एवढस आभाळ

Submitted by rasika_mahabal on 8 January, 2009 - 16:04

अशोक सराफ - लक्ष्मीकांत बेर्डे ह्या जोडगुळीचे सिनेमे बंद झालेत आणि मराठी सिनेमावर शोकाकुल परिस्थिती आली. सचिन पिळगांवकरने काढलेला एखाद दुसरा सिनेमा मधेच मराठी चित्रपटस्रुष्टीच अस्त्तित्त्व जाणवून जायचा आणि पुन्हा मग निस्तब्ध शांतता. कुठल्यातरी अजाण साखळदंडामधे मराठी दिग्दर्शक अडकलेला बहुतेक सराफ - बेर्डेच्या माकडचेष्टांनी भरलेल्या सिनेमां व्यतिरिक्त त्याला काहीच दिसत नव्हत आणि दिसल तरी मराठी प्रेक्षकाला ते झेपेल का नाही ह्याची भिती असावी. अशातच श्वास सारखा सिनेमा गुपचुप येतो काय व डायरेक्ट ऑस्करला पोचतो काय. मराठी दिग्दर्शक अचानक पछाडून जातो. त्याची झोपमोड झाली आहे हे तो डोंबिवली फास्ट, सरिवर सरी सारख्या सिनेमांमधुन सिध्द करतो.
पण आता मात्र माझ्या मते त्याची फक्त झोपमोड झालेली नसून संपुर्ण निद्रानाश झाला आहे. कदाचित,अनाहत, बनगरवाडी, वळु, चेकमेट, शेवरी, टिंग्या एकाहुन एक अधिक सुंदर सिनेमे...(चेकमेट मधील व्हिलनच नाव महाबळ - तेवढच एक वाईट :)) एकाहुन एक सुंदर नेपथ्य, दिग्दर्शन, अभिनय, संवाद.
आणि आता मात्र कमालच झाली - मराठी माणसाने एवढस आभाळ सारखा चित्रपट काढुन स्वतःभवतीची दोरखंड तोडून सुसाट पळ काढला आहे. हा सिनेमा अगदी नक्की बघाल. असेच अनेक मीनींगफ़ुल मराठी मुव्हीज निघत राहोत!

गुलमोहर: 

रसिक,
खरंय तुझं म्हणणं. मराठी सिनेमा पुढे चाललाय.. पण आता खंड नको , इन्फॅक्ट अजुन पुढे जायचय हा विचार मराठी निर्माता, दिग्दर्शकाच्या मनात पाहिजे.. अर्थात या सगळ्याला सुजाण मराठी प्रेक्षकाने तेव्हढीच साथ द्यायला हवीं. नाहीतर प्रेक्षकाला आवडत नाही, म्हणुन निर्मात्याला परवडणार नाही, आणि हा चढत आलेख पुन्हा खाली येणार-- असं व्हायला नको.
-------------------------------------------------------------
ख्वाब रंगी है, इस जहां के, देख ले देख ले तु सजा के,
अपने सायेसे तु निकल के, देख ले देख ले तु बदल के,
रंगोंके है मेले, खुशीयेंके है रेले,
धडकन पे पेहेरा क्युं है क्यु......

एवढस आभाळ बद्द्ल एकुन होतो.
पण तुमच हे वाचुन बघीतला.
फारच छान आहे चित्रपट.
धन्यवाद.

एव्हढंसं आभाळ बद्दल जयावी यांनी पुर्वी इथे सविस्तर लिहीलं आहे. ही लिंक पहा.
http://www.maayboli.com/node/3822