नमन (North American Marathi Author’s Network) : लेखन कार्यशाळा

Submitted by rmd on 10 July, 2015 - 00:13

नमन वर्कशॉप -
अजय गल्लेवाले, लतिका भानुशाली, अतुल कोठावळे, नंदन होडावडेकर
IMAG1694_small.jpg

जितेंद्र जोशी, चिन्मय मांडलेकर
IMAG1696_small.jpg

पहिल्या दिवशी मला आवडलेला कार्यक्रम होता 'नमन (North American Marathi Author’s Network) : लेखन कार्यशाळा'. यात मराठी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल अजय गल्लेवाले आणि नंदन होडावडेकर सहभागी झाले होते. तसेच गंधालीच्या लतिका भानुशाली आणि मॅजेस्टिकचे अतुल कोठावळे ही होते. या लोकांशी गप्पा झाल्या, लेखनाबद्दलचे त्यांचे viewpoints समजले. लतिका यांनी साहित्य प्रकाशित करण्याबद्दल चार शब्द सांगितले. त्या बोलल्या पोटतिडकीने पण त्यातले उपयुक्त मटेरिअल तसे कमी होते. सगळ्यात जास्त मजा आली ती चिन्मय मांडलेकर आणि जितेंद्र जोशी यांच्याशी झालेल्या संवादाने. 'लिहावे नेटके?' या सेगमेंटमधे बोलताना चिन्मय म्हणाला की रोज काहीतरी लिहीत जा. मात्र एका ठिकाणी नीट, शांत बसून लिहा. येता जाता टाइमपास म्हणून करायची ही गोष्ट नाही. आणि जे लिहाल ते आधी तुमचं तुम्ही वाचून पाहा. आपसूक त्रुटी समजत जातील. जितेंद्र म्हणाला की लिहीत जा पण ते प्रकाशित होण्याकरता लिहायचं असा हट्ट धरू नका. जे खोल मनातून येतं आहे तेच आणि तेव्हाच लिहा. लिहीण्यासाठी आधी खूप वाचलं पाहीजे यावर जितू म्हणाला की 'दूध देण्यासाठी गायीला दूध प्यावं लागत नाही. चाराच खावा लागतो' तर चिन्मय म्हणाला 'चारा खावा लागतो हे बरोबर पण उत्तम प्रतीचा चारा खाल्ला तरच दुधाची क्वॉलिटी चांगली मिळते' स्मित या कार्यक्रमात जितूची एक मस्त हिंदी कविता ऐकायला मिळाली.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users