांधींचे ऐकून मुकाट्याने मार खायचा असले काही इथल्या लोकांना कळत नाही. म्हणून तेहि इंटका बदला पत्थरसे घेणारच. लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. या गोष्टींचा त्वरित निषेक केला पाहिजे. तसे झाले नाही तर त्याबद्दल राग येणारच.

दोन्ही बाजूंनी चुका होतात असले काहीतरी गुळमुळीत, इन्टेलेक्च्युअल बोलणे कुणाला आवडत नाही. गुलामगिरी, व्हाईट सुप्रिमसी, देशाची दुफळी हे प्रकार भयंकर आहेत, असाल तुम्ही इंटेलेक्च्युअल, पण काही काही गोष्टी आधी समजून घ्यायला पाहिजेत. सरकारने दिलेला वकील जसे कर्तव्य म्हणून आपल्या अशिलाचा खुनी माणसाचा बचाव करू पहातो, ते इथे मायबोलीवर चालणार नाही.

<<<ट्रम्प ने या सगळ्याचा कडक शब्दामध्ये निषेध करावा ही अपेक्षाच हास्यास्पद आहे>>>

बरोबर आहे. निषेध केला पाहिजे हेहि बरोबर आहे पण ट्रंपकडून तशी अपेक्षा करणे हे हास्यास्पदच.
एखाद्या तुफान विनोदी विदूषकाचा विचार मनात आल्यावर जसे खदखदून हसू येते तसे ट्रंपचे नाव काढले की मला होते.

आहे तर आहे. बरळू दे काहीपण. वेड्याच्या इस्पितळात नाही का, काही पण बोलत असतात पेशंट्स. तसाच हाहि. ठेवला त्याला तिथे प्रेसिडेंटच्या ऑफिसात की त्याला लगेच जबाबदारीची जाणीव झाली असे काही दिसत नाहीये.

बरोबर. लिबरल म्हणा की काँझर्व्हेटिव्ह, त्याचे डोके ठिकाणावर आहे. ट्रंपला काय म्हणायचे हे त्याचे नाव न घेउन त्याने सांगितले. अपेक्षेप्रमाणे ट्रंपच्याच लोकांनी ते स्पष्ट केले! याला म्हणतात हुषारी.

असामी, वाचला लेख. पण माझा प्रश्न ते पुतळे, साइन्स "का" काढायच्या याबद्दल नाही. माझा प्रश्न टायमिंग बद्दल होता. जेव्हा वातावरण जास्त अनुकूल असेल तेव्हा करता येइल. नाहीतरी इतकी वर्षे ते आहेच.

If there is so much problem in US for other than white people. come back to India.
Pankaj Udhas pan tech sangto aahe "Aajaa Umar Bahut Hai Chhotii, Apane Ghar Men Bhii Hain Rotii" Happy

>>--- सहमत आहे.<<

धन्यवाद, नंदन. एका गोष्टीवर तरी आपलं मत जुळलं याचा आनंद आहे.

असामी, अरे बाबा त्या लेखातले मुद्दे बरोबर आहेत पण तशी रिअ‍ॅलिटी आहे का? पुतळे पाडणारे माथेफिरु, ली आणि फाउंडिंग फादर्सच्या इतर कामाचा विचार/ तुलना करणार नाहित तर त्यांच्यातला "गुलामांचा मालक" हा कॉमन धागा फक्त बघणार. तालिबान्यांना बुद्धाच्या कार्याचा काहि पत्ताच नव्हता, केवळ मुर्ति पुजा इस्लाम धर्माच्या विरुद्ध असल्याने त्यांनी त्या फोडल्या, असं काहि आहे का?..

<<<माझा प्रश्न टायमिंग बद्दल होता. जेव्हा वातावरण जास्त अनुकूल असेल तेव्हा करता येइल. नाहीतरी इतकी वर्षे ते आहेच.>>
म्हणजे??
म्हणजे जसे महाराष्ट्रात दादोजी कोंडदेवांचा पुतळा रातोरात हलवला, तसे??? Happy Wink

पुतळे पाडणारे माथेफिरु, ली आणि फाउंडिंग फादर्सच्या इतर कामाचा विचार/ तुलना करणार नाहित तर त्यांच्यातला "गुलामांचा मालक" हा कॉमन धागा फक्त बघणार. >> राज हे कॉनफेडरेट लीडर्सचे पुतळे मुख्यत्वे करून दोन कालखंडांमधे उभारले गेले आहेत -
१. १९२० जिम क्रो segregation च्या वेळी नि
२. १९५५ नंतर - Martin Luther King च्या कामाच्या वेळी.

I guess that can not be coincidence right ?

>>I guess that can not be coincidence right <<

ऑफ कोर्स नॉट! अँड आयॅम नॉट डिनाइंग एक्झिस्टंस ऑफ व्हाइट सुप्रमसी. ऑल आयॅम सेइंग इज लेट लॉ अँड ऑर्डर टेक इट्स कोर्स, वाय्लंस इन्साय्टेड बाय फार-लिबरल्स इज नॉट सॉल्विंग दि इशु इदर, रादर अ‍ॅग्रवेटिंग इट...

बाय्दवे, स्लेवरी वाज नॉट दि ओन्ली रिझन फोर फॉर्मिंग कंफेडरेट स्टेट्स, दोज स्टेट्स ऑल्सो निडेड अ लेवल ऑफ अटानमी फ्रॉम फेडरल गवर्नमेंट...

बाय्दवे, स्लेवरी वाज नॉट दि ओन्ली रिझन फोर फॉर्मिंग कंफेडरेट स्टेट्स, दोज स्टेट्स ऑल्सो निडेड अ लेवल ऑफ अटानमी फ्रॉम फेडरल गवर्नमेंट...
>>

टू मेन्टेन स्लेवरी लीगल इन सदर्न स्टेट्स हे उरलेले वाक्य लिहायचे विसरलात का? अजून कुठला दुसरा मुद्दा होता फेडरल स्ट्रक्चर बाबतचा?

>>अजून कुठला दुसरा मुद्दा होता फेडरल स्ट्रक्चर बाबतचा?<<

टवणे सर, कोट केलेलं वाक्य परत एकदा वाचा. आणि नॉर्थ, साउथ स्टेट्स मध्ये तुष्टता का निर्माण झाली याबद्दलचा अमेरिकन इतिहास वाचा.

दोज स्टेट्स ऑल्सो निडेड अ लेवल ऑफ अटानमी फ्रॉम फेडरल गवर्नमेंट टू मेन्टेन स्लेवरी लीगल इन सदर्न स्टेट्स,,

असं ते पूर्ण वाक्य आहे असे मला म्हणायचे आहे. अजून कुठले कोट केलेलं वाक्य वाचू?
तुम्ही संदर्भ द्या पुस्तकाचा, मी नक्की वाचेन. सिव्हिल वार संदर्भांत गुलामगिरी, तिला असलेली कायदेशीर मान्यता याशिवाय अजून काही मला तरी प्रामुख्याने वाचनात आलेले नाही. शेतमालाची किंमत, शेती प्रमुख व्यवसाय का औद्योगिक उद्योग वगैरे बाबी येतात पण दरवेळी काटा जाऊन गुलामगिरीवरच अटकतो

स्टेट राईट्स ही 'डॉग व्हिसल' आहे. निक्सनच्या सदर्न स्ट्रॅटेजीपासून, रेगनने नेशोबा काऊंटीत दिलेलं भाषण (जिथे सिव्हिल राईट्स चळवळीच्या कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली होती) ते अगदी हिलरीने ओबामाविरुद्ध प्रायमरीत वापरलेले डावपेच हे या सदरात मोडतात. अर्थात, रिपब्लिकनांची यात प्रचंड मातब्बरी आहे.

ली अ‍ॅटवॉटरचे हे उद्गार पहा:

You start out in 1954 by saying, "N**r, n**r, n**r." By 1968, you can't n**r" — that hurts you. Backfires. So you say stuff like forced busing, states' rights and all that stuff. You're getting so abstract now [that] you're talking about cutting taxes, and all these things you're talking about are totally economic things and a byproduct of them is [that] blacks get hurt worse than whites. And subconsciously maybe that is part of it. I'm not saying that. But I'm saying that if it is getting that abstract, and that coded, that we are doing away with the racial problem one way or the other. You follow me — because obviously sitting around saying, "We want to cut this," is much more abstract than even the busing thing, and a hell of a lot more abstract than "N**r, n**r."
— Lee Atwater, Republican Party strategist in an anonymous interview in 1981

काही इतिहासाचं वाचन करण्यासाठी दुवे:
१. https://en.wikipedia.org/wiki/Dog-whistle_politics#United_States
२. The Fall of the House of Bush: The Untold Story of How a Band of True Believers Seized the Executive Branch, Started the Iraq War, and Still Imperils America's Future
३. https://en.wikipedia.org/wiki/Reagan%27s_Neshoba_County_Fair_%22states%2...

शिवाय एक गंमत अशी आहे - कॅलिफोर्निया/न्यू यॉर्क/इलिनॉय या राज्यांच्या धोरणांचा विषय आला की रिपब्लिकन स्टेट्स राईट्स इत्यादी पोपटपंची विसरतात! यात स्टेम सेल रिसर्च (बुशच्या काळातला बॅन), पर्यावरणविषयक धोरणे, सोशली प्रोग्रेसिव्ह बदल इ. सारे आले.

तर्कदुष्टता, तर्कदुष्टता म्हणतात ती हीच हो बने!

अलाबामा : आम्ही बालवाड्या, शाळा, कॉलेजेस, चर्च, बागा इथे लोकांना भरलेल्या बंदुका घेऊन जाण्याची परवानगी देऊ !
रिपब्लिकन्स : ओ हो ! स्टेट्स राईट्स ! ओके.
कॅलिफोर्निया : आम्ही स्टेम सेल वापरून कँसर वर उपाय शोधू !
रिपब्लिकन्स : सॉरी !

कारण गुलामांना मतेच नव्हती, त्यामुळे उत्तरेकडील लोकांचे नेहेमीच बहुमत होई. म्हणून पुढे गुलामांना ३/५ का असे काहीतरी अपूर्णांक मत देण्यात आले. इलेक्टोरल कॉलेज पद्धतीप्रमाणे हि त्यांना थोडा आधार होता. पण हे सगळे त्यांना पुरेसे वाटले नाही, कारण गुलामगिरी हा त्यांच्या अर्थव्यवस्थेचा फार मोठा भाग होता. गुलामगिरी संपली तर एव्हढ्या मोठ्या इस्टेटवर काम करायला कितीतरी जास्त पैसे पडले असते.
त्यापेक्षा आपण सगळे वेगळेच होऊ, गुलाम ठेवू, आपल्या तंत्राने राज्यकारभार करू या उद्देशाने त्यांनी युद्ध सुरु केले.

ते जिंकले असते, तर हेच सगळे लोक (ली नि स्टोनवॉल जॅकसन हे) त्यांच्या देशातले हिरो ठरले असते . व्हाईट सुप्रिमसी, गुलामगिरी, हा आपल्या देशाच्या संस्कृतीचा आधारस्तंभ आहे म्हणाले असते. अजूनहि तिथल्या बर्‍याच लोकांचे तसेच मत आहे हे उघड आहे. त्यांना त्यांच्या विचारांचा, इतिहासाचा अभिमान आहे. त्यांच्या हिरो लोकांचे पुतळे त्यांना तसेच राहू द्यावे असे वाटते,

आता जिंकले उत्तरवाले - म्हणून इतिहास त्यांच्या बाजूने.
दक्षिणेकडील लोक देशद्रोही ठरले. ते व्हाईट सुप्रिमसी, गुलामगिरी, देश फोडणारे असे सगळे वाईट ठरले. दक्षिणेकडील "थोर" व्यक्ति निंदनीय ठरल्या. त्या लोकांचे पुतळे बघवत नाही उत्तरेकडील लोकांना, जसे महाराष्ट्रात दादोजी कोंडदेव, रा, ग, गडकरी यांचे पुतळे काही लोकांना बघवले नाहीत.
आणि दक्षिणेकडील लोक हरले म्हणून व्हाईट सुप्रिमसी, गुलामगिरी, देश फोडणारे हे सगळे तिरस्करणीय ठरले.

तसेहि पुतळ्यांबद्दल जगातल्या लोकांच्या कल्पना वेगळ्याच असतात.
ब्राह्मण, संभाजीविरुद्ध बोललेले आवडत नाही म्हणून महाराष्टात रा. ग. गडकरी यांचा पुतळा हलवला (का फोडला?) , दादोजी कोंडदेवाचा पुतळा हलवला.
उद्या कुणि औरंगजेबाचा पुतळा उभारला शिवाजी पार्कात तर? कारण आपल्या महाराष्ट्रात बुद्धिवादी लोक जास्त - त्यांना औरंगजेबात काहीतरी चांगले दिसेलच. उगाच आपले वादासाठी! मुसलमानांच्या दृष्टीने विचार केला तर औरंगजेब थोरच होता - त्याने अनेक काफिर मारले, देवळे उद्ध्वस्त केली. आपल्या भारताच्या इतिहासात त्याचे मोठे स्थान आहे. विशेषतः श्री छत्रपति शिवाजी महाराज यांच्या आयुष्यातील तो एक मोठा भाग होता. ही सत्यता आहे, इतिहासाचे खरे व संपूर्ण दर्शन करायचे तर औरंगजेबाचाहि पुतळा उभारला पाहिजे.

आता मी साबणाने घासून घासून तोंड धुतो. सचैल स्नान करून, संध्या करून गोमूत्र पितो नि कोंप्युटरवर शिंपडतो.

इतिहासाचे खरे व संपूर्ण दर्शन करायचे तर औरंगजेबाचाहि पुतळा उभारला पाहिजे>> सर पण पुतळे वगैरे अन इस्लामिक आहे हे मी विनम्रपणे सुचवते. ही वोमट हॅव लाइक्ड इट.

ए पण हे अंतर्गत धुमाळी चालू असल्याने सध्या नॉर्थ कोरीआ वगैरे दूर पडले आहे ते बरे वाटले. काल क्लाउड एटलास नावाचा सिनेमा पाहिला. एकदम आल्ट लेफ्ट आहे. एका व्हाइट सुप्रिमसिस्ट ची मुलाखत पण पाहिली. भीति दायक प्रकरण आहे.

अमा, तो वाकोवस्की बंधु भगिनींचा आहे पिकचर. मेट्रिक्स वाले. ते लिबरल पबलिक आहे सो नो वंडर. नेटफ्लिक्स वर सेन्स एट म्हणून शो आहे, तो पण त्यांचाच आहे. तो शो राईट लिनिंग लोकांनी बघितला तर ते मारायला धावतील वाकोव्स्कींना. Lol

>>अजून कुठले कोट केलेलं वाक्य वाचू?<<

टवणे मास्तर -

"स्लेवरी वाज नॉट दि ओन्ली रिझन फोर फॉर्मिंग कंफेडरेट स्टेट्स, दोज स्टेट्स ऑल्सो निडेड अ लेवल ऑफ अटानमी फ्रॉम फेडरल गवर्नमेंट..."

ठळक केलेल्या तुकड्यात आहे ना स्लेवरी चा उल्लेख? वाचलंत का? संपुर्ण वाक्य वाचलंत तर काहि आकलन होतंय का? ते झालेलं असेल तुम्ही सुचवलेल्या तुकड्याने काहि वॅल्यु अ‍ॅड होतेय का?..

<<<सर पण पुतळे वगैरे अन इस्लामिक आहे हे मी विनम्रपणे सुचवते. ही वोमट हॅव लाइक्ड इट.>>>

च्च. तुम्ही फारच बुद्धिवादी हो! तरी बर तिरक्या अक्षरात लिहिले - विनोद म्हणून.

माहित्तै मला ते इस्लाम धर्माविरुद्ध आहे.
पण सगळेच काही बुद्धिवादाने चालत नाही ना!
नाहीतर जे लोक व्हाईट सुप्रिमसि, गुलामगिरी, देशद्रोह करणारे ठरले त्यांचे पुतळे ठेवायची काय गरज?
भावना प्रबळ असतात! कुठल्यातरी एकाच भावनेचा अतिरेक झाला की सत्य विसरायला होते. विचार बंद होतो, मन भरकटते.

तसेच माझ्या भावना एकदम इतिहासाच्या सत्यतेने भारून गेल्या, इतर सत्य काय आहे हे मला पहावेसे वाटले नाही.
बाकी माझे अबुद्धिवादी मन लवकरच ठिकाणावर आले नि मला पण सामान्य, अबुद्धिवादी महाराष्ट्रियांप्रमाणे जरा काय बोलावे याचे भान आले नि मग मी पुढचे लिहीले.

बॅनन ला काढलेला दिसतोय. पॉलिटिको मधे बातमी आहे.

एका पूर्वी व्हाइट सुप्री. ग्रूप मधे असलेल्याचे आर्टिकल तो किंवा कोणताही कल्ट कसा चालतो त्याची चांगली माहिती देते. सध्या अनेक ठिकाणी लागू पडेल. त्यात मेनस्ट्र्रीम मीडिया ब्लॉक करून कण्ट्रोल्ड स्टोरीज फक्त या लोकांपर्यंत पोहोचवणे, स्वतःचे जे समज आहेत त्याला समर्थन देणार्‍याच बातम्या, ओपिनियन्स बघणे वगैरे टॅक्टिक्स लिहीले आहेत, ते आजही लागू पडतात.

आता SNL मधल्या स्केलेटनचं काय होणार? बाल्डविन ते बहूतेक ट्रंपला हॅलोविनचं गिफ्ट म्हणून पाठवणार. Lol

राज भाउ, मी तुमच्या वाक्यातला जो दुसरा भाग आहे तो काही स्वतंत्र नसून पहिल्याच भागाची मागणी दुसरा भाग करतो आहे असे सुचवतो आहे.

दोज स्टेट्स ऑल्सो निडेड अ लेवल ऑफ अटानमी फ्रॉम फेडरल गवर्नमेंट टू मेन्टेन स्लेवरी लीगल इन सदर्न स्टेट्स.

थोडक्यात मला असे म्हणायचे आहे की लेवल ऑफ अटानमी फ्रॉम फेडरल गवर्नमेंट ही केवळ अन केवळ गुलामगिरी कायदेशीर ठेवायला हवी होती, अजून दुसरे कुठले सबळ कारण माझ्या वाचनात आलेले नाही

Pages