तुझ्यात जीव रंगला - झी मराठीवरील नवी मालिका

Submitted by योकु on 19 September, 2016 - 10:26

तर, लोलिता गाशा गुंडाळतेय. नवी मालिका, नवी हिरवीण. नवा काथ्याकूट. नवी पिसं.
हो जाओ शुरू... Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>जेनेलिया देशमुखचा भास मलाही झालाच. शिवाय सई ताम्हनकरचाही झाला

अगदी अगदी

>>आशा काळे आहे. पाटलाची मुलगी. भस्मविलेपित रूप साजिरे आणुनिया लोचनी , अपर्णा तप करिते काननी

बरोबर. हे गाणं मला फार आवडतं

>>मग दादा कोंडकेही होते.>>> मग तो पैलवान दादा कोन्डके होते का?

http://www.imdb.com/title/tt0253783/ - ह्यात दादा कोंडकेंच्या नावापुढे 'नाना' असा उल्लेख आहे. हे पहिलवानाचं नाव असू शकत नाही. 'हणमा' ह्या नावाआधी 'शक्तिकुमार' असा उल्लेख आहे. हाच पहिलवान असावा. Happy

एका सेकंदात ती मुलांना पीटी करुन दाखवता दाखविता याच्या साईडला कशी काय येऊन उभी राहते? अनेकदा सिनेमातही असेच अतर्क्य सीन्स दाखवतात.

>>एका सेकंदात ती मुलांना पीटी करुन दाखवता दाखविता याच्या साईडला कशी काय येऊन उभी राहते?

प्रेमात काही पण होऊ शकतं ना? Happy आणि ह्याला सेकंद वाटला असेल पण प्रत्यक्षात मिनिटं गेली असतील.

पहिलवानाचं खरं नाव हार्दिक जोशी आणि शिक्षिकाबाई अक्षया देवधर म्हणे. पहिलवानाचं मालिकेतलं नाव 'राणा' असं आहे - इति लोकसत्ता. कोल्हापूरच्या पहिलवानाचं नाव 'राणा'?

हिरोईन मला त्या 'सरस्वती' सिरियल मधली सरस्वतीची बहीण वाटली.
आधी एकदम जेनेलियाचा भास झाला होता.

@स्वप्ना_राज

राणा हे नाव असणे यात विशेष असं काहीच नाहीये .....
राजपूत समाजात हे नाव प्रामुख्याने आढळते आणि महाराष्ट्रात हा समाज मोठ्या संख्येने आहे आणि पूर्णपणे मराठी लोकांमध्ये मिसळून गेला आहे . भाषाही मराठीच बोलतो . यांचा मुख्य व्यवसाय शेती आणि पशुपालन,तसेच सैन्य दलात जाण्याची आवड असलेला आणि राजकारणातही बऱ्यापैकी वजन असलेला हा समाज आहे.
अमरावतीचे(बडनेरा मतदारसंघ) विद्यमान आमदार रवी राणा आहेत, ज्यांनी दक्षिणेतील अभिनेत्री नवनीत कौर हिच्यासोबत विवाह केला आहे .
तसेच खामगाव चे माजी आमदार हे काँग्रेस चे राणा दिलीपकुमार सानंदा होते हेच ते ज्यांनी विलासराव देशमुखांना सावकारी प्रकरणावरून अडचणीत आणले होते .
त्याचप्रमाणे मराठा समाजातही राणा नाव लावण्याची पद्धत असावी. उस्मानाबाद चे आमदार व माजी मंत्री असलेले
राणा जगजीत सिंह हे त्याचे उदाहरण. जे शरद पवारांचे जवळचे नातेवाईक असलेल्या माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांचे पुत्र आहेत.
शाळा कॉलेज मध्ये असतानाही राणा नावाचे माझे वर्गमित्र होते .

डायरेक्शन निरंजन पत्की ह्याचं आहे त्यामुळे कधी कधी चांगलं डायरेक्शन बघायला मिळेल, नेहेमीच सांगता येत नाही (स्वानुभव). काही वेळा आवडलंय मला त्याचं डायरेक्शन. डायरेक्टरचं नाव लोकसत्तेत वाचलं.

या सिरीयल चा हिरो "खट्टा मिठा" या अक्षय कुमारच्या सिनेमात असरानी जो एक दुकानदार असतो त्याचा असाच अनेक नोकरांपैकी एक दाखवला आहे. फक्त दाढी मिश्या तिथे न्हवत्या व यंग होता.

बाप रे !!! किती स्मरण शक्ती! आणि ऑफ ऑल पर्सन्स, ह्या हिरो चा चेहेरा इतका लक्षात ठेवण्याचे किती ते अदभुत सामर्थ्य!

इस स्मरणशक्ती का राज झी सिनेमा ........... दोन तीन दिवसापूर्वी आय थिंक सॅटर्डे ला पाहिला होता हा सिनेमा आणि ह्या बैलाची जाहिरात लगोलग झी टीव्ही वर पाहलेली म्हणून आठवणीत राहिला. बाकी येथे महा स्मरणशक्तीवाले सामर्थ्यशाली कितीतरी गावतील तुम्हाला...... हा हा हा हा हा

खाष्ट मोठी सून विरुद्ध गरीब बिचारी धाकटी सून अशी टिपीकल मालिका आहे. >>>> अंह मोठा राणा आहे पण तो ब्रह्मचारी ना म्ह्णुन धाकटी सुन अगोदर आली.

झी आणि कलर्स दोन्हीकडे जुन्या मालिका धडाधड संपताहेत. नांसौ संपली, तुझ्यावाचून करमेना संपली, रात्रीस खेळ चाले संपतेय, अस्सं सासर सुरेख तर केव्हापासून संपतेय. अस्सं सासर सोडली तर बाकीच्या वर्षदीड्वर्षाच्या आसपास संपताहेत. एक बरं आहे. कोणी प्रेग्नंट हिरॉइनी असल्या तर त्यांना निदान वर्षभराच्या आत बाळंत व्हावंच लागेल. गोड बातमी समजण्याआधीचे तीनचार महिने आणि नंतर बारसं-शॉपिंग वगैरेला वेळ पाहिजे ना?

कलेक्टर नायिकेची पण संपली कलर्सची. तुझ्यावाचून करमेना हल्ली काही महिनेच सुरु झाली होतीना, पटकन संपली. दोन्ही शेवटचे भाग बघितले, बोअर वाटले. ती राधा छान होती आणि तिची बहिण तुझ्यावाचून करमेना मधली.

तिथे संभाजी सुरु होणार आहे तू माझा सांगाती पण निरोप घेणार आहे, पेपरला होतं.

तुझ्यात जीव रंगलाची हिरोईन बरी वाटतेय. ह्या हिरोचा भाऊ मस्त आहे दिसायला.

तुझ्यावाचून करमेना हल्ली काही महिनेच सुरु झाली होतीना, पटकन संपली. दोन्ही शेवटचे भाग बघितले, बोअर वाटले. ती राधा छान होती आणि तिची बहिण तुझ्यावाचून करमेना मधली.>> +१. मला कधीमधी आवडायची ती सिरियल म्हणजे मी कधीमधीच बघायचे. Happy रच्याकने शेवट कसा दाखवला?? ( राधा नि सिडचं जमलं असेल.. पण सिडला कसं समजलं??

तिकडे स्टार प्रवाहवर सुद्दा मालिका सम्पतायत. पुढच पाऊल निरोप घेते एकदाची. गोठ येतेय त्याच्या जागी. तो मापसौ मधला लक्ष्मीचा भाऊ झालेला हिरो आहे त्यात.

अंधश्रद्धा सुलु, पु पा ची वेळ बदलली, संध्याकाळी साडेसहा. गोठचा प्रोमो छान आहे, अंडर watar शुटींग केलंय. त्यात नीलकांती पाटेकर पण आहे.

नकुशीमध्ये डोंबिवलीतले बालकलाकार आहेत.

Pages