दुबई / अबु धाबी सहल - भाग ७ - अल ऐन नॅशनल म्यूझियम ( पहिला भाग )

Submitted by दिनेश. on 15 September, 2014 - 10:31

दुबई / अबु धाबी सहल - भाग १ http://www.maayboli.com/node/50452

दुबई / अबु धाबी सहल - भाग २ http://www.maayboli.com/node/50460

दुबई / अबु धाबी सहल - भाग ३ http://www.maayboli.com/node/50475

दुबई / अबु धाबी सहल - भाग ४ http://www.maayboli.com/node/50501

दुबई / अबु धाबी सहल - भाग ५ http://www.maayboli.com/node/50520

दुबई / अबु धाबी सहल - भाग ६ - शेख झय्यद पॅलेस म्यूझियम, अल ऐन http://www.maayboli.com/node/50789

अल ऐन मधेच एक नॅशनल म्यूझियम पण आहे. त्या परीसरात सापडलेल्या अनेक पुरातन वस्तू, तसेच इतर
देशांच्या राजांनी भेट दिलेल्या वस्तू, असा मोठा संग्रह आहे. तिथल्या माहितीफलकांचे पण फोटो टाकतोय,
म्हणजे सविस्तर माहिती मिळेल. पण बरेच फोटो असल्याने दोन भाग करतोय.

काचेच्या आड ठेवलेल्या वस्तू असल्याने फोकस करणे कठीण होते, शिवाय काचेवरचे प्रतिबिंबही टाळता आले नाही.. त्याकडे दुर्लक्ष करा.

१) तिथे दारातच अंजीरानी लगडलेले एक मोठे झाड आहे.

२) मोगर्‍याचा एक वेगळाच प्रकारही आहे

३)

४)

५)

६)

७) असे दागिने ल्यायलेली अरबी वसंतसेना

८)

९) न्हाणीघरातल्या वस्तू

१०)

११)

१२)

१३)

१४)

१५)

१६)

१७)

१८)

१९)

२०)

२१)

२२)

२३)

२४)

२५) कॉफी ग्राईंडर Happy

२६)

२७)

२८)

२९) कितने आदमी थे ? दो सरदार... चार होते तो ये ले जाते Happy चार नळ्यांची पिस्तूल !

३०) ओमानी खंजर.. आजही हा वापरात आहे.

३१)

३२)

३३)

३४)

३५) मोती चाळायच्या चाळण्या आणि मोती.

३६)

३७)

३८)

३९)

४०)

४१) हा इसवी सन पूर्व पहिल्या शतकातला हा कुंभ ( सिरीयाजवळ सापडला )

पुढे चालू...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉव.......... अमेझिंग..अगदी वेगळ्याच वस्तू पाहायला मिळाल्या..

अ‍ॅनशंट दागिने सुप्पर्ब आहेत...

दिनेश, त्या फलकावर लिहिल्याप्रमाणे त्या संग्रहालयात पाषाणयुगापासून शेख झायेद यांच्या कालापर्यंतच्या वस्तू आहेत. तुम्हाला आठवत असेल तर फोटोतल्या वस्तू कुठल्या कालखंडातल्या आहेत ते लिहू शकाल का? म्हणजे खूप सुंदर माहिती मिळू शकेल.

काही काही वस्तू काय आहेत हे नीट कळत नाही (उदा. ३७ - नाणी / राजमुद्रा? ३८ - गुडगुड्या? ४०, १९ इत्यादी) त्यांची नावे अथवा उपयोग पण द्या जमल्यास.

बाकी मस्त खजीना मांडलाय तुम्ही या फोटोंमधून.

माधव, अफाट खजिना आहे तिथे. मी मूळ फोटो बघून लिहिण्याचा प्रयत्न करतो.
गेल्या ५ ते ७ हजार वर्षांपासून तिथे मानवी वस्ती आहे. त्या भागात नेमके काय जगण्याचे साधन होते कळत नाही.
कदाचित त्या काळात थोडीफार शेती होत असेल. पाणी उपलब्ध असेल.
या सर्व कला, म्हणजे विणकाम, कातडी कमावणे, दागिने घडवणे... वगैरे अगदी त्या काळापासून तिथे प्रचलित होते.
तरीही ते लोक भटके होते. आज तेलामूळे समृद्धी आलीय खरी, पण आपली मूळ संस्कृती त्यांनी तगवली आहे.

लाजवाब!... शब्दच नाहीय.... काय मस्त मस्त अन्टीक दागीने आणि वस्तु आहेत. व्वा. तुमच्या मुळे बघायला
मिळते आहे... आणि माहिती सुद्धा मिळते आहे..
प्र.ची ४ खुप आवडली आणि त्या बंदुकी... पक्ष्यांच्या ममीस , मोत्याची चाळणी, मोती सगळच क्लास आहे...