मायबोली वरचे प्रतिसाद

Submitted by sas on 2 January, 2009 - 13:19

मायबोलि वर सभासद झाल्या पासुन बरेच चांगले अनुभव आले, चांगल्या प्रतिक्रिया, प्रतिसाद, सल्ले ह्या स्वरुपात.
पण चांगल्या प्रतिसादां बरोबरच आज वर कित्येकदा मला मायबोलिवर कडु अनुभव आले आणि नेहमीच मी ते गप्प राहुन accept केले पण आता नाहि.

१. (Ref: 'अमेरिकेतिल आयुष्य' मधिल माझी posts)

मायबोलिवर ज्यांनी मला 'जबाबदारी' बाबत 'कडु' आणी 'अपामानास्प्द' शब्दात शिकवण दिली ते लोक : कोणालाही कडु वा मन दुखेल अश्या भाषेत बोलु नये, अपमानास्पद भाषेत सल्ले, मत देवु नयेत ही त्यांची जबाबदारी कशी विसरलेत?? की ही जबाबदारि नाही???

२. 'माझा अनुभव' ह्या विषयाखाली मी Daycare बद्द्ल 'माझे' अनुभव लिहले:

एखाद्या ग़ोष्टिचा ('मला') आलेला अनुभव चांगला नसेल तर सहाजिकच मी 'मला' आलेला अनुभव चांगला नाही असच लिहणार यात टोमणे मारण्यासारखे प्रतिसाद देण्याच काहीच कारण नाही (तुम्हाला फक्त negative च बाबी दिसल्या काही positive दिसल नाही का? हा प्रतिसाद मला खटकला... mainly माझ लिखाण पुर्ण ही झालेल नव्ह्त तेव्हा घाई घाई त अर्धवट लिखाण वाचुन कोणाला उपदेश देण हे योग्य आहे का???

३.
माझ्या 'नोकरी' विषयिच्या लिखाणात एका मायबोलि कराने माझ्या English च्या mistakes काढल्या व MBA असुन साधा हा शब्द लिहिता येत नाही हा टोमणा ही मारला... हे काय योग्य होत?? (ह्या टोमण्याला मी काही उत्तर देण्या आधी दुसर्‍या एका मायबोलि करने चांगल उत्तर दिल होत)

४. 'तुम्हाला काय वाटत' (Your Views and Comments) ह्या मध्ये जेव्हा मला मायबोलि करांची 'मुल ' ह्या विषयावर मत हवी होति:
"आता मात्र तुझा 'कहर' झाला हा विषयावर तुझा वैयक्तिक आहे "... हा असा उर्मट प्रतिसाद मला एका मायबोली काराने दिला.

मायबोली वर कोणाला कोणत्या विषयावर मायबोलि करांची मत हवी आहेत हा ज्याचा त्याचा 'वैयक्तिक' प्रश्न आहे आणी विषय जर खरच चुकिचा असेल Mod & Admin लगेच त्या विषयाला बंद करतात... तेव्हा जर तुम्हाला एखाद्याने सुरु केलेला विषय आवडला नसेल तुम्ही त्या बाबतची तुमचि मत देवु नका उगाच 'कहर' वै शब्द वापरण्याच काही कारण नाही

२००९ मध्ये व पुढे हि मायबोलि वर मी माझ्या लिखाणाला कोणत्याहि प्रकारचे negative प्रतिसाद tolerate करणार नाही तेव्हा Please माझ्या लिखाणांना आपल्यास प्रतिसाद द्यायचा असेल तर भाषेत वर, शब्दांवर लक्ष देवुन प्रतिसाद देणे.

प्रतिसाद देतांना कडु शब्द न वापरणे, अपमानास्पद प्रतिसाद न देणे हि देखिल आपली जबाबदारी आहे...

मायबोली वर कोणि एखादा विषय सुरु केला की त्यात उगाच वाद निर्माण करुन, कडवट प्रतिसादांनी, टोमणयांनि चर्चा कलुशित करण्या पेक्षा कोणताही विषय चांगल्या मतांनी बंद व्हावा हा प्रयत्न आपण का करत नाही?

(मी ही बर्‍याच मायबोलिकरांच्या Posts ला प्रतिसाद दिले/देते पण प्रतिसाद देतांना कधी कडु शब्द, अपमानस्प्द शब्द वापरले नाहित व वापरणारही नाही.)...आभार. चु. भु. माफ. (Pls. Note: कोणालाहि दुखविण्याचा माझा हेतु नाहि)

गुलमोहर: 

saas,
प्रथम मी तूमचे आभार मानते कारण तूम्ही अतिशय योग्य topic वरती discussion सुरु केले आहे. I can empathize with you as I have gone through a similar experience on maayboli.
माझ्या लेखावर 'Where are we heading towards?' वरती देखिल अशाच अतिशय वैयक्तिक आणि बालिश प्रतिक्रिया आल्या होत्या.
लेख न समजताच shonoo ह्यांनी 'मी लेखात अविचार मांडला आहे', 'प्रसिद्धिच्या हव्यासापायी मी हा लेख मायबोलीवरती टाकला आहे', आणि 'माझ्या blog वरती येणा-यांनी भोगावी आपल्या कर्माची फळे' सारख्या अतिशय अपमानस्पद आणि वैयक्तिक प्रतिक्रिया दिल्या होत्या. माझ्या लेखात कुठलिही gramatical mistake नव्हती. मी केलेला शब्द प्रयोग सर्रास english मधे करतात. google मधे जर आपण 'Where are we heading towards?' असे लिहिले तर ३३,००० sites मिळतील जिथे ही वाक्यरचना केलेली आहे.
हा लेख म स्वतः delete केला कारण तो english मधे होता, आणि केवळ मराठी लेखच इथे publish केले पाहिजे हा आग्रह आहे तो मी स्विकारला.
कुठलिहि वैयक्तिक प्रतिक्रिया खरच tolerate केली जाणार नाही हे मायबोली वर code of conduct म्हणुन सगळ्यांनी मान्य केले पाहिजे.
मायबोलीवरिल वाचक हा जर सुसंस्कृत असेल तर त्याने विनयशील पद्धितिनेच आपली प्रतिक्रिया दिली पाहिजे. आपल्याला जर लेखातील विचार पटले नसतील तर ते जरुर लिहावे पण योग्य पद्धतीने, विनयशीलपणे.
एखादी व्यक्ती १० वर्षापासुन मायबोलीवरती आहे म्हणुन तीला कोणावरही उर्मटपणे प्रतिक्रिया देयचा हक्क प्राप्त होत नाही.
नविन लिहिणा-यांना देखिल प्रोत्साहित केले पाहिजे. आणि आपल्याला एखाद्या लेखात जर साहित्यिक मुल्य आढळत नसेल तर प्रतिक्रिया देवू नका, लेख वाचू नका, पण अपमानास्पद आणि वैयक्तिक प्रतिक्रिया ह्या कोणीही tolerate अथवा सहन नाही केल्या पाहिजेत.

वर्षा

>>>नविन लिहिणा-यांना देखिल प्रोत्साहित केले पाहिजे.
१००% मान्य !!

>>>आणि आपल्याला एखाद्या लेखात जर साहित्यिक मुल्य आढळत नसेल तर प्रतिक्रिया देवू नका, लेख वाचू नका,
हे अमान्य!!!! पब्लिक फोरमवर लिहिता आहात. लोक वाचणारच आणि 'तोडलंस, जिंकलंस' अश्या प्रतिक्रीया देणार, तसंच 'हे अज्जीबात आवडलं नाही. भंकस वाटलं, रटाळ लिहीलंय' अश्या प्रतिक्रीया पण येणार! त्या खेळकरपणे घेता यायला हव्या. प्रतिक्रीयेच्या भाषेचं भान रहावं हे नक्की!!

>>पण अपमानास्पद आणि वैयक्तिक प्रतिक्रिया ह्या कोणीही tolerate अथवा सहन नाही केल्या पाहिजेत.
हे बरचसं कबुल, थोडं नाकबुल ! पुन्हा एकदा, पब्लिक फोरमवर आलं की असं सगळं होणं अटळ आहे. लिहीणार्‍याचा हात धरता येत नाही. सगळ्यांचीच कातडी गेंड्याची होऊ शकते का? उत्तर : नाही!!! तेव्हा अश्या काही पोस्टस् आपल्या लेखनानंतर आल्या, तरी त्यामुळे स्वत:ला त्रास करून घेत, आपला दिवस खराब करुन घेऊन काही साध्य होत नाही. दुर्लक्ष करता आलं तर बघावं!
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वैयक्तिक असली तरी योग्य आणि परखड प्रतिक्रीया पचवायला शिकायचं!!! त्यातून खरंच काही घेता येण्यासारखं, विचार करण्यासारखं असेल तर अश्या प्रतिक्रीयांसाठी इगो बाजुला ठेवून थँक्स द्यायचे! मी अजुनही हे शिकतेय!!!

>>एखादी व्यक्ती १० वर्षापासुन मायबोलीवरती आहे म्हणुन तीला कोणावरही उर्मटपणे प्रतिक्रिया देयचा हक्क प्राप्त होत नाही.
अगदी बरोबर!!! तरिही त्याबरोबर आणखी एक सांगावसं वाटतं. नव्या आयडीला मायबोलीवर कशी ट्रीटमेंट मिळते हे बरेचदा ती आयडी कश्याप्रकारचं लेखन करते ह्यावर देखिल अवलंबून आहे. आपल्या पोस्टवर दुसर्‍याचं पोस्ट पडलंच पाहीजे. पोस्टचा अनुल्लेख होता कामा नये हा अट्टहास असतो. नविन असताना माझा पण असायचा. बहुतेक त्यामुळे 'आपल्याला मायबोलीकरांनी स्विकारलंय' अशी काहीशी सुरक्षित भावना होते. हा अट्टहास चुकीचा होता हे हळुहळू समजायला लागलं. 'कुणीतरी काही मला न पटणारं, किंवा दुखावणारं लिहिलं म्हणून मायबोलीवर आता ह्यापुढे लिहीणारच नाही' असंही आधी वाटायचं. पण तो शुध्द मूर्खपणा होता हे देखिल जाणवलं.

जे काय वर लिहिलंय ते स्वानुभवातून! तेव्हा 'फुकट शहाणपण शिकवतेय' असं वाटंत असेल तर सोडून द्या.

चुका आपल्या सगळ्यांच्याच हातून होतात. त्या उगाळत न बसता इथे येत राहीलं तर जास्त बरं!

Sas, तुमच्या मुद्दा क्रमांक १ बद्दल - तिथे तुम्हाला "जबाबदारीची" जाणीव करून देणार्‍या पोस्टसमधे माझेही पोस्ट होते म्हणून. तिथे मी लिहिलेल्या कुठल्याही शब्दाला मी मागे घेणार नाही. माझ्या आयुष्यातल्या कोणत्याही व्यक्तिने जर तुम्ही जे केलेत ते केले असते तर मी याच शब्दात त्यांना उत्तर दिले असते. त्यात एका टक्क्याचीही चूक होती असे मला वाटत नाही. परखड सत्य व स्पष्ट बोलणे हे ऐकणार्‍याला नेहमीच कडू वाटते पण त्याचा अर्थ असा होत नाही की ते बोलूच नये.

दुसरे असे की तुम्ही जेव्हा मायबोलीसारख्या सार्वजनिक व्यासपीठावर आपले वैयक्तिक अनुभव लिहिता, हजारो अनोळखी व्यक्ति त्या वाचतात, तेव्हा त्यावर बर्‍यावाईट प्रतिक्रिया येणारच. तुम्हाला तश्या त्या नको असतील तर मग इथे लिहू नये. फक्त गोड गोड किंवा तुमच्या तथाकथित साहसी व जिगरबाज प्रवासाची वाहवा करणार्‍याच प्रतिक्रिया तुम्हाला अपेक्षित होत्या का? माफ करा पण सगळ्यांनाच तसे वाटेल असे नाही. किंबहुना जिथे तुमचे साफ चुकले तिथे ते तसे चुकले हे तुम्हाला दाखवून देण्यातच तुमची फार मोठी मदत केली गेली असे मला वाटते. तुम्हाला शब्द कडू वाटले असतील पण देवाचे धन्यवाद माना की फक्त कडू शब्दच तुम्हाला ऐकावे लागले व तुमच्या प्रवासात त्याहून भयंकर विपरित असे काही घडले नाही.

ऍडमिन व नेमस्तक इथले अयोग्य लेखन बंद करतात असे तुम्ही म्हटले आहे. पण त्याचबरोबर हे सुद्धा लक्षात घ्या की अयोग्य व असांसदीय भाषेतले प्रतिसादही ते नक्की उडवतात.

तुमचे २, ३, व ४ क्रमांकांचे मुद्दे मला माहित नाहीत त्यामुळे मी त्याबद्दल बोलणार नाही. परंतु तुमच्या पहिल्या मुद्द्याबद्दल मी माझे शब्द मागे घेणार नाही. मी वापरलेल्या शब्दांचा तिथे वेब्स्टर शब्दकोषानुसार अर्थही समजावून सांगितला होता. शिवाय तिथे हे देखील स्पष्ट केले गेले होते की हे सगळे एका व्यक्तिला उद्देशून नाही तर घेतलेल्या चुकीच्या निर्णयाला व त्याच्या अंमलबजावणीला (व त्याहीपुढे जाऊन त्याच्या प्रसिद्धीला व काही जणांनी केलेल्या त्याच्या कौतुकाला!) उद्देशून आहे. तेव्हा व्यक्तिशः अपमान वगैरे करण्याचा / होण्याचा प्रश्नच येत नाही.

सास, नुसतेच रेफरन्स देण्यापेक्षा लिंक टाकलीत तर बरं पडेल.

है: श्शाब्बास!
आता इथे पण कडू नि वैयक्तिक व अपमानास्पद असे लिहीले जाणार! नि मग आणखी एक बातमीफलक उघडल्या जाईल!
शंभर लोकांनी शंभर वेळा सांगितले, मराठीत लिहा, तरी लोक इंग्रजीत लिहितातच! मग कडू, वैयक्तिक, अपमानास्पद लिहिणे तरी कसे थांबेल?
रस्त्यावर कचरा टाकू नये म्हणतात, तरी रस्ता कचर्‍याने भरलेला का असतो?
कुत्र्याचे वाकडे शेपूट सरळ होत नाही.
इथे लिहायला येण्यापूर्वी, शाळेचे, कॉलेजचे प्रमाणपत्र आवश्यक करावे का, की ही व्यक्ति कडू, वैयक्तिक व अपमानास्पद लिहीत नाही!

एक प्रशन नेहमी पडतो मला, हे मायबोलीकर एक्मेकांना चेहर्याने ओळखतात का ? मी कुणालाच नाही ओळखत तसे. बर्याचदा प्रतिसाद personal असतात म्हणुन विचार आला.

>>लेख न समजताच shonoo ह्यांनी <<
हा पण एक खोटा दावा किंवा वैयक्तिक टिका का म्हणू नये?

>>'मी लेखात अविचार मांडला आहे', 'प्रसिद्धिच्या हव्यासापायी मी हा लेख मायबोलीवरती टाकला आहे', आणि 'माझ्या blog वरती येणा-यांनी भोगावी आपल्या कर्माची फळे' सारख्या अतिशय अपमानस्पद आणि वैयक्तिक प्रतिक्रिया दिल्या होत्या.<<
पहिली प्रतिक्रिया अपमानास्पद वाटवून घ्यायची की नाही तुमचा प्रश्न पण वैयक्तिक नक्कीच नाही. लेखाबद्दलची प्रतिक्रिया आहे. बाकी दोन्ही प्रतिक्रिया संदर्भाशिवाय इथे आहेत त्यामुळे त्याचे मोजमाप करायचा प्रश्नच येत नाही.

बाकी मी यातलं काहीच वाचलं नसल्याने कोण चूक कोण बरोबर यात मी पडणार नाही.

>>हा लेख म स्वतः delete केला कारण तो english मधे होता, आणि केवळ मराठी लेखच इथे publish केले पाहिजे हा आग्रह आहे तो मी स्विकारला.<<
हा आग्रह गुलमोहर वर ठळकपणे लिहिलेला आहे. तरीही लेख टाकला हीच चूक. हा आग्रह स्वीकारणे याला मायबोलीच्या नियमांचे पालन करणे असं म्हणतात. जेव्हा मायबोलीवर देवनागरी लिहिणे किचकट होते त्या काळात अश्या आग्रहाला/ सक्तीला मी ही विरोध केला होता. पण जुन्या हितगुजवरची देवनागरी ची खिडकी आणि आता तर देवनागरी फोनेटीक टाइप करण्याची सुविधा हे असताना मायबोली प्रशासनाचा हा आग्रह/ सक्ती ही अत्यंत योग्य गोष्ट आहे.

>>मायबोलीवरिल वाचक हा जर सुसंस्कृत असेल तर त्याने विनयशील पद्धितिनेच आपली प्रतिक्रिया दिली पाहिजे. आपल्याला जर लेखातील विचार पटले नसतील तर ते जरुर लिहावे पण योग्य पद्धतीने, विनयशीलपणे. <<
योग्य-अयोग्य, विनयशील-उर्मट याचे आडाखे आणि पडताळे आपण कुठल्याबाजूला आहोत याप्रमाणे बदलतात प्रत्येकाचे. त्यातून तू, मी, मायबोलीवरील कुणीही सुटलेलं नाही. तेव्हा ते विचारात घेऊनच एखाद्या प्रतिक्रियेला काय जो बोल लावायचा तो लाव.

>>एखादी व्यक्ती १० वर्षापासुन मायबोलीवरती आहे म्हणुन तीला कोणावरही उर्मटपणे प्रतिक्रिया देयचा हक्क प्राप्त होत नाही.<<
याला पट्ट्याखालची प्रतिक्रिया असं म्हणता येईल. वर्षा, हे मी तुला आपल्या जीटॉक संवादातही समजावून सांगायचा प्रयत्न केला होता. इथे अनेक वर्षं असण्याने एकमेकांच्यातला संवाद वाढलेला असतो. कोणाला नक्की काय म्हणायचंय हे नुसत्या लिखित शब्दांच्यातही माहित असते कारण सगळे जण एकमेकांना ओळखत असतात. तुम्ही नवीन येता तेव्हा तुमचे लिखित शब्द यापलिकडे तुम्ही माहीत नसता. तुमचा बोलण्याचा सूर माहित नसतो. त्यामुळे लिहिलेल्या शब्दातून अनेक अर्थ काढता येऊ शकतात. काढले जातात. गैरसमज वाढू शकतात. यामुळे नवीन आल्या आल्या थोडा कलह वाट्याला येऊ शकतो. हे कुठेही घडू शकते. तसेच मायबोलीवरही. त्यामुळे लगेच 'मी बिच्चारी, मला यांनी हेतुपुरस्सर त्रास दिला' या खोड्यात अडकू नये. इथे तुला हेतुपुरस्सर त्रास द्यायलाही अजून कुणी ओळखत नाही.

>>नविन लिहिणा-यांना देखिल प्रोत्साहित केले पाहिजे. आणि आपल्याला एखाद्या लेखात जर साहित्यिक मुल्य आढळत नसेल तर प्रतिक्रिया देवू नका, लेख वाचू नका, पण अपमानास्पद आणि वैयक्तिक प्रतिक्रिया ह्या कोणीही tolerate अथवा सहन नाही केल्या पाहिजेत.<<
नाहीच पटलं. प्रोत्साहित करायचं म्हणजे काय याची व्याख्या कराच एकदा. केवळ वा वा छान छान अश्या प्रतिक्रिया द्यायच्या का? नाही आवडलं एखादं लिखाण तर तसं का लिहू नये? आणि साहित्यिक मूल्य आहे की नाही हे वाचल्याशिवाय कसं कळणार? वाचू नका म्हणायला काय अर्थ आहे? तुमच्या लिखाणावर टिका करणं, लिखाणातले दोष काढणं इत्यादी आणि तुमच्यावर टिका करणं यात फरक आहे. तो समजायलाच हवा. इथे तुम्हाला कोणी सहन करायला सांगत नाहीये. नाही सहन झालं तर भांडा.
माझ्या तर मते हा लेख आणि त्यावरची चर्चा दोन्हीही मायबोलीवर नसताना परत हा विषय उकरून काढून एकांगी बाजू मांडणं हे चुकीचं आहे. तेव्हाच का नाही विरोध केला? तुम्हाला जर तुमचं बरोबर वाटतंय तर कितीही विरोध असला तरी तुम्ही हटता कामा नये.

बाकी मृण्मयी ने जे मांडलं तेच थोडं वेगळ्या शब्दात मांडायचा हा प्रयत्न.
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

ajjuka,
प्रथम प्रतिक्रिया दिलीस ह्या बद्दल धन्यवाद.
'बाकी मी यातलं काहीच वाचलं नसल्याने कोण चूक कोण बरोबर यात मी पडणार नाही.'

मी तूला gtalk वर link दिली होती, त्यामुळे तू लेख वाचून प्रतिक्रिया दिली असतीस तर जास्त योग्य नसते का झाले?
'>>लेख न समजताच shonoo ह्यांनी <<
हा पण एक खोटा दावा किंवा वैयक्तिक टिका का म्हणू नये? '

लेख न समजता हा खोटा दावा नाही आहे, कारण माझ्या लेखाचे मर्म त्यांना नाही समजले... त्यांच्या सर्व प्रतिक्रियांवरुन ते साफ होत होते.. आता माझ्याकडे देयला कुठलिही link नाही कारण मी ते delete केलेले आहे.
आणि माझ्या लेखात अविचार मांडलेला नाही. http://varsha-mhaskar-nair.blogspot.com हि माझ्या लेखाची link आहे, मला उदाहरणासोबत मी कुठला अविचार मांडला आहे हे जर समजविले तर माझ्या दृष्टीने देखिल ते योग्य ठरेल , म्हणजे मी पण असे समाज विघातक अविचार लिहिणे सोडून देइन आणि माझे आयुष्य देखिल सन्मार्गी लागेल. Lol . त्यामुळे मी 'लेख न समजता' जे लिहिले आहे वाक्य ते अजिबात खोटा दावा नाही.

'योग्य-अयोग्य, विनयशील-उर्मट याचे आडाखे आणि पडताळे आपण कुठल्याबाजूला आहोत याप्रमाणे बदलतात प्रत्येकाचे. त्यातून तू, मी, मायबोलीवरील कुणीही सुटलेलं नाही. तेव्हा ते विचारात घेऊनच एखाद्या प्रतिक्रियेला काय जो बोल लावायचा तो लाव. '

मला तूझे हे विधान पटलेले नाही. विनयशिलता हि विनयशिलताच असते, बाजु बदलून त्याचे आडाखे बदलत नाहीत. जसे सत्य हे सत्यच असते, आपण कुठल्या बाजुला आहोत ह्याने सत्य बदलत नाही त्याच प्रमाणे विनयशिलतेचे आडाखे हे आपण कुठल्याबाजूला आहोत त्याप्रमाणे बदलत नाहीत.

उदा. mrinmayee ह्यांना मी ओळखत नाही तरिही त्यांची प्रतिक्रिया हि अतिशय polite स्वरुपात आहे, वाचतांना ती पटते, विचार करायला भाग पाडते. ह्याच भाषेत जर सर्व प्रतिक्रिया असतिल ना तर त्या जास्त परिणामकारक ठरतात. कोणालाही त्याचा राग येत नाही आणि प्रतिक्रीया देणा-याचे उद्दिष्ट पण साध्य होते.
शेवटी आपण प्रतिक्रिया कशाकरिता देतो? आपल्या मनातील मुद्दा समोरच्याला कळावा म्हणुनच ना? मग कटु शब्दात जर प्रतिक्रिया लिहिली तर that very purpose is defeated कारण वाचणा-याला मुद्दा न पटता फक्त त्यातिल कटुताच टोचते, जाणवते.

'इथे अनेक वर्षं असण्याने एकमेकांच्यातला संवाद वाढलेला असतो. कोणाला नक्की काय म्हणायचंय हे नुसत्या लिखित शब्दांच्यातही माहित असते कारण सगळे जण एकमेकांना ओळखत असतात. तुम्ही नवीन येता तेव्हा तुमचे लिखित शब्द यापलिकडे तुम्ही माहीत नसता. तुमचा बोलण्याचा सूर माहित नसतो. त्यामुळे लिहिलेल्या शब्दातून अनेक अर्थ काढता येऊ शकतात. काढले जातात. गैरसमज वाढू शकतात. यामुळे नवीन आल्या आल्या थोडा कलह वाट्याला येऊ शकतो. हे कुठेही घडू शकते. तसेच मायबोलीवरही. त्यामुळे लगेच 'मी बिच्चारी, मला यांनी हेतुपुरस्सर त्रास दिला' या खोड्यात अडकू नये. इथे तुला हेतुपुरस्सर त्रास द्यायलाही अजून कुणी ओळखत नाही.'

मी फक्त माझ्या लेखापुरतीच बोलत आहे. लेखातून माणुस व्यक्त होतो.. आणि तो होत नसेल तर ते त्या लेखाचे failure आहे अथवा वाचकाच्या बौद्धिक क्षमतेचा problem ह्यातिल काहिही असु शकते. अग आपण आपल्या आयुष्यात कथा, कादंब-या, कवितांची पुस्तके वाचतो, आपण त्यातिल किती लोकांना personally ओळखत असतो? त्यामुळे लेख लिहिणारी व्यक्ती ओळखीची आहे अथवा नाही ह्यावरुन प्रतिक्रिया का बदलतात? मला समजु नाही शकले? उलट पक्षी मला असे वाटते कि एखाद्या अनोळखी व्यक्तीने दिलेली प्रतिक्रिया हि ओळखीने दिलेल्या प्रतिक्रियेपेक्षा जास्त प्रांजळ आणि खरी नसते का?
आणि ajjuka मला माझ्या ह्या लेखासंबंधी मायबोलीच्या अनेक वाचकांनी e-mails केल्या instead of writing in the public forum कि तुमचा लेख आवडला, आणि तूमच्या लेखावरती ज्या comments झाल्या त्या अजिबात पटल्या नाहित. मग त्या लोकांनी ते public forum मधे लिहायचे का टाळले? कारण एखादवेळेस जीने माझ्या लेखावर अतिशय बालिश प्रतिक्रिया दिली तीला हे personally ओळखत असावेत, अथवा public forum मधे टाकुन पुन्हा नविन वाद नको म्हणुन देखिल असेल.

'माझ्या तर मते हा लेख आणि त्यावरची चर्चा दोन्हीही मायबोलीवर नसताना परत हा विषय उकरून काढून एकांगी बाजू मांडणं हे चुकीचं आहे. तेव्हाच का नाही विरोध केला? तुम्हाला जर तुमचं बरोबर वाटतंय तर कितीही विरोध असला तरी तुम्ही हटता कामा नये. '

मी तेव्हा विरोध केला नाही असे अजिबात नाही, त्यावेळी मी तितकाच विरोध केला. आणि btw ह्या topic ची सुरुवात मी केलेली नाही. मी sas ह्यांच्या लेखाला फक्त उत्तर दिलेले आहे... विषय निघाल्यावर मी नुकतेच मला आलेले अनुभव लिहिले, त्यात मी काही वावगे केले असे मला वाटत नाही, विषय मी उकरुन काढलेला नाही.
(actually हे पण मजेशीर आहे कि sas ह्यांच्या मूळ लेखा ऐवजी माझ्या प्रतिक्रियेलाच जास्त लोक respond करत आहेत. Wink Happy Lol हे वाक्य मजेनी लिहिले आहे त्या वाक्याला उचलुन पुन्हा वाद नकोत. :D)

बहुधा मी पण अशा प्रतिक्रिया झेलत, सामोरे जात may be I will grow as a person. कुठल्या प्रतिक्रियांना react होयचे, कुठल्या प्रतिक्रिया मनाला लावुन घेयच्या, कुठल्या नाही हे अनुभवावरुन मी शिकेन, may be मग मन इतक हळवं रहणार नाही प्रतिक्रियांच्या बाबतीत. माणूस हा अनुभवावरुनच शहाणा होतो. नाही का?

चू.भू.दे.घे.

वर्षा

>>'बाकी मी यातलं काहीच वाचलं नसल्याने कोण चूक कोण बरोबर यात मी पडणार नाही.'
-----------
मी तूला gtalk वर link दिली होती, त्यामुळे तू लेख वाचून प्रतिक्रिया दिली असतीस तर जास्त योग्य नसते का झाले?<<
यातलं काहीच चा अर्थ लेखावरच्या चर्चेसकट लेख असा होतो. लेख आता वाचून होहो ती प्रतिक्रिया चुकली किंवा बरोबर होती असं म्हणण्यात काही अर्थ नाही. कारण वरच्या वाक्यांचे मागचे पुढचे संदर्भ माहीत नसणार.

>>लेख न समजता हा खोटा दावा नाही आहे, कारण माझ्या लेखाचे मर्म त्यांना नाही समजले... त्यांच्या सर्व प्रतिक्रियांवरुन ते साफ होत होते.<<
त्यांना समजले नाही असे तुला त्यांच्या प्रतिक्रियांवरून वाटले. म्हणजे खरंच समजलं नाही असं होत नाही. इथे वैयक्तिकची रेष ओलांडली जातेच आहे की. माझा पुढचा मुद्दा पण इथे सिद्ध झाला.

>>आपण कुठल्या बाजुला आहोत ह्याने सत्य बदलत नाही त्याच प्रमाणे विनयशिलतेचे आडाखे हे आपण कुठल्याबाजूला आहोत त्याप्रमाणे बदलत नाहीत. <<
हा आदर्शवाद झाला. खर्‍या माणसांचं असं होत नाही.

>>त्यामुळे लेख लिहिणारी व्यक्ती ओळखीची आहे अथवा नाही ह्यावरुन प्रतिक्रिया का बदलतात?<<
हे कुठून शोधून काढलंस? अनोळखी व्यक्ती म्हणजे तू लिहिलेला लेख होता म्हणून अश्या प्रतिक्रिया आल्या असा फार मोठा दावा करते आहेस तू.

>>instead of writing in the public forum कि तुमचा लेख आवडला, आणि तूमच्या लेखावरती ज्या comments झाल्या त्या अजिबात पटल्या नाहित. मग त्या लोकांनी ते public forum मधे लिहायचे का टाळले? कारण एखादवेळेस जीने माझ्या लेखावर अतिशय बालिश प्रतिक्रिया दिली तीला हे personally ओळखत असावेत, अथवा public forum मधे टाकुन पुन्हा नविन वाद नको म्हणुन देखिल असेल<<
हे माझ्याही अनेक लेखांच्या बाबतीत होत असतं. दुनिया चांगलं चांगलं किंवा वाईट वाईट म्हणत असते आणि त्या विरोधात जाणारी किंवा सहमत असलेली सुद्धा एखादी प्रतिक्रिया इमेल मधे येते. यात वैयक्तिक रित्या ओळखणे, नवे वाद नको म्हणून टाळणे इत्यादी गोष्टी बघणे हे थोडं फारफेच्ड वाटतं.

असो! एवढं मनावर घेत बसलीस तर मुश्किल होईल. प्रत्येक जण आयुष्यात कधी ना कधी तरी चुका करत असतोच (तू सुद्धा करत असशीलच.) तशी एखादी चूक म्हणायची आणि पुढे जायचं. तुला पुढच्या लिखाणासाठी शुभेच्छा!

-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

'त्यामुळे लेख लिहिणारी व्यक्ती ओळखीची आहे अथवा नाही ह्यावरुन प्रतिक्रिया का बदलतात?<<
हे कुठून शोधून काढलंस? अनोळखी व्यक्ती म्हणजे तू लिहिलेला लेख होता म्हणून अश्या प्रतिक्रिया आल्या असा फार मोठा दावा करते आहेस तू. '

hey ajjuka you got me wrong......completely wrong 'अनोळखी व्यक्ती म्हणजे तू लिहिलेला लेख होता म्हणून अश्या प्रतिक्रिया आल्या असा फार मोठा दावा करते आहेस त'' अग मी असा कुठलाही दाव करत नाही आहे., तू जे म्हणालिस कि
'तुम्ही नवीन येता तेव्हा तुमचे लिखित शब्द यापलिकडे तुम्ही माहीत नसता. तुमचा बोलण्याचा सूर माहित नसतो. त्यामुळे लिहिलेल्या शब्दातून अनेक अर्थ काढता येऊ शकतात. काढले जातात. '

मी त्याला अनुसरुन म्हणाले, कि लेखावर प्रतिक्रिया देण्यासाठी ओळख असण्याची काय गरज आहे? प्रतिक्रिया आपण लेखाविषयी देतो, व्यक्तीविषयी नाही. आणि त्यामुळे नविन व्यक्ती आहे कि जूनी ह्याने काय फरक पडतो?
बरं यार जाउ दे सगळं. 'कुछ तो लोग कहेंगे.....छोडो बेकार कि बातो में......' Happy
hmm , पण हि maturity येइला काही काळ सरावाच लागतो. बरोबर आहे ना? पहिले पहिले होतो माणुस असा react पटकन. जसे मी वरिल प्रतिक्रियेत म्हणाले आहे तसे.... मला पण समजायला लागेल हळु हळु कुठल्या प्रतिक्रियांना react होयचे, कुठल्या प्रतिक्रिया मनाला लावुन घेयच्या, कुठल्या नाही हे अनुभवावरुन मी शिकेन.
पण तरी मायबोली वरती प्रत्येकानेच थोडे introspection केले पाहिजे ह्या प्रतिक्रिया कशा देयच्या ह्या संदर्भात, instead of defending ourselves. बरोबर आहे ना? बघा पटलं तर, नाही तर आहेच पुढच्या वादाला सुरुवात... hey just kidding!!! Happy Happy
Happy New year to everybody.... Happy

वर्षा

लेखावर,कवितेवर जरुर टिका करावि पण वैयक्तिक स्वरुपाचि टिका हे असभ्य पणाचे लक्शण आहे.....टिकेला घाबरु नका शेवटि...लेख व लेखक आठवणीत रहातो....टिकाकार नाहि...आचार्य अत्र्यांवर अनेकानि टिका केली...सारे नजरेआड गेले..अत्रे व त्यांचे साहित्य अमर ़जाले......अभिव्यक्ति स्वात्यंत्रावर विश्वास ठेवा...तुम्हाला जर लेख लिहिण्याचे स्वातंत्र्य आहे तर त्यांचे टिका करण्याचे स्वतंत्र्य मान्य करा.....घाबरु नका...लिहित रहा....लिहित रहा....लिहित रहा....लिहित रहा....लिहित रहा... लिहित रहा....लिहित रहा.... लिहित रहा....लिहित रहा....लिहित रहा.... लिहित रहा....लिहित रहा....लिहित रहा.... लिहित रहा....लिहित रहा....लिहित रहा....

अवांतर -

वर्षा,

>>>> माझ्या लेखात कुठलिही gramatical mistake नव्हती.
<<<< तुमच्या या दोन इंग्रजी शब्दांमध्येही चूक आहे. "grammatical" असे हवे.

दुसरे असे की "Where are we heading towards?" ही वाक्यरचना सकृतदर्शनी योग्य वाटली तरी ती मलाही चुकीचीच वाटते. ही अशी वाक्यरचना जशीच्या तशी वापरणारी फक्त २२३ पानं गूगलला मिळाली. (टीपः जशीच्या तशी वाक्यरचना शोधण्यासाठी गूगलमधे वाक्याभोवती अवतरण चिन्हे घालावी लागतात.)

तळटीप : पुन्हा एकदा, इथे प्रांजळ प्रतिक्रिया देण्याचा हक्क बजावला आहे. अपमान, पाणउतारा, वैयक्तिक चिखलफेक, बेजबाबदार विधाने, कडूजहर गरळओक, नवीन लेखनाची मुस्कटदाबी वगैरे प्रकार नाहीत हे कृपया लक्षात घेणे. Happy त्याउप्पर या प्रतिक्रियेला कशा स्वरुपात वाचायचे व त्याचे काय अन्वयार्थ लावायचे याची संपूर्ण जबाबदारी प्रत्येक वाचकाधीन आहे. Happy

चाफा,

'<<<< तुमच्या या दोन इंग्रजी शब्दांमध्येही चूक आहे. "grammatical" असे हवे.'
---> ह्याला typing mistake म्हणतात. Lol , अशा मग माझ्या मराठी लेखनात देखिल तूम्हाला चूका आढळतील, बघ ना माझ्याच वरिल प्रतिक्रियेत देखिल माझ्या मलाच दिसणा-या असंख्य मराठीतील -ह्स्व, दिर्घाच्या चूका आहेत.

शेवटी असे आहे चाफा, अग चूकाच काढायच्या असा अट्टाहास ठेवला ना कि अग फक्त चूकाच दिसतात. तूम्हाला दिसणा-या (ज्या मला मान्य नाहित) इंग्रजीतील व्याकरणाच्या चूकांच्या पलिकडे जाउन लेखात काय मांडले आहे ह्यांवर देखिल जरा दृष्टीक्षेप टाकला ना तर बरं नाही का होणार. शेवटी भाषा आणि साहित्य हे व्याकरणाच्या देखिल पलीकडील असतं. आपल्या भावना समोरच्या व्यक्तीला पोहोचविण्याकरिता, communication साठी भाषा वापरतात ना?
अमेरिकेत देखिल आज-काल english spellings ला महत्व दिले जात नाही. तूम्ही कराल ते spelling योग्यच आहे असे मानतात. Correct me if I am wrong.

शेवटी मी इतकेच म्हणेन... तूम्हाला वाटतय ना चूका काढावयाच्या तर काढा... शेवटी व्यक्ती स्वांतत्र्य आहे. आणि हाच जर तूमचा वेळ घालविण्याचा उद्योग असेल तर चालु द्या. Happy

वर्षा

<<<< अमेरिकेत देखिल आज-काल english spellings ला महत्व दिले जात नाही. तूम्ही कराल ते spelling योग्यच आहे असे मानतात. Correct me if I am wrong.

>>>> बापरे! मस्तच! Lol चालू द्यात तुमचे. एक नवीन बाफ उघडाच यासाठी. आणि आम्ही कोण हो "correct" करणार?! तुम्हाला "मान्य नाहीत" हे तर तुम्हीच म्हटलेय ना मग वरती "correct me" कशाला? Proud

मुळात तुमचा लेख मी वाचलेला नाही - नव्हता. तेव्हा त्याचा भावार्थ काय आहे त्यात मला गम्य नाही. इथे तुम्ही वर मुद्दा मांडलात ना की तुमची वाक्यरचना चुकीची आहे असे तुम्हाला कोणीतरी तेव्हा सांगितले आणि तुम्हाला ते मान्य नाही असे? त्यावर आणि केवळ त्यावर माझी प्रतिक्रिया आहे. तुमच्या लेखावर नाही. कळले का? की अजून गल्लत होते आहे?

वेळ घालवण्याचा उद्योग वगैरे छान मजेदार लिहिले आहे हा. पण असो, मी समजू शकतो तसे लिहिले जाण्यामागची चीड. Happy

<<<< शेवटी मी इतकेच म्हणेन... तूम्हाला वाटतय ना चूका काढावयाच्या तर काढा... शेवटी व्यक्ती स्वांतत्र्य आहे.

>>>> अरे वा! हे सगळ्यात महत्त्वाचं. हे "शेवटी" कशाला? हेच धोरण जर "सुरुवातीपासून" ठेवलं असतंत तर इथे लिहिलंतच नसतंत. असो, शेवटी का होईना पण मुद्दा तुमच्यापर्यंत पोचला असावा. Happy

बास, मला इथे अजून काही बोलायची इच्छा नाही!

अमेरिकेत देखिल आज-काल english spellings ला महत्व दिले जात नाही. तूम्ही कराल ते spelling योग्यच आहे असे मानतात.
---- असा पण वारा वाहतो आहे हे वाचल्यावर आश्चर्य वाटले. इंग्रजी भाषा ज्ञान कमी असणारे लोकं खुप लिहायला लागले असावेत. माझ्या मते english spellings ला अजिबात(च) महत्व नाही दिल्यास अर्थाचे अनर्थ होतील...

एक प्रशन नेहमी पडतो मला, हे मायबोलीकर एक्मेकांना चेहर्याने ओळखतात का ?
प्रयत्न केला तर जमते. न्यू जर्सीत आम्ही बरेचदा एका वेळी एका ठिकाणी भेटण्याचा कार्यक्रम ठेवतो. निदान वीस पंचवीस मायबोलीकर, व त्यांचे जवळचे नातेवाईक भेटतात.
मी सान होजे ला जाण्या आधी कळवले की येणार आहे तेंव्हा तेथील, SVS, Storvi, लिंबोणि इ. मायबोलीकर भेटले. पुण्याला, मुंबईला जाण्या आधी कळवले तर जवळ जवळ वीस पंचवीस जण प्रत्येक गावात भेटले. ऑस्ट्रेलियाला गेलो होतो तेंव्हा तिथे अखिल ऑस्ट्रेलिया मराठी अधिवेशन होते. तेथेहि दहा बारा मायबोलीकर भेटले.
आपण जर भांडा भांडी, टीका करणे कडवट लिहीणे असे केले नाही तर लोकांनाहि आपल्याला भेटायला आवडते.
सुरुवाती सुरूवातीला मायबोलीवर नुसतीच चेष्टा मस्करी, हास्यविनोद चालत असत. मग कुणितरी गंभीर विषयांवर चर्चा सुरु केली, जसे, 'लग्नात वधूला शंभर एक, मोठ्या माणसांना वाकून नमस्कार करावा लागतो हा त्यांच्यावर अन्याय आहे' असा विषय मांडला. तीहि गंमतच असणार असे समजून बर्‍याच जणांनी त्यावर चेष्टेने लिहीले. त्यातून भांडणे उद्भवली. अनेकदा भारत वि. अमेरिका, स्त्रीस्वातंत्र्य यांच्यासारखे न सुटणारे वादंग इथे झाले आहेत. काहीजणांनी त्यांच्या कविता गोष्टींवर केलेले समालोचन, जणू वैयक्तिक हल्ला मानून जोरात भांडण केले.
असे झाल्याने मायबोलीवर पूर्वीसारखी गंमत नाही, म्हणून माझे अनेक मित्र मैत्रिणी आताशा इथे येईनासे झाले आहेत. न्यू जर्सी सोडून इतर शहरातल्या बातमी फलकावर लिहायला भीति वाटते, जरी तिथले बरेच लोक मला ओळखतात.
"sic transit gloria maayboli"

नमस्कार,

मला केवळ चांगले आणी गोड प्रतिसाद्च हवेत अस मला म्हणायच नाही, पण आपल्या आपण जर दुसर्‍याला काही सल्ला देण्याचा, शिकविण्याचा वा चुक त्याची/तिची चुक दाखविण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तो प्रयत्न करताना अपमानास्प्द शब्द वापरण चुक नाही का???

चांगली शिकवण/सल्ला देण्यासाठी असभ्य/मन दुखविणारा/ समोरच्याला अपमानास्पद वाटेल असा मार्ग / शव्द निवडण हे बरोबर आहे का???

कोणालाही कोणत्याही प्रकारचि शिकवण देतांना Positive Way ने ती दिलि पाहिजे असा आग्रह बालवाडि ते PhD पर्यंतच्या आणी इतरही शिक्षण पद्धतित आहे..."तु हे केल/करतोस ते चुक आहे" अश्या negative प्रतिक्रिये पेक्षा "तु हे अस केल असतस वा केलस तर अधिक चांगल होईल" अशी प्रतिकिया/प्रतिसाद जर आपण देण्यास काय हरकत आहे?? समोरच्याला ते टोचत ही नाही आणी आपल्याला काय म्हणायचय हे त्याला/तिला अधिक लवकर व वाईट न वाटता पटत.

मायबोलिवर वर आपण ईतरांच मन दुखविण्या साठी, अपमान करण्यासाठी प्रतिसाद देतो कि खरच आपल्याला समोरच्याला काही चांगल सल्ला, शिकवण द्यायची म्हणुन प्रतिसाद देतो ?
...आपल्याला जर खरच चांगल्या भावनेने कोणाला काही सांगायच असल की चांगले भाव चांगल्या शब्दात आपसुक येतात.

अपमानास्पद, कडु शब्दांनी ego hurt होतो कि नाही हे मला माहीत नाही पण मन मात्र नक्किच दुखत .
समोरच्याच मन दुखवुन वर "माझ्या शब्दांनी तुझा दिवस खराब करु नकोस , वाईट वाटुन घेवु नकोस"
अस सांगण कितपत योग्य आहे? त्यापेक्षा मन दुखेल असे शब्द वापरु नये हे योग्य नाही का?

शब्द कडु असेले तरी विषयात/चर्चेत 'विष' घोळणारे नसावेत आणी मन दुखविणारे नसावेत.

समोरच्या ने काही चुक केलि; पण त्याला कठोर, कडु वापरुन प्रतिसाद/प्रतिक्रिया देण हि चुक नव्हे का??...सत्य कडुच असत पण सत्य कठोर आणी कडु शब्दात व्यक्त कराव लागत नाही वा तशी गरज ही नसते.

कुठेतरी वाचलय... "अती शहाणे लोकाच कडु, आणी कठोर शब्द वापरतात कारण ते किति शहाणे हा ego त्यांना असतो. सभ्य व्यक्तीला दुसर्‍याच मन दुखवण शक्यतो जमत नाही" .

वाचनात आलेला एक सुविचार: 'सल्ले ह्या, चुका दाखवा पण चुका दाखवितांना कडु, कठोर, अपमानस्प्द शब्द वापरुन शब्दांच्या चुका करु नका' .

आपण आपल्या मुला/मुलिंना घरच्यांना वा Office मध्ये काही शिकवितांना असेच शब्द वापरतो का? हे पब्लिक फोरम म्हणुन आपली काहीच जबाबदारि नाही?

If u don’t know situation better not to give suggestion
'स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे' हे इतर बाबतिं प्रमाणेच संभाषणाच्या बाबतितही लागु आहे.

.. आभार
इंग्रजी वाक्य, शब्द वापरल्या बद्द्ल क्षमस्व.

असे झाल्याने मायबोलीवर पूर्वीसारखी गंमत नाही,
--- गेले ते दिन गेले... Sad

कुठेतरी वाचलय... "अती शहाणे लोकाच कडु, आणी कठोर शब्द वापरतात कारण ते किति शहाणे हा ego त्यांना असतो. सभ्य व्यक्तीला दुसर्‍याच मन दुखवण शक्यतो जमत नाही" .

अति शहाणे असलेले नव्हे, ज्यांना असे वाटते की आपण अति शहाणे आहोत असे लोक तसे वागतात हा अनुभव मला अनेSSकदा आलेला आहे. याचे एक उदाहरण म्हणजे My fair lady मधील prof. Higgins ची वर्तणूक. तो कधीहि त्या मुलीशी धड बोलला नाही. सतत कडू शब्दात, उपहास करून, टीका करून, रागावून बोलत असे. त्या मुलीची शिकण्याची इच्छा जबरदस्त, नि त्या प्राध्यापकाच्या मित्रामुळे शेवटी बिचारी शिकली! पण एक तर तो सिनेमा होता, नि दुसरे म्हणजे बाकीच्यांनी तसे वागण्याची गरज नाही.

गंमत म्हणजे bridge खेळताना माझा partner माझ्या खेळावर, bidding वर सतत टीका करत असे! पण तो म्हणतो तसे का करायचे याला त्याच्याजवळ तार्किक कारण काहीच नव्हते. या उलट जे expert खेळणारे होते, ते अगदी बरोब्बर तार्किक दृष्ट्या समजावून सांगत की काय बरोबर. नि कधी कधी मी खेळलेले सुद्धा योग्यच होते, आम्ही डाव हरलो याची वेगळी कारणे ते दाखवून देत.

सास, १. तुम्हाला आलेल्या प्रतिसादांमधे मला देखिल काही प्रतिसाद आवडले नव्हते आणि मी तसे तेथे सांगितले ही होते. माझ्या प्रतिसादालाही विरोध करणारे अजून काही प्रतिसाद आलेच की. ह्याचा अर्थ असा नाही की त्या सर्व मायबोलीकरांना माझ्या विषयी वैयक्तिक आकस आहे किंवा माझा अपमान करण्याच्या हेतुने त्यांनी तशा पोस्ट टाकल्या.

२. हे डे केअरचं पोस्ट मी वाचलं आहे. तिथे एकीला तुमच्या पोस्टविषयी गैरसमज झाला आणि दुसरीने तिला चुक निदर्शनास आणुन दिली (असे आठवते). ह्याचा अर्थ पहिलीने तुम्हाला हेतुपरस्पर टोमणे मारले आणि दुसरी तुमच्या प्रेमात आहे असा होत नाही.

मायबोलीसारख्या संकेतस्थळांवर आपण एकमेकांना ओळ्खतो ते आपल्या प्रतिसादांमधुन, लेखनामधुन. प्रत्यक्ष बोलण्यातील, स्वरातील चढ-उतार इथे समजणे थोडे अवघड असते. त्यासाठी बरेच जण स्मितचित्रांचा आधार घेतात. परंतु स्माइलीज टाकल्यानंतरही गैरसमज व्हायचे ते होतातच. परंतु त्याला वैयक्तिक आकस वगैरे लेबलं लावु नका. तसेच एरवी जरा लेकाला सर्दी झालीये किंवा १० लोकांना जेवायला घालायचे आहे काय करु अशा पोस्ट आल्या की सर्वांनाच, अगदी एक दिवसापुर्वी नोंदणी झालेल्या सदस्यांना देखिल उत्साहाने प्रतिसाद देणारे मायबोलीकर एखाद्या(च) विषयावर मला (इथे: तुम्हाला) असा प्रतिसाद का देत आहेत ह्याचाही विचार करायला हवा. म्हणजे प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात तसे.

३ आणि ४. कल्पना नाही.

वर्षाताई, मायबोलीकर एकमेकांना भेटतात म्हणजे ते लगेच सर्व एकाच पक्षाचे/मताचे होतात असे थोडीच आहे. अगदी माबोवर ओळख होउन लग्न केलेल्या बायकोच्या गोष्टीतला एखादा मुद्दा काही मला पटला नाही असे जाहीर सांगणारे नवरे आहेत की इथे Happy तसेच तुम्हाला इतरही अनेक तिखट प्रतिक्रीया आल्या होत्या मग तुम्ही पुन्हा-पुन्हा शोनु ह्या आयडी ( Wink ) चा उल्लेख करता आहात ही गोष्ट थोडी खटकण्यासारखी आहे Uhoh

असो, (मृ आणि अज्जुकेने कालच केलेल्या) शिळ्या कढीला उत आणलाय का मी ? Happy

>>असो, (मृ आणि अज्जुकेने कालच केलेल्या) शिळ्या कढीला उत आणलाय का मी ? <<
शिंडे, वैयक्तिक हल्ला!!! तुझ्याकडून अपेक्षित नव्हतं हो असं! Happy
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

सास, नेमका विषय माण्डला हे तुम्ही!
अर्थात, या धाग्याचा वापर करुन, तत्काळ, बघा अमक्या तमक्या वेळेस माझ्यावरही किती आयड्यान्नी कसे कसे टीकेचे आसूड ओढले अशी तक्रारखोर पोस्ट करण्यासाठी या धाग्याचा वापर करण्याची माझी सूतराम इच्छा नाही! Happy तरीही.....
बरेचदा असे अनुभवास आले की एखाद्या आयडीचे मत न पटल्याने, माझेच मत कसे खरे हे सान्गण्याच्या नादात, वादविवादपटू वैयक्तिक पातळीवर घसरतात, राजकारण्यान्सारखी हीन दर्जाची टिका करतात वा वैयक्तिक बाबीन्चे दाखले देतात! बर्‍याचदा त्यान्ना साहित्यिक मूल्य असतेही पण वाचणारा समोरचा आयडीच नव्हे तर अन्य वाचकही दुखावले जाऊ शकतात याचे भान प्रत्येकानेच ठेवले पाहिजे! अगदी नजिकचे उदाहरण म्हणजे माझ्या पाइल्स व गळवाच्या दुखण्याचे! आता याचा सम्बन्ध माझ्या "बिघडलेल्या" "चान्गले विचार न करणार्‍या" मनस्थितीशी लावून, त्यामुळेच असले रोग होतात असा बादरायण सम्बन्ध लावुन कोणी त्याचा उल्लेख केला तर त्यात "टिकेचे" साहित्यिक मूल्य मी शोधावे की सत्य शोधावे की बाष्कळ बडबड म्हणून सोडून द्यावे? बर सोडून दिले तर मौन हीच माझी सम्मती असे होते त्याचे काय? असो.
माझ्यापुरते मी त्यात अफलातून, समोरच्याला नामोहरम करण्याच्या दृष्टीने केलेली कमरेखालची टीका असे साहित्यिक मूल्य शोधले, थोडा हसलोही या "अचूक" हजरजबाबीपणाला व स्मृतिला, पण ही टिका डोक्यात जाऊ न देता झटकूनही टाकली! अशा टीकेने नाही माझ्या पाईल्स गळवे बरी होणारेत वा अधिक बिघडणारेत! हो की नाही?
काही अतिसज्जन आयड्या आजही मला (वा माझ्या आयडीला) "विकृत" असे सम्बोधतात! आता याकडे काय लक्ष द्यावे बरे???? अशान्ना जगाचा अनुभव नाही, अशान्नी खरिखुरी विकृत स्वभावाची माणसे पाहिली वा अनुभवलीच नाहीत तेच या शब्दाचा असा सढळ हस्ते वापर करू शकणार, नाही का? पुन्हा तेच, अमक्या तमक्यान्नी मला विकृत म्हणले तर मी लगेच विकृत ठरण्यायेवढा मायबोलीचा प्लॅटफॉर्म तकलादू हे का? येथिल इतर आयडीज (व्यक्ती) लगेच बाबा वाक्यम प्रमाणम म्हणून असल्या लोकान्चे शब्द शिरावर घेवुन नाचणारेत का? मला कुठेतरी विश्वास ठेवावाच लागतो, अन माझा येथिल सभासदान्च्या सतसदविवेकबुद्धीवर विश्वास असल्याने काही खोडसाळ किन्वा अज्ञानी आयडीज "विकृत" "विकृत" म्हणून माझी वासलात लावत असल्या तरी त्याचि फिकीर मी का करावी? ते त्यान्चे मत हे! तसेच ठेवावे कि बदलावे हा ही त्यान्चा प्रश्ण हे! मी का त्याची काळजी करावी? नाही का?
तर सान्गायचे हेच की, उडदामाजी काळेगोरे असणारच! ते ही सापेक्ष! एकाला काळे भासेल ते गरज नाही की दुसर्‍याला काळेच भासावे! मत स्वातन्त्र्य हे! त्यामुळे मला "विकृत" म्हणल्यावर जसा "पाठीमागुन टाळ्यान्चा गजर होईल" तसेच "शेम शेमच्या" घोषणाही होतील याची स्वाभाविक खात्री जर असेल तर मात्र जरी विषय नेमका असला तरी या धाग्याचा मला उपयोग नाही.
गम्मत अशी हे की उद्या अवधुत गुप्तेने सारेगमप कार्यक्रमात एखाद्या चान्गल्या गाण्याला "अरे व्वा, अगदी विकृत गायलास रे/ग" अशी प्रतिक्रिया दिली तरीही मला आश्चर्य वाटणार नाही! अशी प्रतिक्रिया त्याने द्यावी की नाही, प्रतिक्रियेत "विकृत" हा शब्द वापरावा की नाही हा वेगळा प्रश्ण! Happy शब्दशः अर्थ काढायचा तर नाही वापरला पाहीजे, पण केवळ "भावना पोचविण्याचा" सम्बन्ध असेल तर विकृतच काय कोणताही हिडीस शब्द वापरला तरी काय फरक पडतो???????? आई नाही आपल्या बाळाला लाडाने मेल्या दोडक्या म्हणत? (अर्थात मला विकृत म्हणणारे देखिल तशाच लाडाने म्हणतात काय की!!! Proud तेवढा सन्शयाचा फायदा त्यान्ना द्यायलाच हवा ना??? Lol )
...;
आपला, लिम्बुटिम्बु

sas,
तूम्ही अगदी योग्य शब्दात मला काय म्हणायचे आहे ते मांडले आहे. मी तूमच्या मताशी १००% सहमत आहे. ज्याला सद्सदविवेक्बुद्धि आहे त्या प्रत्येकाला तूमचे म्हणणे पटेल.

cindrellaa ताई, मला वाद पूढे वाढवायची बिल्कुल इच्छा नाही आहे, पण तूम्ही जे म्हणालात ना 'तसेच तुम्हाला इतरही अनेक तिखट प्रतिक्रीया आल्या होत्या मग तुम्ही पुन्हा-पुन्हा शोनु ह्या आयडी ( ) चा उल्लेख करता आहात ही गोष्ट थोडी खटकण्यासारखी आह''

मला फक्त ३ लोकांच्या विरुद्ध प्रतिक्रिया आल्या होत्या. त्यातिल raw ह्यांनी मी तूमचा लेख वाचला नाही आणि वाचणार देखिल नाही असे लिहिले होते आणि त्यामुळे त्या प्रतिक्रियेचा उल्लेख कराव असे वाटत नाही. आणि आणखिन एका महिलेने असेच कहि तरी लिहिले होते जे मला ignore ह्या category मधे टाकावेसे वाटते कारण त्यावर लिहावे , प्रतिक्रिया द्यावी ह्याही लायकिचा तो प्रतिसाद नव्हता.
बाकी सर्व प्रतिक्रिया अशा होत्या कि 'लेख मराठीत टाका'... त्या तिखट वा अयोग्य नव्हत्या.

आणि cindrellaa ताई, त्याच forum मधे अनेक लोकांनी माझ्या लेखाविषयी ज्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत त्या योग्य नाहित हेही लिहले होते... त्यामुळे अनेक तिखट प्रतिक्रिया आल्या हे साफ चूकिचे विधान आहे.
'मायबोलीकर एखाद्या(च) विषयावर मला (इथे: तुम्हाला) असा प्रतिसाद का देत आहेत ह्याचाही विचार करायला हवा. म्हणजे प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात तसे.'
फक्त ३ id's म्हणजे मायबोली होत नाही. आणि माझ्या लेखात कुठलेही आक्षेपार्ह्य आहे अथवा माझा लेखात काहिही साहित्यिक मूल्य नाही आहे असे अजिबात नाही, कारण मला अनेकांनी अतिशय छान प्रतिसाद दिलेले आहे.. तेव्हा नाण्याच्या २ बाजू वैगरे मला मान्य नाही.

बाकी मला वाटते माझ्या बाजूने मी माझ्या ह्या विषयावरिल प्रतिक्रिया इथेच थांबविते...... मला कटुता कोणाविषयीही नाही.

वर्षा

नमस्कार!

cinderella
माझ्या post च्या प्रतिसादांना दिलेले तुमचे प्रतिसाद मि वाचले होते आणि इतर बर्‍याच वेळि हि जेव्हा माझ्या posts ला कडू प्रतिसाद आले तेव्हा मायबोलि करांनि ते प्रतिसाद योग्य नाहित असे जे प्रतिसाद दिले होते ते हि मला आठवतात आणि त्या बाबत मि तुम्हा सर्वंचि आभारि आहे.

पण! कडु प्रतिसाद मग त्याला दुजोरा देणारे वा विरोध करणारे प्रतिसाद हे सुरु झाल कि मुळ विषय बाजुला रहातो आणि वाद सुरु होतो आणि मग चर्चा/विषय वादात अडकतो. हेच तर नको व्हयला ना.
इथे आनंदाने, एकमेकांना न दुखवता जर आपण राहिलो तर... कोणाला मायबोलि सोडुन जाव लागणार नाहि. असो.

'वाईट बोललेल विसरुन जा' या पेक्षा 'मन दुखेल अस न बोलण हा प्रयत्न केला तर अधिक चांगल' हा सल्ला चांगला अस मला वाटत.

बाकि मि इथे लिहित रहाणार आणि मला जर वाटल एखाद्या विषयाचा फलक उघडावा तर ते हि करणार कारण ह्यात कुणाचा अपमान करण्याचा वा मन दुखविण्याचा माझा हेतु नाहि Happy

माझ्या मनात कोणा बद्द्ल काहि आकस नाहि व कुणि माझ्या बद्द्ल हि मनात काहि आकस ठेवु नका Please.

मायबोलि वर एक नवि सुरुवात मि ह्या क्षणा पासुन करत आहे Happy तुम्हि सगळे माझ्या सोबत आहात ह्या विश्वासाने. Happy

सर्वांचे आभार. चु. भु. क्षमस्व.

अरे वा वा, आता कसे जुन्या मायबोलीत आल्यासारखे वाटते आहे... अजुन काही टिपीकल जुने शब्द बाहेर आलेले दिसत नाहीय पण वाचुन मजा वाटतेय.

मायबोलिवरील प्रतिसादांच ललित होणे कसे काय शक्य आहे. मला वाटतं लिखाणाचा गट चुकला सास तुझा.

बी अगदी मनातले. हे काही गुलमोहरावरले ललित वाटत नाही.

Pages