मायबोली मास्टरशेफ- मंजूताई - पमकीन रोल

Submitted by मंजूताई on 13 September, 2016 - 05:43

घटक पदार्थ :
म : मखाणे
ब : बदाम
ल : लाल भोपळा
लाल भोपळ्याच्या बिया, कन्डेन्स मिल्क, वेलदोडा, चमचाभर तूप , खोबऱयाचा कीस
कृती : लाल भोपळा किसून ध्या. मखाणे तुपावर भाजून घेवून व बदाम एकत्र पूड करुन घ्या. थोडंस तूप टाकून किस कोरडा होईपर्यंत परतून घ्या त्यात मिल्क, बिया घालून मिश्रण कोरड होईपर्यंत परता. थंड झाले की रोल बनवा व खोबऱयाच्या किसात घोळवून सजवा.

टीपा : खूप सोपी कृती व झटपट होणारी आहे. मखाण्या ऐवजी रवा वापरता येईल. बिघडण्याला वाव नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त पाकृ, भोपळ्याच्या बियांची सजावट छानच :)
फोटोंची साईज कमी करून पुन्हा अपलोड करा, आत्ता खूपच मोठे दिसत आहेत.

मस्त. झटपट रेसिपी वाटतेय. बाइंडिंगचं काम कशाने झालंय?
मखाणे वापरायची आयडिया छान. बदामाऐवजी किंवा जोडीने बेदाणे (अख्खे ) छान वाटतील का?

मानव, अारती, आर्या व भरत मनापासून धन्यवाद! स्पर्धेसाठी म्हणून मी बदाम वापरले आहेत. तुम्ही कुठलेही ड्रायफ्रुटस वापरु व मखाण्या शकता. बदाम व मखाण्याची पूड बायडिंगचे काम करते. तुम्ही मखाण्याच्या ऐवजी भाजलेला (नुसताच)रवा टाकू शकता. मखाणे (कुठलाही लाही प्रकार) पौष्टीक असतात. हेल्दी रेसिपी आहे. तुपाचा वापर अत्यल्प आहे. एवढंच म्हणीन करुन , खाऊन पहा मगच मतदान करा