२ जुलै : अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला

Submitted by दीपांजली on 9 July, 2015 - 23:58

बी एम एम २०१५ , माझं पहिलच अधिवेशन, तेही आमच्या एलेनी होस्ट केलेलं , तीन चार दिवस जाम धमाल केली, कितीतरी प्रोग्रॅम्स ची ट्रिट , अनेक मित्र मैत्रीणींना भेटायची संधी मिळाली, ड्रेसप करायला मिळालं , या शिवाय ओपनिंग सेरिमनीच्या ओपनिंग डान्स मधे असल्याने गेले ४ महिने डान्स प्रॅक्टीस सेशन्स आणि तयार झालेलं वातावरण थेट कुठल्या ग्रँड वेडींग ची तयारी करतोय असं वाटत होतं , अर्थात आमचे ४ महिने हे इतर व्हॉलेंटिअर्स नी दिलेल्या वेळेपुढे काहीच नवह्ते, त्यांची लगिनघाई गेले २ वर्षं चालु होती !
असो, तर आधी अ‍ॅक्चुअल कन्व्हेन्शन बद्दल , मी अटेंड केलेल्या प्रोग्रॅम्स बद्दल स्मित

डे १ , २ ़जुलै २९१५ (अधिवेशनाच्या आधीचा दिवस )
या दिवशी ला सिनेमा ( फिल्म मेकिंग सेमिनार) आणि मच अवेटेड बँक्वेट डिनर नाइट अरेंज केली होती.
ल सिनेमा ज्या लोकांना सिरियसली फिल्म मेकिंग बद्दल थोडं फार कळतं, अभ्यासपूर्ण चर्चा ऐकण्यात इंटरेस्ट आहे अशां साठी होतं.
वक्त्यां मधे डॉ जब्बार पटेल, मोहन आगाशे, महेश लिमये, निशिकान्त कामत, ऑस्कर अ‍ॅवॉर्ड विबर जेफरी ब्राउन असे दिग्गज होते.
अटेंडीज मधे फिल्म मेकिंग स्टुडंट्स बरोबर कन्व्हेन्शन ला आलेले स्वानंदी टिकेकर, अतुल कुलकर्णी हे सुध्दा आग्दी सिन्सिअर विद्यार्थ्या सारखे नोटपॅड पेन घेउन बसले होते स्मित.
स्वानंदी स्क्रीन वर बर्यापैकी चब्बी दिसते, इन रिअल कित्ती बरीक आहे, तिला सांगितलं तर ती म्हणे मी स्क्रीन वर १० ते १५ किलो जास्तं दिसतेच स्मित.
मी थोडा वेळ व्हॉलेंटीअर होते म्हणून हे अटेंड केलं , नाहीतर इट्स नॉट फॉर कॉमन पीपल, जाणकारांसाठीच ते वर्कशॉप !

बँक्वेट डिनर :
फुशिआ कलर शेड्स (गुल्बाक्षी- राणी कलर )थीम दिली होती, मी आणि इतरही अनेकांनी ड्रेसिंग अप एंजॉय केलं!
या कलरचा ड्रेस / साडी नाही अशी इंडीयन स्त्री क्वचितच , पुरुषां साठी ब्लॅक फॉर्मल असावा ड्रेसकोड कारण , अधुन मधुन एखादा पुरुष दिसला तरी मॅजेंटा कुर्ता सलवार - शेरवानी किंवा उपरणं घेतलेला स्मित.
असो, तर सुरवात जादुची पेटी कार्यक्रमानी झाली, प्रामाणीकपणे मला हा प्रोग्रॅम बँक्वेट डिनरला किती योग्य आहे याची शंकाच होती, पण खरच खूप एंजॉय केला !
आदित्य ओक आणि त्यांचे साथीदार कमाल वाद्यवृंद आहे.
कार्यक्रमाला कोणी वेगळा अँकर नाही, ते स्वतः च वादना बरोबर हार्मोनियम ची हिस्टरी सांगताना मधे खूप इंटरेस्टींग किस्सेही सांगितात!
कार्यक्रम इतका सुंदर झाला, हा मेन अ‍ॅरीना इव्हेंट मधे हवा होता असं मात्रं राहून राहून वाटलं .
बँक्वेट च दिसरं अ‍ॅट्रॅक्शन , ' शेखर रहाटेंचा फॅशन शो', याची मी फार वाट पहात होते पण टोटल डिसअपॉइन्टमेन्ट ... रॅम्प वर जुनाट दिसणार्या डल कलरच्या नाडीच्या नौवार्या, ढगळ वाइट फिटींग चे ब्लाउज आणि साडी कशी कॅरी करावी हे मुळीच न समजणार्या काठी सारख्या मॉडेल्स.. सगळेच इंडीयन कपडे कमालीचे डल, जुनाट... काही ठिकाणी ड्रेसेस ना बाहेरून सेफ्टीपिन्स लावलेल्या दिसत होत्या !
गाण्यांची आणि कपड्यांची काही सुसंगति नाही.. रॅम्प वर व्हाइट ड्रेस्ड वेस्टर्न ब्राइड येते आणि गाणं ' लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ' अ ओ, आता काय करायचं
पीएनजीची ज्वेलरीही काहीच लक्षात रहाण्या सारखी नाही...
लोक शिव्या घालत होते माझ्या आजुबाजुचे.. कितीतरी पब्लिक उठुन गेले चक्क .
अगदी प्रामाणिकपणे सांगते, अटेंडीज पैकी सगळ्यांचे कपडे जास्तं सुंदर दिसत होते..
असो, जादुची पेटी , डिनर मेन्यु आणि ड्रेसिंग अप करायला मिळालं म्हणून मी एं़़जॉय केला इव्हेंटचा बराचसा भाग.

( क्रमशः)

Group content visibility: 
Public - accessible to all site users