आपला कपिल ५० वर्षाचा झाला तरी त्याबद्दल फारसे कोठेच काही आले नाही? कदाचित आयसीएल मधल्या त्याच्या सहभागामुळे बीसीसीआय ने काही उत्साह दाखवला नाही. कदाचित मध्यंतरी त्याचे नाव मॅच फिक्सिंग मधे आले होते त्यामुळे ही असेल, पण त्याची शक्यता कमी आहे.
चला निदान आपण तरी काही जबरी आठवणी लिहू 
१. पाक मधे (बहुधा जगात) पहिल्यांदाच भारतीय बोलर विरूद्ध हेल्मेट घालायची वेळ आली प्रतिस्पर्धी फलंदाजांना 
२. इंग्लंड मधे फॉलोऑन टाळायला २४ रन्स व फक्त एक विकेट शिल्लक असताना सलग ४ सिक्स मारून टाळलेला फॉलोऑन!
३. ऑस्ट्रेलियात त्याला एकदा चुकीचे LBW दिल्यावर "हे आउट असेल तर मी १००० विकेट्स घेतल्या आहेत" म्हणणे 
४. तो रिचर्डस चा कॅच !!!
५. गावस्कर बरोबर ची (निदान मीडियाने) लावलेली भांड्णे, पण त्याच्या कप्तानपदाच्या शेवटच्या स्पर्धेत जीव तोडून केलेली बोलिन्ग व बॅटिंग
६. अप्रतिम यॉर्कर वर काढलेली त्याच स्पर्धेतली कासिम उमर ची दांडी, जी नंतर अनेक वर्षी कोणत्यातरी जाहिरातीत दिसली
७. एक सिक्स मारल्यावर लॉन्ग ऑन ला फिल्डर लावला तरी तेथेच पुन्हा कॅच देउन आउट होणे
८. जखमी असताना ऑस्ट्रेलियात शेवटच्या दिवशी बोलिंग ला येउन पाच विकेट्स उडवून भारताला जिंकून देणे
९. रन काढताना दुसरा बॅट्स्मन जेमेतेम तिकडे पोहोचेपर्यंत बॅट टेकवून पुढच्या रन ची ३-४ पावले टाकून केलेली तयारी
१०. "नटराज" पुल शॉट 
आणि "आपण जरी फक्त १८३ केलेले असले तरी आपण ते केलेले आहेत, त्यांना अजून करायचे आहेत", कधीही नि विसरणारी कामगिरी म्हणजे १९८३ चा वर्ल्ड कप !
अजून अनेक मजेदार, अवाक करणार्या, डोक्याला ताप देणार्या आठवणी असतील तुमच्या कडे ही. जरूर लिहा 



"नटराज" पुल शॉट >>
काय ग्रेट नाव ठेवलंय या शॉटला...
मस्त लिहिलंय रे फारेंड....
सही! कपिल जैसा कोई नहीं!
नटराज शॉट
१३१ कसोटी सामन्यात ३१ च्या सरासरीने ५००० पेक्षा अधिक धावा आणि आठ शतके (एकदिवसीय सामन्यात २३ ची सरासरी).. कपिलची नेहेमीच बोथम, इम्रान आणि हॅडली बरोबर तुलना झाली.. ह्या सगळ्यांच्या तुलनेत कपिलची बॅटिंग नक्कीच चांगली होती (बोथम जास्ती कंसिस्टंट होता हे मान्य).. तसेच सगळ्यात जास्त बळीदेखील कपिलनेच मिळवले..
अरे मी ही ऐकलेली उपमा आहे ती, मूळ कोणाची माहीत नाही पण चपखल वाटली.
मी हा लेख लिहावा तसा लिहीलेला नाही, तुमच्या ही आठवणी लिहा
अमोल...


कालच झी टीव्हीवर बातमी बघताना मनात आलं की कपिलबद्दल काहीतरी लिहायलाच हवं. तुला माहितेय? कपिल माझा ऑलटाईम फेव्हरिट खेळाडू आहे
-----
अजून एक आठवण -- बेन्सन अँड हेजेस कप, ऑसट्रेलिया : कपिल आणि वेंगसरकरने साक्षात रिचर्ड हॅडलीच्या एका ओव्हरमधे १७ रन्स ठोकल्या होत्या !!!
-----
आणि मित्रा... तू सगळ्यात महत्वाची आठवण लिहिलीच नाहीयेस !!
१९८३ चा विश्वचषक, भारत वि. झिंबाब्वे.... आपण ५ बाद १७ होतो.... तिथून कपिलने रॉजर बिन्नी आणि किरमाणीच्या साथीने नाबाद १७५ ठोकल्या होत्या.... सामना एकाहाती फिरवणं म्हणजे काय त्याचं ह्याहून उत्तम उदाहरण नसावं
-------
'नटराज' शॉट -- गावसकरने ही उपमा त्याच्या 'आयडॉल्स' ह्या अप्रतिम पुस्तकात वापरली आहे
पहिल्या बॉलला आऊट होणे!
>>महत्वाची आठवण लिहिलीच नाहीयेस

तो लहान असेल तेव्हा, आठवत नसेल.
तो जेंव्हा बॅटींगला यायच्या तेंव्हा ते ग्राँउड मध्ये पाय ठेवल्याबरोबर ते वर आकाशात देवाकडे पाहने. नंतर सच्याही तेच करायला लागला.
मी ही
ही स्टाईल रिपीट मारली होती.
आणी एक पाय उंचावर घेउन शॉट मारने मला इतके आवडले होते की आधी गार्ड न घालता तसा बर्याचदा ट्राय केला होता. काही शॉट्स बसल्या, काही मलाच बसल्या.
मी लहान असताना कधी तरी ११ डिसें रोजी कपिल वर लेख छापुन आला होता व त्यात वाढदिवसाच्या शुभेच्छा असे काही तरी लिहीले होते. अनेक दिवस असे वाटायचे की कपिल आणी माझा वाढदिवस एकाच दिवशी आहे.
चित्र्या, ती मॅच काय होती बॉस. अहाहा सुंदर आठवन. मलाही गावसकर पेक्षा कपिल आवडतो. त्यांचा भाडन्याचा काळात गावस्कर कपिलला इग्नोर मारायचा. मग उरलेले १० प्लेअरनी त्यांची जागा घेतली की उरलेल्या जागेवर कपिल जायचा. एक दोन मॅच मध्ये गावस्करचे भक्त असलेल्या माझ्या वडिंलाना चिडलेले पाहीले होते. त्यांनीच हा किस्सा सांगीतला, तेंव्हा पॉलीटिक्स कळत न्हवते.
कपिलनेच गोल्फ काय चिज आहे हे सांगीतले. नांदेडच्या स्टेडीयम वर कपिल ११ विरुध्द अझर ११ मॅच होती. त्या मॅच मध्ये कपिलने ११ सिक्स लावलेले पाहीलेत बॉस. ते ही बॉक्स मध्ये बसुन. (काकांची कृपा).
देव साहेबांवर रॅन्डम आठवनी लिहायला लागनार आता.
काही मलाच बसल्या
लिहीच मग, केदार, शक्यतो येथेच
हो ती मॅच नेमकी रेकॉर्ड झाली नाही (१७५ वाली). केदार ते वरती पाहणे शक्यतो सगळेच जण करायचे, मी सुद्धा
आम्हाला वाटायचे डोळ्यांना उन्हाची सवय व्हावी म्हणून करतो, त्यामुळे आम्ही गल्ली मॅच मधे उन्हात बसलेलो असलो तरी बॅटिंग ला जाताना वर बघायचो 
कपिल मस्त कलंदर natural खेळाडू होता. purely gifted. मला वाटते गावसकर्नेच म्हटलय ना कि "कपिल अष्ट्पैलू नसता तर सर्वात great batsman झाला असता."
ते फक्त एक शेवटी हाकलून देइतो राहिला नसता तर ...
बाकी त्या जमान्यातले लोक सही स्टाईलभाई होते. कपिलचे पाठीमागे वळून वर बघणे, श्रिकांतचे तो stance नि प्रत्येक stroke नंतर fine leg ला जाऊन नाकाच्या त्या चित्रविचित्र हालचाली, गावसकरचे gloves शी खेळणे, शास्त्रीचे ball shine करायला pant वर मागून नि पुढून (??) घासणे (आम्ही पण उगाच रबर बॉल घासत खेळायचो swing व्हावा म्हणून
) , शिवा बॉल उजव्या हातातून डाव्या हातात उडवायचा रन उप सुरू करायच्या आधी.
कही लिहिलय फारेंड..
>>>> त्यामुळे आम्ही गल्ली मॅच मधे उन्हात बसलेलो असलो तरी बॅटिंग ला जाताना वर बघायचो >>>>आम्ही पण उगाच रबर बॉल घासत खेळायचो swing व्हावा म्हणून >>>
आधी गार्ड न घालता तसा बर्याचदा ट्राय केला होता. काही शॉट्स बसल्या, काही मलाच बसल्या. >>>>
^^^^^^^^^^^^^^^^^^
अगदी बरोबर!!!
----------------------
यूँ खड़ा मौकतल में कातिल कह रहा है बार-बार,
क्या तमन्ना-ए-शहादत भी किसि के दिल में है.
दिल में तूफ़ानों कि टोली और नसों में इन्कलाब,
होश दुश्मन के उड़ा देंगे हमें रोको ना आज.
दूर रह पाये जो हमसे दम कहाँ मंज़िल में है,
कपिलने उत्कृष्ट गोलंदाजी केलेली शेवटची मालिका म्हणजे १९९१-९२ साली भारताने ऑस्ट्रेलियात खेळलेली ५ कसोटींची मालिका. ह्या मालिकेत भारताचा ४-० असा दारूण पराभव झाला होता. परंतु कपिलने जबरदस्त गोलंदाजी करून मालिकेत २५ बळी मिळविले होते. त्याने विशेषतः ऍलन बॉर्डरचा मामा केला होता. संबंध मालिकेत त्याने ४-५ वेळा बॉर्डरला त्रिफळाबाद केले होते. त्यावेळी समालोचक "बॉर्डर कपिलाईझ्ड आउट" अशी संज्ञा वापरत होते. या मालिकेनंतर त्याला निवृतीपर्यंत इतकी चांगली गोलंदाजी करता आली नाही.
कपिलच्या आक्रमक नेतृत्वाचे एक उदाहरण म्हणजे १९८३ भारतात वेस्ट इंडिज विरूद्ध अहमदाबाद येथे नाणेफेक जिंकून सुद्धा प्रथम गोलंदाजी घेतली व दुसर्या डावात जबरदस्त गोलंदाजी करून ८६ धावात ९ बळी मिळवून विजयाची संधी निर्माण केली होती. अर्थात वेस्ट इंडिजच्या तोफखान्यासमोर भारताचा ४थ्या डावात टिकाव लागला नाही.
कपिलभक्तांनो.....
माझ्या ब्लॉगवर एक ताजा लेख लिहिला आहे... कपिलबद्दल्....'योद्धा खेळाडू' नावाचा
जरूर भेट देऊन प्रतिक्रिया सांगा.
लिंक द्या की राव