नका सोडून जाऊ
मला लोटून दूर
केला काय अपराध?
करता पारखे सासरं?
लेक आहे गरीबाची
म्हणून राग का धरिता?
माझ्या बाबांचा सारखा
तुम्ही उद्धार करीता?
तुमच्या मुळेच आली
मी बनून नवरी
जाउ तरी मी कशी
आता कायम माहेरी?
सुख संपत्ती वैभव
नाही सुख शाश्वत
आनंदाने दोघे गाऊ
आपण गरीबीचे गीत!
तुम्ही प्रेमळ फार
असे होते मी ऐकले
तुमच्या प्रेमासाठी सारे
माझे तारूण्य वेचले!
बाळ तुमचे माझ्या
पोटी आहे चिमुकले
संपत्तीच्या या लालसी
होईल संसार शकले!
थकले आमचे बाबा
थकली आमची आई!
अजून आहे हो लग्नाची
माझी धाकली ताई!
त्यांच्याकडून पैसे
मी कसे हो आणू?
आत्मा विकून त्यांनी
केले कन्यादान जणू!
तुम्ही धरा हो धीर
कष्टांची हो काय भीती?
सेवेसाठी मी तुमच्या
करीन डोळ्यांच्या वाती!
तुम्ही जन्माचे साथी
मला आहे अभिमान!
तुम्ही ऐकाल ना माझे?
तुम्ही सख्या माझे प्राण!
तुम्ही बसाना येथे!
मला जवळी घ्या ना!
नका करू काही चिंता
आता तरी हसा ना?
हात हांतात घेऊन
मला वचन द्या ना!
पुन्हा नाही म्हणणार
तू निघून जा ना!!!!
एकदम
एकदम ह्रदयस्पर्शि लिहिल आहे!
खुप आवडली कविता !
अतिसुंदर!!!!!
अतिसुंदर!!!!!!!!!!
छान लिहिलत तुम्ही.
एकदम
एकदम ह्रदयस्पर्शि लिहिल आहे!
खुप आवडली कविता > यापेक्षा अधिक काय लिहिणार.. वैशालीला अनुमोदन...
अति अति
अति अति सुंदर!!!!!!!!!!
छान लिहिलत तुम्ही. आवडली रे....
दादा
दादा ....मस्त !
-प्रकाश
-------------------------------------------------------
दीवाना हुआ बादल !
इमोशनल! हरी
इमोशनल!
हरीश
उमेशदा, कवि
उमेशदा,
कविता छान आहे. पण, माफ करा तुम्ही या कवितेत स्त्रीला फारच लाचार, अबला वगैरे करुन टाकले आहे. जर अशा नवर्याबरोबर सुखाने संसार करायची इच्छा असेल तर तिला थोडे कणखर व्हावेच लागेल आणि प्रत्येक स्त्री मध्ये ही क्षमता असते किंबहुना स्त्री मध्येच ही क्षमता असते. ती करुणामयि माता, प्रेमरुपी पत्नी तर आहेच पण आपला संसार, आपलं घर सावरण्यासाठी ती दुर्गाही होवु शकते, आदिशक्तीचे रुपही धारण करु शकते. ती विश्वाच्या शक्तीचा मुल स्त्रोत आहे, निदान कवितेत तरी तिला इतकी दुर्बल बनवु नका. चु,भु.दे.घे.
सस्नेह...
विशाल.
____________________________________________
रातराणीचा सुगंध पलंगावर पडल्या पडल्यादेखील घेता येतो. पण तुळस वृंदावनातच राहते, तिच्यापुढे आपल्याला उभंच राहावं लागतं.
http://maagevalunpahataana.blogspot.com
विशाल!
विशाल! तुमचा अनुभव वेगळा असेल! पण विशेषतः विदर्भात अजूनही विशेषतः गरीब लोकांमधे कमवित्या नसणार्या विवाहित स्त्रीयांची किती खेदजनक परिस्थिती आहे याची तुम्हाला कल्पना नसेल.हुंडाबळी, माहेरून पैसे आणण्यासाठी छळ आणि नेहमी "टाकून" देण्याची भिती या सर्व बघितलेल्या गोष्टींतून वरील कविता साकारली आहे. मुलीला दुर्गा बनण्याचे बाळकडू अशा लोकांकडून तरी मिळत नाही! तरी पण धन्यवाद!
कविता अगदी
कविता अगदी ह्रदयस्पर्शी आहे.
शरद
"मैं क्यों उसको फोन करूं?
उसके भी तो इल्म में होगा;
कल शब, मौसमकी पहली बारिश थी! 'परवीन शाकर'