घोड्याची नाल

Submitted by सचिन पगारे on 9 May, 2015 - 09:39

दोन दिवसांपूर्वी नवी मुंबईला एका मित्राकडे जाणे झाले.ह्या मित्राने तेथे एक घर घेतलेय. दोन महिन्यापूर्वी पूजा, शांती असले काही विधी करून त्याने गृहप्रवेश केला. मला मात्र आमंत्रण असूनही काही कारणास्तव जाणे जमले नाही. दोन दिवसांपूर्वी वेळ असल्याने त्याच्या घरी गेलो. मोठ्या आनंदाने त्याने स्वागत केले घर दाखवले.

माझ्या एक गोष्ट लक्षात आली कि त्याने दरवाजाला घोड्याची नाल ठोकलेली आहे ह्या आधीही मी बर्याच लोकांच्या दारावर हा प्रकार पहिला होता.मी त्याला त्यामागचे कारण विचारले तर तो म्हणाला,"काही नातेवाईक म्हणाले, 'लावा, म्हणून लावली, मलाही हा काय प्रकार आहे माहित नव्हते,मात्र एका धार्मिक बाबतीत अधिकारी असलेल्या नातेवाईकाने सांगितले कि वाईट प्रेत-आत्म्यांनी घरात प्रवेश करू नये म्हणून घोड्याची नाल लावायची असते.त्यामुळे हि नाल लावली "'.

विषय तेथेच संपला.

परंतु मनात विचारचक्र सुरूच राहिले जर वाईट प्रेत आत्म्यांना घरातच प्रवेश करायचा असेल (जर ते असतील तर) तर त्यांना मुख्य दरवाजाच कशाला हवा? ते संडास बाथरूमच्या बाऱ्यामधूनही प्रवेश करू शकतात.तसेच किचन किंवा बेडरूमच्या खिडक्यान मधूनही प्रवेश करू शकतात तर हि जादुई घोड्याची नाल फक्त मुख्य दरवाजात न लावता, बाल्कनीत, किचन, बेडरूमच्या, संडास, बाथरूमच्या खिडक्यांवर लावल्यास वाईट प्रेतात्म्यांपासून घराचे रक्षण होईल व घरदार गुण्यागोविंद्याने राहील असे मला वाटते.

मायबोलीकरांना ह्याबद्दल काय वाटते........

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाल नवी आणून ठोकलेली चालत नाही, नाल वापरलेलीच पाहिजेल असते. बाजारात अनेक ठिकाणी मिळणारी नाल ही घोड्यांसाठी वापरलेली नसून बैलाची असते. अषा डुप्लिकेट नालीमुळे आपले इप्सित साध्य न होता दुरात्म्यांना सहज प्रवेश मिळतो. व इकडे आपण नाल ठोकून निश्चिंत असतो. घरात दुरात्म्यांचा वावर सापडून आला की लगेच समजावे की नाल डुप्लिकेट मिळलेली आहे. तेव्हा नाल आणताना ती घोड्याचीच आहे हे पाहून घ्यावे. व डुप्लिकेट बैलाच्या नालीपासून सावधान.

नाल ठोकताना U आकारात ठोकावी त्याच्यामुळे गुडलक खाली सांडणार नाही. उलटा U केल्यास ते चांगले नसते व आपले चांगले गुडलक सांडुन जाते..

काही लोक नाल दरवाज्याच्य वर न ठोकता खाली उंबरठ्यावर ठोकतात. अशावेळी यू ची मोकळी टोके घराच्या आतल्या दिशेकडे असली पाहिजेत. म्हणजे घरातील चागल्या शक्ति व गुडलक बाहेर सांडणार नाहीत.

निष्पाप कोवळ्या जीवा,
तुझ्याकडे घोड्याची/बैलाची/ड्युप्लिकेट बैलाची नाळ वेगवेगळी ओळखण्याची काही व्यवच्छेदक लक्षणे असतील तर कृपया माहिती दे ना.
बाजारात विकत घेताना तिथल्या तिथे पटकन अ‍ॅनालिसीस करून प्रत्येक नाल वेगवेगळी ओळखण्याची काय लक्षणे आहेत?

वयछेदक म्हणजे काय ते समजले नाही. पण घोड्याच्या पायाला ठोकलेली असते ती घोड्याची नाल व बैलाच्या पायाला ठोकलेली बैलाची असे असते. जर घोड्याच्या पायाला ठोकलेली असेल, तर तीच नीट पाहून घ्यावी.
चप्पलेसारखी त्यांच्या पायाला ती लोखंडाची नाल बसवलेली असते. काही वेळा हंटर बूटांनाही नाल बसवलेली दिसून येते. ही नाल तर संपूर्णच निरुपयोगी असते. अजीबात गुडलक मिळत नाही.

जीवा,
म्हणजे पहिला घोडा शोधावा लागेल. मग नाल शोधून सोडवावी लागेल.
मग ती घरी आणुन लावावी लागेल.

निष्पाप कोवळा जीव तुम्ही दिलेली माहिती धक्कादायक आहे. जर घोड्याच्या एवजी बैलाचे नाल देत असतील तर ते समाजासाठी घातक आहे. बैल जसा चौखूर उधळतो तसे दुरात्मे उधळून घरात येण्याची दाट शक्यता वाटतेय. घोड्या एवजी बैलाच्या नाल विकणार्यांना कठोर शासन व्हावे हीच सरकारकडून अपेक्षा......
माझ्या मते नाल हि घोड्याची आहे कि बैलाची ह्याबाबत शेतकऱ्यांना माहिती असावी त्यांच्या ह्या माहितीचा उपयोग करून घेवून एक जोडधंदाही त्यांना मिळू शकतो. सध्या भाजपचे खडसे ह्यांनी एक मत मांडले आहे मल्टीप्लेक्स मध्ये मध्यंतरात बराच मूत्राचा साठा निर्माण होतो त्याचा वापर शेतीसाठी करण्यात यावा ह्यासाठी ते योजना मांडणार आहेत. गडकरींना तर ह्या बाबत अनुभव आहे.

आता समजा ह्याच प्रकारे शेतकऱ्यांची एखादी संस्था उभारण्यात आली नि त्यांचे काम काय तर ज्या व्यक्तीला घराला घोड्याची नाल बसवून दुरात्म्यांना घरबंदी करायची आहे त्याच्या बरोबर बाजारात जावून त्याला घोड्याचीच नाल खरेदी करून देणे. जेणेकरून घराला बैलाची नाल बसवून त्याचे नुकसान होवू नये ह्याने शेतकऱ्यांना चार पैसेही मिळतील नि नाल लावणाऱ्याला दुरात्म्यांपासून मुक्ती.

समाजातील अश्या अंधःश्रद्धेंचा वापर करून गरिबांना फायदा झाला तर खरेच अच्छे दिन येतील.

काही वेळा हंटर बूटांनाही नाल बसवलेली दिसून येते. ही नाल तर संपूर्णच निरुपयोगी असते. अजीबात गुडलक मिळत नाही.>>>>>> हे चुकीचे आहे गुडलक मिळायलाच हवे

पगारेजी ,
अस्सल नाल मिळवण्याचा बिनतोड उपाय सांगतो.
एक घोडा विकत घ्या, त्याला नाल बसवा. पेटावाले येऊन तुमचं भुस्काट पाडतील , त्यांच्या धुलाईनंतर जर तुमचे हातपाय शाबुत असतील तर घोडा फिरवुन आणा. मग त्याची नाल काढा , जरा संभाळुन नाहीतर घोडा तुमची धुलाई करेल . अशारीतीने तुम्हाला अस्सल घोड्याची अस्सल नाल मिळेल, मग बाजारातुन खिळे आणि हातोडी आणुन दरवाजावर ती नाल ठोका.
आता तुमचं नशीब फळफळेल , राहुलजी तुम्हाला बोलावुन पक्षाची मोठी जबाबदारी देतील आणि तुमचेही अच्छे दिन येतील.
तथास्तु !

सध्या भाजपचे खडसे ह्यांनी एक मत मांडले आहे मल्टीप्लेक्स मध्ये मध्यंतरात बराच मूत्राचा साठा निर्माण होतो त्याचा वापर शेतीसाठी करण्यात यावा ह्यासाठी ते योजना मांडणार आहेत. गडकरींना तर ह्या बाबत अनुभव आहे.
<<

लो कल्लो बात.

मग, मागच्या सरकारातले आमचे लाडके मा. अजीतदादा पवार यांनी धरणेच्या धरणे त्याच साठ्याने भरायची गोष्ट केल्याबरोब्बर हे सगळे भगवे बगळे मान कापलेल्या कोंबडीसारखे का फडफडू लागले होते? अजीतदादा शेतकर्‍याच्या घरातले आहेत. शेतीसाठी काय चांगले असते, ते त्यांना चांगले ठाऊक आहे.

*

सातीअक्कांनी बैलाची नाळ म्हटलंय ते निकोजीच्या लक्षात आलेलं दिसत नाहिये Wink

पगारेजी ,
अस्सल नाल मिळवण्याचा बिनतोड उपाय सांगतो.
एक घोडा विकत घ्या, त्याला नाल बसवा. पेटावाले येऊन तुमचं भुस्काट पाडतील , त्यांच्या धुलाईनंतर जर तुमचे हातपाय शाबुत असतील तर घोडा फिरवुन आणा. मग त्याची नाल काढा , जरा संभाळुन नाहीतर घोडा तुमची धुलाई करेल . अशारीतीने तुम्हाला अस्सल घोड्याची अस्सल नाल मिळेल, मग बाजारातुन खिळे आणि हातोडी आणुन दरवाजावर ती नाल ठोका.>>>>

पहा बाजीन्दांनी अस्सल घोड्याची नाल मिळवण्यासाठी काय काय उपाय केले. प्रथम घोडा विकत घेतला (पेटावाल्यांनी त्यांचे येवून भुसकट पाडले)नाल काढताना घोड्याने त्यांची धुलाई केली तरीही त्यांनी अस्सल नाल मिळवून भूताखेतांपासून मुक्ती मिळवलीच ... ह्याला म्हणतात अनुभव......

.अजून कुणाचे काही अनुभव असतील तर नक्कीच शेअर करावेत

धन्यवाद बाजिंदा

काऊ अत्यंत उपयुक्त अशा लिंक तुम्ही दिल्या आहेत ह्याचा नक्कीच मायबोली वरील अंध श्रद्धाळूंना फायदा होईल. फक्त मायबोली वरीलच नव्हे तर इतरही लोकांना ह्याचा फायदा व्हाव्हा म्हणून हा धागा सार्वजनिक करत आहे . अंध श्रद्धाळूंनी काऊ नि दिलेल्या लिंकचा फायदा घ्यावा हि विनंती.

काळ्या घोड्याचे किती फायदे आहेत ते खुद्द काळ्या घोड्यालाही माहित नसेल

घोड्याची नाल काय ठोकताय, एक सॉक्सची जोडी महिनाभर न धुता पायात/ बुटात घाला आणि नंतर दरवाजावर ठोका, काय बिशाद आहे कोणी घरात घुसायची..(वस्तीगृहातला प्रत्यक्ष अनुभव आहे, एका रुम मध्ये हा उपाय योजन्यात आला होता, रॅगींग घेणारे सुद्धा आत घुसले नव्हते)

छान.

रच्याकने,
गेटवे ऑफ इंडिया किंवा इंडिया गेटवर चांगली काळ्या घोड्याची अस्सल नाल ठोकली, तर भारतात आजकाल वाढलेला दुष्ट आत्म्यांचा वावर कमी होईल काय?

मायबोलीवरचे कवी विशाल म्हस्के ह्यांच्यापासून प्रेरणा घेवून एक सहज सुचलेली चारोळी सादर करत आहे

शिवराय नि त्यांच्या मावळ्यांनी,
स्वराज्य रक्षणासाठी हाती घेतली तलवार नि ढाल,
आज मात्र त्यांचा मावळा भुताला घाबरून
दाराला ठोकतोय घोड्याची नाल...