Submitted by harish_dangat on 8 January, 2009 - 22:25
माझा गाव सोडताना , मनी उठले काहूर
आला भरून हा उर , ओली झाली ही नजर
माझा गाव सोडताना , आली पावसाची सर
आला आठवनींचा पुर , धुंद झाले तरूवर
माझा गाव सोडताना , वनी नाचतात मोर
रूणझुनती पाखरं , आले जुळून हे सूर
माझा गाव सोडताना , वर ढगांची मखर
इंद्रधनू कडेवर , लाजे चंद्राची ही कोर
माझा गाव सोडताना , दिसे झाडांना बहर
गोड जांभळं नी बोरं , लोंबे आब्याला मोहर
माझा गाव सोडताना , शेता फुलांचे आगर
झेंडू मोगरा तगर , जसे उडवी अत्तर
माझा गाव सोडताना , नदीच्या या काठावर
डोई कोणाच्या घागर , कोण वाजवी पैंजार
माझा गाव सोडताना , लागे डोळयाला धार
होई आवाज कातर , ह्रदयी येई गहीवर
हरीश दांगट
गुलमोहर:
शेअर करा
सस्नेह... वि
सस्नेह...
विशाल.
____________________________________________
http://maagevalunpahataana.blogspot.com
>>माझा गाव
>>माझा गाव सोडताना , नदीच्या या काठावर
डोई कोणाच्या घागर , कोण वाजवी पैंजार<<
हे आवडलं.
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
हरिशजी, कवी
हरिशजी,
कवीता वाचल्या नतंर माझ्या गावाची (तुगाव) खुप आठवण आली!!
धन्यवाद!!
वा छान गाव
वा छान गाव अगदी डोळ्यासमोर उभ राहील.
>>माझा गाव
>>माझा गाव सोडताना , नदीच्या या काठावर
डोई कोणाच्या घागर , कोण वाजवी पैंजार<<
हे आवडलं.
-नी
अनुमोदन. छान शब्द आहे पैंजार
शुभेच्छा
चित्र उभ
चित्र उभ राहतंय कवितेतून. छान कविता
आवडली
आवडली कविता.
सुरेख
सुरेख हरिश
......................................................................................................................
http://kautukaachebol.blogspot.com/
आइ सार्खि
आइ सार्खि गाव्चि आत्व्न का काद्ते ते आत्ता कलला,,,,
छान कविता
छान कविता
माझा गाव
माझा गाव सोडताना
माझ्या उरात काहूर . . .
हम्म्म्म्म!