दार्जीलिंग सहल - भाग ३ - बोटॅनिकल गार्डन

Submitted by दिनेश. on 11 March, 2016 - 02:03

दार्जीलिंग सहल - प्राथमिक माहिती http://www.maayboli.com/node/57963

दार्जीलिंग सहल - भाग १ प्रयाण आणि डेकेलिंग रिसॉर्ट http://www.maayboli.com/node/57965

दार्जीलिंग सहल - भाग २ - रॉक गार्डन http://www.maayboli.com/node/57976

रॉक गार्डनपासून जरा पुढे गंगा मैया पार्क नावाचे अजून एक पार्क आहे. त्याचे स्वरुप रॉक गार्डनसारखेच आहे पण तिथे बोटिंगची सोय आहे. सध्या सिझन नसल्याने तिथे दुरुस्तीचे काम चालू आहे, म्हणून तिथे जाण्यात अर्थ नव्हता. म्हणून आम्ही परत दार्जीलिंग गावात आलो. आता तिथले बोटॅनिकल गार्डन बघायचे होते. हे गार्डन गावातच आहे, आणि तिथे पायी जाण्याशिवाय पर्याय नाही ( वाहने जाऊ शकत नाहीत )

मुख्य रस्त्यापासून, खुप खाली उतरत जावे लागते. पायरस्ता आहे पण त्याला प्रचंड उतार आहे. त्याच वाटेने परत यायचेय हे लक्षात ठेवावे लागते. या रस्त्यावर एक डावे वळण लागते आणि तिथेच या गार्ड्नचे द्वार आहे. तिथे एक छोटी पाटी पण आहे पण ती लक्षात न आल्याने आम्ही बरेच खाली उतरुन गेलो. शेवटी तिथल्याच एका मुलाला विचारल्यावर त्याने नीट रस्ता दाखवला. दार्जीलिंग मधे शाळांची उत्तम सोय असल्याचे जाणवले. शाळकरी मुले खुप स्मार्ट होती आणि खुपच छान हिंदी आणि इंग्लिश बोलत होती.

दार्जीलिंग मधे सपाट जाग फारच थोड्या असल्याने जे काही आहे ते डोंगर उतारावरच आहे. हे गार्डनही त्याला अपवाद नाही, त्यामूळे आत शिरलायवरही आपण डोंगरच चढ्त किंवा उतरत असतो.

गार्डन खुपच मोठे आहे, सर्व फिरून बघायचे तर भरपूर वेळ हवा. त्या गार्डनमधली बहुतेक झाडे ही उभ्या विस्ताराची आहेत. आपल्या वड पिंपळासारख्या आडव्या विस्ताराची झाडे अजिबातच दिसली नाहीत.

आणि उभा विस्तार नजरेच्या टप्प्यात येत नाही तिथे कॅमेरात काय येणार ? आपल्याला दिसतो तो केवळ बुंधा आणि त्यावरचे नाव. झाडाच्या फांद्या, पाने वगैरे खुपच वर आहेत. आणि तसाही वसंत ऋतू नसल्याने,
अनेक झाडांना फुले यायची होती.

तिथे कॅक्टसचे वेगळे प्रकार दिसले. ग्रीन हाऊसही आहे. पण त्यांची मांडणी मला तरी आवडली नाही. कॅक्टसच्या विभागात हिरव्या पट्ट्या आणि फुलांच्या दालनात गुलाबी फरश्या बसवल्याने फोटो काढणे अवघड झाले होते.
भर दुपार असूनही प्रकाश पुरेसा नव्हता. ( मला राहून राहून ऑकलंडच्या विंटर गार्डनची आठवण येत होती. मायबोलीवर मी तिथले भरपूर फोटो टाकले आहेत. )

ऑर्किडसे एक वेगळे दालन आहे. तिथे काही दुर्मिळ ऑर्किडस आहेत पण या दिवसात त्यातली काही मोजकीच फुलली होती.

गार्डनच्या आतमधे खाण्यापिण्याची सोय नाही. प्यायच्या पाण्याचीही व्यवस्था दिसली नाही. पण आम्ही सगळे गार्डन न बघितल्याने, त्या असाव्यात असे वाटतेय.

दार्जीलिंगची आणखी एक मजा म्हणजे ते उभ्या डोंगरावर वसले असल्याने, नकाशा तितका उपयोगी पडत नाही. त्यामूळे विचारत विचारतच फिरावे लागते. अनेक जागी पोलिस पोस्टस आहेत आणि स्थानिक लोकही व्यवस्थित रस्ता दाखवतात. ( पाट्या मात्र फारश्या दिसत नाहीत. )

तर चला या गार्डनमधले फोटो बघू..

१) प्रवेशद्वारातून आत शिरलो तरी खुपच उतार आहे.

२) कॅमेरात एवढेच माऊ शकते

३) आतली झाडेही उतारावरच आहेत.

४) नकाशा

५) निवडुंगाचे काही प्रकार

६)

७)

८)

९)

१०)

११)

१२)

१३)

१४)

१५)

१६)

१७)

१८)

१९)

२०)

२१)

२२)

२३)

२४)

२५)

२६)

२७)

२८)

२९)

३०)

३१)

३२)

३३)

३४)

३५)

३६) इथली अनेक फुले सारखी दिसत असली तरी त्यात सूक्ष्म फरक आहेत.

३७)

३८)

३९)

४०) ती लाल दिसताहेत ती या निवडुंगाचीच फुले आहेत.

४१) मॅग्नोलियाला बहर येत होता. पण अपुर्‍या उजेडामूळे डिटेल्स नाहीत ( पुढे येतील )

४२) जी मोजकी ऑर्किड्स दिसली ती

४३)

४४)

४५)

४६)

४७)

४८) ही वेल कुंपणावर होती

४९) ही पालवी नुसती झळाळत होती

५०) हे अनंत नाही, याचे नाव कॅमेलिया जॅपोनिका

५१) या कॅमेलियाच्या दोन जाती होत्या. गुलाबी कॅमेलियाच्या फुलावर तर मी लट्टू. हे फूल खुप गचपणात होते. कोण काय बोलेल याची पर्वा न करता मी त्यात घुसून हा फोटो काढलाय.

५२) फूल जरा जवळून बघितल्याशिवाय माझ्या भावना तूमच्यापर्यंत पोहोचणार नाहीत.

५३) दार्जीलिंग मधे कुठेही गेलात तरी मोमो असतातच. वाफवलेले, तळलेले तर मिळतीलच पण जरा चौकशी केलीत तर मोमोज चिली पण मिळतील...

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह, मस्तच आहेत कॅक्टस चे प्रकार, बरेचसे पहिल्यांदाच पाहिले
अनंत चा मोठा कझिन फारच सुंदर आहे आणी कॅमेलिया जॅपोनिकातर अक्षरशः दिलखेचक आहे.. सुर्रेख..
मोमोज.. टेस्टी!!!!!!!