माझ्या नवऱ्याची बायको - झी मराठीवरील नवी मालिका

Submitted by योकु on 8 August, 2016 - 23:51

चल्ला पिसं काढू!
येत्या २२ तारखेपासून ही नवी मालिका, झी मराठीवर चालू होतेय. आजच सकाळी जाहीरात पाहीली म्हणून ताबड्तोब धागा काढ्ला! Wink
चलो हो जाओ शुरू!

कलाकार -
अभिजित खांडकेकर
स्मिता गोंदकर
सुहिता थत्ते

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Aajpasoon

मला एक शंका आहे. त्या बच्चानी गुरवाच्या बायकोला बघितलेच नाहीये तर मग तिला कसे कळले की ती गावठी आहे? आज दुकानात येतात ना त्या दोघी एकमेकींसमोर..

मला एक शंका आहे. त्या बच्चानी गुरवाच्या बायकोला बघितलेच नाहीये तर मग तिला कसे कळले की ती गावठी आहे? आज दुकानात येतात ना त्या दोघी एकमेकींसमोर..>>> अग, गुरु तिला सान्गत असतो ना सतत राधिकाबद्दल उदा. माझी बायको अशी आहे , तशी आहे. वै. वै. त्यासाठी तिला प्रत्यक्ष बघायची काय गरज आहे?
त्या दोघीन्ना एकमेकान्बद्दल अजून माहीती नाहिये.

एका पोस्टपासुन गुरुनाथला गुरव म्हणायची रीत या धाग्यावर पडली आहे, बहुतांश लोक ' गुरवाला' असा शब्द वाक्यात उपयोग करुन वापरतात ज्यामधे एका जातीचा अनावधानाने उपहासात्मक उल्लेख होतो आहे याकडे कृपया लक्ष देणार का?

मला एक शंका आहे. त्या बच्चानी गुरवाच्या बायकोला बघितलेच नाहीये तर मग तिला कसे कळले की ती गावठी आहे? आज दुकानात येतात ना त्या दोघी एकमेकींसमोर..>>>

अगं असं काही नाहीये. त्या राधिकाची साडी, वेणी आणि इतर अवतारांमुळे + मराठी अ‍ॅक्सेंटमुळे शनाया तिला गावठी म्हणाली. शनायाला समोरच्याचा अपमान करायला किंवा त्यांना गावठी आणि थर्ड क्लास म्हणायला त्यांना ओळखण्याची गरज नाहीये. ते कॅरॅक्टरच तसे आहे.. सगळ्या जगाला तुच्छ लेखणारे.

बादवे मला खूप आशा होती कि राधिका किंवा तिची शेजारीण ते शनायाच्या खिशातून पडलेलं कार्ड बघेन आणि राधिकाला त्यावरचे गॅरीचे नाव दाखवेल आणि त्याचा भांडाफोड होईल.. पण कसलं काय? आणि ते कानातले सीनमध्येसुद्धा तो अलगद सुटला.

अवांतरः गॅरी-राधिकाचा लहान मुलगा बोबडा आहे किंवा त्याचे उच्चार जरा सदोष आहेत असं मला कालच्या त्याच्या डायलॉग्जवरून वाटलं.

गुरव ही जात आहे??? मला आजच कळलं. मला गुरव म्हटलं की राखेचा मधला गुरवच आठवायचा किंवा गुरव म्हणजे देवळातला देवाची पूजा करणारा.. एवढंच माहित होतं.

कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर साॅरी. परत मुद्दामहून असा उल्लेख मी तरी करणार नाही. Happy

अवांतरः गॅरी-राधिकाचा लहान मुलगा बोबडा आहे किंवा त्याचे उच्चार जरा सदोष आहेत असं मला कालच्या त्याच्या डायलॉग्जवरून वाटलं.>>> हो बरोबर मुलगा बोबडा आहे. पण गोड आहे तो

गॅरी-राधिकाचा लहान मुलगा बोबडा आहे किंवा त्याचे उच्चार जरा सदोष आहेत असं मला कालच्या त्याच्या डायलॉग्जवरून वाटलं.>>> चलता है, अजून लहान आहे तो.

लिंगायत समाजात गुरव हे आडनाव आहे, कोकणात गुरव शंकराच्या देवळाचे पुजारी म्हणून असतात. त्यांना मोठा मान असतो. माझ्या माहेरी रोज देवाबरोबर गुरवांना द्यायला नैवेद्याचं पान असतं (५ असतात नैवेद्य. देव, गुरव, गोग्रास, भु भु- माऊ आणि एक आठवत नाही, सर्वांचा मान अशी प्रथा आहे). त्यांनी नैवेद्य नेल्यावरच आम्ही जेवतो. सासरी श्रावणी सोमवारी गुरवांना नैवेद्य असतो.

५ असतात नैवेद्य. देव, गुरव, गोग्रास, भु भु- माऊ आणि एक आठवत नाही, सर्वांचा मान अशी प्रथा आहे>>> पाचवा नैवेद्य गाईला असावा बहुधा.

बहुतांश लोक ' गुरवाला' असा शब्द वाक्यात उपयोग करुन वापरतात ज्यामधे एका जातीचा अनावधानाने उपहासात्मक उल्लेख होतो आहे याकडे कृपया लक्ष देणार का? >>> कादिप धाग्यावर लोक भरभरून गौरीच्या अभिनयाला नावे ठेवतात, त्या रागापायी तिच्या नावाचा अपभ्रंश करतात. मग तो गौरी नावाच्या प्रत्येक मुलीचा उपहास होतो का ?

कादिप धाग्यावर लोक भरभरून गौरीच्या अभिनयाला नावे ठेवतात, त्या रागापायी तिच्या नावाचा अपभ्रंश करतात. मग तो गौरी नावाच्या प्रत्येक मुलीचा उपहास होतो का ? >> +१००

>> +१००..
याचा अर्थ काय ? Happy उपहास होतो की नाही?

मझ्या मते तरी नाही. आपण फक्त सिरेलीतल्या गौरी ला ग व री , थंडाक्का , माठाक्का असे म्हणत असतो!

या सीरियल सारखाच `सवत माझी लाडकी ' सुद्धा (कथानकाचा पाया) मला अजिबातच आवडला नव्हता.>>> का?

माठाक्का>>>> Rofl

या सीरियल सारखाच `सवत माझी लाडकी ' सुद्धा (कथानकाचा पाया) मला अजिबातच आवडला नव्हता.>>> का? > अगदीच उथळपणे कथा रंगवली होती .

काय चालू आहे सध्या?
ह्या कथा बीजावर आधारित शी डेव्हिल नावाचा सिनेमा लै भारी आहे. मेरील स्ट्रीप मिस्ट्रेस असते व
रोझान बार बायको. दिसायला साधी जाडी वगैरे. मग ती नवर्‍याचा सूड घेते. अशी कथा आहे. बिबी नं वन पण त्यावरूनच घेतला आहे. पन डेविड धवन चे डिरेक्षन त्यामुळे वरचा मजला रिकामा

अगदीच उथळपणे कथा रंगवली होती .>>> मला नाही उथळ वाटली. एका ठराविक वयात आल्यावर (किंवा अस म्हणू की तारुण्य ओसरायला लागल्यावर) पुरुषाला (स्त्री सुद्धा पण इथे मोजो आहे म्हणून पुरुष) आपण अजुनही कोणाला आकर्षक वाटतो का हे आजमावतो. असे काही वाटले की खूष होतो. तारुण्य टिकवण्याची धडपड करतो.

मोजो मुळात स्त्री लंपट नाही. कुटुंब वत्सल आहे. बायको-मुलींवर त्याचे प्रेम आहे. म्हणूनच नीना त्याला एवढ होऊनही समजुन घेते. त्याला सोडून जात नाही. त्याच वेळी ती वर्षा उसगवकरलाही जपत असते. (आठवा तो नीना तिच्या डोक्याला तेल लावत असते त्यावेळाचे संवाद)

मी नताशा + १

पण ही मालिका समाला + मुंफौ अशी हायब्रीड व्हरायटी वाटतेय Happy

रच्याकने, ती राधिकाची मैत्रीण आहे ती कलाकार आधी कशात होती का?

Madhav, ti Rahul Mehendalechi bayako aahe...

Pages