भारतीय टेनिसला सोनियाचे दिवस दाखवणारी सानिया!

Submitted by ऋन्मेऽऽष on 20 April, 2015 - 16:41

.

सानिया मिर्झाने जागतिक क्रमवारीत महिला दुहेरीमध्ये अव्वल क्रमांक पटकावला !

गेल्या आठवड्यातील वर्तमानपत्रावर नजर पडली, आणि ही बातमी वाचली!

एकाच वेळी आनंद आणि अभिमान दोन्ही दाटून आले..
पण दुसर्‍याच क्षणी स्वत:शी थोडी शरमही वाटली, जे ही बातमी आपल्याला ईतक्या उशीरा समजावी.
त्याच बरोबर वाईटही वाटले की ज्या व्हॉटसपवर नको नको त्या गल्लीन्यूज फिरत असतात, तिथेही कोणाला हे शेअर करावेसे वाटले नाही.

जिथे एकीकडे साईना नेहवालच्या कामगिरीबद्दल कौतुकाच्या पोस्ट फिरत असतात, जे ती डिजर्व्हही करतेच, पण तिथेच गेल्या काही काळात सानियाबद्दल अभिमानाने कोणी काही फिरवले आहे, असे क्वचितच आढळते.
किंबहुना ती भारतीय तिरंग्याच्या दिशेने पाय ठेऊन बसली आहे असे फेक फोटोच तिची बदनामी करताना मध्यंतरी पाहण्यात आले होते.
बहुधा यामागे कारण तिचे पाकिस्तानी क्रिकेटपटूशी लग्न करणे असावे. कदाचित यातही मुलगी भारतीय आणि मुलगा पाकिस्तानी हे जास्त भावना दुखावणारे असावे,. पण तिने त्यानंतरही भारतासाठीच आपले टेनिस खेळणे चालू ठेवले हे कोणालाही विचारात घ्यावेसे वाटले नाही वा त्याची किंमत मग आपल्या लेखी शून्य झाली.

असो,

सानिया मिर्झा!
एकेकाळची माझी प्रचंड आवडती टेनिसतारका !

याचा अर्थ असा होत नाही की आज आवडती नाही.. पण प्रचंड आवडती म्हणजे एकेकाळी वहीच्या मागच्या पानावर जिचा फोटो मी चिकटवला होता अशी एकमेव क्रिडापटू. अन्यथा हा मान मी चित्रपटसृष्टीतील कोण्या हिरोईनलाही अपवादानेच दिला होता. पण यामागे निव्वळ सानियाचे ग्लॅमरस दिसणे एवढेच नव्हते, तर तिचा स्पोर्टी लूक वेड लावायचा. आसपासच्या मुलींमध्ये तो अभावानेच आढळायचा. तिच्या एकेक स्टाईल स्टेटमेंटचे आम्हा मुलांनीही कॉपी करून झाले होते. मग ते तिच्यासारखे कानातले घालणे असो वा चष्म्याची फ्रेम असो. खेळाच्या जोडीनेच आपला असा एक वेगळा ठसा उमटवणारी महिला क्रिडापटू म्हणून तिची ही अचिव्हमेंट नाकारता येत नाही.

पण काही झाले तरी एखाद्या खेळाडूला खरी ओळख त्याचा / तिचा खेळच मिळवून देतो, आणि याची जाणीव ठेवत त्या खेळाशी ती नेहमीच प्रामाणिक राहीली. तिच्या बॅडपॅच मध्येही, जेव्हा सारे सानिया मिर्झा आता संपली, किंवा एका मर्यादेपलीकडे ती आपला खेळ उंचावू शकत नाही, ती भारताची अ‍ॅना कुर्निकोवा बनूनच राहणार, अशी तिची प्रतिमा तयार होत होती, तेव्हाही.. आणि तिच्या लग्नानंतर आता सानिया मिर्झा भारतीय टेनिसचा केवळ भूतकाळ बनून राहणार अश्या कंड्या पिकू लागल्या तेव्हाही.. तिने आपला लढाऊ बाणा सोडला नाही, ना आपली बंडखोर वृत्ती सोडली, येस्स बंडखोर वृत्ती ज्यासाठीच मी तिला ओळखायचो, आणि ज्यासाठीच ती मला आवडायची (आठवा तिच्या स्कर्टच्या लांबीवरून उठलेला वाद) ... आणि अखेर आपल्या खेळातील प्रतिस्पर्ध्यांशीच नाही तर समाजाशी देखील लढत देत तिने आज हे शिखर गाठले. हॅटस ऑफ सानिया!

पुढे मागे नक्कीच मेरी कोम वा मिल्खासिंग सारखा सानिया मिर्झाच्या जीवनावर देखील चित्रपट बनवला जाईल. (बहुधा आजच्या घडीच्या नायिकांमध्ये "आलिया भट्ट" ही तिची भुमिका सर्वांगाने पेलण्यास सक्षम राहावी.) पण त्या चित्रपटात तिच्या वैयक्तिक आयुष्याला फाटा देत एक सर्वोत्कृष्ट भारतीय महिला टेनिसपटू म्हणूनच तिचे दर्शन घडावे अशीच ईच्छा. कारण आजही तिचे भारतीय टेनिसमधील योगदान सर्वार्थाने जनमाणसात पोहोचले नाही असे मला वाटते. अगदी आमच्यासारख्या चाहत्यांपर्यंतही नाही.. अन्यथा सचिनच्या टेनिस एल्बोबद्दल खडानखडा माहिती असणार्‍या किती जणांना हे ठाऊक असेल की सानियाला देखील कसलासा सांधेदुखीचा आजार आहे. जो तिच्या कारकिर्दीच्या मुळावरच उठू शकतो. ज्याच्याशी झुंजत तिने हा चमत्कार घडवला आहे.

एक काळ होता जेव्हा भारतीय टेनिस लिएंडर पेस आणि महेश भूपती या नावांपासून सुरू व्हायचे तरी टेनिस बघायचो मात्र आम्ही सानिया मिर्झासाठीच. अन्यथा बुद्धीबळात जसे विश्वनाथ आनंद हे नाव सर्वांनाच ठाऊक असते पण तो खेळ बघत कोणी नाही, की फॉलो करत नाही, तसेच भारतीय टेनिसचे आमच्यालेखी झाले असते.

काही का असेना, क्रिकेटच्या ओवरडोसने वैतागलेले, अन टेनिसला काही काळ विसरलेले माझ्यासारखे कित्येक गटांगळू या आनंदाच्या बातमीनंतर पुन्हा या खेळात रस घेऊ लागतील अशी आशा करायला हरकत नाही. Happy

थ्री चीअर्स फॉर सानिया !!
हिप हिप ...

ऋन्मेऽऽष

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिंडरेला Happy
ते सानियाला यमक जुळवत सोनिया चे दिवस केले होते. तरी आपण तिने या खेळात ग्लॅमर ओतले याच्याशी एकमत आहात च की .. हेच मला पुरेसेय.. बाकी, आपली पोस्ट छान.

लीम्बुभाऊ, आशुचेम्प आणि इतर
अत्यंत सुरेख चर्चा !

आशुचेम्प च्या पोस्टी अतिशय समर्पक आणि वाचनीय.
वेळेअभावी चर्चेत भाग घेता आला नाही याचा खेद वाटला Sad

मस्त चर्चा .. धन्यवाद ..

हा धागा सानियाच्या ग्लॅमरस असण्याचा, स्पोर्टी लूक, स्कर्टची लांबी, अ‍ॅना कुर्निकोवा, अलिया भट, चित्रपट अश्या विषयांवर बोलण्यासाठी आहे तर आकडेवारी, जय पराजयाची कारणे असल्या बाष्कळ आणि फडतूस गोष्टींसाठी दुसरा धागा ऊघडा. ईथे फक्त चमचमीत आणि ग्लॅमरस चर्चा ऋन्मेष ह्यांना अपेक्षित आहे.

हे दोन दिवसही असे विषय चघळल्याशिवाय राहू शकत नाहीत बघून अवाक व्हायला होते.

आशुचॅम्प सर्व पोस्ट्सना प्रचंड अनुमोदन!! अगदी योग्य शब्दात, मुद्देसूदपणे विचार मांडले आहेत, सगळ्याच पोस्टी आवडल्या.

हजारो खेळाडूंमधून एखादीच सानिया, साईना तयार होते पण म्हणून बाकीचे ९९९ जण फुकटचे बघे नसतात. त्यांनीही तितकीच मेहनत घेतलेली असते. त्यामुळे प्रत्येक खेळाडूचा आदर करा. भले ते जिंकोत वा हारोत.>>> +10000

आशुचैंप, सगळ्या पोस्ट्स आवडल्या. मूळ लेखापेक्षा तुमच्या पोस्ट्स सुरेख आहेत.
पायस,तुमच्याही पोस्ट्स छान आहेत

आशुचॅम्प, पोस्ट खूप आवडल्या.

बाकि मूळ लेख ठिक ठिक. माफ कर, ऋन्मेऽऽष पण मनात आले ते लिहुन टाकण्यापेक्षा त्यावर अजून काम / रिसर्च करून लिहिलं असतस तर जास्त चांगला लेख लिहिला असतास हे माझं वैयक्तिक मत.

चौकट राजा, माफ करा कशाला, आणि याला लेख म्हणून बघू नकाच. सई किंवा स्वप्निलबद्दल मी जे लिहिले होते त्याला लेख म्हणू शकता. इथे मात्र बातमी वाचून मनात आले तेच मला लिहून मोकळे व्हायचे होते. तसेच हे वैयक्तिक मत म्हणून लिहिले आहे, कोणाला पटावे असा हट्ट नसून इतरांचीही मते जाणून घेण्यात रस होता. Happy

इथे मात्र बातमी वाचून मनात आले तेच मला लिहून मोकळे व्हायचे होते. >>>> हो का ? मग टेनिस ह्या विषयाशी संबंधीत धागा आहे की. तिथे लिहायचं होतं. लेख पाडायचा, मग लोकांनी आवडल नाही किंवा सुधारणा हवी म्हटलं की लेख नाहीच आहे म्हणून कोलांटी कशाला ?

पराग,
मी खेळाच्या मैदानात वगैरे काय तो ग्रूप आहे तिथे पाहिलेले.. हि चर्चा कुठेही नव्हती.. अन्यथा आहे त्याच चर्चेत प्रतिसाद टंकला असता..
बाकी कोलांटी उडी कसली.. वर उल्लेखलेले सई आणि स्वजोशीचे लेख तरी कुठे लोकांना आवडलेले.. उलट टिंगल टवाळ्या उडवणारेच प्रतिसाद आलेले.. एखादा लेख फसला तर फसला, त्यात काय एवढे.. किंवा लोकांना नाही आवडला तर नाही आवडला.. त्यात काय मनाला लाऊन घ्यायचे.. घेतले तर पुढचा कसा लिहायला होणार.. आणि तुम्हाला खरेच असे वाटते की मी या कशाने खट्टू होत असेन .. उलट हट्टाने आता चांगलच जमलं पाहिजे म्हणून लिहायला घेतो Happy

बस्स इथे ज्या भावनेने लिहिलेले ती प्रामाणिकपणे सांगितली इतकीच,

असो, हि माझ्या या विषयावरची शेवटून दुसरी पोस्ट, नाहीच राहवले तर अजून एक लिहेन Happy

टेनिससाठी स्वतंत्र ग्रूप आहे. सापडला नाही तर कमीत कमी एकदा विचारयचे तरी. ते ही नाही तर चालू घडामोडींमध्ये लिहू शकता.

नवीन असताना मी सुद्धा छोट्या-मोठ्या लेखांसाठी धागे काढले आहेत पण चूक लक्षात आल्यावर रंगीबेरंगी पानावर आणि नंतर ब्लॉगवर लिहायला सुरूवात केली. ते कसं तुमचं स्वतःचं हक्काचं मैदान असतं. तुम्ही ब्लॉग काढला की नाही?

नवीन असताना मी सुद्धा छोट्या-मोठ्या लेखांसाठी धागे काढले आहेत
>>>>>>
एक शंका,
आपल्या लिखाणाच्या सूचीत "अजून यांनी काही लेखन केले नाही" असे दाखवले जातेय.

माझाही... फिदीफिदी>>

ऋन्मेष, माझा हा एकमेव आयडी. मी डुआयडीच्या अगदी विरोधात असतो नेहमी. तुझा डुआयडी कुठला? आशा आहे तू गैरवापर करणार नाही Happy

बी,
आपल्या विश्वासाला अजूनपर्यंत तरी जागलोय, मी ड्यू आयडीच्या नाही तर त्याच्या कुठल्याही प्रकारच्या गैरवापराच्या विरुद्ध आहे, जेव्हा वापरला तेव्हा हे वेळोवेळी चेक करत राहतो की अजाणतेपणे आपल्या हातून काही गैर तर घडत नाही ना. बाकीचे आपल्याला पर्सनल मेल मेसेज वर लिहितो.

जसे क्रिकेट बघण्यासाठी जागणारी मंडळी आहेत तसे चेस ची मॅच ६-६ तास बघणारी, benaud प्रमाणे स्विडलर ची कमेंट्री फॉलो करणारी देखील पुष्कळ जनता आहे. आता तुम्ही संख्याबलाचा मुद्दा आणणार असाल तर सांगतो की हा वर्ग दिवसेंदिवस वाढतोय.
>>>>>

पायस काल उशीरा एंट्री मारल्याने याचे उत्तर निसटले होते.
इथे किती जण बुद्धीबळ बघतात हा मुद्दा नव्हताच, भले एखादा खेळ जगात मोजून चार लोक बघत असले तरी त्या चार जणांच्या आवडीचा आदरच आहे,
माझा मुद्दा होता की विश्वनाथ आनंद हे नाव ऐकून असतात, पेपरात न्यूज वाचून अभिमान वाटून घेतात, मेसेज फॉर्वर्ड करतात... पण प्रत्यक्षात स्वता खेळ बघत नाही असाही एक मोठा वर्ग आहे.. त्या वर्गाला मी वर निर्देशित केलेय. तो खेळ बघणारे, खेळणारे, वा तो खेळाचा प्रकार, यावर कुठलीही चांगलीवाईट टिप्पणी नाही केली.

गूड न्यूज.. सानिया मिर्झा महिला दुहेरीच्या अंतिम फेरीत पोहोचली .. ग्रॅण्ड स्लॆम विम्म्बल्डन !

पण आज महाराष्ट्र टाईम्समध्ये मात्र स्पोर्टच्या पानावर जोकोविचचा फोटो छापत तो अंतिम फेरीत पोहोचला अशी हेडलाईन होती, आणि त्या अंतर्गत आतमध्ये बारीक अक्षरात सानिया देखील अंतिम फेरीत पोहोचली ही बातमी होती. अरे कोण जोकोविच. किती लोकांना त्याच्या नावाची स्पेलिंगही येत नसेल. पण आपल्या भारतीय वृत्तपत्रांसाठी त्याचे अंतिम फेरीत पोहोचणे जेवढे महत्वाचे आहे तेवढे आपली भारतकन्या अंतिम फेरीत पोहोचणे कौतुकाचे नसावे.

ग्रेट न्यूज .. हॅटस ऑफ सा नि या ...
ती डिजर्व्ह करते च !

चक दे मधील डायलॉग आठवला..
हा पुरस्कार म्हणजे एक सणसणीत चपराक आहे .. Happy

हा लेख माझ्या वाचण्यातनं निसटला होता.

मला स्वतःला सानियाचा सिन्गल्सचा खेळ अतिशय आवडायचा. धोका पत्करून अवघड अँगल्सनी फटके मारण्याची तिची हातोटी लाजवाब होती. 'ऑल ऑर नथिंग' असा तिचा खेळ असायचा. ती सगळ्या भारताचीच लाडकी होती आणी तो तिचा हक्कच होता.

मात्र शोएबशी लग्नानी सगळं चित्रंच बदललं.

एक तर तो अशा देशाचा ज्यानी असंख्य भारतीयांना ठार मारलं आहे आणि पुढेही मारतच राहाणार आहेत. ते ही त्यांना त्यातून काही मिळतय म्हणून नव्हे, तर फक्त भारताचं नुकसान व्हावं म्हणून.

त्याचं आधी लग्न झालेलं होतं (आणि 'तलाक' झालेलां नव्हता) हे त्यानी प्रथम मान्यच केलं नाही. जेव्हां फारच अंगाशी आलं तेव्हां मान्य केलं पण पुनःपुन्हा 'मी तेव्हां लहान होतो, मी तेव्हां लहान होतो' चा पाढा वाचला.

लहान? तो बालविवाह नव्हता काही! हा तलाक शेवटच्या क्षणी मिळवण्यासाठी त्याला किती कोटी रुपये खर्च करावे लागले याबद्दल वावटळी तेव्हां उठत होत्या. पण जाऊ दे. तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.

तो क्रिकेटर आहे पण क्रिकेटला जागणारा आहे का?

पाकिस्तानी टी२० च्या आंतरिक लीगमध्ये 'एक मॅच मुद्दामून हरलो' असा कबुलीजबाब त्यानी दिला. (प्लीज नोट - आरोप नव्हेत, कबुलीजबाब.) मात्र त्यासाठी एकही रुपया घेतला नाही असंही त्यानी म्हटलं. ज्याला विश्वास ठेवायचा आहे त्याने ठेवावा.

तिच्या लग्नाआधी जो सोप ऑपेरा चालू होता तेव्हां एकदा ती आणि शोएब तिच्या बंगल्याच्या व्हरांड्यात तावातावानी भांडले होते. बंगल्याला कॅमेर्‍यांचा गराडा आहे हे माहीत असताना भांडायला एवढ्या मोठ्या बंगल्यात ओपन व्हरांडा सोडून जागाच मिळाली नाही? हा निष्काळजीपणा आहे का कोरियोग्राफी असा प्रश्न तेव्हां माझ्याप्रमाणेच कित्येक जणांना पडला होता.

मला तिचा खेळ अजूनही आवडतो. तिने दुखापतीतून प्रचंड प्रयत्नांनी मार्ग काढला याबद्दल मला तिच्याबद्दल अतिशय आदर आहे. लिअ‍ॅन्डर पेसच्या शब्दात सांगायचं झालं तर 'हल्ली टेनिसपटूंकडे insane फिट्नेस असतो.' अशा जगात एकानंतर एक सव्वीस मॅचेस जिंकायच्या म्हणजे अफलातूनच कामगिरी आहे हे ही निर्विवाद.

पण आता मला ती 'आपली' वाटत नाही. ही शोकांतिका आहे, पण आहे हे खरं.

मात्र त्यासाठी एकही रुपया घेतला नाही असंही त्यानी म्हटलं. ज्याला विश्वास ठेवायचा आहे त्याने ठेवावा.
>>>>
सानियाने ठेवला असेल, प्यार अंधा होता है. Happy
ती स्वता मात्र तिच्या खेळाशी एकनिष्ठ वाटली नेहमी..

बाकी आता ती तुम्हाला आपली वाटत नाही आणि एकेकाळी आपली वाटायचे हे दोन्ही प्रतिसादात जाणवतेय.

Pages