माझाच 'तो'

Submitted by विद्या भुतकर on 9 February, 2016 - 21:54

काचेच्या पलीकडे तो केविलवाण्या 'शूर' चेहऱ्याने
आणि अलीकडे मी 'उशीर झाल्याच्या' काळजीत
उसनं अवसान आणून हात हलवित.

दारातून तो खिडकीच्या काचेत येतो
दोन बोटं ओठावर ठेवून
अलगद हवेत सोडतो.

मीही मग दोनदा तसंच करते.
हळूहळू तो खिडकीच्या कोपऱ्यात येतो
पुढे जाणाऱ्या मला पाहण्यासाठी.

मीही क्षणभर थांबते
त्याला मनभरुन पाहायला
आणि पटकन पाठ फिरवते.

मनातल्या मनात त्याला सांगत,
'बाबा येतील लवकर घ्यायला'.
आणि तशीच बाहेर पडते,
'स्त्रीस्वातंत्र्याच्या' तथाकथित अपेक्षा पार पाडायला.
-तुझीच आई.

विद्या भुतकर.
माझे फेसबुक पेज: https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

'स्त्रीस्वातंत्र्याच्या' तथाकथित अपेक्षा पार पाडायला>> तथा कथित का बरं ? तुम्हाला स्वतःच्याच लिबरेशन वर विश्वास नाही का? करोडो स्त्री लेबररस जगभर मुलांना दूर ठेवून काम करतात व पैसे मिळवतात. आवंढे गिळत, काळजावर दगड ठेवू न मुलांच्याच भविश्यासाठी पैसे कमवतात. ह्यात काहीच तथाकथित किंवा फोर्स्ड नाही. ही जगण्याची रीत झाली आहे.

तुमची गोड हळवी फेसबुक पोस्टे वाचताना बरे वाट्ते पण जग खरेच ह्या वर्ल्ड व्यू पासून खूपच पुढे आले आहे. मुलांच्या आयु श्यातही आईला सोडून काही तास दूर राहणे ह्या पुढे जाउन किती तरी भयानक दु:खे शामिल झाली आहेत. द वर्ल्ड इज अ मोर डेंजरस प्लेस फॉर चिल्ड्रेन अँड मॉम्स दीज
डेज

यू मे ऑलवेज लीव्ह द जॉब अँड वर्क फ्रॉम होम. लेट युवर पार्टनर अर्न द मनी. पण खूप स्त्रियांना
ही लक्षरी नाही. आणि त्यांचे व मुलांचे मस्त चाललेले असते.

अमा,
हे माझे छोट्याशा जगातले छोटे दु:ख आहे. आणि बरेच स्त्रिया मजुरी करुन दिवस काढतात हे मान्यही आहे. पण त्यान्च्या दु:खाबदल मला लिहिता येत नाही. माझी तेव्हढी एपत नाही.
तथाकथित कारण, मी घरी राहाय्चे वा नाही याचे मला स्वात्र्न्त्र्य्य आहे. पण मी जायचा निर्ण्यय घेते.

तथाकथित कारण, कित्येक बायकाना, पैसे कमविले तरी ते कसे वापरायचे याचेही स्वातन्त्र्य नसते किण्वा आपण स्वावलम्बी आहोत असे वाटत असले तरी निर्णय घ्याय्चे हक्क कुणा दुसर्याला असतात.

असो. तुम्ही वाचलीत, इथे लिहिलेत त्याबद्दल धन्यवाद.

विद्या.