Submitted by mitthu on 9 January, 2009 - 01:04
नमस्कार करतो सर्वाना नाव माझे हट्ट
जन्मा पासुन सर्वानशी माझे नाते घट्ट
लहान पणी सारे जण काळजी माझी घेतात
बोबडे बोल मागतील ते लगेच आणुन देतात
इथेच बहुतेक सर्वाचे एकुण गणित चुकते
वाढत्या वायात जाता जाता माझी छाती फुगते
हळु हळु माझ्या मग मागण्या मी वाढवतो
अडुन बसतो सारे काही मनासारखे घडवतो
जेव्हा करीतो प्रवेश मी तरुणाईच्या घरात
करतो बरेच उपद्रव प्रत्येकाच्या घरात
कधी सत्ता कधी भत्ता मिळवण्याचा रचतो डाव
रुसवा फुगवा असती सोबत मनावरती देतो घाव
येवढ मात्र नक्कि आहे सोबत माझी कामाची
पेटुन उठलो कि घडवितो कामं मोठया नामाची
शांत असतो थोडा मी उतरणारया वयात
पहिले इतकी ताकद नसते थकलेल्या पायात
म्रुत्यूच्या मी जातो चरणी शेवटी आयुश्याच्या
प्रवास माझा असाच आसतो ठाई प्रतेकाच्या
गुलमोहर:
शेअर करा
जयदिप
जयदिप कविता चांगली आहे.
माझ्या मते हट्ट हा स्वभावातच असतो तो उतारवयात कधी कधी जास्तच जाणवतो.
अभिप्राय
अभिप्राय दिल्या बद्दल धन्यवाद.
तुमचे म्हण्णे मला मान्य आहे. मी फक्त स्वभावाचा व्यक्ति रुपाने वर्णन करण्याचा प्रयत्न केला आहे.
जयदीप ओक
जयदीप.....मस्
जयदीप.....मस्त रे.....!! मिठ्ठू किती दिवसांनी बोलायला लागला रे
धन्यवाद.
धन्यवाद. बरेच दिवसांनी रिकामा वेळ मिळतो आहे त्याचा सदुपयोग सुरु आहे
जयदीप
जयदीप आवडली कविता. पण थोडी अजून वाचनीय झाली असती जर....... शुद्धलेखन... दुसरं काय!
>>शांत असतो थोडा मी उतरणारया वयात
>>पहिले इतकी ताकद नसते थकलेल्या गळ्यात
इथे यमकासाठी 'गळ्यात' च्या ऐवजी 'पायात' चाललं असतं का?
धन्यवाद.
धन्यवाद. सुचवलेला बदल केल आहे.
हटके हा
हटके हा हट्ट गड्या.
......................................................................................................................
http://kautukaachebol.blogspot.com/
हट्ट हा
हट्ट हा सस्पेन्स ठेऊन शेवटी जाहिर केला असता तर?
बाकी छानच.
अय्यो सहि
अय्यो सहि आहे....
धन्यवाद
धन्यवाद