Submitted by अज्ञात on 8 January, 2009 - 04:24
कधी वाटले नव्हते की
सुखही जाळेल जिवाला
भेट हवेतिल श्रवणाची
स्वर ढवळतील हृदयाला
मनतुडुंबघन लाभला जिव्हाळा
अनपेक्षित; सृजनाला
विरघळले ऋतु आंसवांतुनी
तोषवीत सगुणाला
जे नको; हवेसे कधी वाटते
विसरावे स्वतःला
कळेच ना जे आठवते
असते का तेही ज्वाला ?
ही गूढचरण शब्दाविण भाषा
जाणवते रुधिराला
नि:शब्दच चाळवे सकल
कोषातिल मधुशाला
....................अज्ञात
गुलमोहर:
शेअर करा
ही गूढचरण
ही गूढचरण शब्दाविण भाषा ... व्वा !!
***************
impossible is just an opinion
पहिल्या
पहिल्या कडव्यातच जिंकलंस!
ग्रेट
ग्रेट !
हरीश
कधी वाटले
कधी वाटले नव्हते की
सुखही जाळेल जिवाला
भेट हवेतिल श्रवणाची
स्वर ढवळतील हृदयाला
वा !
मनतुडुंबघन लाभला जिव्हाळा
अनपेक्षित; सृजनाला
विरघळले ऋतु आंसवांतुनी
तोषवीत सगुणाला
छान .
जे नको; हवेसे कधी वाटते
विसरावे स्वतःला
कळेच ना जे आठवते
असते का तेही ज्वाला ?
ज्वाला ..... चा संदर्भ का यावा . खूप विचार करूनही समजत नाहीये.
ही गूढचरण शब्दाविण भाषा
जाणवते रुधिराला
नि:शब्दच चाळवे सकल
कोषातिल मधुशाला
रुधिर =रक्त (माझ्यामते)
हा अर्थ बरोबर असेल तर गूढचरण शब्द नाही समजला. इथे मी चरण काव्यातील/अभंगातील चरण ह्या अर्थाने घेतो आहे.
ह्या दोन गोष्टी समजल्यास कविता नव्याने वाचता येईल
वैभव, आपल्य
वैभव,
आपल्या प्रश्नांबद्दल आभारी आहे.
जे नको वाटायला; ते हवेसे, त्यात स्वतःला विसरून जावे, असे वाटते आहे. जे आठवते आहे त्यानुसार जे सुख माझ्या जिवाला जाळते आहे तीच 'ज्वाला'(तेच सुख) तिच्यातही असेल का? पण हे नक्की कळत नाहीये. असा 'ज्वाला' चा संदर्भ.
प्रेमाची संवेदना रक्ताभिसरणातून प्रथम उमलते. ही भाषा ज्याची त्यालाच रुधिरातून शब्दाविना कळते म्हणून ती 'गूढ्चरण', काव्यातील अथवा अभंगातील चरणांप्रमाणे हाही एक भाषेचा वेगळा चरण.
मला वाटतं संदर्भ लागतील. पुन्हा एकदा आभार.
................अज्ञात
आवडली आणि
आवडली आणि समजलीही.
छान.
सर्वांचे
सर्वांचे मनःपूर्वक आभार !
you may also meet me at ....... www.layakari.com
I am here too ..... http://adnyaatvaas.blogspot.com
Good
Good one!!!!!!!!!!!!
Roops..........
" करु न याद मगर किस तरह भुलाऊ उन्हे, गझल बहाना करु, और गुनगुनाऊ उन्हे...."
अप्रतिम !!!
अप्रतिम !!!
छान! शरद
छान!
शरद
कधी वाटले
कधी वाटले नव्हते की
सुखही जाळेल जिवाला
- वा!
वा! अतिशय
वा! अतिशय सुंदर.
मस्त..!!!
मस्त..!!!