मराठे ज्वेलर्स बीएमएम सारेगम २०१५ - देवकी पांडे बाम (डॅलस, टेक्सास) यांच्याशी गप्पा

Submitted by वैभव on 10 June, 2015 - 12:09

मराठे ज्वेलर्स बीएमएम सारेगम २०१५ अंतिम फेरीत निवड झाल्याबद्दल आपले मन:पूर्वक अभिनंदन.
DevkiPandeMb.jpg
१) देवकी, तुम्ही मूळच्या कुठल्या ?

मी मूळची औरंगाबादची. एमजीएम मेडिकल कॉलेज अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरमधून मी फिजिओथेरपीचे शिक्षण घेतले.त्याबरोबरच मी संगीतात विशारद केले आहे. आणि आता दोन वर्षांपासून डॅलस, टेक्सास इथे आहे.

२) तुम्हांला संगीताची गोडी कशी आणि केव्हा लागली ?

माझे आईवडील आणि काकाकाकू अशा सगळ्यांना संगीताची आवड आहे. माझा काका खूप छान पेटी वाजवतो. माझा लहान भाऊ गौरांग खूप छान काँगो वाजवतो .त्यामुळे घरात संगीताचे वातावरण आहे, असं म्हणायला हरकत नाही.लहान असताना मी पंडित गोपाल मिश्रा यांचाकडून पियानो वाजवायला शिकले. खूप कार्यक्रम केले. पण त्यामध्ये जास्त मन रमलं नाही. वयाचा १५व्या वर्षी मी गाणं शिकायला सुरुवात केली आणि अजूनही मी ते जोपासत आहे .

३) संगीताचे शिक्षण तुम्ही किती वर्षं घेत आहात? आणि कोणत्या प्रकारचे संगीतशिक्षण चालू आहे ?

मी वयाचा १५व्या वर्षापासून शास्त्रीय संगीताचे आणि नाट्य संगीताचे शिक्षण घेत आहे.

४) संगीतातील तुमचे गुरू कोण ?

माझं गुरू सौ वैजयंती जोशी यांचाकडे संगीताचे शिक्षण झाले आहे. नुकतेच पंडित संजीव अभ्यंकर यांचाकडे मी शास्त्रीय संगीताचे शिक्षण सुरू केले आहे.

५) संगीतातल्या तुमच्या विशेष कामगिरीबद्दल काय सांगाल ?

  • औरंगाबाद व पुणे इथे मी अनेक गाण्याचे कार्यक्रम केले आहेत
  • मला पंडित भीमसेन जोशी पुरस्कार देऊन सन्मानीत केले गेले आहे
  • डॅलसमध्ये ICMC [INDIAN CLASSICAL MUSIC CIRCLE ] मध्ये मी गायले आहे .खालील संकेतस्थळी जाऊन तुम्ही माझा performance बघू शकता.
  • https://www.youtube.com/watch?v=I_zqtzs4qYo

  • प्रसिद्ध संगीतकार जितेंद्र कुलकर्णी यांचासोबत हिंदी गाण्यांचा कार्यक्रम सादर केला आहे.
  • SONY TVवरच्या INDIAN IDOL या गाण्याच्या कार्यक्रमात मी भाग घेतला आहे .

६) संगीताच्या या आवडीसाठी तुमचे काय विशेष प्रयत्न असतात ?

मी भरपूर संगीत ऐकते आणि भावगीत, भक्तिगीत, लावणी, ठुमरी हे सगळे प्रकार गाण्याचा प्रयत्न करते.

७) तुमचे आवडते गायक / गायिका आणि आवडते गाणे कोणते? आवडते संगीतकार कोण?

पंडित भीमसेन जोशी आणि पंडित संजीव अभ्यंकर - शास्त्रीय संगीतातील आवडते गायक ,
मराठी चित्रपटातील आवडते गायक - आशा भोसले ,आरती अंकलीकर .
अरिजीत सिंग आणि सुनिधी चौहान - हिंदी चित्रपटातील आवडते गायक.
आवडते संगीतकार - पंडित हृदयनाथ मंगेशकर, अजय-अतुल, अवधुत गुप्ते .
आवडते गाणे - तरुण आहे रात्र अजुनी, ती गेली तेव्हा रिमझिम, कांदेपोहे

८) आपल्या बीएमएम सारेगम 2015च्या अंतिम स्पर्धेसाठी कशा पद्धतीची तयारी चालू आहे ?

उत्तम सादरीकरणासाठी आणि आवाजाचा टेम्पो कायम ठेवण्यासाठी मी रोज रियाझ करत आहे .

९) संगीताखेरीज आपले अजून काय काय छंद किंवा आवड आहे ?

मला कलाक्षेत्रातील सर्व गोष्टी आवडतात - चित्रकला ,नाट्यकला इत्यादी. त्याव्यतिरिक्त मला बॅडमिंटन व क्रिकेट प्रचंड आवडते .

१०) आपल्या बीएमएम सारेगम २०१५च्या प्राथमिक आणि उपांत्य फेरीची तयारी तुम्ही कशी केलीत ?

घरची कामं, थोडा फिजीओथेरपीचा अभ्यास यांतून वेळात वेळ काढून मी नियमितपणे रोज २ तास रियाझ केला. खालील दुव्यावर तुम्ही मी गायलेली काही गाणी ऐकू शकाल .
गेले द्यायचे राहून

११) आपला कौटुंबिक परिचय ?

अलीकडेच, म्हणजे २०१३मध्ये निखील बाम ह्याचाबरोबर माझा विवाह झाला .

देवकीला तुम्ही या दुव्यावर जाउन मतदान करू शकता.

Group content visibility: 
Public - accessible to all site users