मुंबईपासच्या प्रस्तावित शिवस्मारकातील पुतळ्यातील घोड्याच्या पावलांच्या ठेवणीविषयी

Submitted by limbutimbu on 24 December, 2016 - 04:45

सध्या, सर्वदूर बातम्यांमधे, मिडियामधे मुंबईजवळ उभारल्या जाणार असलेल्या शिवस्मारकाबाबत बरेच वाचायला बघायला मिळते आहे. उद्याच त्या स्मारकाचे भूमिपूजन/पायाभरणी आहे.
न्युज मिडियामध्ये, प्रस्तावित शिवस्मारकातील छत्रपत्री शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचे छोटेखानी मॉडेल (प्रतिरूप) बघण्यात आले.
या प्रतिरूपाप्रमाणे, शिवराय बसलेले दाखविलेल्या अश्वाचे पुढील दोनही पाय हवेत उचललेले (झेप टाकण्याच्या अविर्भावात) दाखविले आहेत.
देवतांच्या मूर्ति बसविण्याव्यतिरिक्त "व्यक्तिचा पुतळा /मूर्ति" करुन बसवण्याची पद्धत भारतात पूर्वी कधीच नव्हती.
मात्र युरोपमध्ये पूर्वापार याबाबत प्रगती होती व पुतळा कसा असावा याचे नियमही बनविले गेले आहेत.
तेच नियम इकडेही वापरणे अनुचित ठरणार नाही.
मात्र.......
माझ्या अल्प माहितीनुसार, या (अलिखित) नियमांनुसार जो राजा, युद्धात युद्ध करताना मृत्युमुखी पडला नाहीये, व जो मृत्युसमयी सार्वभौम राजा होता, त्याचा अश्वारुढ पुतळा उभा करायचे असल्यास घोड्याचा केवळ एक पाय उचललेला दाखवणे आवश्यक मानले जाते.
याचे उलट, जो राजा, युद्धात युद्धभूमिवर मृत्युमुखी पडला असेल, केवळ अशांचे बाबतीतच घोड्याचे पुढील दोनही पाय हवेत उचललेले दाखवितात.
याव्यतिरिक्त, मृत्युसमयी, वा दरम्यानचे काळात राजा वर सत्ताहीन होण्याची पाळी आलेली असेल, तर घोडा चारही पायांवर उभा दाखविला जातो. हा नियम मात्र तपासुन घ्यायला हवा. मला खात्री नाहीये.

तर मुद्दा असा की इतका सारा खर्च करुन शिवस्मारक उभारले जाते तर त्यातिल घोड्याचे पायांची रचना जगन्मान्य मूर्तिशास्त्राप्रमाणे होणे मला तरी आवश्यक वाटते.

जाणकारांना विनंती आहे कि त्यांनी या पाश्चात्य मूर्तिशास्त्रातिल पुतळ्यातील घोड्याच्या पायांच्या अवस्थेविषयीच्या नियमांबात अधिक माहिती/लिंक वगैरे द्यावी.
वरील नियम मला पुसटसे आठवते आहे, त्यानुसार, एका दिवाळी अंकात (बहुधा किर्लोस्कर) श्री करमरकर यांनी गेल्या शतकात बनविलेल्या शिवाजीमहाराजांच्या पुतळ्याबाबत लेख होता, त्यात ही माहिती देखिल होती. हा पुतळा पुण्यात शिवाजी प्रिपरेटरी हायस्कुल, कोर्टाच्या मागे/मॉडर्न कॅफे समोर बसविलेला आहे.
मात्र मला अधिक संदर्भ जुळविता आलेले नाहीत.

या शास्त्रानुसार, खरे तर पुण्यातील बालगंधर्वपासच्या झाशीच्या राणिचा जो पुतळा दाखविला आहे, त्याचे दोनही पाय हवेत फेकलेले दाखवायला हवे होते. पण तिथे घोड्याचा एकच पाय उचललेला दाखविला आहे.
तर डांगे चौक (हिंजवडी ते चिंचवड) येथे कॉर्नरला एक बाग आहे, त्यातिल शिवरायांचा पुतळा असाच घोड्याचे दोनही पाय हवेत फेकलेल्या अवस्थेत आहे.
वरील दोनहि पुतळे संकेतानुसार चुक आहेत.

हां, आता असले संकेत मानायचेच नाहीत असे काही ठरविले असल्यास मग बोलणे खुंटले.

*****************************
पद्म यांनी दिलेली लिंक व माहिती पुढे देत आहे

पद्म | 24 December, 2016 - 15:39
https://en.wikipedia.org/wiki/Equestrian_statue

इथे आत्ताच वाचलं,

Hoof-position symbolism

In the United States and the United Kingdom, an urban legend states that if the horse is rearing (both front legs in the air), the rider died in battle; one front leg up means the rider was wounded in battle or died of battle wounds; and if all four hooves are on the ground, the rider died outside battle. For example, Richard the Lionheart is memorialised, mounted passant, outside the Palace of Westminster by Carlo Marochetti; the former died 11 days after his wound, sustained in siege, turned septic.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>फक्त प्रॉब्लेम एवढाच आहे की समुद्रात भर टाकत आहेत त्याचा फटका तर बसणार नाही ना. अजून एक २६ जुलै झेलायचा नाहीये<<

सद्यस्थितीत असलेल्या मुंबईचा ५०% पेक्शा जास्त भाग समुद्रात किंवा खाडीत भराव टाकुन विकसीत केलेला आहे. नियोजीत शिवस्मारक किनार्यापासुन दूर बेटासारखं उभारलं जात असेल तर भरती/ओहोटिचा कितीसा ॲडवर्स इफेक्ट होणार आहे?..

३६०० कोटी रुपयांमधे आत्महत्या प्रवण क्षेत्रामध्ये एखादा कायमस्वरुपी प्रकल्प नसता उभा करता आला असता का ? (याच्या एक चतुर्थांश सुद्धा लागले नसते कदाचित ) ? कुणी सुधारणारे नाही इथे.

शिवस्मारकाला विरोध इज नथिंग बट ए फ्युटल अटेंम्प्ट, सो लेट्स नाॅट वेस्ट टाईम, एनर्जी, ॲंड बॅंडविड्थ आॅन दॅट टाॅपीक... Happy

राजजी
शिवस्मारकाला विरोध नाही. समाजाचे प्रश्न मार्गी लागलेले नसताना दोन्ही पक्ष स्मारकावरून जे राजकारण खेळतात त्याला विरोध आहे. कि सर्वत्र संपन्नता नांदत असल्याने स्मारके उभारली जाताहेत असं तर नाही ना ?

My sweet tongue !

Yesterday I spoke , it became truth !

राज्य सरकारने २०१७ हे ‘पर्यटन वर्ष’ म्हणून जाहीर केले असून, पर्यटनाला चालना देण्यासाठी हेरिटेज पॉलिसी तयार करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील सुमारे ४५० किल्ल्यांजवळ असलेल्या सरकारी जमिनींवर हॉटेल आणि अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.’ असे राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.

‘राज्यात जास्तीत जास्त पर्यटक यावेत, यासाठी आगामी वर्षभरात विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. त्यानुसार हेरिटेज पॉलिसी तयार करण्यात आली आहे. राज्यात सुमारे ४५० किल्ले आहेत. ते किल्ले पुरातत्त्व खात्याकडे आहेत. या किल्ल्यांच्या जवळ सरकारी जमिनी आहेत. त्या ठिकाणी हॉटेल आणि अन्य सुविधा उपलब्ध करण्याचा विचार आहे. त्यामुळे पर्यटक आकर्षित होतील.’ असे रावल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

http://m.maharashtratimes.com/maharashtra/pune-news/hotels-on-government...

स्मारकाला तसा विरोध नाही. नाहीच बांधायचे तर मग कोणाचेच नको. ईतरांचे बांधले जातात तर मग महाराजांचा का नको? >>महाराष्ट्रात असलेले गडकिल्ले म्हणजे शिवाजीमहाराजांची स्मारकेच आहेत. त्याची नीट काळजी घेता येत नाही. या १३०० कोटींमध्ये त्यांचा विकास सहज करता येऊ शकेल. अरे हो. पण त्यात पैसे खाता येणार नाहीत ना.

या प्रकल्पामुळे त्या खडकांवर असलेले प्रवाळ नष्ट होणार आहेत.

एका बाजूला भारताचे वैज्ञानिक काटकसर करून अथक परिश्रमाने अवघ्या ४५० करोड मधे मंगळावर यान पाठवतात.

तर दुसरी कडे राजकिय नेते ३६०० करोड, ३००० करोड रुपये खर्च करून मुर्ती स्थापन करण्यात मग्न आहे.

गमभन म्हणताहेत त्या प्रमाणे पर्यावरणाला धोका आहेत. एखादे खाजगी प्रोजेक्ट असते तर सरकारने हजार खुस्पटे काढली असती, पण आज या अंधतेमूळे पुढचा धोका कुणाला दिसत नाही.

दादर चौपाटीचे वैभव मी स्वतः बघितले आहे. जूहू एवढा लांब किनारा नसला, तरी तिथे बर्‍यापैकी रुंद रेतीचा पट्टा होता. ओहोटीच्या वेळी बरेच आत चालत जाता येत असे. ( तिथे समुद्र खोल नाही ) पण आता फारसा किनाराच उरलेला नाही. लाटा रस्त्याच्या अगदी जवळ येताना दिसताहेत. त्या किनार्‍यालाच लागून असलेल्या महापौर निवासालाही धोका निर्माण झाल्याचे वाचले होते.

गिरगाव चौपाटीही अशीच गिळंकृत करुन टाकली तर !

<शिवस्मारकाला विरोध इज नथिंग बट ए फ्युटल अटेंम्प्ट, सो लेट्स नाॅट वेस्ट टाईम, एनर्जी, ॲंड बॅंडविड्थ आॅन दॅट टाॅपीक>
अ‍ॅग्री. अ‍ॅज फ्युटल अ‍ॅज द प्लान्ड शिवस्मारक, द युनिटी स्टॅच्यु , द बुलेट ट्रेन & लिस्ट गोज ऑन.

भरत बरोबर आहे.

शिवाय त्यानंतर हे असले धागी ही हाईट्ट आहे.

@ लिम्ब्या,

"आमच्या गावाबाहेर मारूतीचा मोठ्ठा पुतळा आहे" हे वाक्य बरोबर आहे का?

थोरल्या महाराजांचा पुतळा असतो की मूर्ती?
त्याला सो कॉल्ड 'पाश्चात्य' नियम लावाय्चे का?
उग्ग्ं फडतूस वाद उकरून काढायचे.

मिशन मार्सची किम्मत ४५० कोटी होती
पुतळा ३६०० कोटींचा आहे.

"बीएमकेजे" उर्फ, "भारत माता की जय"

सद्यस्थितीत असलेल्या मुंबईचा ५०% पेक्शा जास्त भाग समुद्रात किंवा खाडीत भराव टाकुन विकसीत केलेला आहे. नियोजीत शिवस्मारक किनार्यापासुन दूर बेटासारखं उभारलं जात असेल तर भरती/ओहोटिचा कितीसा ॲडवर्स इफेक्ट होणार आहे?..

राज.. त्या भरावानंतरच या चौपाट्या तयार झाल्या आणि एकंदरीत मुंबई स्थिरावली आणि वस्ती झाली. फार लांब कशाला, बान्द्रे रेक्लमेशनही गेल्या ३०/४० वर्षातलेच आहे. पण आता अगदी हद्द गाठलेली आहे. यापेक्षा जास्त भर समुद्रात घातली गेली तर अनेक ठिकाणी भरतीचे पाणी शिरण्याची शक्यता आहे.

आता जिथे नंदादीप उद्यान आहे तिथे पुर्वी ( म्हणजे बी के सी व्हायच्या आधी ) डॉ सलीम अलि यांनी पक्षी अभयारण्य व्हावे असे सांगितले होते, तसा बोर्डही लागला, होता पण नंतर तिथले फ्लायओव्हर्स झाले, आणि आता तितक्या संख्येने तिथे पक्षी दिसत नाहीत. कारण पुढे भर घातल्याने तो प्रवाहच नष्ट झालाय.

किल्ल्यांजवळ सुविधा आणि जायला रस्ते केले तर "खरकटे" पर्यटक त्याचा नाश करतील, हे खरे असले तरी त्याचा बंदोबस्त करणे अवघड आहे का ? पुरेसे शुक्ल आकारून तिथे कायम स्वरुपी नोकर नाही का ठेवता येणार ?
मुंबईतली ( आणि दिल्लीतलीही ) मेट्रो कशी चकाचक ठेवली जाते ?

मेट्रोत खाय प्यायची पर्मिशन नसते ..... काँटॅक्ट पेरिअडही कमी असतो. किल्ल्यावर लोक काही तास ते काही दिवस असणार ... त्यावर चेक ठेवणे मुष्किलच आहे.

घ्या,
IT सेल कडून 3600 cr खर्चाचे जस्तीफिकेशन यायला सुरुवात झाली आहे.

This is a public service message.

Many are cribbing about the cost of the Shivaji statue. What they do not know is this statue is a masterstroke by Modi Sir which will pay for itself many times over.

The statue is made of Amorphous Silicon, Cadmium Telluride & Copper Indium Gallium Selenide. This is exactly the same material used to make solar cells. Our government consulted with Dr. Immonen Kirsi, Senior Solar Scientist at VTT Research, Finland to develop technology to mould these materials into a statue form. This research took 2.5 years & on December 3rd, Dr. Kirsi sent a private email to Modi Sir that it's now ready for mainstream use. The statue will generate enough electricty to power all government offices in Mumbai.

The statue also has Radial Uniform Projection And Ranging(RUPAR) technology to track boats in the Arabian Sea to prevent a repeat of the 2008 Mumbai attack where the terrorists entered India through the sea. RUPAR is the next generation of SONAR technology and has been developed at the Indian Institute of Science.

Congratulations to all of us.

काही केले तरी आमचे मोदि सर ग्रेट,
अगदी 2000 च्या नोटेत gps चिप या वळणाचे कॅम्पेन आहे हे...

समस्त राजकारण्यांना (यात हे प्रस्तावित स्मारक करण्याची कल्पना डोक्यात आणणारे आधीच्या सरकारातले लोकपण आहेत.) आणि त्यांच्या तालावर नाचणार्‍या नोकरशहांना लाजा वाटल्या पाहिजेत छत्तीसशे कोटी हा शब्दसुद्धा उच्चारायची. मूळ गडकिल्ले, इतर मंदिरे, अवशेष दुर्लक्षित, धूळखात अखेरच्या क्षणाची वाट पाहत पडलेत पूर्ण राज्यभर. पण लोकांपर्यंत ऐतिहासिक वारश्याचं महत्व पोहोचवायला मुळात सरकारमधल्या तथाकथित सुशिक्षित आणि जाणत्या लोकांना त्याचं महत्व असलं/कळलं पाहिजे. गेले वीस वर्ष महाराष्ट्राच्या पुरातत्व संचलनालयावर योग्य व्यावसायिक पुरातत्वशास्त्रज्ञाची संचालकपदी नेमणूक करायला कुणाला वेळ नव्हता आणि चालले इकडे समुद्री पर्यावरणाची नासाडी करून कोळ्यांच्या पोटावर पाय आणून अमाप पैसे खर्च करून स्मारके उभारायला.
इतिहास, पुरातत्वावर खर्च नसेल करायचा तर नका करू (आम्हाला सवय आहे त्याची) पण मग निदान शेतकरी, दुष्काळ या सारख्या आणीबाणीच्या मुद्द्यांवर तरी खर्च करा.
हे सगळे अरण्यरुदन आहे माहित आहे. या मुद्द्यावर लिहायचं नाही असं ठरवलं होतं. पण राहवलं नाही.

डॉक्टर,

अवघड नाही ते. खाण्याच्या जागा वेगळ्या करायच्या. एरवी अगदी हातातले सामानही तपासायचे. प्लॅस्टीकच्या बाटल्या नेऊ द्यायच्या नाहीत ( हे किल्ल्यावर जाण्यासाठी म्हणतोय मी )

परदेशात खुप ठिकाणी बघतो मी हे. फार दूर नाही, अगदी श्रीलंकेतही ! त्यांची स्मारके त्यांनी खुप चांगल्या प्रकारे जपली आहेत.

आणि वर वरदाने लिहिले ते खरेच आहेत. कुठल्याही सुजाण नागरीकाचे तेच मत असेल.

एक देश म्हणून कुठल्याही राजकीय निर्णयाला कडाडून विरोध करायची आपली ताकद कमी पडते. मेधा पाटकर ने काय कमी विरोध केला ? पॉवर प्रोजेक्ट्स ना का कमी विरोध होतात ?

पण या स्मारकाबाबत तर विरोध करायची पण गोची आहे, कारण शिवाजी महाराज हे त्यांनी एक मोहरा बनवले आहेत ( हे लिहिताना खुप यातना होताहेत, पण सत्य आहे ते ) अगदी मंदिर वही बनायेंगे, च्या वेळी झाले होते तेच.

विरोध केलात तर तूमच्या निष्ठांवरच संशय घेतला जातो.

आणि इथे कुणा अजाण बालकाला वाटतेय का, कि दिल्या बजेट मधे आणि दिल्या वेळेत हे पुर्ण होईल ??

The statue will generate enough electricty to power all government offices in Mumbai.

Rofl

आणि पडक्या किल्ल्याना मात्र लोकानी गोंजारत बसायचं !
कुणि कुणालाहि गोंजारले तरी मला राग येत नाही.
मला प्रचंड वाईट वाटते ते भारतीयांच्या विचारसरणीबद्दल.

ज्या गोष्टींबद्दल अभिमान, कुणाला गोंजारायचे, कुठे पैसे खर्च करायचे ते खाजगी स्तरावर का ठरवत नाहीत? कुणि पुढाकार घेऊन हे सगळे लोकांच्या देणग्यांतून का करत नाहीत? मग उगाच कुणाला आक्षेप, टीका करायला वावच नाही. तुमचे पैसे जात नाहीत, गप्प बसा असे सांगता येते.
एक कोटीहून अधिक लोकसंख्या, जगात आर्थिक स्तरावर उच्च स्थान, अनेक लोक अत्यंत श्रीमंत, व्यवस्थापन विषयात मास्टर्स डिग्री वाले असंख्य लोक.

असे असताना प्रत्येक बाबतीत सरकार!
सरकार तर लोकशाही, प्रत्येकाला मतस्वातंत्र्य, मग सरकारने काही करायचे म्हंटले म्हणजे सगळ्या लोकांच्या करातून पैसे. मग ते का नाही टीका करणार? आक्षेप घेणार? त्यांचा हक्क आहे.

जनतेला बहुमताने असे वाटले की पुतळा उभारावा, आपल्या देशाचा अभिमान म्हणून, तर सरकारने परवानगी द्यावी पण पैसे मात्र खाजगी देणगीदारांकडून घ्यावेत.

इथे स्वातंत्र्यदेवीच्या पुतळ्याची डागडुजी, नवा रंग इ. करायचे होते तर ली आयाकोका या प्रसिद्ध खाजगी व्यक्तीने पुढाकार घेतला, जनतेकडून देणग्या घेऊन पैसे गोळा केले नि त्यातून हे काम केले. तेंव्हाहि टीका करणारे होतेच, पण त्यांनाहि अधिकारवाणीने सांगणारे देणगीदार होते की आम्ही आमच्या पैशातून सरकारी परवानगीने, सरकारी पैसे न घेता हे काम करतो आहोत, तेंव्हा तुम्ही नुसतेच बोंबलत बसा, कुणि काम थांबवणार नाही!!

भारतीय म्हणजे नुसती बोंबाबोंब नि विरोध. विधायक कार्ये अत्यंत थोडी.

जरा बाबा आमटे यांच्या कार्यातून स्फूर्ति घ्या!! त्यांना किती पैसे दिले सरकारने? त्यांच्याविरुद्ध बोंबाबोंब ऐकू आली नाही. अत्यंत खुळचट्ट, अशास्त्रीय कल्पना बाळगून त्यांच्या कार्याला विरोध झाला होता, पण त्याने कार्य थांबले नाही, तेव्हढी शक्तीच नव्हती विरोधात.

जरा बाबा आमटे यांच्या कार्यातून स्फूर्ति घ्या!! >>>
मी तिकडे आले कि प्लस वन देईन या वाक्याला..

विकु,

सध्याचे भाजपा सरकार, हे निवडून आलेले लोकनियुक्त कल्याणकारी लोकशाहीचे नसून, भारत नामक देश युद्धात जिंकून पादाक्रांत केलेल्या हिंदुस्थानी लोकांचे सरकार आहे.

यांना देशाचा खजिना व नागरिकांना वाट्टेल तसे, वाट्टेल तिथे, वाट्टेल तेव्हा वापरायचा, छळायचा, अधिकार आहे.

यांना संसदेत किंवा कुठेच उत्तर द्यायची गरज नाही.

तेव्हा, निधी कुठून आला, हा प्रश्नच उभा राहू शकत नाही!

ह्म्म्म लगता हैं चोट बहोत गहरी हैं Sad
असो, हे पुतळा प्रकरण मलाही पटलेले नाही.
शिवाजी महाराज असते तर लोक कल्याणकारी कामे सोडून असले खर्च करणार्‍यांचे काय केले असते ?

मला वाटते की भूमीपूजन करून काम थांबवतील... राममंदिरसारखे हा मुद्दा सारेच पक्ष किमान पंधरावीस वर्षे वापरतील.. काही बाही कारणे निघत कामावर स्टे येत राहील आणि मुद्दा तापत राहील.

Pages