दु:ख

Submitted by वर्षा.नायर on 8 January, 2009 - 07:08

तू मिळाला नाहिस असं कुणाचच आयुष्य नाही.
प्रत्येकाला तूला सामोरं जावंच लागतं

तू तर एकच आहेस,
तू प्रत्येकाच्या घरात, हृदयात रहातोस
पण प्रत्येकाच्या वेगळ्या रसायनात मिसळून
विभिन्न रुपे धारण करतोस

तू प्रत्येकाच्याच रसायनात मिसळला आहेस.
काहिंना तू आपल्या रसायनात मिसळून गेल्यावर
ह्या रसायनाचीच नशा चढते, व कलेची निर्मिती होते.

प्रत्येकजण तुझं त्यांच्यातील आस्तित्व दाखविणं टाळतात.
पण तूच तर आहेस जो सच्चे मीत्र, सच्चा सखा मिळवून देतोस.
एखाद्या फसव्या अनाहुत क्षणी
जेव्हा दोन व्यक्तींना परस्परांतील तूझे दर्शन होते
तेव्हा त्या अधिक जवळ येतात.

तूझ्याशी दोस्ती करायची का वैर हे प्रत्येकाच्या रसायनावर अवलंबून असतं
पण चांगल्या माणसाच्या रसायनात
तू बहुधा दुध पाण्याच्या मिश्रणासारखा सहज मिसळतोस
आणि म्हणूनच तू चांगल्या माणसात अधिक आढळतोस.

तू आहेस म्हणूनच सुखाचे आनंदाचे महत्त्व
तू नसताच तर मग सुखाला सुख तरी कोणी म्हणाले असते का?
सुखाचे आणि हास्याचे नाते आहे
तूझे आणि अश्रूंचे नाते आहे
पण सुख आणि हास्य दोन्हिही फसवं व कृत्रिम असु शकतं
दु:ख आणि अश्रु मात्र सच्चे असतात.

तूच माणसाला जमिनीवर ठेवतोस,
आर्तता, उदासी ही पण तूझीच रुपे आहेत
प्रेमाला पण सुखापेक्षा तूच जवळचा वाटतोस
आणि मला देखिल.....

तुझ्या मुळेच मला माझ्या मनाच्या खोल डोहाचा तळ गाठता येतो
आणि माझ्या आत्म्याचे देखिल दर्शन होते.

गुलमोहर: 

तू आहेस म्हणूनच सुखाचे आनंदाचे महत्त्व
तू नसताच तर मग सुखाला सुख तरी कोणी म्हणाले असते का?
सुखाचे आणि हास्याचे नाते आहे
तूझे आणि अश्रूंचे नाते आहे
पण सुख आणि हास्य दोन्हिही फसवं व कृत्रिम असु शकतं
दु:ख आणि अश्रु मात्र सच्चे असतात.

खरय. छान.
पण त्याला जास्त वेळ जवळ बाळगू नका हं!

अल्का प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद.
वर्षा

तू प्रत्येकाच्याच रसायनात मिसळला आहेस.
काहिंना तू आपल्या रसायनात मिसळून गेल्यावर
ह्या रसायनाचीच नशा चढते, व कलेची निर्मिती होते.

पण चांगल्या माणसाच्या रसायनात
तू बहुधा दुध पाण्याच्या मिश्रणासारखा सहज मिसळतोस
आणि म्हणूनच तू चांगल्या माणसात अधिक आढळतोस.

जेव्हा दोन व्यक्तींना परस्परांतील तूझे दर्शन होते
तेव्हा त्या अधिक जवळ येतात.

मस्त !! Happy

धन्स अज्ञात!!! (धन्स वैगरे, शिकले कि नाही मी मायबोली वरिल भाषा)

छान ... जरा शुद्ध लेखन सांभाळ...:)

वर्षा,
खुप साधी, सरळ आणी सोपी कवीता!!!
छान!

सत्यजित.. होना माझ्या -हस्व, दिर्घाच्या खुप चुका होतात. नेहमी confusion असते, अमुक शब्द -ह्स्व लिहायचा कि दिर्घ? Happy त्या व्यतिरिक्त देखिल काही शुद्धलेखनाच्या चुका असतील तर सांगा. Happy

गणेश, कविता वाचलीत आणि प्रतिसाद दिलात त्या बद्दल धन्यवाद.

वर्षा, हाच अनुभव खुलवुन लिहिलास तर मस्त ललित होइल. रागाऊ नकोस पण कविता म्हणुन नाय. दिर्घ काव्य कदाचित! पण एकुणच विचार खूप सुंदर आहे गं. माझं बर्‍याचदा असं होतं. मागे एकदा वैभवजीनी सुधारणा केली होती माझ्या एका रचनेत.

पल्ली तू म्हणतेस ते थोडं खरं आहे, हा विषय खुलवुन ह्याच्यावर ललित होईल देखिल.

पण अग माझ्यासाठी कविता हि स्वत:शी बोलणारी जास्त असते, माझी कविता हि माझे माझ्यासाठीच असलेले self expression असते. जेव्हा खुप आतुन उर्मी येते तेव्हा कागदावर भावना मांडण्याचा प्रयत्न करते, मग ते मी ललित लिहित आहे का कविता का अजुन काही हे मला देखिल माहित नसते.

मी ब-याचवेळा खास कवितेला योग्य असे typical शब्द वापरुन आणि छंदात लिहिण्यासाठी जाते, पण मग ती कविता माझ्यापासुन खूप दूर जाते, मला तीला कृत्रिमतेचा वास येउ लागतो. आणि मी तसे लिहिण्यापासुन परावृत्त होते

हे झाले माझे वाटणे, अर्थात वेगवेगळ्या पद्ध्तीने पण लिहिता आले पहिजे, शिकले पाहिजे.. प्रयत्न करेन.

काही हरकत नाही. भावनांना कृत्रिमतेमध्ये मुळीच कोंडू नका.लिहीत रहा मुक्तपणे.
तुमच्या कवितेचे अभिवाचन केलेत की जास्त ईफेक्ट येईल.

अगदी अगदी. माझं मत फार मनावर घेऊ नकोस. लिहित रहा, लिहित रहा राणी Happy

अग पल्ली, नाही अशिच suggestions देत जा.. शेवटी चुका कळल्या किच माणुस सुधारतो. मी अर्थात positivelyच घेते suggestions.