Submitted by जयवी -जयश्री अंबासकर on 9 January, 2009 - 02:47
घुमे रानशीळ गोड कशी पानात पानात
फुले चांदणे गुलाबी कसे मनात मनात
लागे चाहुल तयाची, मन आतूर आतूर
उरी गोड थरथर, लाज करी चूर चूर
कुणी उकलले माझे आज गुपित गुपित
फुले चांदणे गुलाबी कसे मनात मनात
आठवांचे सोनसळी, ऊन केशर केशर
तुझ्या वनात बसंती, मन मोहर मोहर
गाणे गाई वारा तुझे माझ्या कानात कानात
फुले चांदणे गुलाबी कसे मनात मनात
दिस भुलाव्याचे कसे, जाती छळत छळत
नादावले कशी बाई तुझ्या खेळात खेळात
न्हाऊनिया झाले चिंब तुझ्या रंगात रंगात
फुले चांदणे गुलाबी कसे मनात मनात
जयश्री
गुलमोहर:
शेअर करा
आठवांना
आठवांना सोनसळी ऊन म्हणण फार फार आवडलं . क्या बात है!
फर्माईश लगेच पूर्ण केल्याबद्दल धन्स
हाय ! उन
हाय ! उन दिनोंकी याद !!!
......................................................................................................................
http://kautukaachebol.blogspot.com/
दिस
दिस भुलाव्याचे कसे, जाती छळत छळत
नादावले कशी बाई तुझ्या खेळात खेळात
सुंदर
खुप सुंदर.
खुप सुंदर. शब्द कसे मस्त ताल धरुन आलेत, माझ्याशी तर नेहमी कट्टी घेतात.
>>तुझ्या
>>तुझ्या वनात बसंती, मनी मोहर मोहर
क्या बात है!
पानात.....
पानात..... मनात...... खेळात....... शब्द संगती छान जमलीय...... छान आहे कविता.....
>>तुझ्या
>>तुझ्या वनात बसंती, मनी मोहर मोहर
क्या बात है!
चिन्नू ला अनिमोदन. अगदी "जयावी" कविता/ गाणे
दिस
दिस भुलाव्याचे कसे, जाती छळत छळत
नादावले कशी बाई तुझ्या खेळात खेळात
न्हाऊनिया झाले चिंब तुझ्या रंगात रंगात
फुले चांदणे गुलाबी कसे मनात मनात
व्वा. मस्त, छानच.
वर्षा
जयूऊऊऊऊ
जयूऊऊऊऊ क्याबात है......
वाह वाह ....
श्यामली,,,,,श
श्यामली,,,,,शुक्रिया जानेमन


कौतुक,,,,, उन यादोंके ऐसेही संभालके रखो...!
सानिका....... कौतुकाबद्दल धन्यवाद !
कविता......अगं तुझ्या नावातच आहे काव्य... प्रयत्न केल्याशिवायच काव्य तयार होत असेल तुझं
चिन्नु तुझा प्रतिसाद गृहीतच धरलकप्ल्पक;)
कल्पना, सुहास्य, वर्षा... मनापासून धन्यवाद.....हुरुप वाढला माझा !
वैभवा...... तुझ्या पसंतीची मोहर........ तहे दिल से शुक्रिया जनाबे आली
अहाहा..बहार
अहाहा..बहार आणलीस..
आपली तुपली गट्टी बरं ! मस्तच !
सस्नेह...
विशाल.
____________________________________________
http://maagevalunpahataana.blogspot.com
वाह... सार
वाह... सार कस बाई लईत लईत..
क्या बात
क्या बात है, जयावी!!!
--------------------
जगा.. जगवा..
हसा.. हसवा..
जीवन एक जल्लोष आहे.
रानशिल
रानशिल शब्द खुप आव्द्ला....
विशाल.....
विशाल..... अगदी अगदी


सत्या..... धन्यवाद धन्यवाद !!
किरु, ड्रीम......शुक्रिया
सगळ्यांच्या प्रतिक्रिया वाचून खूप छान वाटलं
खूप छान !!
खूप छान !! वादळवाटच्या टायटल साँगची चाल लागतेय याला
.
.
कोणाचे देणे कोणास पुरते | कितीही द्यावे सदा अपुरते |
परी माझे सरकार जे देवू सरते | ते न सरतें कल्पांती ||
जय हो जय हो!
जय हो जय हो!
सुरेख! बापू
सुरेख!
बापू करन्दिकर
छान
छान नेहेमीप्रमाणेच्...फक्त यावेळी मला जरा शब्दबंबाळ वाटली...
अश्विनी,
अश्विनी, बापू, पल्ली, योग...... धन्स !!
योग....... अरे कमी शब्दात व्यक्त होणं फार कठीण होतं मला. ते कसं जमवायचं हा मोठाच प्रश्न आहे.
तस नाही
तस नाही ग...
हा सहज, हळुवार अन मुख्यत्वे जास्त भावनाप्रधान असतो... त्यामूळे यावेळी जरा जास्त शब्द वापरले अस वाटल..
तुझ्या कवितांचा फॉर्म (कोण ते "फीगर" म्हणतय
आणि व्यक्त व्हायच म्हणशील तर शब्द कधी पुरे पडलेत..?