बदफैली - भाग 3

Submitted by निशा राकेश on 13 September, 2016 - 05:15

बदफैली - भाग 3

http://www.maayboli.com/node/60116 - भाग 2

"पण नक्की, काय म्हणालात तुम्ही आमच्या घर मालकाला."

"ते एक सिक्रेट आहे.. जे मी तुम्हाला आताच नाही सांगणार"

अपर्णा फक्त हसली..पण हा मनुष्य थोडा विचित्र आहे ह्याची तिला खात्री झाली..

त्या दिवशी दोघांनी एकमेकांचे नंबर एक्सचेंग केले..

अपर्णा त्या दिवशी फार खुशीत होती..तिला कशाचा नेमका कळत न्हवत....पण खूप आनंद झाला होता.....जणू हवेत तरंगल्याच फील येत होत..... सोहमला भेटून आल्या नंतरचा संबंध दिवस तिचा चांगला गेला होता... रात्रीचे आठ वाजले होते.. अशोक रोज रात्री ओव्हरटाईम करून दहा वाजता घरी यायचा ..
अशोक ची वाट पाहत बसली असतानाच तिच्या फोनवर एक मेसेज आला.

"जेवलात का ?"

"नाही अजून माझे मिस्टर दहा वाजता येतात ...त्या नंतर आम्ही एकत्र जेवतो"

"ओह्ह …..मग केलत काय दिवसभर"

"विशेष काही नाही.....आराम केला , टीव्ही पहिला , जेवन बनवलं.."

"ओके......माझा दिवस मात्र आज सार्थकी लागला...Thanx to you ."

" to me .....का बर...मी काय केलं"

"माझ्यासोबत कॉफी घेतलीत...खूप बर वाटलं मला"

तेव्हढ्यात मोबाईलच्या स्क्रीनवर Ashok calling …….

अशोकचा फोन…. तिने घड्याळात पाहिलं साडेनऊ वाजून गेले होते...

"हॅलो......अशोक तुझा ह्यावेळी फोन काय झालं..?"

"अप्पू..ऐक ना...सॉरी मला आज लेट होईल ,... तु जेवायची थांबू नकोस मी साडेअकरा पर्यंत येतो घरी.."

"पण अशोक........"

"अग येतो ना मी...तु जेवून घे हा ...चल बाय मला मॅनेजर हाक मारतोय"

इतकं बोलून त्याने फोन कट केला.... अपर्णा हताशपणे मोबाईल हातात धरून उभी राहिली ...

फोनवर सोहमचा मेसेज आला ....."What happend .....are you ok "

तिने रागातच आणि अनावधाने "No .." असा रिप्लाय केला ...

आणि फोन बेडवर फेकून दिला रागातच तिने स्वतःला वाढून घेतलं ....आणि रडत रडत जेवत बसली..
.
फोनच्या मेसेजची टोन तीन चार वेळा वाजली ..तिने दुर्लक्ष्य केलं...

थोड्याच वेळात मोबाईल वर फोन आला बघतेय तर सोहमचा फोन होता....आता ती थोडी भानावर आली डोळे पुसतच तिने फोन घेतला..

"हॅलो ...अपर्णा काय झालं ...तु काहीच का रिप्लाय देत नाहीयेस...म्हणून मी फोन केला."

"काही नाही..मी जेवत होते ..सॉरी ..मी तुमच्याशी नंतर बोलते"

"अपर्णा काय झालंय..तुझा आवाज असा येतोय ..रडल्यासारखा..आणि तु जेवतेयस तुझे मिस्टर आले वाटत.."

अपर्णाला रडू कन्ट्रोल झालं नाही ...आणि ती रडायला लागली...

"अपर्णा ..का रडतेयस अग शांत हो ....काय झालं ..मला सांग"

"काही नाही मला येत असं मधेच रडायला ..काहीही कारण नसताना"

"काहीही काय..प्लिज मला सांग..मी काही मदत करू शकतो का तुझी"

"तुम्ही काय माझी मदत करणार...माझी मदत कुणीही नाही करू शकत"

"पण झालंय काय ..ते तर सांगशील"

"मला खूप एकटं वाटत ..असं वाटत माझ्यासाठी कुणालाच काही वाटत नाही…..मी असले काय …..नसले काय ..कुणालाच काहीच फरक पडत नाही...ज्या माणसाच्या विश्वासावर मी माझ्या घरच्यांशी भांडले ... त्यांच्या पासून दूर येऊन पडले….इतकी दूर कि आता पुन्हा त्याच्याशी काहीही संबंध जोडू शकत नाही ....ज्या माणसांसाठी मी माझ्या हक्काच्या माणसांना दुरावले...त्या माणसाला माझी काडीचीही किंमत नाही.. मी इथे एकटी आहे....एकटीच जगतेय…..त्याला त्याच काहीच नाही...त्याला फक्त त्याच काम…..त्याचा ओव्हरटाईम… त्याचे पैसे…..बस्स त्याच एवढंच जग राहिलंय….त्याच्या ह्या जगात मी कुठेच नाहीये..."अपर्णा सुचेल ते वाटेल तस सोहमला ऐकवत होती...

सोहम शांतपणे अपर्णानेच सगळं ऐकत होता..अगदी तिला जराही मध्ये न तोडता...

बोलून बोलून अपर्णा गप्प बसली

"हॅलो..अपर्णा शांत हो.. झालं सगळं बोलून ...झाली सगळी भडास काढून....अपर्णा मला एक सांग ..अशोकच खरच चुकतंय का ग...तो पैसे कमवतोय .. तुमच्या दोघांसाठीच ना ….हो त्याला नाही वेळ देता येत ..मान्य आहे मला ...पण तु नाहीका त्याला समजून घेऊ शकत...त्यांच्या रात्रंदिवस कष्ट करण्याला ...त्याच्या मरमर करण्याचा तुला अभिमान वाटायला हवा….कि राग यायला हवा..."

"पण...सोहम,,,"

"एक मिनिट...माझं पूर्ण बोलून होऊ दे…..तुला चिंता वाटते..साहजिक आहे...पण अपर्णा एक सांगू का ....ज्याची कष्ट करायची मनापासून तयारी असते ना ..त्याला शरीर देखील नेहमी साथ देत...so don’t worry ...काळजी नको करुस तु इतकी...तु तुझं मन गुंतव कुठेतरी..तु देखील स्वतःला बीजी ठेव.... खरच अशक्य आहे का हे "
अपर्णा काही वेळ नुसती गप्प बसली...

"अपर्णा तू ऐकतेस ना....तुलाच त्याला समजून घ्यायचं ..तू जस तुझ्या माणसांपासून लांब आहेस...तसाच तो देखील आहेच कि.....तुम्ही दोघेच आहेत एकमेकांचा आधार..नाही का वाटत तुला..."

"सोहम मला खरच पटतंय तुझं ...तु बरोबर बोलतोयस ...मी उगीच इतकी निगेटिव्ह विचार करत असते नेहमी.....समस्येवर मार्ग काढण्यापेक्षा फक्त रडत बसते.....पण तुझ मी नक्की ऐकेल....thank you so much .."

"अग thank you काय ..मला जे सुचलं ते मी सांगितलं तुला...पण अपर्णा तुझ्या एक गोष्ट लक्षात आली का.....आपण एकमेकांना अरे तुरे करायला लागलोय....."

"अहो खरंच कि...extreamly sorry for that "

"sorry ..कशासाठी आता अहो जाओ नाही...आपण एकमेकांचं चांगले मित्र नाही होऊ शकत का ,,,"

"नक्कीच ...Thanx Friend "

"Friend ला कुणी Thanx नाही म्हणत "

डोअरबेल वाजली..."अशोक आला वाटत…..चल bye ...good night "

"छान हसून दार उघड..काळजी घे स्वतःची …..good night "

अपर्णा त्या दिवसानंतर खरच बदलली...तीची चिडचिड कमी झाली...आनंदी राहायला लागली... स्वतःकडे लक्ष्य द्यायला लागली....स्वतःला सतत कशात तरी गुंतवून ठेवायला लागली...तिला वाचनाची आवड होती...म्हणून ती एका वाचनालयाची मेंबर झाली...तिची आवडती अभिनेत्री स्मिता पाटील... तिचे सिनेमे बघत रविवार घालवू लागली...सोहमचा फोन मात्र तिला रोज सकाळ संध्याकाळ यायचा त्याच्याशी ती खूप बोलायची...तिने अनुभवलेल्या नवीन गोष्टी .....एखाद्या नवीन वाचलेल्या पुस्तकाबद्दल...स्मिता पाटीलच्या एखाद्या सिनेमा बदल....तिने स्मिता पाटीलचा "भूमिका" हा सिनेमा तब्बल आठ वेळा बघितला....

त्या दिवशी सोहमशी फोन वर बोलताना ..

"सोहम...स्मिता पाटीलच भूमिका ह्या सिनेमातलं काम काम मला खूप आवडलं"

"हो...स्मिता पाटीलला त्या सिनेमासाठी पुरस्कार देखील मिळाला होता "

"हो ..का...,हि माहिती माझ्यासाठी नवीन आहे..."

"तुला तीच काम इतकं का आवडलं ... त्या सिनेमा मध्ये तर ती अनेक पुरुषांसोबत..."

"सोहम...प्लिज ह्यापुढे एक शब्द देखील बोलू नकोस ....."

"काय झालं..."

"तुम्ही पुरुष,,,,,असे किती ओळखू शकता एखाद्या स्त्रीला…तू त्या सिनेमात फक्त ती किती जणांसोबत झोपली हेच पाहिलस का... तिच्या लहानमनापासून तिने भोगलेला एकटेपणा .....तिची insecurity ...तिची घुसमट..... ती सतत कुणाचा तरी आधार शोधत होती.....पण प्रत्येक वेळेस तिला जो पुरुष मिळाला...त्या प्रत्येकाने फक्त तिला वापरली...तुला हे नाही का दिसलं...त्यातलं ना मला जेव्हा ती अमरीश पुरी सोबत राहत असते..आणि तिला जेव्हा तो घराच्या बाहेर पडायचं नाही...आमच्या घराची बायकांसाठी हीच रीत आहे वैगेरे सांगतो….म्हणून तिला त्याच्या जवळ देखील राहायचं नसत..त्याला सोडायचं असत तेव्हा त्याची पहिली बायको... तिला बोलते ना " उषा...तु चली भी गयी तो क्या बदलेगा.....सिर्फ बिस्तर बदलेंगे..रसोई घर बदलेंगे....उषा मर्दोके मुखोटे बदलते है... मर्द नही...अपनी कैदसे समझोता कर ले." एका बाईने दुसऱ्या बाईला आपण पुरुषांच्या कैदीतच राहील पाहिजे... हे सांगितलंय...ह्याचा कधी विचार तरी केलास तु "

"मर्दोके मुखोटे बदलते है... मर्द नही...तुला मी देखील मुखवटा चढवलेलाच वाटतो का ?"

"मी फक्त सिनेमा बद्दल बोलतेय"

"मी तुला माझ्याबद्दल विचारतोय...काय वाटत तुला माझ्याबदद्ल"

"तुझ्याबद्दल मला खूप curiosity वाटते .."

"कसली curiosity "

"हेच कि तुझ्याजवळ माझ्या सर्व प्रॉब्लेमच सोल्युशन कस काय असत "

"मुळात...तुझे प्रॉब्लेम्स हे प्रॉब्लेम्स असतात का..ते फक्त छोटासा गुंता असतो तुझा तूच तयार केलेला ....मी फक्त तुला तो सोडवून देतो....तुझ्या माझ्या प्रश्नाच खर उत्तर अजूनही दिल नाहीये...सांग ना खरंखरं तुला काय वाटत माझ्याबद्दल"

"तू खरा वाटतोस...आणि तू खूप चांगला आहेस"

"बस्स इतकंच...."

"हो...म्हणजे...बरं तू सांग तुला काय वाट माझ्याबद्दल"

"बरच काही वाटत....पण ते मी असं फोन वर नाही सांगणार मला भेटशील"

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता मला जाम शंका यायला लागल्यात,
हा प्राणी कार्तिक कॉलिंग कार्तिक सारखा बाईच्याच मनाचा दुसरा अवतार असेल
(डोकं खाजवणारी स्मायली)

निशा, तुम्ही कथा वळवायची आणि बाकीच्यांनी तर्क करत रहायचे यातच तर खरी मजा आहे.>>>>> अच्छा Happy

अनघा >>>> धन्यवाद ..

आवडला भाग....पण का कोण डोक्याला मुंग्या येऊ लागल्यात ....पुढे काय होईल याची उत्सुकता आहे की पुढे असे व्हायला हवे याची अपेक्षा....कळत नाही....असो....येऊ द्या पुढचा भाग लवकर

Good going