निसर्गाच्या गप्पा (भाग २३)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 10 November, 2014 - 14:09

निसर्गाच्या गप्पांचा धागा २३ व्या भागामध्ये पदार्पण करत आहे. सगळ्या निसर्गाच्या गप्पांच्या सदस्यांचे हार्दिक अभिनंदन.

"हिवाळा" हा सगळया ऋतुंमधे आल्हाददायक ऋतु वाटतो. हिवाळ्याची पहाट खुपच रम्य वाटते. पहाटे सभोवताल पसरलेले धुके, गार वारं, पक्षांचा किलबिलाट, गाईचे हंबरणे, कोवळ्या उन्हाचा किरणोत्सव, आंगणात पेटवलेल्या चुलीचा धुर,वाफाळता चहा.. सगळेच कसे रमणिक आणि प्रसन्न वाटते.

हिवाळ्यात थकवा, चिडचिड जाणवत नाही, शीण येत नाही, एरवी नकोस झालेले उन सुदधा हवेहवेसे वाटते. या दिवसात अहार वाढलेला असतो तसेच पचन शक्ती पण चांगली असते. या ऋतूत सशक्त होऊन ही ताकद साठवुन वर्षभर पुर्वायची असते..

तसेच थंड हवामानामुळे या दिवसात फळ भाज्यांची रेलचेल असते.. पेरु,सिताफळे,पपई,, चिक्कु अशा मधुर फळाची मेजवानी असतेच जोडीला संत्रे, मोसंबी अशी निमफळ पण चाखायला मिळतात. थंडी मुळे फुला - फळांचे रंग अधिकच गडद आणि लोभस वाटतात.

या दिवसात काही झाडांची पान गळती असते तर..काही झाडे ओसंडुन बहरत असतात.
एकी कडे बुची , पारिजातकांचे सुगंधीत सडे पडलेले असतात तर दुसरीकडे शेवंती, चमेली, सायली नटलेली दिसते..
तर असाहा सुगंधोत्सव कधीच संपु नये असे वाटते...

आपण सगळे नुकतीच दिवाळी जलौषात साजरी करुन एका वेगळ्याच जोशात कामाला लागलेले असतो... आता वेद लागतात ते तुळशीच्या लग्नाचे! आपले सगळे सण समारंभ निसर्गाशीच निगडीत आहेत.. उदा. कार्तीक महिन्यातच तुळशी विवाहा असण्याचे कारण असे की या महिन्यात तुळस बहरलेली असते , तिला भरपुर पान आणि मंजीर्‍या आलेल्या असतात.. म्हणजेच विवाहा योग्य झालेली असते... या सणाच्या निमित्याने कन्या योग्य वयात आल्यावरच तिचा विवाह करावा असे तर आपल्या पुर्व़जांना सुचवायचे नसेल ना! असे श्री दिलीप व सौ पोर्णिमा कुलकर्णीं यांच्या एका पुस्तकात वाचल्याचे आठवते..

शिवाय, तुळशीच्या लग्नासाठी लागणारे सगळे साहित्य आपल्याला निसर्गचे देते..उदा. विवाहासाठी लागणारी झोपडी किंवा मांडव उसाची किवा ज्वारीची असते,.. पुजेच्या साहित्यात बोरं, चिंचा, आवळे, सिताफळ हवेच. म्हणजेच काय तर सणा समारंभाच्या निमित्याने आपण निसर्गाचीच पूजा करतो, आभार मानतो. आणि असे करणे गरजेचे आहे.कारण आपण निसर्गाकडुन नेहमिच काही ना काही घेत आलो आहोत. त्याचे आपल्यावर अनंत उपकार आहेत, कधी न फेडु शकणारे.

तर अशा या "कधी न संपावा" अस वाटणार्‍या रुतुचे आपण सगळे मना पासुन नि.ग. वर स्वागत करुया.

(वरील फोटो व लेखन मायबोलीकर निसर्गप्रेमी सायली पातुरकर यांच्याकडून)

नि.ग. च्या धाग्याची सुरुवात झाली आहे ५ डिसेंबर २०१० रोजी पासून.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
निसर्गाच्या गप्पा (भाग २१) http://www.maayboli.com/node/49967
निसर्गाच्या गप्पा (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अदीजो,शशांक,
फुले+फोटो मस्त.
सायली, खरंच ग पहिल्या फोटोत, मायलेकरांचे भाव करूण दिसतात.

हे आमच्या बागेतलं वॉकिंग आयरिस - अति मंद सुगंध असतो आणि सकाळी काही काळच फुलतं हे ...... Happy

walking iris 80 kb.jpg

गेल्या भागात अजिबात सक्रिय नव्हते. आता मात्र नेहमी यायला जमेल असे वाटते.

चर्चगेट परिसरातील गुलमोहोरांना तुरळक फुले फुलली आहेत. तसा हा त्याचा सिझन नाही. मग का बरं फुलला असेल?

वॉकिंग आयरीस मस्त शशांकजी.

माझ्याकडे ब्रह्मकमळ म्हणणार्‍या कॅकटसवरही आत्ता कळ्या आल्या आहेत. १५ एक तरी असतील.

सोनटक्याला मागे सांगितल्याप्रमाणे कळ्या धरल्या आहेत.

सुप्रभात..
ambadi.jpg

रावी, सरिवा, आर्या.. धन्यवाद..
देवकी Happy
वॉकिंग आयरीस दिसायला तर मस्तच शीवाय सुगंधी पण आहे.. Happy
सरिवा, नीळी ग्रामोफोन आकाराची फुलं मस्तच Happy
जागु बापरे १५ कळ्या, मज्जा आहे तुझी..

सायली, अंबाडीची बोंडे ना ही ?
शशांक, किती कलाकुसरीचे आहे हे फुल. इथे अंगोलात त्याचा एक पिवळा प्रकार दिसत असतो.

सुदुपार! नविन भागाचा सुरुवात छान झाली. सायली - मनोगत व प्रचि सुरेख ! माझ्याकडच्या अंबाडीला चटणी करण्याइतपत फुले आली आहेत ... फोटो टाकीन ... रच्याकने चटणीची रेसिपी टाकशील...

आभार मंजु ताई..
अरे व्वा.आंबाडी ला फुलं पण लागलीत, फोटो पाहिजे..
चटणी खुपच सोप्पी आहे.. लसुण, जीरे,मीठ, तिखट आणि ही फुलं (बियांसकट) मिक्सर मधुन गिरवायची..
आपल्या करवंदाच्या चटणी सारखीच आहे पा. कृ.

कुणाला करडईच्या फुलांचा किंवा बोंडांचा फोटो मिळाला तर अवश्य टाका. मी एकदा शेतातून खुडली होती.. बोटांना चांगलेच काटे रुतले होते.

सायलि, चटणीचा पण फोटो डकव ना असेल तर .. आणि कृती पण दे.

माझ्याकडे निसर्गाचे इतके इतके फोटो आहेत पण प्रश्न साईझ कमी करण्याचा आहे. मी आता काहीतरी उपाय बघतो आहे. कुठल्यातरी साईट वर अपलोड करुन इथे लिंक पेरतो.

बी, पिकासावरून लिंक देत जा. साईझचा प्रश्न येत नाही.
मला एकदा बघाविशी वाटली म्हणून अख्खी करडई हवी होती. कुठेच मिळत नव्हती. शेवटी नारायणगावच्या आठवडी बाजारात मिळाली. तिच्या बोंडाचे पण लोणचे करतात असे वाचले. मला चौफुला जवळ एका शेतात ती दिसली.
हात लावायला गेलो तर भयानक काटे टोचले.

दिनेश, हो पिकासा आहे फक्त फोटो अपलोड करायची देर.. Happy आळसे कार्यभाग नासतो Happy

अकोल्यात करडईची भाजी विकायला असते भाजारात. त्याचबरोबर अन्य भाज्या. मला अकोल्याचा बाजार इतर कुठल्याही शहरातील बाजारांपेक्षा जास्त गजबजलेला आणि ताजा हिरवाकंच वाटतो. ह्याला कारण अकोला शहर खेड्यापाड्यांनी वेढलेले आहे.

माझ्याकडे निसर्गाचे इतके इतके फोटो आहेत पण प्रश्न साईझ कमी करण्याचा आहे. मी आता काहीतरी उपाय बघतो आहे. कुठल्यातरी साईट वर अपलोड करुन इथे लिंक पेरतो. >>>>> ही दक्षिणाने सुचवलेली साईट छान आहे - मी बहुतेकवेळा हीच वापरतो -
http://www.shrinkpictures.com/

माझ्याकडे ब्रह्मकमळ म्हणणार्‍या कॅकटसवरही आत्ता कळ्या आल्या आहेत. १५ एक तरी असतील.

>> माझ्याकडे २..पण हे खुपच उशीरा आहे ना.. गेल्यावर्षी जुन मध्ये होते

Pages