Submitted by विशाल कुलकर्णी on 9 January, 2009 - 00:45
नील नभाच्या पंखावरती
होवुनी स्वार मी आले रे
नभमालेच्या मंडपात या
झड वर्षेची मी झाले रे
...........मोरपीस मी झाले रे..!
समीरासंगे धुंद होवुनी
दंवासवे मी झुलले रे
फुलपाखरु माझ्या मनीचे
अंगणी भिरभिरले रे
...........मोरपीस मी झाले रे..!
पिऊनी गंध तुझ्या प्रीतीचा
साज नवतीचा ल्याले रे
सुखही झाले असह्य आता
प्रेमसागरी तव न्हाले रे
...........मोरपीस मी झाले रे..!
मिठीत येता तुझ्या साजणा
गंधाळुन मी फुलले रे
गीत जन्मले आज प्रीतीचे
धुंदावुन जीवन गेले रे
...........मोरपीस मी झाले रे..!
विशाल
गुलमोहर:
शेअर करा
चांगली
चांगली आहे.
...........मोरपीस
...........मोरपीस मी झाले रे..!
सुंदर लय आहे ह्या ओळीला. कल्पना पण छान
ते गाणं
ते गाणं आठवलं... मी आज फुल झाले...
छान कविता
कायरे,
कायरे, बायकोच्या कविता पण स्वतःच्या नावावर खपवतोस काय ? सांगू का तिला ?
......................................................................................................................
http://kautukaachebol.blogspot.com/
सुखही झाले
सुखही झाले असह्य आता
प्रेमसागरी तव न्हाले रे
सुंदर
बायकोच्या
बायकोच्या कविता..
मला असे नाही वाटले. वाटले की, ह्यांना कशा दुसर्याच्या भावना कळतात? !
कविता छान आहे.
विशाल,
विशाल, कविता आवडली

--------------------
जगा.. जगवा..
हसा.. हसवा..
जीवन एक जल्लोष आहे.
अरे वा..
अरे वा.. कुठल्या शिनिमातलं गाणं?
chinnu शी सहमत,
chinnu शी सहमत, एखाद्या चित्रपटात चांगले गाणे शोभेल.
हरीश
अलकाजी,
अलकाजी, बायकोच्या मनातली कविता चोरलीयं त्याने. लबाड आहे तो.
......................................................................................................................
http://kautukaachebol.blogspot.com/
गेल्या
गेल्या वर्षी लोकलमध्ये एकदा समोरच्या सीटवर बसलेल्या एका जोडप्याचे संभाषण कानी आले. आशुतोश गोवारीकर "मावा' ला सपोर्ट म्हणुन प्रयत्न करत होता. थोडासा चमकलो.."मावा" या शब्दाचा आम्हाला एकच अर्थ माहीत ना .
त्यांना विचारले असता कळाले की मावा म्हणजे "मेन अगेन्स्ट वायोलेन्स अँड अब्युज ". स्त्रीयांवर होणार्या अन्याय, अत्याचाराविरुद्ध पुरुषांनीदेखील आवाज उठवायला हवा अशा विचाराची आणि खरोखर खुप कार्य करणारी अशी ही संघटना आहे. कोणीतरी हरिष सदाना की असंच काहीतरी नाव असलेले सदगृहस्थ हि संस्था चालवतात.
एक विचार मनात आला कि हे जर करायचं झालं तर मुळात एक स्त्री होवुन विचार करता आला पाहिजे. तिच्या मनात डोकावता आलं पाहिजे. आपल्याला हे जमेल का? मग त्या दृष्टीने प्रयत्न सुरु झाले. खुप कठिण आहे हो. इतकं सहनशील होणं, इतकी समर्पण भावना अंगी बाणवणं खुप कठीण आहे. ते जेव्हा जमेल तेव्हा जमेल. पण गेल्या वर्षभाराच्या प्रयत्नानंतर एवढं जमायला लागलंय. आणि मनापासुन सांगतो एक खजिना हाती गवसल्यासारखं वाटतंय.
सस्नेह...
विशाल.
____________________________________________
http://maagevalunpahataana.blogspot.com
धन्यवाद.
धन्यवाद. एवढे विचार मनांत आले तरी भरपूर ! विचार केव्हातरी आचाराला जन्म देतोच.
अशि
अशि क्ल्पना केलित तेव्हा पुधच्या ति जन्मिचि स्रि होन्याचि तयारि दर्शवते, मस्करि केलि, पन वात्ल न्हव्त पुरुषाना हि कलु शक्त स्रि च मन..
मस्त रे.
मस्त रे. मस्त गाणं होइल. पण....
>> फुलपाखरु माझ्या मनीचे
अंगणी भिरभिरले रे >>
इथे लय जरा गडबडल्यासारखी वाटली.