तुझ्यात जीव रंगला - झी मराठीवरील नवी मालिका

Submitted by योकु on 19 September, 2016 - 10:26

तर, लोलिता गाशा गुंडाळतेय. नवी मालिका, नवी हिरवीण. नवा काथ्याकूट. नवी पिसं.
हो जाओ शुरू... Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही एकमेव सिरीयल मला सध्या झी टीव्ही वर आवडतेय . प्रेमकथा पण निरागस प्रेमकथा , गावकडचं वातावरण , कोल्हापूर -सांगलीकडचे प्रसिद्ध 'होय की ' ' चालतंय की' हे डायलॉग , हलकेच पण अर्थपूर्ण संवाद , सगळ्यांनी चोख केलेली कामे , जास्त उतार चढाव नाही , जास्तीचा ड ड्रॉमा नाही पण एका रेषेत चाललेले आयुष्य पण नाही,खूप निर्मळ आणि प्रसन्न अशी ही सिरीयल आहे ..

खरं प्रेम काय हे ह्या सिरीयल मध्ये कळतं! ..राणा आणि अंजली मध्ये असलेली वैचारिक , मानसिक , आर्थिक , सार्वजनिक तफावत पण ती असतानाही एकमेंकाना ते भावतात , आवडतात , एकमेकांना हळूहळू accept करतात .. त्यातच सगळं येतं .. मस्तच आहे ही सिरीयल !!!

मजा म्हणजे सगळ्यांनीच छान कामे केली आहेत !! अंजली साधी सरळ चांगले विचार बरीच समजूतदार , राणा भोळा पण मानाने निर्मळ असणारा , गोदाक्का आणि राणा चे वडील म्हणजे ७० च्या दशकातील चित्रपटातील मंडळी , गोदाक्का प्रेमळ पण तेवढ्याच माणसांना ओळखण्यात हुशार , राणा चे वडील खूप समजूतदार , दूरदृष्टी असणारे , तो सुरज , ती खलनायकी ण धाकटी सून ( तिने पण भार्रीच acting केलीये!! ), ती बडबडी आणि फितवणारी चमची , राणा चे कुस्तीचे प्रशिक्षक त्यांचे हसू येणारे dialogue , अंजलीचे साधे , मध्यमवर्गीय , टिपिकल पण आनंदी आई बाबा ..सगळे सगळेच ग्रेट आहेत ..

पण मला सगळ्यात आवडलेत ते म्हणजे बरकत आणि रेणू !! मी तर फॅनच झालीये त्यांची ! अगदी हिरो आणि हेरॉईन पेक्षाही ते भारी वाटतात आणि आवडतही !! बरकत चे प्रेमळ , सुन्दर , आनंदी हसु .. आणि त्याचे सहजच असलेले डायलॉग , आपल्या मित्राबद्दल असलेले प्रेम पहिले की भारीच वाटते !!! तो ग्रेट आणि ग्रेटच आहे .. म्हंटलं तर खूप साधा आहे दिसायला , थोडाफार शेतात राबल्यामुळे काळा पण आहे .. पण तो हसला कि इतका छान आणि प्रसंन्न दिसतो कि बस ! नकळत आपल्यालाही प्रसन्न वाटू लागतं Happy

रेणू .. अंजलीची खरी आणि एकमेव मैत्रीण !! तिला समजून घेणारी , प्रोत्साहन देणारी ! तिचे पण खूप प्रसन्न हसू आहे ..साधीच असली तरी गावाकडची हुशारी आहे तिच्यात. राणा चे आणि अंजलीचे सूत जुळावे हे तिला मनापासून वाटतं .. खरंच मनाने निर्मळ आहे ती !! मुख्य म्हणजे गावाकडच्या बोलण्याचा लहेजा , रहाणीमान बरोब्बर कॅप्चर केलय तिने ! तिला पण पाहिलं की मन प्रसन्न होतं Happy

माझ्यासाठी तरी ह्या सिरीयल मधील ' हिरो ' आणि ' हिरोईन ' तर 'राणा ' आणि 'अंजली ' पेक्षाही .... 'बरकत ' आणि 'रेणू ' आहेत !!

आणि हो 'साहेबरावांना ' कशी विसरेन ते तर ' सिरीयल ' मधील खूप हवेहवेसे आणि एकदम भारी सैराट असे 'गेस्ट ' आहेत .. त्यांची तर 'फॅन' मी केव्हाच झालीये !! Happy

खरंच ! ह्या ग्रेट कलाकारांबरोबर एक सेल्फी काढायला मिळाला तर ' चेरी ऑन द टॉप ' !!! Happy Happy Happy

वॄन्दा | 28 December, 2016 - 01:10 नवीन >>>>> + ११११
जे मनात होत ते लिहलं आहेस... पुर्ण अनुमोदन... मला हि खुप आवडते हि सिरियल...

वृंदा, छान पोस्ट.

मी काल झी च्या फेसबुक वर लिहून आले की 'तुझ्यात जीव रंगला' हीच फक्त चांगली सिरीयल आहे, सर्वांनी चांगला अभिनय केलाय. बाकी सर्व सिरियल्स म्हणजे आनंदी आनंद आहे.

मलापण बरकत आणि रेणू जास्त आवडतात.

तो सुरज दिवसरात्र पिऊन असतो. एरवी सगळ्यांवर चबर चबर करणारी त्याची बायको, त्याला सुधरवायचा प्रयत्न करत नाही ती. सगळी दादागिरी त्या बिचाऱ्या गोदाक्कावर.

मला सर्वात अवडलेला संवाद...

अंजलीबाई ने डोक्यामागे मारु नये तिथे छोटा मेंदु असतो तो काय काय करतो ते सांगीतलेल असत...
राणा तेच कुस्तीच्या आखाड्या मध्ये सांगतो... सगळ्याना...
..तेव्हा त्याचा आखाड्याचा मित्र (जो बायकोला वेळ दिल्यावर गाजराचा शिरा मिळतो तो वाला) विचारतो...

..."अर...राणा.. छोटा मेंदु एवढ सगळ करतुया म्ह्णतोस.. !!
तर मग.. मोठ मेंदु काय करतो...?"

राणा : " (भांबावुन) मोठ मेंदु..? ते मला नाही म्हाईत.. उद्या अंजलीबाईना इचारुन मग सांगतो..!!"

I like it so much...!! ...this is the only daily soap, I wish... कि जो किमान काही years तरी चालावा...

Happy

खूप निर्मळ आणि प्रसन्न अशी ही सिरीयल आहे ..>>
मनातले बोललीस वृंदा ! Happy
२५ dec चा भाग ऑनलाईन कुठे पाहता येईल . कुठेच सापडला नाही .
कोणी डिटेल मध्ये सांगा ना काय झाले ?

बरकत असं नाव खरच असतं का? बरकत म्हणजे वड ना ?

कि जो किमान काही years तरी चालावा >>> एवढा कथेत जीव नाहीये. एकदा कोर्टींग संपून अक्षता पडल्या की धाकट्या सुनेची कारस्थाने आणि तिला थोरल्या सुनेनी दिलेली उत्तरे ह्याच धोपट मार्गावरून जाणार मालिका. तेंव्हा वेळेत संपलेली बरी Happy

कि जो किमान काही years तरी चालावा >>> एवढा कथेत जीव नाहीये. एकदा कोर्टींग संपून अक्षता पडल्या की धाकट्या सुनेची कारस्थाने आणि तिला थोरल्या सुनेनी दिलेली उत्तरे ह्याच धोपट मार्गावरून जाणार मालिका. तेंव्हा वेळेत संपलेली बरी स्मित >>>>>>> +१

तसेही थोड्या काळानंतर सगळ्याच मालीका बोर करत्तात, जो पर्यंत मजा येत्तीये बघायचे नाहीतर सोडुन द्यायचे

एकदा कोर्टींग संपून अक्षता पडल्या की धाकट्या सुनेची कारस्थाने आणि तिला थोरल्या सुनेनी दिलेली उत्तरे ह्याच धोपट मार्गावरून जाणार मालिका. तेंव्हा वेळेत संपलेली बरी >> अगदी खरे. पुढे काय करतील हे झीवाले त्याचा नेम नाही.

अजुन काय, एक अति-आदर्श सून, एक अति-कपटी...इथे ललिता-स्वानंदी ऐवजी नन्दीता-अन्जली जुगल्बंदी असेल

आमच्या कोल्हापूर कड अक्षी अस्सच बोलत्यात बगा...
लई भारी हाय बगा हि शिरेल....

अवो म्हादवराव...
बरकत म्हजें काय म्हणतात ते, समृद्धी वो..
मुस्लिम हाय त्यो...
अदुनमदुन हिंदी बी बोलतयं की त्ये...

मी मानिनी | 28 December, 2016 - 11:39

कि जो किमान काही years तरी चालावा >>> एवढा कथेत जीव नाहीये. एकदा कोर्टींग संपून अक्षता पडल्या की धाकट्या सुनेची कारस्थाने आणि तिला थोरल्या सुनेनी दिलेली उत्तरे ह्याच धोपट मार्गावरून जाणार मालिका. तेंव्हा वेळेत संपलेली बरी स्मित >>>>>>> +१

तसेही थोड्या काळानंतर सगळ्याच मालीका बोर करत्तात, जो पर्यंत मजा येत्तीये बघायचे नाहीतर सोडुन द्यायचे
>>>>>>>>>>>हो खरच ......

बरकत असं नाव खरच असतं का? बरकत म्हणजे वड ना ?>>> बरकत म्हणजे वैभव आणि बरगद म्हणजे वड.
तो मुस्लिम दाखवला आहे म्हणून बरकत नाव.

सुरजपण काम चांगलं करतो, एरवी त्याच्या दिसण्याकडे जास्त लक्ष जातं. देखणा आहे पण कायम टाईट दाखवतात त्याला त्यामुळे एकसुरी वाटतं पण आज नीट लक्ष दिलं तर acting चांगली वाटली, टाईट असताना पण आणि नसताना पण. डोळे फार सुंदर आहेत त्याचे ब्राऊन तेजस्वी. राणाचे डोळे पण छान आहेत पण सुरजपेक्षा कमी.

राणाचे डोळे पण छान आहेत पण सुरजपेक्षा कमी.>>
पण अख्खा राणाच सुरजपेक्षा छान आहे हं, अंजूताई. डोळा मारा >>>>> मस्त

पण अख्खा राणाच सुरजपेक्षा छान आहे हं, अंजूताई. डोळा मारा >>> मला त्याच्या खळ्या आवडतात Happy आणि अ‍ॅक्टींग भारी, पण बरकत समोर असेल तर बरकत भारी वाटतो मला.

आता ती डायरी सुनबाईंच्या हातात पडू नये म्हणजे मिळवलं..

राणाला लिहिता वाचता येतनाही हे कळल्यावर अंजलीची काय reaction असेल =?

दोन चार बुकं शिकला असेलच की पैलवान. एवढही वाचता येत नसेल तर पाठव्क बाईना परत घरी शिकवणी सुरु करावी लागणार.

पण हे शिक्षणाचं पटलं नाहि.. एव्ह्ड्या मोठ्या घरचा मुलगा, वडिल चांगले राजकरणात अन ह अशिक्षित? बिल्कुलच पटत नाहि.. गावोगावी चांगलाच शिक्षणाचा प्रसार आहे.. कुणी अनपड नसतं आता

अगदी अक्षरओळख नाही राणाला, ते काही अजिबात पटलं नाही आणि पचनी पडत नाहीये. तो फक्त स्मायलीज टाकल्यात त्या बघतो.

पटत नसले तरी अशक्य नाही. जर का पैलवानकी करत असेल तर कशाला हवे शिक्षण असेही असु शकते. पण एक दोन चार यत्ता तरी झालेले असायला हरकत नव्हती.

Pages