तिकीट

Submitted by कौतुक शिरोडकर on 9 January, 2009 - 03:13

अहो, ऐकलतं का ???
तुमचं नाव आलयं पेपरात.
तुमचं गाणं, तुमचा रियाज, तुमचा अभ्यास...
पुरवणी छापली आहे तुमच्या नावाची, कव्हर स्टोरीसोबत.
मिडीयावाले बराच गाजावाजा करताहेत तुमचा.
माझी पण मुलाखत घेतली बरं.
मी बोलले मग, 'सरकारला सांगा, पेंशनच्या पाचशे रुपयात महिना भागत नाही.'
हे बघा, चांगलं काळ्या चौकटीत ठळक अक्षरात छापलदेखील आहे.
रागावू नका.
एक विचारू का ? खरचं रागावू नका.
हल्ली माणसांची वर्दळ वाढलीय. तेव्हा तिकीट लावलं तर चालेल का तुमच्या समाधीच्या दर्शनाला येणार्‍यां‍ना ? तेवढाच औषधांचा खर्च निघेल. सोसत नाही हो आता एकटीला.
लावू ना तिकीट ????

गुलमोहर: 

आई गं....... खरंच सुन्न झालं रे !!

समर्पक शब्दात विदारक सत्य ...

.......!!!

अतिशय भावस्पर्शी

................! Sad
----------------------
I'm sure..I'm not the Best, still I'm happy.. I'm not like the Rest..!! Happy

>>तिकीट लावलं तर चालेल का तुमच्या समाधीच्या दर्शनाला येणार्‍यां‍ना ?

काळीज थरथरलं ही ओळ वाचून..... मित्रा..... तोडलंस!

सुंदर...

***
अजनबी सा, दोस्त सा, दुश्मन सा ये बहरूपिया
मेरे अंदर कोई बतलाए खुदा-रा कौन है?

काय कल्पनाविलास आहे!! कटू सत्य..

अगदी भिडली मनाला कविता.........

*****************
सुमेधा पुनकर Happy
*****************

कौतुका, पुन्हा पुन्हा वाचतोय आणि प्रत्येक वेळी मनाला चटका लावुन जातेय.

सस्नेह...

विशाल.
____________________________________________

http://maagevalunpahataana.blogspot.com

भोकसल काळजात ... Sad

सुंदर.

झुकलोय प्रतिसादांच्या भाराने. त्याच अवस्थेत आभार मानतोय सगळ्यांचे.
.........................................................................................................................

http://kautukaachebol.blogspot.com/