ओल

Submitted by पल्ली on 8 January, 2009 - 03:16

पाऊस तिच्या दारी आला
त्या पावसात ती ओलिचिंब भिजते.
पाऊस म्हणतो, मला तु का येऊ देते?
त्यावर ती गारठते!
पावसाला कविता सुचते,
तिच्या घरांत शब्द गळु लागतात,
त्याच शब्दांचा बर्फ ती फ्रिजमध्ये ठेवते,
तो घरी आला की
सरबतात घालुन देते.आता तो गारठतो!
तो म्हणतो, मी जवळ असताना,
तु का गारठते?
ती म्हणते, मला भावनेची थंडी वाजते...
मग तो आणि ती, पिघळु लागतात.
बर्फही वितळतो,
काम वाली बाई येते,
मळकट फडक्याने सारे पुसुन जाते.
तो म्हणतो, आता गं करायचे काय?
ती म्हणते, मला तरी पुढची कविता सुचत नाय.
तो म्हणतो, पकड तरी पण शब्दांना..मी वाट बघतोय
ती म्हणते, थांब रे जरा, ती बाई फडक्याने पुसतेय.
ती गेली की मग बोलु.
तो म्हणाला, हा पाऊस भलताच चालु.
मी बाहेर पडलो की हा होतो चालु.
हा नुसता पाऊस की तुझा बालमित्र भालु?
मी गप्प बसले.
आता अजुन काय बोलु?

Lol
----------------------
I'm sure..I'm not the Best, still I'm happy.. I'm not like the Rest..!! Happy

मला ई-टीव्हीवरच्या कॉमेडी एक्स्प्रेस मधल्या कवीची आठवण झाली. मज्जा आली वाचताना!

मला अशा खूप सुचतात. सोडु का अंगावर? सांगा, मी काय करु?

वा!!! मजा आगया Happy
God made Man and tailor made Gentleman! Wink

सोड सोड! एक बी बी आहे बघ टण्याने सुरु केलेला....

Lol
काहीच्या काहीच....
ह् ह पु वा.

पल्ली मला तु खरच सुनिल तावडे सारखी दिसत आहेस...
कविता म्हणून झाली की विचरणारी... कशी वाटली ? Happy

तिच्या घरांत शब्द गळु लागतात
आणि
मला भावनेची थंडी वाजते...
हे आवडले.

शब्दांना गाळण्याचे काम आपले !

कायच्या काय ? खास तुला म्हणून....
नवकवी - माझ्या आधी माझा बकरा हजर झाला
कोंबड्याच्या कानात घड्याळाचा गजर झाला

.........................................................................................................................

http://kautukaachebol.blogspot.com/

Happy Happy !!

तुझि मुल्गि कल्पना कर्ते धग, चन्द्र, तारे हसनारे;उगाच;नाहि, आइ हि तशिच ना

तिच्या घरांत शब्द गळु लागतात,
त्याच शब्दांचा बर्फ ती फ्रिजमध्ये ठेवते,
तो घरी आला की
सरबतात घालुन देते.आता तो गारठतो!
तो म्हणतो, मी जवळ असताना,

मी बसलो ह्वोतो खोक्यावर
आणि येकदम पडलो डोक्यावर
साला खोका निघाला फुसका
पुट्ठा म्हणतो "बस का?"
साला तुम्ही बसुन
खोक्याला आले पोंग
उगाच कशाला घेता
हलकेपणाचे ढोंग
साला डोका नाही हं तुमचा
रिकामा खोका आहे
आणि गावातल्या प्रत्येक
मनीला एकतरी बोका आहे Happy

ही कशी वाटली?
तुमच्याच बर्फाच्या पाण्याने
धुतली बाटली Lol

सत्या... जबरी रे! मस्त च आहे...