दुबई / अबु धाबी सहल - भाग १० - शेख झायेद मशीद, अबु धाबी ( भाग अ )

Submitted by दिनेश. on 30 September, 2014 - 07:45

दुबई / अबु धाबी सहल - भाग १ http://www.maayboli.com/node/50452

दुबई / अबु धाबी सहल - भाग २ http://www.maayboli.com/node/50460

दुबई / अबु धाबी सहल - भाग ३ http://www.maayboli.com/node/50475

दुबई / अबु धाबी सहल - भाग ४ http://www.maayboli.com/node/50501

दुबई / अबु धाबी सहल - भाग ५ http://www.maayboli.com/node/50520

दुबई / अबु धाबी सहल - भाग ६ - शेख झय्यद पॅलेस म्यूझियम, अल ऐन http://www.maayboli.com/node/50789

दुबई / अबु धाबी सहल - भाग ७ - अल ऐन नॅशनल म्यूझियम ( पहिला भाग ) http://www.maayboli.com/node/50816

दुबई / अबु धाबी सहल - भाग ८ - अल ऐन नॅशनल म्यूझियम ( दुसरा भाग ) http://www.maayboli.com/node/50823

दुबई / अबु धाबी सहल - भाग ९ - जबेल हाफीत http://www.maayboli.com/node/50900

अबु धाबीला मुद्दाम जायचे होते ती तिथली शेख झायेद मशीद बघण्यासाठी. अतिशय सुंदर अशी ही मशीद आहे.
पैंगबरवासी शेख झायेद यांच्या इच्छेनुसार त्यांच्या मुलांनी त्यांच्या निधनानंतर ही बांधली आहे. त्यांचे दफन
या मशिदीच्या आवारात ( आत नाही ) केलेले आहे.

पांढर्‍या शुभ्र रंगातली ही वास्तू अत्यंत देखणी आहे. मी काही रुढ अर्थाने धार्मिक नाही पण या मशिदीच्या आवारात
खुप शांत वाटते, असा अनुभव आला. इस्लामचा एक पंथ तितकासा कट्टर नाही आणि शेखसाहेब या पंथाचे होते.
कपड्यांवरची थोडी बंधने सोडल्यास इथे कुठलिही जाचक बंधने नाहीत. सर्व भागात फिरता येते. प्रार्थनेच्या वेळा
आणि शुक्रवार सोडल्यास, मोफत मार्गदर्शकांची सोय आहे.

४०, ००० नमाजींना या मशिदीत एकावेळी नमाज पढता येतो. या वास्तूला एकंदर ८२ घुमट आहेत, १००० स्तंभ आहेत. या स्तंभांवर मदर ऑफ पर्ल चे नक्षीकाम आहे. भिंतींवर व जमिनीवर वेगवेगळ्या रंगांच्या संगमरवराची
नक्षी आहे. स्तंभांवरच्या नक्षीत सोन्याचाही वापर केला आहे. जमिनीवरचे नक्षीकाम क्षेत्रफळात १७००० चौ. मीटर्स आहे आणि ते जगातील सर्वात मोठे आहे.

इतर अनेक बाबतीतही असेच विक्रम आहेत. इथला हाताने विणलेला एकसंध गालिचा, एकूण १३००
कलाकारांनी विणलेला आहे. तो ५,६२७ चौ मीटर्स आहे. त्यासाठी न्यू झीलंडमधून मागवलेल्या व इराणी लोकरीचा वापर केलाय आणि तो इराणी कलाकारांनी अल खलिकी यांच्या मार्गदर्शनाखाली विणलाय. तो देखील अर्थातच
जगातील सर्वात मोठा गालिचा आहे. त्यातल्या मधल्या भागातील नक्षी सोडल्यास इतर सर्व नक्षी वेगवेगळी
आहे ( तिचेही फोटो टाकतोच. ) या गालिच्यावर आपल्याला बसता, चालता येते.

खास जर्मनीहून मागवलेली ६ प्रचंड झुंबरे इथे आहेत. तीदेखील जगातील दुसर्‍या क्रमाकांची आहेत.

ही वास्तू जरी शुभ्र रंगात असली तरी शेजारच्या सरोवराच्या तळाशी निळ्या लाद्या आहेत. त्यातून खास प्रकाशयोजनेद्वारे हि वास्तू मंद निळ्या प्रकाशात उजळली जाते. या प्रकाशयोजनेची खासियत म्हणजे ती
चंद्रकलेप्रमाणे कमी अधिक तीव्र केली जाते.

तर इथले भरपूर फोटो काढलेत ( म्हणून ३ भागात देतोय. )

आधी अबुधाबीच्याच मला आवडलेल्या इतर काही इमारती बघू..

१)

२)

३)

४)

५)

६) हे एक पारंपारीक शैलीतले घर

७)

८) कॉईन बिल्डींग

९)

१०) एक देखणा पूल

११) प्रथम दर्शन

१२)

१३) ड्रेस कोड

१४)

१५)

१६) हे मोरपिशी घुमट बघून घ्या... त्या खाली काय आहे ते पण बघूच

१७)

१८)

१९)

२०)

२१)

२२)

२३) या खांबावरच्या नक्षीत सोन्याचा वापर केला आहे.

२४) साधी पाणी प्यायची जागा पण अशी सुंदर सजवलीय

२५)

२६)

२७)

२८)

२९)

३०)

पुढे चालू..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अननसाच्या आकाराची बिल्डिंग नाही का बघितली? अगदी मेन रोडवरच आहे.

ही मशिदच काय ती बघण्यासारखी आहे अबु-धाबीमध्ये. रात्रीचं सौंदर्य तर काही औरच आहे.

आभार.. कविता, प्रिती, वर्षू.
आडो.. त्या बिल्डींगचा फोटो नाही नीट आला. फेरारी पण बघून आलो. फोटो येतीलच. पण या मशीदीतच भरपूर वेळ काढला. पाय निघतच नव्हता इथून.

आभार..

प्रथम, या दिवसात खुपच उन असते पण या मशिदीच्या आत आणि आवारातही हवा थंड राखलेली आहे.
गल्फमधे फिरायला जायचे ते नोव्हेंबर ते जानेवारी या काळात. त्यावेळी थंड असते.