मालवणी-कोकणी शब्दार्थ

Submitted by नीलू on 14 January, 2009 - 12:40

'मालवणी शिकायचय?' या बाफला मिळालेला प्रतिसाद बघून कोकणी/मालवणी शब्द आणि त्यांचे अर्थ यांचे संकलन ईथे नवीन हितगुजच्या विभागात करावे असे वाटले. काही सोप्या मालवणी शब्दांपासून मी सुरुवात करतेय पण मालवणी/कोकणी जाणकारांनी कृपया त्यात भर टाकावी. जेणेकरून नवीन-जुन्या सर्वच गजालीकरांना ईथे पाहिजे त्या शब्दांचे दुवे मिळणे सोपे जाईल. बाकी शब्दरचना वगैरे तिथे 'मालवणी शिकायचय?' या बाफवर कळेलच. पण शक्यतो ईथे गप्पा न मारता फक्त माहितीच पोस्ट करण्यात यावी ही विनंती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टाण - समुद्राच्या भरती- ओहोटीचा परीणाम म्हणून त्यावेळी नदी- खाडीतही पाण्याचा ओघ
समुद्राकडून/समुद्राकडे असतो. होडी चालवताना याचा फायदा/ अडचण तीवरतेने जाणवते. या पाण्याच्या परस्पर विरोधी ओढीला ' टाण' म्हणतात.

वास्तविक, हो शब्द सरळ सरळ 'ताण ' वरून इलेलो.पण ' टाण' म्हटल्यारच तुमकां नदी- खाडीवर त्येचो नेमको अर्थ कळता. " मेल्या, टाण बघूनच होडीन जा. नायतर , देवबागेत पोचेस्तर वल्हवून बावळे पडतीत मोडून !'

मस्त धागो . :).
मी माहेरून कोकणातली आणि सासरं मुंबईचं.
आजी , मावश्या , मामा , आत्या सगळे मालवणी बोलतात. मला समजते , बरीचशी बोलताही येते , कधीतरी grammatical mistakes होतात.
माझ्या आजीमुळे नवर्याच्या कानावर मालवणी शब्द पडायचे , मीही घरी नवर्याशी बोलताना काही शब्द वापरते. एखादा कामाची फार घाई होती आणि हा काही productive मदत न करता नुसता इकडे तिकडे करत होता. मी जाम चिडले , बडबडले आणि शेवटी म्हटलं "मगाधरना नुसतो बोवाळता !" ते ऐकूनच नवरा इतका खोखो करून हसायला लागला .
एकदा त्याचा जूना टीशर्ट बघून मी बोललेले , " भानशीरा केलस त्याचा "

मगाधरना नुसतो बोवाळता !">>>> Biggrin
माझे कॉलेजचे मित्र-मैत्रिणी मालवणचे होते. मज्जा यायची त्यांचं बोलणं ऐकताना.

माझे पणजोबाच मालवण सोडून मुंबईकर झाले होते.
मी जन्माने मुंबईकर्,घरात अम्ही मुलं मराठी बोलायचो.बाकीचे , कधी मराठी कधी कोकणी बोलायचे.पण मराठी बोलताना शुद्ध मराठी(कोकणीचे हेल नाही) बोलायचे.
ऑफिसमधे एकीने म्हटले " अय्या तू मालवणी? मग तशा शिव्या देत असाल ना!(मच्छिंद्र कांबळींच्या नाटकांचा प्रभाव)"

भोवांडो - लाबचा फेरा . उदा.
'रे, तुमची मारकी म्हस फुढच्या दारांत शिंगां रोखून उभी, म्हणान भोवांडो घेवन मागच्या दारान येवचां लागलां !!

climb_1.jpeg
वरच्या चित्रात कोयता अडकवायला हूक असलेला पट्टा बांधलाय, त्याला ' आकडी' म्हणतांत व माडावर पकड मिळण्यासाठी पायात दोराची गुंडाळी घातली आहे , त्याला ' खाडू' म्हणतात.

आडाळो - विळी... >>> हां ..बरेच दिवसानी ऐकला शब्द . आजी-आईच्या तोंडून ऐकलेला Happy .
आम्ही विळी ला मोरळी म्हणतो >> माझ्या सासरी म्हणतात , सुरुवातीला मी फुल्ल कन्फ्युज्ड व्हायचे . Happy

सुपारीच्या (पोफळीच्या ) पानाच्या देठाकडचा मोठा लांबट सपाट भाग असतो तो कापून त्याचा लांबट मोठा द्रोण बनवतात. फ्रिज मधल्या ट्रे सारखा भाज्या, फळं इ. ठेवायला त्याचा छान उपयोग होतो. त्याला ' विरी' म्हणतात.

साष्णावन हो असोच एक शब्द.. मराठीत कदी ऐकाक नाय... (सरकवून, की जपून)..
..
उदा.. मी माजी कत्री (कात्री) खयतरी साष्णाव्न ठेवलंय, पण आता अजीबात आठावणां नाय...
..
आजून एक आठवलो.. ,करलावून'.. आयेन मुळे (तिसरे) करलावून ठेवलेन आणि मसालो वाटूक घेतलेन..
करलावून... शिंपल्या उघडणे..

*करलां - माड/झाडं शिंपण्याकरता लाकडाचे बनवलेले साधन (भाऊकाका, चित्र काढतास काय?)* - खास जमलां नाय पण ' करलां'' म्हणजे काय ही कल्पना तरी येत .20211210_104023.jpg

क्रिया तीच पण वस्तू वेगळी. देशावर चिंच उकलली असे म्हणतात. म्हणजे साल काढलेला चिंचेचा आकडा विळीच्या धारेवर धरून चिंचोक्याच्या जागेवर थोडा छेद द्यायचा आणि विळीवरच त्याचे एक टोक उंचावून चिंचोका खाली पडू द्यायचा. म्हणजे लांब अख्खा आकडा मिळतो. अशा
लांब अख्ख्या चिंचा विक्रीसाठी बऱ्या पडतात. तुकडे तुकडे पडले की पॅक करताना त्याचा गोळा होतो आणि भाव कमी मिळतो. मीठ घालून कुटतानासुद्धा सोपे पडते.

हीरा, ' करलावणे ' यालाही विशिष्ट अर्थ आहे. शिंपलया ( तिसरया, मुळे इ. ) यातील खाद्य भाग कठीण कवचाच्या दोन बंद कपयांत असतो. ते कप्पे उघडणयाची सोप्पी पद्धत म्हणजे कोमट पाण्यात शिंपलया ठेवणे. पण त्यांत कांहीं अडचणीही असतात ( खराब शिंपलयांतील पाणी, मळ वेगळा काढता येत नाहीं) व त्याच्या चवीवरही कांहींसा परिणाम होतो. म्हणून' करलावणे' ही क्लिष्ट प्रचलित पद्धत. यांत, प्रत्येक शिंपला सूरी किंवा विळी वापरून उघडला जातो .

Pages