मुंबई ग्राहक पंचायत - 41 वा वर्धापन दिन

Submitted by मुंबई ग्राहक पं... on 10 April, 2016 - 04:36

नमस्कार, 

   आज गुढीपाडवा, आजच्याच दिवशी म्हणजे 1975 च्या गुढीपाडव्याला मुंबई ग्राहक पंचायतीची गुढी रोवली गेली. 41 वर्षे अव्याहत पणे ग्राहक शिक्षण, ग्राहक चळवळ तसेच सदस्यांकरीता उपयोगी वाणसामान, वस्तुंचे मासिक वितरण अशा विविध उपक्रमांतून मुंबई ग्राहक पंचायतीचे काम वाढतच आहे. आज जवळपास 36000 कुटुंब सदस्य संख्या असलेल्या मुंबई ग्राहक पंचायतीचा वटवृक्ष बहरतच आहे. 

    आपण या निमित्ताने एक नविन अनुदिनी (Blog) सुरु करीत आहोत जी आवाजी (Audio) स्वरुपात आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात बऱ्याचदा वाचण्याकरीता पुरेसा वेळ उपलब्ध होत नाही, म्हणूनच मुंबई ग्राहक पंचायतीकडे उपलब्ध असलेल्या रेडीओ भागांचे या अनुदिनी करीता संपादन करुन ते आपण 15 दिवसांनी एक भाग असे प्रसारीत करणार आहोत. हे सर्व भाग आपण ऐकून त्याचा आनंद तर घ्याच, पण आम्हालाही कळवा आपल्याला हे भाग आवडले की नाही ते. चला तर करुया सुरुवात.....

    मुंबई ग्राहक पंचायतीचे संस्थापक सदस्य श्री. अशोक रावत यांनी मुंबई ग्राहक पंचायतीच्या स्थापनेपासूनच्या कामाचा घेतलेला हा आढावा आपण ऐकूयात....

खालील दुव्यावर टिचकी मारुन (Click) आपण हा भाग ऐकू शकता.

ध्वनी अनुदिनी भाग-1 - श्री अशोक रावत

टिप - सदर लिंक मुंबई ग्राहक पंचायतीच्या गुगल ड्राईव्ह वरील ऑडियो फाईल सुरु करते.

आपण हा भाग येथूनही ऐकू शकता.

        धन्यवाद.
आपल्या प्रतिक्रिया आम्हाला अवश्य कळवा.

- अनुदिनी गट, मुंबई ग्राहक पंचायत, पुणे विभाग

सदर ध्वनी धागा मुंबई ग्राहक पंचायत, पुणे विभागाच्या http://punemgp.blogspot.in या ब्लॉगवरही प्रसिध्द करण्यात आलेला आहे. या ब्लॉगवर या पुर्वीचे असे ग्राहक माहितीचे लेख आपणांस वाचता येतील.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

या इथे साऊंड क्लाऊडची लिंक एंबेड करण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी झाल्याने गुगल ड्राईव्हची लिंक दिलेली आहे. मायबोलीच्या धोरणात बसत नसल्यास कृपया पर्याय सांगितल्यास आवश्यक बदल करता येतील.