मी एक कोडर....

Submitted by mitthu on 8 January, 2009 - 06:50

मी एक कोडर हो मी एक कोडर
नोकरी मागु मागु घश्याला पडली कोरड

.NET, DB, Planning चे करु शकतो काम
मोबद्ल्यात मी घेईल वाजिब असे दाम

अनुभव आहे पाठिशी पण काम हाती नाही
recession चा बळी मी दोष नाही काही

दिवस असे वाईट पण करू तरी काय
मन माझं मानेल पण पोटाचे काय

चलतो आता जवळ आलाय interview चा थांबा
असेल कुठे नोकरी तर माझ्या साठी सांगा

साधी, सोपी, सरळ..
मस्त रे मिठ्ठु.. Proud
--------------------
जगा.. जगवा..
हसा.. हसवा..
जीवन एक जल्लोष आहे. Happy

इथे लिहिण्यापेक्षा डाइस नाहीतर मॉन्स्टर वर टाका हे Happy

मैत्रेयी,
"इथे लिहिण्यापेक्षा डाइस नाहीतर मॉन्स्टर वर टाका हे" च्या ऐवजी
"आता डाइस नाहीतर मॉन्स्टर वर सुद्धा टाका हे" असं असायला हवं ना हे! नाहीतर आपण कसं वाचलं असतं?

को डरति? धीर धर, मिळेल तुला. छान लिहीली आहेस पण!

मस्त. पण "काहीच्या काही" नक्कीच नाही. कविता वर टाक.
----------------------
I'm sure..I'm not the Best, still I'm happy.. I'm not like the Rest..!! Happy

बराच वेळ डोकं खाजवलं... मी एक कोडर? Uhoh काय कळेना.. कविता वाचल्यावर कळ्ळं...
कविता छान जमलेय.... Happy

मिठ्ठू (तुझा आयडी पण मस्त आहे), खूप छान व मनापासून लिहिली आहेस.

------------------------------
पंचप्राण हे आतुर झाले करण्या तव आरती | सगुण रुपाने येऊन स्वामी स्विकारा आरती ||

मिठ्ठू

"दिवस असे वाईट पण करू तरी काय
मन माझं मानेल पण पोटाचे काय"
खरचं!

छान कवीता!!!

परिस्थिती बिकट आहे खरी; पण हेही दिवस जातील.
शोधा म्हणजे सापडेल !

नोकरी मागु मागु घश्याला पडली कोरड
येथे नोकरी मागून मागून म्हणायचे आहे का?
कविता उस्फूर्त आणि छान आहे.

आइ ति फिल्द मधला वाततो.......

मस्तच लिहिले आहे..साधी सरळ शब्दात...
आवडली...

Lol होना ... कोडर रिसेशन "को डर"!