विवाहाच्या निमित्ताने....

Submitted by limbutimbu on 26 November, 2014 - 02:31

हिंदुस्थानातील कुटुंब संस्थेच्या अनेक अंगांपैकी एक अविभाज्य अंग म्हणजे विवाहसंस्था होय.

प्रत्येकास आयुष्यात कधीनाकधी विवाह सोहळ्यात, त्या आधीच्या पुर्वतयारीत, प्रत्यक्ष सोहोळ्यातील कामात, व नंतरची मांडवपरतणी उरकण्यात सहभागी व्हायचा योग येतो, मग तो स्वतःच वधु/वर या भुमिकेत असेल, वा वर/वधुचे माता/पिता/नातेवाईक/मित्र/निरिक्षक या भुमिकेतून असेल.

तर हा धागा विवाहा निमित्ताने सध्या होणार्‍या घडणार्‍या अनेक योग्य वा अयोग्य रिती रिवाज रुढी परंपरा यांच्या आलेल्या स्वानुभवावर आधारित घटनांची/प्रसंगांची चर्चा करण्यासाठी आहे.

काही छान नविन प्रथाही सुरू होताना दिसत असतील, बरेच चांगलेही होत असेल तर ते ही इथे मांडणे अपेक्षित आहे, न की केवळ टीकात्मक लेखन.

चार माणसे जमली, की टाळक्याला टाळकी भिडणारच, त्यातुन विवाहप्रसंगी तर बघायलाच नको, तर अशावेळेस अनुभवलेल्या गंभीर/हलक्याफुलक्या/विनोदी प्रसंगाचे वर्णन इथे देण्यास कसली हरकत असावी? पुढच्यास ठेच, मागचा शहाणा, असे व्हावयाचे असेल, तर आपले अनुभव सांगायलाच हवेत ना?

(कृपयाच, इथे ऐकीव/ वा दुसर्‍या कुणीतरी मांडलेल्या विचारांचे/तत्वांचे सादरीकरण/प्रचार करण्याऐवजी, स्वानुभव व त्यावरील विचार मांडणे अपेक्षित आहे. धाग्यावर हलकीफुलकी चर्चा अपेक्षित असून कोणत्याही जातीधर्माला / समुहाला / व्यक्तिला दुखावणे अपेक्षित नाही)

या धाग्याव्यतिरिक्त, अशास्वरुपाच्या विषयावर मायबोलिवर आधिच एक धागा आहे, इच्छुकांनी तो देखिल नजरेखालून घालावा: लग्नातल्या गमतीजमती : http://www.maayboli.com/node/13968
जुनी मायबोली: http://www.maayboli.com/hitguj/messages/644/112938.html?1153310676

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लिंब्या परत धाग्याच्या विषयाशी संबंधित एक किस्सा...

ग्रुपातल्या मित्राचे आणि मैत्रिणीचे एकमेकांशी लग्न होते. ग्रुपमधले पहिलेच लग्न होते. त्यामुळे ग्रुप दंगामस्ती मूडमधे होता. जवळजवळ सहा महिने आधी लग्नाची खरेदी, रूखवताची तयारी या नावाखाली आम्ही मैत्रिणी उगाचच जमून गप्पा-खिदळणे वगैरे करत होतो. त्यामुळे एक्साइटमेंट प्रचंड होती.
त्यामुळे सिमांतपूजनाच्या वेळेला आमचा दंगा (आवाज टाकणे, खिदळणे वगैरे) अंमळ जरा जास्तच वाढला असावा कारण मैत्रिणीच्या वडिलांकडून आम्हाला जोरदार कानपिचक्या मिळाल्या होत्या.
कानपिचक्या मिळाल्यावर आमच्यातले मोठ्ठे इगोवाले मित्रवर्य चिडले. उगाच मोठ्यामोठ्याने मी उद्या येणार नाही वगैरे बोलू लागले. कोणी ऑडियन्स नाही हे लक्षात आल्यावर गप्प बसले.
दुसर्‍या दिवशी सकाळी ते मित्रवर्य धुमसतच आले. आम्ही सगळे निर्लज्जपणे खिदळणे मोड वर परत आलोच होतो. हे मित्रवर्य खुन्नसवर जास्त जोरजोरात बोलू लागले. परत कानपिचक्या.
मग आम्ही सगळे एका कोपर्‍यात जाऊन बसलो. थोडावेळ गप्प बसलो. नंतर आता जेवायलाच नको इथे लग्नात वगैरे डायलॉग्ज झाले.
मित्राचे आणि मैत्रिणीचे लग्न म्हणजे त्यांच्या पंक्तीला आपण बसायचे हे ठरलेले होते. त्यामुळे वेळ लागणार होताच.
ज्या कोपर्‍यात जाऊन बसलो होतो तो कोपरा मांडलेल्या रूखवताच्या शेजारचा होता. आणि आम्ही सर्वांनी गप्पा मारता मारता रूखवतातले सगळे खाद्यपदार्थ खाऊन टाकले होते.
अजून कानपिचक्या मिळायच्या आत आम्ही मिळेल त्या पंक्तीला बसलो आणि जेवून तिथून पसार झालो.

हेमन्त् |
गाय किती पूजनीय आहे . तिच्या शरीरावरच्या कुठल्या उर्जाचाक्रात कुठल्या देवतेचा निवास असतो हे हि हिंदू धर्मग्रंथात सांगितलं आहे .(जर तुम्ही एखादा वाचला असेल तर )
तरीही तुम्ही आणि तुमच्यासारखे महापापी धर्मभ्रष्ट लोक गोमांस खायचं समर्थन करत असतील तर शेवटी ज्याचा हात मोडतो त्याच्याच गळ्यात पडतो .
स्वतःच्या सोयीचे तत्वज्ञान हिंदू धर्माच्या नावावर खपवणार्‍यांच्या मनाप्रमाणे जग चालत नाही.>>
नका का चालेना . जगाशी आम्हाला काय करायचा .जगा ने गु खाल्ला तरी आम्हाला काही फरक पडत नहि. आम्हाला फरक पडतो तो गोमातेची हत्या केल्याने . मुस्लिम , ख्रिस्चानांना ह्याचं नॉलेज नसल्यामुळे एक वेळ समजू शकतं पण हिंदूंना का म्हणून माफ करायचं ?
लोक सर्रास पापं करतात आणि आपण काही चुकीचं करतोय ह्याची त्यांना जाणीव हि नसते . उगीच का जग एवढ्या दुख्खाने भरलंय हल्ली .

@सारिका३३३

मग बीफ खाणारे देस्ग एवडे श्रेष्ट कसे झाले ? अमेरिका , युरोप , पूर्व आणि आखती देश --- सगळीकडे बीफ खातात ... मग हे पापी लोक का पुढे गेले ?

मी बीफ खात नाही कारण मला त्याची टेस्ट नाही . पण बरेच हिंदू विशेशतः हाय फाय हिंदू बीत खातात - जसे कि ऋषी कपूर - आता त्याचे की वाईट झाले ? घसघशीत बैकांबरोबर संबंध , यशस्वी कारकीर्द , पाली हिल ला प्रचंड बंगला आणि यशस्वी मुलगा .... मग त्याला पापांची की शिक्षा मिळाली ?

तीच गोष्ट वीर संघवी ची .. तो तात रादिया तपेस मध्ये नाव असूनसुद्धा मिरवतो

मग वाईट काय ?

मग हे पापी लोक का पुढे गेले ? >>> पुढं जाणं कशाला म्हणतात हे ज्याच्या त्याच्या विचारांवर ठरतं .
परवा लोकमत मध्ये एक झकास लेख आला होता . हे लोक योगसाधनेला , मनः शांतीला , कुटुंब पद्धतीला काय महत्व देवू लागलेत . भारतीय संस्कृतीकडे कसे वळू लागलेत आणि आपण मात्र उलट ह्या गोष्टींची कशी उपेक्षा करत आहोत .पृथ्वीवरचे काही देश हे पूर्वीच्या चांगल्या कर्मांची फलं म्हणून ऐश्वर्य , सुखसुविधा भोगण्यासाठीच आहेत . उदा .अमेरिका, रशिया , फ्रांस इ . काही फक्त वाईट कर्मांची फलं भोगण्यासाठी . उदा आफ्रिकन देश .
काही मिश्र फळांसाठी आहेत .
आता त्याचे की वाईट झाले ?मग त्याला पापांची की शिक्षा मिळाली>>
रिशी कपूर सारखे लोक भौतिक जगात यशस्वी लोक आहेत तसे करोडो अयशस्वी , दरिद्री , आजारी , अत्याचारित , भयानक भोग भोगणारे सुधा आहेत कि. हे सुधा यशाच्या शिखरावर असताना काप्पोर सारखेच माजून गेले असतील .पापांची शिक्षा कधी कशी मिळणार हे आपल्या हातात असतं का ? अनेक जन्मांमध्ये त्यांनी चांगली कर्म सुधा केली असतील कि . त्याचाच हा परिणाम . कर्मफळाचा नियमच आहे हा . चांगल्या कर्मफलांचा साठा संपला कि मग त्यांना सुधा वाईट कर्मांची शिक्षा मिळणार आहेच कि . किवा आधीच मिळाली असेल .
आता मजा करायला मिळतिये . पुन्हा शिक्षा . पुन्हा मजा . हे असंच चक्र चालू राहणार . मुक्ती मिळेपर्यंत

आणि आपण मात्र उलट ह्या गोष्टींची कशी उपेक्षा करत आहोत .पृथ्वीवरचे काही देश हे पूर्वीच्या चांगल्या कर्मांची फलं म्हणून ऐश्वर्य , सुखसुविधा भोगण्यासाठी आहेत . उदा .अमेरिका, रशिया , फ्रांस इ . >>>> हे जरा अति आहे. त्या देशातील नागरिकांनी कष्ट केले म्हणून ते पुढे आलेले आहेत!!!

काय खावे आणि काय प्यावे हा वैयक्तिक प्रश्न आहे....उगीचच जे लोक आपल्या मताचे नाहीत त्यांना पापी वैगेरे म्हणू नये

पृथ्वीवरचे काही देश हे पूर्वीच्या चांगल्या कर्मांची फलं म्हणून ऐश्वर्य , सुखसुविधा भोगण्यासाठीच आहेत . उदा .अमेरिका, रशिया , फ्रांस इ . काही फक्त वाईट कर्मांची फलं भोगण्यासाठी . उदा आफ्रिकन देश .
......

Proud

सौदी , पाकिस्तान , ब्रह्मदेश इ इ यांचे काय ?

त्या देशातील नागरिकांनी कष्ट केले म्हणून ते पुढे आलेले आहेत>>>
इतर देशातले लोक बैलासारखे कष्ट करतातच कि . जरा . शेतकरी शेतात राब राब राबतो . पण गरीबच असतो . काही लोक फार कष्ट न करता त्यांना सगळं मिळतं . जरा नीट तपासा बरं अमेरिका, रशिया , फ्रांस, इंग्लंड मधले लोक जास्त कष्ट करतात कि इतर गरीब देशातले ? श्रीमंत देशातल्या लोकांना बापजाद्यांकडून हि संपत्ती मिळते. कष्ट करून नाही. उलट त्यांचाकडे कष्ट काही नसतात आणि असलेला पैसा कसा खर्च करायचा हा प्रश्न असतो.
भारतात सोन्याचा धूर निघत होता म्हणे . कुठं गेली ती सगळी संपत्ती ?हिंदूंकडून मुस्लिमांकडे , मुस्लिमांकडून इतर देशांकडे . हीच गोष्ट इतर देशांचीही. संपत्ती पुन्हा परत फिरून मुळच्या देशांकडे येईल .
आपण कुठल्या देशात जन्माला यायचं , कधी यायचं , श्रीमत घरात यायचं कि गरीब , स्वस्थ यायचं कि व्यंग घेवून कि लुळं पांगळ होवून, खूप कष्ट करून सगळं सुरळीत होईल आणि कष्ट फळाला येतील किवा काहीही न करता आरामात बसून ऐश्वर्य उपभोगायला मिळेल ह्यातलं काहीही आपल्या हातात नसतं . आपल्या हातात फक्त कर्म करत राहणं असतं . चांगली किवा वाईट

नीधप,

>> पतीचे अर्धे पुण्य पत्नीला आणि पत्नीचे अर्धे पाप पतीला याचा हिशोब चित्रगुप्ताने मांडलाय हे कशावरून?
>> हे लॉजिक कुणा पुरूषाने स्वतःच्या सोयीसाठी मांडलेले आहे. हे स्त्रियांना अवमानकारक आहे. आणि यावर
>> विश्वास ठेवणार्‍यांशी कुठल्याही प्रकारचा युक्तिवाद अशक्य आहे. माझ्याकडे इतका रिकामटेकडा वेळही नाही.

पापपुण्याचा हिशोब मांडणारे देव मूर्ख आहेत हे बोलण्यासाठी तुमच्याकडे भरटेकडा वेळ आहे. युक्तिवाद करायला मात्र वेळ नाही.

पुरूषांचा काय वेळ जात नाही म्हणून बायकांवर अन्याय करायला बसलेत का?

आ.न.,
-गा.पै.

आताच लिंबूभाउ यांचा एक महत्त्वपूर्ण प्रतिसाद वाचण्यात आला खरच अतिशय उत्तम होता. त्यावर अंमलबजावणी म्हणून मी आजपासून गामा पैलवान, लिंबूभाऊ, सारिका३३३ सारख्या आयडींकडे दुर्लक्ष करण्याचे ठरवले आहे. यापुढे यांच्यासारख्यांच्या कोणत्याही पोस्टींना उत्तर दिले जाणार नाही. (अतिशय अपवादात्मक गोष्ट असल्यास जसे की काही माहीती मदत हवी असल्यास उत्तर दिले जाईल)

कृपया सहकार्य कराल ही अपेक्षा.
धन्यवाद.

Happy

डेअरी उद्योगात किती प्रचंड हिंसा अंतर्भूत आहे हे वाचल्यावर मला तरी दूध पिणे' शाकाहार' वाटेनासा झाला आहे. गाय ही मातेसमान मानायची असेल तर व्यावसायिक पातळीवर विकले गेलेले दूध पिणे हेही पापच !

खरे सान्गायचे तर नॉनव्हेज व्हेज खाणे हे ज्याच्या त्याच्या पिन्डावर अवलम्बुन असते. ( दहाव्याचा पिन्ड नव्हे) माझा नवरा नॉनव्हेज खातो, मी खात नाही. माझ्या माहेरी अन्डे सुद्धा खाल्ले गेले नाही. सासरी मात्र मासे, चिकन, मटन वगैरे. मुलगी खाते कधीतरी, पण ती अजून लहान आहे. ती माझ्या नवर्‍याला सान्गते, बाबा मासे आण. पण आणल्यावर वरण भातच खाते. नाही जमत तिला. हे खाणे न खाणे प्रत्येकाच्या आवडी-निवडीवर, उपलब्ध पदार्थान्वर अवलम्बुन असते.

सारीका, पाश्च्यात्य देशातसुद्धा तुम्हाला शाकाहारी सापडतील. पण त्यान्च्या हवामानाला तेच खाणे सुट होत असल्याने, ते त्यान्चे जीवनमान बनले. त्यामुळे त्याना काहीही वर्ज्य नाही.

आपल्या खन्डाचे हवामान हे तीन ऋतुन्चे असल्याने सर्व काही उपलब्ध होते. ते सहजासहजी बाहेर मिळणार नाही. आणी हे नॉनव्हेजी लोक दररोज खात नाहीत, अपवाद मासेखाऊन्चा, कारण ते त्यान्च्या जीवनाचा भाग बनलेय.

धागा भरकटला.:फिदी:

धागा भरकटला.फिदीफिदी
<<
जौद्या हो. द्या ढील अजून थोडा.

अप्पाकाकांनी सांगीतलं ना, येमेनला जायचंय? Wink

हे घ्या ढील देण्यासाठी माझ्याकडून :

अक्का,
माशांचं पक्वान्न कुठे करतात? ती तर रोजची भाजी. ती लग्नात नसते करायची.

(टीप: ही पोस्ट ऑन टॉपिक आहे. विवाहाच्या निमित्ताने जे काय होईल त्यात हे येते Wink )

पण पारशी सोडून इतर लग्नात माशांचा स्टॉल ठेवत नाहीत. अगदी अट्टल मासेखाऊ लोकसुद्धा.>>>>परवडत नाही हो.

देवकी सुरमई नको हो, निदान जवळा, मांदेली तरी ठेवायला हवी की नाही?

अरे हो, इकडे हैद्राबादेत काही कम्युनिटीज 'फिश फ्राय' ठेवतात बफेत.
पण महाराष्ट्रात पाहिले नाहीत मासे जेवणात.

ईकाका, पण लग्नात भाजीसुद्धा असतेच की!

(येमेनला लग्नात फिश ठेवतात का ते बघायला हवे Wink )

>>(येमेनला लग्नात फिश ठेवतात का ते बघायला हवे>> चँडलरला विचारा. तो जॉबकरता येमेन रोड, येमेनला गेलेला असतो. Proud

पण पारशी सोडून इतर लग्नात माशांचा स्टॉल ठेवत नाहीत. अगदी अट्टल मासेखाऊ लोकसुद्धा.>>>
अर्रर्र, आमच्याकडे लग्नाकार्याच्या जेवणात मासे नसतील तर राजनैतिक संबंध संपुष्टात येतील की हो. Proud

अरे हो, खरंच की! बंगाली लोकांना विसरूनच गेले मी.
Wink
तुमच्या इथे कुणाचं लग्नं ठरलं की मला नक्की बोलव.

ग्रॅड स्कूलमधे असताना तिथल्या मैत्रिणींशी लग्नपद्धती याबद्दल गप्पा होत तेव्हा लग्नांमधे लहान पोरंटोरं सगळ्यांना सकुसप आमंत्रण असतं याचं त्यांना आश्चर्य वाटलं होतं. आणि लग्नामधे सकुसप नाही जायचं तर कधी जायचं असं मला वाटलं होतं. Happy
अगदी जवळच्या नात्यातली (सख्खी भावंडे, सख्ख्या भावंडांची मुले किंवा नवरा/नवरीपैकीच कुणाची तरी मुले) असल्याशिवाय बाकी कुठल्या लग्नांना लहान पोरांना आमंत्रण नसतं म्हणे. लग्नाचे गांभीर्य निघून जाईल किंवा तत्सम काहीतरी असे कारण कळले. आता हे कितपत खरे माहित नाही कारण अमेरिकन सिरीयली/सिनेमांमधे लग्नांमधे लहान पोरं नसतातच असं बघितलं नाही.
अर्थात आपल्याकडच्या लग्नांच्यातला हमखास सीन म्हणजे दोन-तीन वर्षाच्या पोराची/पोरीची आई जेवायला बसली म्हणजे बरोब्बर चावी दिल्यासारखी पोराला शी लागते आणि भर पंक्तीत आईच्यापुढे जाऊन सर्वांना ऐकू येईल एवढ्या खणखणीत आवाजात पोर 'आई शी आली!' सांगतं असा सीन तिकडे होत नसावा... Wink

>>अगदी जवळच्या नात्यातली (सख्खी भावंडे, सख्ख्या भावंडांची मुले किंवा नवरा/नवरीपैकीच कुणाची तरी मुले) असल्याशिवाय बाकी कुठल्या लग्नांना लहान पोरांना आमंत्रण नसतं म्हणे. >>
इथे लग्नाला मुलांना बोलवायचे की नाही, कुणाच्या मुलांना बोलवायचे, बोलवणार नाही हे कसे सांगायचे वगैरे भानगडी म्हणजे एक डोकेदुखीच असते. त्यावरून हर्ट फिलिंग्ज , टिकाटिप्पणी चालते. त्यात लग्नाला मुलं चालतील पण रिसेप्शनला नको वगैरे भानगड असेल तर अजूनच घोळ!

Pages