Submitted by पल्ली on 8 January, 2009 - 02:43
पक्षी बांधला बांधला
सुने आभाळ आभाळ
निळ्या त्याच्या पंखात
आस ओढाळ ओढाळ...
त्याच्या आभाळाला खळे
स्वप्न रानातले खुळे
रानसोयरे सुखाचे
रान सोयरे मैत्रीचे . ..
पक्षी उगेच हसतो
आता बेतालसा गातो
त्याला कौतुकाचा चारा
पक्षी दिसतो बिचारा ...
आकाशाला त्याची
आठवे भरारी
पक्ष्याचे सामर्थ्य
गाठे उंचीची श्रीमंती....
नका बांधु रे पक्ष्याला
नका पिंजर्यात गाडु
त्याला आकाश भेटवा
पक्षी लागु दे रे उडु . ..
गुलमोहर:
शेअर करा
(No subject)
सस्नेह...
विशाल.
____________________________________________
http://maagevalunpahataana.blogspot.com
.............................
.....................................!!!!!!
बहिणाबाई....
बहिणाबाई.... खुप छान... "पक्षी लागु दे रे उडु"
छान...
छान...
स्वप्न
स्वप्न रानातले खुळे
रानसोयरे सुखाचे
रान सोयरे मैत्रीचे . ..
पक्षी उगेच हसतो
आता बेतालसा गातो
त्याला कौतुकाचा चारा
पक्षी दिसतो बिचारा ...>>> हे आवडलं पल्ले
धन्स.
धन्स. सर्वांना.
खूपच
खूपच छान........
नका पिंजर्यात गाडु...... मधील 'गाडु' शब्दाएवजी दुसरा शब्द असायला हवा असे वाटते...... उदा. कोंडू......
आठवणींचे
आठवणींचे अवघे पक्षी
उडू लागले अवती भवती
किती पाह्तो कोंडू तयांना
कधी गवसती कधी झुलवती
......................................................................................................................
http://kautukaachebol.blogspot.com/
(No subject)