ढग

Submitted by पल्ली on 22 November, 2014 - 22:46

ढगाचा एक तुकडा
देखणा रुबाबदार
जणु कापसाचा पुंजका
चंदेरी चमचम
हळुवार अलवार..
वार्‍याच्या तालावर
धुन्द बेहोश होता
आपल्याच नादात
एकटा गात होता.
वार्‍याची लकेर घेउन
डौलात गिरक्या
मारीत होता..
निळ्या नितळ आभाळात
उठुन अगदी दिसत होता...
अगदी तुझ्यासारखा....
तुझ्याचसारखा भासत होता.
आपल्याच धुंदीत कधी
येतोस ना जेव्हा सूरांच्या रंगात..
तेव्हा तु जसा
हृदयगार वाटतोस,
अगदी तस्साच
तस्साच तो ढग मला जाणवला..

Group content visibility: 
Public - accessible to all site users