निसर्गाच्या गप्पा (भाग २९)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 January, 2016 - 01:19

सर्व निसर्गप्रेमींना मकर संक्रांतीच्या व निसर्गाच्या गप्पांच्या २९ व्या भागाच्या हार्दिक शुभेच्छा.

निसर्गाच्या प्रत्येक ऋतूचा बाज अगदी निराळाच असतो. ग्रिष्मातला सळसळता रंगीत निसर्ग मनाला नव चैतन्य देतो. पावसाळ्यातला कोवळा निसर्ग मन हिरवगार करुन टाकतो. तर ऑक्टोबर हिटला अलविदा करत येणारी गुलाबी थंडी तरुणाईचा उत्साह वाढवते. या ऋतू बदलाला मानवा सोबतच निसर्गातील प्रत्येक घटक आपआपल्या परीने साद देत असतो. पानगळ, पालवी, मोहर, फळ-फुलां सोबत प्रत्येक सजिव आपली दैनंदिनी बदलत असतो. या नियमालाच अनुसरुन काही परदेशी पाहुणे आपल्या पिल्लांना मायेची ऊब मिळावी म्हणून दर वर्षी न चुकता आपल्या आजोळी स्थलांतर करतात. हिवाळ्यातील हे 'स्थलांतर' म्हणजे भटक्यांसाठी एक पर्वणीच असते.

भारतीय उपखंडातील हिवाळा हा विविध पक्ष्यांच्या स्थलातंराचा आवडता काळ. उत्तर ध्रुवाकडील कडाक्याच्या थंडी पासून संरक्षण मिळावे व लहान पिल्लांना अन्न मिळावे हा एकमेव उद्देश घेऊन फ्लेमिंगो पासून ते छोट्या प्लोवर पर्यंतच्या शे-दिडशे जाती-प्रजाती भारतातल्या विविध पाणथळ जागी स्थलांतर करतात. लडाख पासून ते कच्छच्या रणा पर्यंत... आसामच्या काझीरंगा पासून ते दक्षिणेतील पश्चिम घाटा पर्यंत आपला बसेरा टाकतात. आशिया उपखंडातील कमी थंडीचा प्रदेश या परदेशी पाहुण्यांच्या प्रजननाचा आवडता काळ असतो. राजस्थानातील वाळवंटांत येणार्‍या सारस क्रेनच माहेरपण तेथिल स्थानिक नागरिक अगदी आवडीने करतात. गुजरात मधिल Little Runn of Kutch सरोवराला गुलाबी छटा देणार्‍या रोहितपक्ष्यांची संख्या वर्षा गणिक वाढत असते. LRKच्या या सुदृढ अन्नसाखळीला मिळालेली ही पोचपावतीच आहे. काही स्थलांतरीत पक्षी भारतील दक्षिण भागाला जास्त पसंती देतात. त्याच मुख्य कारण म्हणजे केरळ पर्यंत पसरलेलं पश्चिम घाटाच सदाहरित जंगल, समुद्र किनारे आणि खाड्यांवर पसरलेली खारफुटीची जंगलं...

पक्ष्यांच्या या नैसर्गिक अधिवासा वर होणारं मानवी अतिक्रमण हा एक चिंतेचा विषय बनला आहे. निसर्गातील अन्न साखळी अबाधित राखली पाहिजे याची जाणिव प्रत्येकांत रुजवावी म्हणून Bombay Natural History Society आणि इतर पक्षी मित्रांच्या माध्यमातून अनेक चळवळी सुरु आहेत. त्याला महाराष्ट्र सरकार कडूनही सकारात्मक पाठिंबा मिळत आहे.. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या माळढोक पक्षासाठी राखिव जंगल मिळावं या करता मुख्यमंत्र्यांन कडून हिरवा कंदिल देण्यात आला आहे. सरकारी पातळीवर असे प्रयत्न होतच राहतील. पण त्या सोबतच सामान्य नागरीकांनीही निसर्गा प्रती आपल्या जाणिवा रुंदावल्या पाहिजेत. तरच ही पाहुणे मंडळी न चुकता दरवर्षी स्थलांतर करुन येत राहतील.

वरील मनोगत व फोटो मायबोली निसर्गप्रेमी इंद्रधनुष्य यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423
(भाग २७) http://www.maayboli.com/node/55016 (भाग २८) http://www.maayboli.com/node/55962

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गौरी, माझाच एक लेख होता, नीट आठवत नाही पण ती कुसं मधात पाडून तोंडावाटे घेतात, असे काहीतरी होते. ( खात्री ची माहिती असल्याशिवाय कुणी प्रयोग करु नका )

गुड ईव.. प्रत्येक दिवशी , प्रत्येक खिडकीतून दिसणारे पण कधी ही कंटाळा न येणारे दृश्य!!!

ह्या पक्षांच नाव सीबर्ड आहे की दुसर काही?

समुद्रातून जाताना लाँच मधून खाऊ घातल्यास पाठी पाठी येतात लाँचच्या.

वर्षु, सूर्योदय आणि सूर्यास्त दोन्ही आपल्या घरातुन दिसणे म्हणजे किती छान ना. फोटो ही सुंदर.

जागू, सी गल आणि गिरी पुष्प दोन्ही मस्त.

असे सी गल द्वारके हुन भेट द्वारकेला जाताना पण खूप दिसतात.

हो ग. बिचा-याचे जास्त नखरे नाहीत. सहज फुले मिळतात देवाला. पांढरी कमी आहेत माझ्याकडे. एकच रोप आहे. निळी जास्त आहेत. कधी क्वचित त्याला डबल गोकर्ण पण येतात. Happy

पांढ-यामधे निळी छटा अरे वा. गुलाबीसर रंगाचीपण फुले असतातना.

हो खरच आहे गोकर्ण खुप मायाळु वाटतो, खुप फुलं देतोय, बर्‍याच वेळ टवटवीत असतात फुलं..
मुख्य म्हणजे कृष्णाच्या आवडीचे फुल.. गो कर्ण, गाईच्या कानासारखे फुल... Happy
याला सुपलीचे फुल पण म्हणतात.

माझ्याकडे पण डब्बलचा आहे, तुरळक फुल येतात त्याला.

हा राखाडी रंगाचा गोकर्ण आता तेवढा दुर्मिळ नाही पण यात एक गुलाबी रंग पण असतो, तो मात्र फार दुर्मिळ आहे. ( मी फक्त एकदाच बघितला आहे )

गोकर्ण..मस्तय.. रंग खुप आवडतो मला..पांढरा मी पहिल्यांदा बघतेय.. गुलाबी असतो हे आत्ता कळले.. पांढर्‍यात निळी छटा बढीया दिसतोय सायु Happy

अन्जु ताई, यात पांढर्‍या मधे निळी छटा असलेला पण आहे माझ्याकडे>>>>>>> मस्त आहे.आजूबाजूला पारिजातकाचा सडा सुरेख दिसतोय.

नै नै..अँगल बिंगल घेण्याच्या भानगडीत नै पडली मी.. आणि पानांवर धुळे.. इतक्या दिवस वर लटकुन होत म्हणून.. हे खास जागु साठी.. मागे हाच रंग म्हणत होती गं मी बिगुनिया चा .. आणखी एक पांढरा सुद्धा आहे हँगिंग मधे लावलेला पण तो लटकुन असल्याने फोटो नव्हता काढला.. येतो न फ्लॉवरपॉट चा फिल Wink

बॉटल के अंदर बॉटल ब्रश...:)

देवकी तो पारिजातकाचा सडा माझ्या कडचा नाही ग बाई, ज्यांच्या कडुन मी त्या गोकर्णांच्या बीया आणल्या न त्यांच्या कडचा आहे.. Happy

बिगुनिया हँगिंग मधे खुपच छान दिसतोय..

Pages