रानदिवा

Submitted by जयश्री हरि जोशी on 27 December, 2016 - 13:33

श्वास मंदावता
कसे चपापून
पापणीचे वन
होय जागे

झोपेतच कुणी
उसवले प्राण
झाले देहावीण
सैल धागे

आसक्त होऊन
दूर गेला मेघ
काजळाची रेघ
उरे मागे

डोळे पांघरता
एकमेकांवरी
अंधाराच्या घरी
दिवा लागे

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेल्कम बॅक! या कवितेचा फॉर्म तुमच्या इतर वाचलेल्या कवितांपेक्षा वेगळा वाटला. इतर अनेक कवितांप्रमाणेच ही सुद्धा समजली असे म्हणू शकत नाही, पण शब्दरचना इतर कवितांप्रमाणेच आवडली. पुन्हा वाचेन.

बाय द वे इतर अनेक कविता कोठे गेल्या तुमच्या?

फा+१
तुमच्या कविता फार इन्ट्रिगिंग असतात. नीटश्या कळल्या नाहीत तरी त्या शब्दांच्या चकव्यात गुंतून विचारात पडायला होतं.

कविता आवडली. त्यातला एक आयुष्याच्या संध्याकाळचा असलेला उदासभाव स्पष्टपणे व्यक्त होतो.

तीही मीच आहे.
खरोखरी.
जयश्री हरि जोशी
अथवा जयू जोशी
I tried to change my password, but the profile name needed a change. I got the following message:

The specified passwords do not match.
The name जया एम is already taken.

Hence kept the same user name with just a single empty space in between Happy

आधीच्या कविता तुमच्यामुळे मिळाल्या, सिन्थेटिक जीनिअस! आभारी आहे..

तुमच्या कविता फार इन्ट्रिगिंग असतात. नीटश्या कळल्या नाहीत तरी त्या शब्दांच्या चकव्यात गुंतून विचारात पडायला होतं. >> परफेक्ट वर्णन मै.
मला एक दूर गेलेली व्यक्ती आणि दुसरी मागे राहिलेली व्यक्ती किंवा मग त्या दूर गेलेल्या व्यक्तीच्या इच्छा/ भावना... आणि ते दोन्ही अचानक एका क्षणी ओव्हरलॅप झाल्यावर होणारं अतूट नातं असं काही जाणवलं.

सुंदर कविता! तुमच्या कवितांमध्ये इतक्या नीटस, आपोआप जुळलेल्या यमकांच्या ओळी असतात की वाचताना फार सुख वाटते! The words just flow effortlessly.

वा व्वा व्वा!
विरहाच्या अंधारातही आठवांचे,स्वप्नांचे दीप प्रज्वलीत करती कविता!

तुमच्या कविता फार इन्ट्रिगिंग असतात. नीटश्या कळल्या नाहीत तरी त्या शब्दांच्या चकव्यात गुंतून विचारात पडायला होतं.>> +१.

ही कविता पण छानच.