रांगो़ळ्या - भाग २

Submitted by सायु on 18 September, 2015 - 04:06

रांगोळ्या भाग १ ला भरभरुन प्रतिसदा बद्द्ल सगळ्यांचे मनापासुन खुप खुप आभार..... Happy
तसेच या धाग्यामुळे मला देखिल खुप काही शिकायला मिळाले. नविन रांगो़ळ्या, नविन कल्पना,
सुचना हे सगळे बघताना माझ्याही रांगोळ्यांमधे खुप सुधारणा झाली आहे ,त्या बद्द्ल तुम्हा
सगळ्याचे आभार., Happy

असे म्हणतात ,रांगोळी म्हणजे दुर्गा, शक्तीचे प्रतिक. रांगोळी काढल्यावर किंवा बघितल्यावर
आपल्याला सुखद अनुभुती येते कारण रांगोळी हे आनंदाचे, सौख्याचे प्रतिक.. रांगोळी आपल्या
संस्कृतीचे प्रतिक.. एखाद्याच्या अंगणात, देवळासमोर, समारंभात आपण सगळेच थोडा तरी वेळ काढुन
रांगोळ्या आवर्जुन बघतो.. आणि हे बघताना आपण अनुभवतो ,एक वेगळाच आनंद ,चैतन्य, शान्तता.. Happy

तर श्री गणेशाला वंदन करुन दुसर्‍या भागाची सुरवात करते आहे...
आणि या भागातही खुप काही शिकायला मिळेल अशी अपेक्षा करते...
पहिल्या धागा..
http://www.maayboli.com/node/51302

IMG_20150918_134518.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आहेत सगळ्याच रांगोळ्या ! मीही रोज येते पण प्रतिसाद कधीमधी.... अआ तिकडे हॉटिलात तुमचा रांगोळीवरचा लेख वाचला होता ... छानच होता...

मस्त्च आह्रेत सगळ्या रांगोळ्या.
सायु, तुमच्या रांगोळितले शेडिंग जबरदस्त असते.

हेमा ताई.:)
रिया धन्स ग..
टीना, कसला कॉम्पलेक्स बाई, तु माझ्या पेक्षा कीत्ती तरी गोष्टीत उजवी आहेस..:)
टीना दोन्ही रांगो़ळ्या सुरेख, ऊषा छान च काढते रांगोळ्या..

मंजु ताई , धागा रोज बघते वाचुन छान वाटले..
जयु धन्स..

अ.आ. पानाफुलांची रांगो़ळी साधी , सुरेख..

हे घे डीटेल्स मंजु ताई, पहिल्या धाग्याहुन सभार...
सोप्पी आहे, काढुन पहा..

+++++++मला थेंबांच्या रांगोळ्या खुप जास्त आवडतात..
ही रांगोळी मी बहुतेक सोमवारी काढते... शिवलींग आणि बेल पानं.. तुम्ही पण काढुन बघा...

१२ ते १२ च्या ४ ओळी, मग एक एक थेंब कमी करत ४ पर्यंत (दोन्ही बाजुनी)

rangoli2 002.jpg

हो रीया,
तो छापाच आहे..मी काढलीए ती Wink
पिंडीची सायली ने पहिल्या धाग्यावर दिलेलीच आहे..
कुणीतरी एक लिंक सुद्धा दिलेली होती त्यात मला परत भेटली..ते सेव्ह करुन ठेवली होती म्हणून काढायला घेतली..
सॉरी सायली , इतक्यात नेट जरा त्रास देत माझं म्हणून तेको क्रेडीट लिहिनेका रह गया Sad ..
इथं पण ते देते पिंडीच्या रंगोळीचे नोट्स.. सायू डोन्ट माइंड प्लीज Happy

बाकी मला बेलाचे तिनच पानं काढायची होती आणि पिंड सुद्धा मोठी हवी होती म्हणून मी जरासे बदल केलेले आहेत रांगोळी काढताना ..

जालावरुन साभार Happy

सायली बोटांची मस्तच Happy

कालची आणि आजची एकसाथ टाकतेय Happy

६ ते ६ :

तुळशीसमोरची ९ ते ५ :

हो आज गेटसमोर काढलेली.. ७, ८ अश्या एकानंतर एक ९ ओळी :

आणि या तुळशीसमोरच्या आणखी छान तुळश्या Wink ६ ते ६ :

सुंदर!

इथुन प्रेरणा घेऊन मी आज एक रांगोळी काढलीच! मेलबर्न मधले हवामान लहरी असल्याने दारात किंवा अंगणात बसून रांगोळी काढण्याचा आनंद विरळाच. पण रांगोळीची हौस मी ताटावर/ताटलीवर रांगोळी काढुन भागवते. रांगोळी काढण्यापूर्वी ताटाला तेलाचा हात फिरवते. त्यामुळे हे ताट बाहेर दारात ठेवले तरी रांगोळी उडत नाही.

मी तो फोटो इथे डकवण्याचा प्रयत्न केला पण साईझ मोठी असल्याने इथे पोस्ट होत नाहीये. फोटोची साईज कशी कमी करायची?

Pages