मायबोली गणेशोत्सव २०१४ : उपक्रम "प्रकाशचित्रांचा झब्बू - गाडी बुला रही है! " ४ सप्टेंबर

Submitted by संयोजक on 25 August, 2014 - 10:51

गणपती बाप्पा मोरया!
कोण्या शहराची 'ती' शान तर कोण्या शहराची ओळख. कोणासाठी 'तिचा' प्रवास म्हणजे सहज हौस तर कोणासाठी गरज. अशी ही बालगीतातली झुकझुक गाडी पुढे मेट्रो, लोकल, पॅसेंजर, एक्स्प्रेस अशा वेगवेगळ्या रूपात आपल्याला भेटते. तीच तुम्हाला बोलावते आहे मायबोली गणेशोत्सव २०१४ मध्ये, झब्बू खेळण्यासाठी! 'गाडी बुला रही है!'
आगीनगाडीचं तुम्ही पाहिलेलं आणि टिपलेलं रूप तुम्हाला मायबोलीकरांना दाखवायचं आहे.

हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. इथे केवळ रेल्वेची प्रकाशचित्रे अपेक्षित आहेत. खर्‍या, खोट्या, चालू, बंद अशा कोणत्याही रेल्वेचे प्रकाशचित्र चालेल.
३. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
४. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
६. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
७. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्र संग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. नेटवरुन घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.

मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा: http://www.maayboli.com/node/47635

उदाहरणार्थ :-

tram 2.jpg
(कोलकता ट्राम)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

झुकु झुकु आगीन गाडीच आकर्षण आबाल वृद्धाना सगळ्यानांच असतं. मला ही आहे. त्यामुळे हा धागा विशेष जिव्हाळ्याचा. सर्वच फोटो सुंदर आहेत. मजा येतेय बघायला.
लंडनची ट्युब ही जगातील सर्वात पहिली भुयारी रेल्वे. जवळ जवळ दीड शे वर्षांपूर्वी, जेंव्हा तंत्रज्ञान एवढे विकसीत झाले नव्हते तेव्हा सुरु झालेली. हे लंडनचे एक ट्युब स्टेशन आणि ट्युब

From mayboli

ही ट्रेन खास रियासाठी....

फिनिक्स मार्केट सिटी, कुर्ला.

तोषा, फटाफट हिरवे सिग्नल दे बरं माझ्या झुकझुकगाड्यांकरता. एकदा सगळ्या इथे यार्डात आणून लावल्या की माझी ड्युटी संपवून घरी जायचंय.......

Pages