वल्डकप मध्ये पुन्हा एकदा पाकचा पराजय !!

Submitted by केदार on 15 February, 2015 - 07:08

Ind_pak_2015_WC.JPG

सहा पैकी सहा!!

वल्डकप मध्ये पुन्हा एकदा पाकचा पराजय !

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धोनी बेस्ट फिनिशर बेस्ट फिनिशर म्हणुन नुसता घोष करण्यात अर्थ नाही. गेल्या काही मॅचेसमधे शेवटच्या ओवर्स मधे त्याची हिरोगिरी पुर्ण फसली आहे.
>>>>>>>

अंशतः सहमत पण एक कर्रेक्शन, धोनी हा भारतीय उपखंडातील खेळपट्ट्यांवरचा बेस्ट फिनिशर आहे. चेंडू उसळला की त्याचे तंत्र तोकडेच आहे, तो फक्त जिगर दाखवत उभा राहतो आणि आपल्या पट्ट्यात एखादा लूज बॉल आला तर त्याला भिरकावून द्यावा एवढेच करतो. असे बॉल किती मिळतात यावर त्याचा स्कोअर होतो. जसे आजही त्याने एखाददोन शॉट सीमापार मारले, पण इतर बॉल खाल्लेही. इथे जर बॉलिंग चांगली पडली तर तो निष्प्रभ वाटतो आणि कन्सिस्टंटली चांगली पडली तर लाचार.

आम्ही क्रिकेट खुप फॉलो करत नाही. पण कालची match अपवाद होती.. आमचा अतिउत्साह बघुन आमच्या शीघ्रकवी लेकीला शेवटच्या २ ओव्हर्स मध्ये सुचलेल्या ओळी:
Pakistan Pakistan boo boo boo
India wants you to feel the blue
(Blue as sadness and blue colour of Indian team)

तिने असेही सांगितले की Australia vs India match असल्यास ती ऑस्ट्रेलिया ला सपोर्ट करणार!

श्रद्धांजली हा शब्द वापरल्याचे काही जनांना पटले नाही. ते त्या जागी बरोबरच आहे. पण हा शब्द एक रूपक आहे. लिटरल अर्थ घ्यायची गरज नसावी. तेवढा स्पोर्टिव्हनेस माझ्यात नक्कीच आहे. Happy खरच मिस्बा गेला तर मलाही चांगला खेळाडू गेला म्हणून दुखः होईल.

माझ्याघरी माझे अनेक मित्र काल जमले होते. आणि जेंव्हा पाकच्या काही बॉल्स वर आपण बीट होत होतो तेंव्हा मी, वॉव व्हॉट अ ब्युटी, असे म्हणल्यावर ते देखील चकित झाले होते.

तसेच हे युद्ध नव्हते आणि तिथे श्रद्धांजली योग्य आहे असेही लिहिलेले दिसले. - अहो युद्ध हे कधीच होऊ नये ! युद्ध होऊ नये म्हणून जे जे होईल ते ते प्रयत्न करावेत. आणि समजा भारत पाक युद्ध झाले तर मी पाकचे सैनिक जितके मेले त्यावर खुश होईल. शेवटी युद्ध झालेच जर जिंकावेच ह्या मताचा मी आहे. समोरच्या सैनिकाला वाचवून युद्ध लढता येत नाही, आणि आपले बलिदान देऊन युद्ध लढता येत नाही. तर समोरच्याला यमसदनास पाठवून युद्ध जिंकले जाते. ती तुलनाच चुकीची आहे !!

तस्मात हे रूपक आहे तसेच घ्यावे.

भारत -पाक मॅच नंतर..

एक पाकीस्तानी बॉर्डर क्रॉस करण्याचा प्रयत्न करत असतो.
तेव्हा भारतीय सैनिक त्या पाकीला, "वही रूक जा नही तो गोली मारूंगा"

पाकी,"गोली से डर नही लगता साहब, कोहली से लगता है" Proud

केदार, तुम्ही लिहिलेलं explanation पटत नाहीये! May be we differ on this. May be it's a new slang I am unaware of! पण श्रद्धांजली हा शब्द रुपकार्थाने घ्यावा असं काहीही भारत-पाक सामन्यात घडलं असं मला वाटत नाही. त्यामुळे शीर्षक पटलेलं नाही. तुम्हाला ह्या धाग्यावर जश्या पोस्ट्स हव्या आहेत त्या अनुषंगाने काहीतरी धमाल witty शीर्षक हवं होतं!

इतिहासाच्या पुस्तकाला
भुगोलाचे कव्हर
पाकिस्तानची वाट लाउन गेला
अनुष्काचा लव्हर

ओके जिज्ञासा, मला श्रद्धांजली लिहिताना कदाचित ते पटणार नाही हे माहिती होते. आय अ‍ॅम नॉट अ‍ॅट ऑल एक्सप्लेनिग. तुमचे मत मला मान्य आहे.

अजूनही मला गैरे वगैरे वाटत नाही. इटस पार्ट ऑफ गेम. इंग्रजीत सौम्य भाषेत, वी नेल्ड हिम किंवा एक्साईटमेंट असताना "वी किल्ड द गेम" असे नेहमी म्हणतात. तसेच हारलेल्या टीमला "डीपली बरीड इन द ग्राउंड" असेही म्हणतात. त्यात कुणालाच वावगे वाटत नाही.

असो मी बदलून " वल्डकप मध्ये पुन्हा एकदा पाकचा पराजय" असे करतो.

जौ द्या ओ
पेशावर हल्ल्याचे समर्थन आनंद व्यक्त करणार्‍या लोकांना आज पाकड्यांच्या प्रेमाचे भरते आले आहे. अजुन काही नाही

पाकीस्तानी ड्रेसिंग रूम मधे एक मोटीवेशनल सेशन
हमलोग हारे ये मत देखो....... ये देखो की हम सब लोगोंको बॅटींग मिली

पीके सिनेमात अनुष्काशी शेवटी एक पाकिस्तानी लग्न करतो ...
बस एवढंच कोणीतरी सांगितलं मग काय तुटून पडला पठ्ठ्या.!!!
100 केले कि राव ....

केदार, now I get you Happy Somehow these idioms and phrases are very hard to translate from one language to another with all the nuances! "हातच्या कांकणाला आरसा कशाला' ह्याला इंग्रजीत कसे नेता येईल Proud
तुम्ही शीर्षक बदलले ह्यासाठी मनापासून आभार! नाहीतर शब्दशः अर्थ घेतला गेल्याने इथे मारामाऱ्या व्हायची शक्यता जास्त! आता इथे तुम्हाला अपेक्षित असा दंगा होऊ दे!

कालच्या मॅचने, २०११ च्या मॅचची एका वेगळ्या अर्थाने आठवण आली. २०११ च्या भारत-पाक सामन्याच्या दरम्यान ऑफिस मधे फायनल ऑडिट चालू होतं. सामन्याच्या दिवशीही मुख्य ऑडीटर ऑफिस मधे होता. हा आमचा ऑडिटर पाकिस्तानी आहे. बरं आमचं अकाउंट्स डिपार्टमेंट भारतीय बहुल... मल्याळी, बंगाली, बिहारी, गुजराती असे सगळे... आणि मी मराठी.
कल्पना करा काय मजा आली असेल आम्हाला... आधीच ऑडीटर, त्यात पाकिस्तानी !!! Happy

पाकीस्तानी ड्रेसिंग रूम मधे एक मोटीवेशनल सेशन
हमलोग हारे ये मत देखो....... ये देखो की हम सब लोगोंको बॅटींग मिली>> Rofl
Rofl
Rofl
Rofl
Rofl

येथे राजकारण आणणे स्वतःचे स्वतःहून रोखता आले तर बघा अशी विनंती.....>>>>>सहमत
Happy
please dont spoil the victory mood.................only enjoy the whatsup and facebook messages.

किती तो घोळ.. मॅच जिंकली हे महत्त्वाचे.. बाकीचे गेले तेल लावत..

फेव्हीक्विकची अ‍ॅड जबरीच होती..

खबर है कि जैसे ही शोएब अख्तर कमेंट्री रूम में जाके बैठे, अमिताभ ने चीखते हुए, कुर्सी पर लात मारी और कहा कि "जब तक बैठने के लिए न कहा जाए, तब तक खड़े रहो, ये कॉमेंट्री बॉक्स है, तुम्हारे बाप का घर नहीं"!

मोहम्मद इरफ़ान इतना लम्बा है कि मैच हारने के बाद पुरी पाकिस्तान टीम इसके कंधे से कूदकर आत्महत्या कर सकती है

एका भारतीयाचे ऐकुन पाकिस्तान्याने ओएलएक्स वर फटाके विकायला काढले.
भारतातुन फोन गेला
भारतीयः- सलाम वाले कुम भाईजान.फटाके बेचने है
पाकी:- जी हा. ५००० होंगे जनाब
भारतीयः ५००० क्या बरखुरदार आप १०००० लिजिये.
पाकी:- १० हजार? क्यो
भारतीयः- ५००० फटाको के और ५००० वो फटाके वही पाकिस्तान मे फोडने के लिये Rofl

सगळ्याच पोस्ट मजेशीर.
केदार, विंग्रजीतुन "डीपली बरीड इन द ग्राउंड" आणि म्हराटीतुन "श्रद्धांजली" नाही कंपेर होउ शकत. Happy

और इसी बीच पाकिस्तान मे पटाखों की
दूकान के बाहर बोर्ड लग गया है...

"बेचा हुआ माल वापस नहीं होगा"

Pages