Submitted by mansmi18 on 30 December, 2014 - 11:58
नमस्कार,
पुढील महिन्यात एक घरगुती कार्यक्रम (साधारण ५० उपस्थिती) करावयाचा आहे. तेव्हा (शाकाहारी)जेवण कॅटरर्स कडुन करुन घ्यायचा विचार आहे. काही चांगले कॅटरर्स माहित असल्यास संपर्क द्याल का?
बाणेर भागातले अस्ल्यास उत्तम पण दुसर्या भागात असतील पण बाणेर एरियात सर्विस देत असतील तरीही चालेल.
धन्यवाद.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बाणेर भागात सर्विस देणारे
बाणेर भागात सर्विस देणारे केटरर्स माहीत नाहीत. परंतु तुमच्या एरियातील मॅरेज हॉल्स / कार्यालय इ. यांच्या केटररबद्दल चौकशी करू शकता. ते अनेकदा खासगी, घरगुती समारंभासाठीही सुविधा पुरवतात. जस्ट डायलवरही अनेक 'रेकमन्डेड' केटरर्सची नावे मिळू शकतील.
या एका साईटवर काही केटरर्सची यादी दिसली.
https://lagnachibolni.com/caterer_in_pune.php
इथे चौकशी करुन बघा :
इथे चौकशी करुन बघा : http://www.harshadcaterers.com/
अप्रतिम चव आणि प्रोफेशनल सर्विस..... आपल्याला काहे बघायला लागत नाही
मी स्वता माझ्याकडच्या दोन-तीन घरगुती प्रॉग्रॅमसाठी ट्राय केलेले आहे आणि ओळखीच्यातही अनेक लोका.न्चा चा.न्गला अनुभव आहे!
(No subject)
हे कोकणस्थानी दिलेले
हे कोकणस्थानी दिलेले जोशी-गोखले केटरर्स, मित्र मन्डळ कार्यालयात आहेत का ते विचारा. जर हेच असतील तर जरुर सर्व्हिस घ्या. अप्रतीम जेवण असते यान्चे. मस्त चव!
कोथ्रुडमधील लक्ष्मी-नारायण
कोथ्रुडमधील लक्ष्मी-नारायण केटरर्स पण मस्त आहेत.. ते बाणेरमधे सर्व्हिस देतील की नाही माहित नाही. त्यांचे डिटेल्स नेट वर मिळु शकतील
मित्र मन्डळ कार्यालयात आहेत
मित्र मन्डळ कार्यालयात आहेत ते, खरंच अप्रतीम चव असते जेवणाला त्यांच्या.
स्वरुप, मी पण तेच नाव सांगणार
स्वरुप, मी पण तेच नाव सांगणार होते, आठलेकर.
सगळ्याना धन्यवाद. विचारुन
सगळ्याना धन्यवाद.
विचारुन पाहतो.
शिवतिर्थ नगर मधे "अमेय हॉल"
शिवतिर्थ नगर मधे "अमेय हॉल" आहे..ते मोडक काका...मस्त जेवण...छान सर्वीस असते...
५० लोकांसाठी छान सोय करुन देतील..वाढप्यांसकट...
त्यांचा फोन नं आत्ता नाही माझ्याकडे...उद्या देइन नक्की...
एमायटीकडे जातानाच्या
एमायटीकडे जातानाच्या रस्त्यावर बेडेकर गणपती मंदिर आहे. त्याच्या शेजारीच बेडेकर हॉल आहे. त्यांचेही केटरींग मस्त असते.
पूना गेस्ट हाऊसचे
पूना गेस्ट हाऊसचे सरपोतदारांचे केटरिंग
जनसेवा भोजनालय (डेक्कन जिमखाना) यांचे केटरिंग
http://in.myinfoline.com/tumm
http://in.myinfoline.com/tummytreatcaterers/enquiry
हे ही पहा. चालक मंदार नाडगौडा माझा मित्र आहे
श्रेयस ची केटरिंग सर्विस आहे.
श्रेयस ची केटरिंग सर्विस आहे. (सर्व्ह करायला देखिल माणसे पाठवू शकतात. )
कॄष्णा डायनिंग हॉल ची देखिल. (जेवण घेउन याव लागतं त्यांच्या लॉ कॉलेज रोड वरील डाय्निंग हॉल मधून)
दोन्ही चविष्ट आहेत.
जोशी स्विइट्स , बाणेर पण केटरींग करतात. ( इडलिशियस , बनेर च्या जवळ त्यांच दुकान आहे जोशी स्वीट्स नावाच)