थीम पार्क्स बद्दलचे अनुभव / आवडत्या राईड्स

Submitted by Adm on 28 April, 2015 - 08:41

देशी तसच परदेशी प्रवासात अनेक जण वेगळवेगळ्या थीम पार्क्सना भेटी देत असतात. बर्‍याचदा एकादिवसात भल्या मोठ्या पार्क मधलं नक्की काय काय बघायचं, कुठल्या अ‍ॅक्टीव्हिटीज करायच्या असे प्रश्न पडतात. त्यामुळे थोडा गृहपाठ करून गेलेलं असलं की पार्क मधल्या आपल्या वेळेचं नीट नियोजन करून आवडत्या गोष्टी बघता येतात. आधी जाऊन आलेल्यांचे अनुभव असा गृहपाठ करायला बर्‍या पडतात.
हा धागा थीम पार्क्स आणि त्यातल्या आवडत्या राईड्स, गोष्टी, इव्हेंट्स इत्यादींबद्दल चर्चा करण्यासाठी. तसच इतर बाबतीतले अनुभव जसे पार्क मधल्या खाण्यापिण्याच्या सोई, जवळपास रहाण्याच्या दृष्टीने ठिकाणं, थोडक्यात आपली थीम पार्क ट्रिपसंबंधी महत्त्वाचं असं काहीही लिहिण्यासाठी!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पैसे देउन जीव धोक्यात घालुन घाबरवुन घ्यायचा विरोधक असल्याने फारशा राइड केल्या नाहीत.
नाही म्हणायला कुतुहल म्हणुन, कोलम्बस एक बोट जी अर्धवर्तुळाकार झोके घेते अशी राइड दोन वेळा केली आहे.
अप्पुअघर आणि पैठणला.
परत नाहीच.

ब्लॅकपूल युके मधली बिग वन माझी पहिली रोलर कोस्टर राईड होती. १९९६ मध्ये ती तेव्हाची सर्वात उंच आणि सर्वात खोल राईड होती. तो अनुभव अविस्मरणीय आहे. हळूहळू कार वर वर जात गेली. सर्वोच्च बिंदुला ती काही सेकंद थांबली. समोर अथांग समुद्र पसरला होता. त्या काळात मुंबईत उंच इमारती सहसा नव्हत्या. आमचे घर बैठ्या चाळीतले, त्यामुळे तितक्या उंचीवरून परिसर बघण्याचा माझा पहिला अनुभव होता. त्याची नवलाई संपत नाही इतक्यात राईड सुरु झाली. आम्ही सुसाट वेगाने समुद्रात कोसळायला लागलो. इतका भन्नाट अनुभव होता तो!!! Happy आम्ही दोनदा तीच राईड केली. गर्दी सुसाट होती नाहीतर आम्ही दिवसभर तिथेच असतो!! Happy
त्याच्यापुढे एस्सेलवर्ल्ड एकदमच पुळकवणी वाटते! Happy
http://en.wikipedia.org/wiki/Big_One_(roller_coaster)
At its highest point above ground level, the ride reaches 213 feet (65 m) with the first drop measuring 205 feet (62 m). The first drop has an incline angle of 65 degrees and the usual maximum speed for the ride is 74 miles per hour (119 km/h). The ride lasts approximately three minutes and during this time riders normally experience positive g-forces of up to 3.5g and negative g-forces of up to 0.5g.

नंतर कालांतराने डिस्ने टोक्यो, सिक्ष फ्लाग वगैरे केले पण मनात मात्र अजूनही बिग वन आहे. Happy
दुसर्या क्रमांकाला जुरासिक पार्क राईड - कुठे केलेली आठवत नाही. पूर्ण वेळ बंदिस्त गुहेतून जात असताना, एका क्षणी आपण जरा उंच जागी पोहोचतो. आता आपण खाली कोसळणार इतक्यात एक मोठ्ठा डायनासॉर आ वासतो आणि आपण त्याच्या पोटात जातो!! Happy
तिसरा अनुभव मादाम तुसादचा - हि काही राईड नाही. पण गायडेड टूरसारखं काहीतरी. एका खोलीतून दुसर्या खोलीत युरोपचा इतिहास बघत ऐकत जातो. एका खोलीत कुठल्याशा राणीला, तिच्या राजाने कुठल्याशा गुन्ह्यासाठी गिलोटिन खाली दिले. भिंतीवर उंचावर त्या राणीचे डोके गिलोटिनमध्ये ठेवताना छायाप्रकाशातून दाखवले. कथेत आपण बर्यापैकी गुंतलेलो होतो. वरून गिलोटिनचे पाते सपकन खाली आले आणि त्याच क्षणी खोलीत अंधार झाला आणि अंगावर अचानक काहीतरी थोडे घट्ट प्रवाही ओलसर पडले. जणूकाही रक्तच!! एक क्षण भयानक शिसारी आली. जवळपास सगळेच जन किंचाळले. आणि मग दिवे आल्यावर लक्षात आले हा सगळा अनुभवाचा भाग होता! Happy
डिस्ने मधली एक गुहेतली राईड खूप छान आनंददायी होती. भीती दाखवणारे काही तिथे नव्हते. डिस्नेचे मिकी, मिनी वगैरे दिसत होते. दृश्य अनुभव खूप खूप सुंदर होता.

खरतर आम्हि पट्टायाला पॅरासिलिंग केले होते. धमाल आलि होति. म्हणुन आत्ता श्रिलंका- मालदिव टुर करताना मालदिवला पॅरासिलिंग करण्याकरता आम्हि गेलो.आमच्या बरोबर तिन हनिमुन कपल्स होति. त्यांच्यात आम्हि सिनियर असल्याने मि व सुषमा आधि निघालो. इथे आम्हाला पॅराशुटला खालि असलेल्या रॉडला लाईफ जॅकेट घालुन बाधले. व पतंगाला ढिल देतात तसे त्यांनि ढिल द्यायला सुरवात केलि. दर ढिल साधारण १० फुटाचा होता. तो दिल्यावर आम्हि धक्का दिल्यासारखे पुढे मागे होत होतो. साधरण ६० फुट उंच गेल्यावर त्या स्पिड बोट्वाल्या दोघांना काहितरि शंका आलि. म्हणुन त्यांनि आम्हाला खालि खेचण्यास सुरवात करताच पॅराशुटचा स्पिड्बोटिला बांधलेला दोर तुटला व आम्हि दोघेहि भर समुद्रात पडलो. नंतरचि पाचेक मिनिटे हि जिवन-मरणाचि हेलकावे देणारि होति. पॅराशुटचा दोर माझ्या पायात अडकला व मि खालि खेचला जात होतो. पण सुषमाने हिमतिने पाण्यात बुडि मारुन मला श्वास घेण्याकरता तिनदा वर खेचले. हा अपघात होता हे कितिहि मनाला समजावले तरि मनातिल भिति जायला अजुन किति वेळ लागेल...माहित नाहि.

भयंकर अनुभव आहे. पॅरासेलिंग आवडते आणि बरेचदा केले आहे. इथे भेट द्यायला आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना पण आग्रहाने करायला लावले होते.

स्ट्रॅटोस्फिअरमधल्या राइडस केल्या आहेत.. मजा आली. त्यात मित्राने १० डॉलरची पैज लावलेली असल्याने जास्तच मजा आली Wink

लुइव्हिल सिक्स फ्लॅगमधली हेलिवेटर (आता त्याला फीअरफॉल म्हणतात बहुतेक) राइड फार आवडली होती.

इथं अँटवर्प मधे जी वार्षिक जत्रा भरते त्यातली इक्लिप्स राइड घेतली आहे.. अमेझिंग अनुभव. वरून अँटवर्पचं छान दर्शन घडतं Happy

हो पण त्या मुलीच्या मृत्यूत त्या राइडचा काही सहभाग नाहीये असंही सांगत आहेत बातम्यांत. कदाचित तिला एखादी माहीत नसलेली प्रीएक्झिस्टिंग कंडीशन असवी.. त्या राइडमध्ये डोक्याला खूपच धक्का बसतो. काहीतरी संबंध असणारच आहे. फार स्केरी आहे. मी बसतच नाही हल्ली अशा राइडसमध्ये.

नुकतंच पुन्हा लॉस अँजेलिसच्या युनिव्हर्सल स्टुडियो आणि डिस्नीलँड आणि कॅलिफोर्निया अ‍ॅडव्हेंचरला भेट दिली. यावेळी थोडं नैसर्गिकरित्या आणि बरचंस बहिणीनं सतत फोनवरून बोंबाबोंब करून ढकलत राहिल्यानं आधी भिती वाटत असलेल्या राईडस ही केल्या. आवडत्या-नावडत्या राईड्सची लिस्ट :

युनिव्हर्सल स्टुडिओ, हॉलिवूड, एले
Despicable Me Minion Mayhem
Transformers™: The Ride-3

कॅलिफोर्निया अ‍ॅडव्हेंचर, एले
Grizzly River Run
Radiator Springs Racers
Silly Symphony Swings
Soarin' Over California
The Twilight Zone Tower of Terror™ - ही बहिणीच्या कृपेनं ( राईड करत नसल्याबद्दल खूप घालून पाडून बोलली म्हणून नाक कापलं जाऊ नये म्हणून केली) घडली. धम्माल आली. बहिणीला माफ केलंय.
Space Mountain - ही केली पण नाही झेपली. पूर्ण अंधारात कायच्या काय स्पीडनी वेडीवाकडी वळणं आहेत.

डिस्नीलँड, एले
Indiana Jones™ Adventure
Matterhorn Bobsleds
Big Thunder Mountain Railroad
Fantasmic! - हा शो आहे अर्थात पण तरीही......

सिंगापुर, युनिवर्सल स्टूडीयो मधली ट्रान्सफॉर्मर्स पण आवडते.>>> मला पण जाम आवडली... next generation thrill ride that blurs the line between fiction and reality!

राइड्स मधे अगदी सोप्या असतात त्या आवडतात. जसे की हळूहळू छान आरामात गाडीने वा बोटीने ज्या राइड्स असतात त्या. उदाहरण- डिज़्नी वर्ल्ड फ्लोरिडा एपकॉट मधील Soarin, The seas with Nemo. मॅजिक किंग्डम मधले- its a small world, peter pan ride वगैरे.

हॅरी पॉटर वर्ल्ड मात्र खूप आवडलं. राइड्स मधे फॉरबिडन जर्नी फारच छान आहे. राईड्स पेक्षा मला तिथलं जे मॉडेल विलेज केलं आहे ते खूप आवडलं. हुबेहुब पुस्तकातून उचलून आणून ठेवल्यासारखं. सुरेखच.

मामी मी त्या ट्रान्फॉर्मरच्या राईडला इतका आरडाओरडा केला आहे !! मला आजकाल जाम भिती वाटते राईड्स ची!! मला आपल्या त्या डिस्नेलँडमधल्या कपबश्या आवडतात. Proud शिवाय डिस्नेलँडमध्ये सोअरिंग ओव्हर कॅलिफॉर्निया ४डी शो पण मस्त आहे.. आमच्या कॅमरिओजवळच्या सॅन्ता रोझा रोडवरून नेतात त्यात, आणि तिथे असणार्‍या लिंबाच्या झाडांवरून जाताना लिंबाचा वास पण येतो.. फार सही आहे!

हो पाहिली ती बातमी Sad पण तो मुलगा कसा गेला ते कळले नाही. पडला का ?
ती राइड भयंकर दिसतेय.
गेल्या महिन्यात युनिवर्सल ला गेलो होतो पुन्हा. हॅरीपॉटर राइड मस्त आहे. स्टुडिओ राइड मधेही नविन अ‍ॅडिशन्स केल्यात. फास्ट अँड फ्युरियस हे त्यातले नवे अट्रॅक्शन आहे. जबरद्स्त आहे!!

हॉन्ग्कॉन्ग डिस्नेलॅण्ड मध्ये :

१) जंगल रिव्हर क्रुझ . धम्माल राईड आहे. कुठेही वेडीवाकडी वळणे नाही , आरडाओरडा नाही. पण जाम मज्जा येते.

२) द स्मॉल वर्ल्ड - जस्ट टू क्युट Happy

३) लायन किन्ग शो - लायन किन्ग आवडत असेल तर अजिबात चुकवू नका . ४:३० चा शो असेल तर ४ वाजल्यापसून लाईन मध्ये उभे रहा.

शुक्रवारी कुंडलिका रिव्हर राफ्टिंग ला अपघात झाला.राफ्ट उलटले.आणि पिंपळे सौदागर इथे राहणारी एक पत्रकार महिला गेली.पहिला अंदाज नदीत जास्त पाणी सोडण्यात येणार होते हे आयोजकांना माहिती नव्हते/माहिती असून त्यांनी भरपूर धंदा बुडून नुकसान होईल म्हणून लपवले.

http://www.mid-day.com/articles/woman-dies-as-raft-overturns-on-kundalik...
https://www.tripadvisor.in/ShowTopic-g1209190-i20740-k7762431-Safety_Riv...

हे वाचून इथे कोणाचा तरी परदेशात राफ्ट उलटून अंगावर पडण्याचा भयंकर अनुभव वाचला होता तो आठवला.

Pages