जिगीषा : मलाही कोतबो: अदिती

Submitted by भारती बिर्जे.. on 3 September, 2014 - 06:47

जिगीषा : मलाही कोतबो: अदिती

बरं झालं लोक्स मायबोलीने मला संधी दिली माझ्या मराठी प्रेक्षकांशी बोलायची , एरवी या सिरीयलवाल्यांनी मला नको जीव करून सोडलं आहे.आधीच मी नवीन . चार लोकांमध्ये तोंड वर काढलं की आधी कथानकाच्या थीमवरून सतरा प्रश्न , मग माझ्या आणि जयच्या पर्सनल लाईफवरून.

तुम्हीच सांगा, एवढी क्रांतीकारक थीम कोणाला सुचली होती का कधी ! आता आहेत माझ्या आगाऊ मैत्रिणी ज्या म्हणतात की बरं झालं कळलं की असं एक ऑफिस अस्तित्वात आहे जिथे लग्न झालेले employees सरळसरळ बाद आहेत ! म्हणजे ही लग्नसंस्थेसाठी चांगली बातमी नाहीच . अगदी अधिकृतरीत्या . एरवी आडून आडून अनेक हल्ले झालेत विवाहसंस्थेवर , पण हे अगदीच थेट आणि अति झालं ! बरं त्यातही समानता आहे , बाई आणि बुवा असे वेगवेगळे नियम नाहीत हे मस्तंय ! एक वात्रट मैत्रीण तर म्हणाली की स्ट्रेट आहे ना तुझा बॉस नक्की ? असे जगावेगळे नियम केले तर ऑफिस चालेल वेळ , मनुष्यजातीचं काय ?

आता आपल्याला काय कर्तव्य आहे मनुष्यजातीशी ? आपली सिरीयल चालली की बस्स ! आणि मला सांगितलं आहे इथल्या जुन्याजाणत्यानी की लोक काय वाट्टेल ते बघत बसतात. त्यांचा वेळ जात नसतो ना अगदीच . त्यांना प्रश्नही पडत नाहीत. जसं की माझी लग्नानंतरची ओळखपत्रं डॉक्युमेंटस वगैरे मिसेस अमुकतमुक म्हणून असतात , माझा पत्ता बदललेला असतो कागदोपत्री ,हे सगळं ऑफिसपासून कसं लपवलं मी नवीन नोकरी अविवाहित म्हणून धरताना ? की कुणी हे सगळं मागितलंच नाही ? सुटले म्हणा ! मी नाही ! स्क्रिप्टरायटर ! नाही तर इथे अस्मितासारखी सस्पेन्स स्टोरी सुरू नाही का होणार माझे रेकॉर्डस इतक्या तत्परतेने मी कसे बदलले त्या विषयावर ! बाकी तिच्या सस्पेन्स स्टोरीत तरी कुठे फारसा सस्पेन्स असतो म्हणा.

दुसऱ्या एका मावशींना वेगळाच प्रश्न पडलेला. लग्नच नाही ज्या ऑफिसात तिथे बऱ्यावाईट अफेअर्सना तरी काय स्कोप ! म्हणजे ‘’ आणि ते लग्न करून सुखाने किंवा दु:खाने नांदू लागले’’ ही सपक कथानकं जशी बाद झाली तशीच चटकदार विवाहबाह्य संबंधांचीही शक्यता नाही उरली! या बाईंना ऑफिस हे कामं करण्यासाठी असतं हे समजावून सांगायला गेलं तर म्हणतात , मग काय फक्त कामं करत बसलेली माणसं दाखवतात का सिरीयल्समध्ये !

गप्प बसायला काय घेतील हे सगळे ? या सर्व ढालगज लोकांना मी काय सांगू ? आहे एक चमत्कारिक बॉस, आहे एक अद्भुत ऑफिस ! नसतं का जगात असं काही ?बहुरत्ना वसुंधरा की काय म्हणतात ना ?
याहीवर वाद घालायला एक भांडखोर काका आहेतच - ते म्हणतात , असेल असेल जगाच्या पाठीवर असं ऑफिस ! पण मेल्यांनो तुम्ही दोघेही नवराबायको तिथेच का कडमडलात ? बाकीचं जग ओस पडलं होतं का ? हिंदी सिनेमाच्या वर ताण केलीत !

काय उत्तरं देत बसणार अशा असंतुष्ट आत्म्यांना ?
अरे बाबांनो ,जगा आणि जगू द्या- च्च आपलं बघा आणि बघू द्या बकवास शांतपणे इतरांना तरी!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी Biggrin Proud

जिगीषा, कृपया शब्दखूणांमधे मायबोली गणेशोत्सव २०१४ , मायबोली, उपक्रम हे शब्द घाला.

मनमोकळे लिहिले आहे Happy

ह्या सिरियलमध्ये एक अण्णा म्हणून आहेत त्यांना बहुधा असे सांगण्यात आले असावे की सिरियल हॉरर आहे.

कालपासून मला वाटते एक नवीनच स्त्रीपात्र आले आहे जे हिरोला बॉयफ्रेंड बनण्यास उद्युक्त करत आहे.

जिगीषा.....

नवीन लेखनाच्या यादीत तुमचे नाव येता क्षणीच मी अगदी लहान मुलाच्या उत्सुकतेने तिकडे धाव घेतो असे म्हटले तर ते अतिशयोक्तीचे होणार नाही....इतका दबदबा तुम्ही तुमच्या अनियमित लेखन माध्यमाद्वारे निर्माण केला आहे.

पण आज तुम्ही लिहिलेले सारे काही अगदी डोक्यावरून गेले असे म्हटले तर कृपया गैरसमज करून घेऊ नका; कारण ज्या मालिकेसंदर्भात ह्या लेखाचा जन्म झाला आहे, ती मालिकाच मला माहीत नसल्याने लिखाणाचा निर्भेळ आनंद घेता येत नाही असे दिसत्ये. बाकी लेखनशैलीवर तुमचा प्रभाव जाणवतोच.

पुन्हा एकदा आभार सर्वांचे .
@अशोक, या compliment साठी फार मोठे आभार Happy माझ्या अनियमिततेचाही तुम्ही उल्लेख केलाच आहे Happy काय करू, जो परकायाप्रवेश करणं मला फार आवडतं त्यावर कॉपीराईट वगैरेंची गहन प्रश्नचिन्हं उमटतात कधीमधी, ( त्याहीवर तुम्ही प्रोत्साहन देणारे प्रतिसाद दिलेत पूर्वीही ) पण मग जरासं कमी होतं लिहिणं खरं.
''का रे दुरावा'' या नव्या सिरीयलचे संदर्भ आहेत या कोतबोला श्रीयु.पण एकूणच अनेक सिरियल्समध्ये आपल्याकडे कथानकातले कच्चे दुवे फारसे सिरीयसली घेतले जात नाहीतच - काहीही दाखवा आपण बघतोच..धड ना स्वप्नरंजन धड ना वास्तव अशा अधांतरात लटकत रहातं कथानक..