कमिशन ___ २२५

Submitted by ऋन्मेऽऽष on 1 December, 2016 - 02:57

ईस्टॉलवर आज नेहमीपेक्षा कमी गर्दी होती. सगळ्यांचाच सेम प्रॉब्लेम. मी खिसे चाचपले. २० रुपयांची खुल्ली चिल्लर आणि पाचशे पाचशेच्या दोन कायमच्या बंद नोटा सापडल्या. नाही म्हणायला मागच्या खिशात दोन हजारांचे कडक बापू होते. पण ते नुसता वडापाव खायला म्हणून बाहेर येणार नव्हते.

जंबो वडापाव साधा पंधरा रुपये. त्यावर बटर आला तर वीस रुपये. आणि चीज आले तर आपल्या औकातीच्या बाहेर.. साला पाच रुपये शिल्लक ठेवायचे की बटर बोलायचे.. आरे हाड, आपण खाणार तर तुपाशी! एका फटक्यात निर्णय झाला. हातातला वडापाव पोटात जात होता आणि खिशातले बिनकामाचे बापू हसत होते.

अरे ही त्या दिवशीचीच बाई. वरचेवर असते का ईथे? पाच पाच रुपये गोळा करून वडापाव खाऊन जाते. बरा धंदा आहे. मागच्यावेळी दया येऊन तिला अख्खा वडापाव घेऊन दिलेला. चुकी केली. आता उगाच दोनपाच रुपयांच्या आशेने बघतेय आपल्याकडे. अरे हे काय, ईथे कश्याला येतेय. आता कसे कटवावे हीला, द्यायला आठाणेही नाहीत.

च्यायला खिशातले बापू नाचवावेत का तिच्यासमोर. बघ बाई देतोय का तुला तरी तो वडापाववाला दोन हजाराचे सुट्टे. एक वडापाव कमिशन म्हणून तू खाल्लास समजेन. उरलेले मला दे. सुट्ट्याचे सुट्टे आणि पुण्याचे पुण्य..

पण काही सुचण्याआधीच ती माझ्यापर्यंत पोहोचली. आपले तंबाखूचे दात दाखवत हसली. आणि आपल्या मळलेल्या झोळीतून एक डब्बा बाहेर काढला. मी हात वर करत तिला ‘पुढे जा’ असे बोलणार ईतक्यात तिने तो डब्बा उघडला.. आणि माझा हात वरच्यावरच थबकला.

माझ्यासमोर हजाराची बंद नोट नाचवत ती म्हणाली, साहेब सुट्टे मिळतील का... नऊशे ऐंशी दिले तरी चालतील ..

- ऋन्मेष

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुळातच मोजणे ही एक चांगली सवय आहे,
कारण जी गोष्ट आपण मोजतो तिची आपल्याला किंमत सुद्धा असते
आणि मग शब्द मोजू लागलो तर शब्दांचीही किंमत ओळखतो Happy

अ‍ॅप वगैरे आता आलेत, मला चालताना पावले आणि लिहिताना शब्द मोजायची लहानपणापासूनची सवय आहे < तु जन्मतःच एप आहेस.

---> किती जळणार ?
रुमणेश भाऊ - लिहीत राहा... हम आपके साथ है

रीया Proud

ग शब्द मोजू लागलो तर शब्दांचीही किंमत ओळखतो
>> वाटत नाही तस आजवरच्या वावरावरून! Wink

वाटत नाही तस आजवरच्या वावरावरून!
>>>
नानबा Happy

एक उदाहरण घेतो,

एकाला पैश्याची किंमत आहे तर दुसर्‍या एकाला नाही.
ज्याला पैश्याची किंमत नाही त्याचा पगार पन्नास हजार आहे, पैश्याची किंमत नसल्याने त्यातील पंचवीस हजार म्हणजेच पन्नास टक्के रक्कम तो मौजमजेत उधळतो.

ज्याला पैश्याची किंमत आहे तो मात्र आपल्या मिळकतीच्या दहा टक्केच मौजमजेत उधळतो. पण त्याचा पगार पाच लाख असल्याने तुम्हाला पन्नास हजार उधळलेले दिसतात.

पण आता एक त्रयस्थ व्यक्ती ज्याला त्यांचे पगार माहीत नाही तो या दोघांपैकी कोणाला उधळपट्टी करणारा बोलणार सांगा Happy

ईथेही तसेच आहे, माझ्याकडे इथे बोलण्यासारखे अफाट आहे. पण शब्दांची किंमत असल्याने मी त्यातले मोजकेच बोलतो. पण एखाद्याला गोडाऊनमध्ये किती माल पडलाय हे माहीत नसल्याने एवढे देखील जास्त वाटते Happy

आणि हे मुद्दा क्लीअर करायला लिहिलेय, स्वताचे कौतुक नाही.
तरी तसे वाटल्यास तो आरोपही नेहमीच मान्य केलाय Wink

Kadak...there should be dabate on this topic
>>>>>
नक्की कुठला टॉपिक? क्लीअर सांगा जरा, एका धाग्याची सोय होईल

धन्यवाद मृणाली. फार जुने लिहिलेले वर काढले. पुन्हा आता लिहायला घ्यायला हवे. मायबोली गणेशोत्सवाने जरा मूड फ्रेश केलाय Happy

Pages