हितगुज दिवाळी अंक २०१४: मालकीहक्काबद्दल सूचना व खुलासा

Submitted by admin on 18 July, 2014 - 11:55

हितगुज दिवाळी अंकासाठी कोणत्याही स्वरूपात साहित्य पाठवणार्‍यांसाठी कुठल्याही प्रवेशिकेच्या मालकीहक्काविषयी स्पष्टीकरण (copyright information) आपल्या संरक्षणासाठी देणे महत्त्वाचे वाटते.

यासाठीचे नियम खालीलप्रमाणे असतील -

येणार्‍या प्रत्येक प्रवेशिकेचे (लेखन / ध्वनिमुद्रण / ध्वनिचित्रमुद्रण) व रेखांकनाचे / अ‍ॅनिमेशनचे पूर्ण मालकीहक्क ती प्रवेशिका पाठवणार्‍या यथायोग्य साहित्यिकाच्या किंवा कलाकाराच्या ताब्यात राहतील. परंतु पाठवण्यात आलेल्या व स्वीकारल्या गेलेल्या प्रत्येक प्रवेशिकेसाठी, तुम्ही मायबोली प्रशासनाला त्या प्रवेशिकेला maayboli.comवर प्रसिद्ध करण्याचा किंवा maayboli.incला त्या प्रवेशिकेचा इतर कुठल्याही माध्यमात वापर करण्याचा अमर्याद, कायमस्वरूपी व रद्द न करता येणारा परवाना देत आहात.

ध्वनिमुद्रण, ध्वनिचित्रमुद्रण, लेखन, रेखांकन अथवा अ‍ॅनिमेशन यांच्या निर्मितीत एकापेक्षा अधिक मायबोलीकर सामील असतील, तर त्या प्रवेशिकेचे सर्व हक्क मायबोली.कॉमकडे असतील.

'दिवाळी संवाद'चे सर्व हक्क मायबोली.कॉमकडे असतील.

याचा अर्थ -

तुम्ही त्या प्रवेशिकेचे एकमेव निर्माते असाल, तर -

* प्रवेशिकेचे पूर्ण मालकीहक्क तुमचे असतील व तुम्ही त्या प्रवेशिका इतरत्र प्रसिद्ध करू शकता अथवा तुमच्या वैयक्तिक आर्थिक नफ्यासाठी विकू शकता.
* परंतु मायबोली प्रशासन ती प्रवेशिका मायबोलीवर अथवा इतर कुठल्याही माध्यमांमध्ये अनिर्बंध वापरु शकते. (वापराचा अमर्याद परवाना)
* भविष्यात ती प्रवेशिका मायबोलीवरून अथवा इतर माध्यमांमधून काढून टाकावी असे तुम्हांला वाटले तरी मायबोली तसे करण्यासाठी बांधील राहणार नाही. (कायमस्वरूपी परवाना)
* तुम्ही तुमची प्रवेशिका इतर कोणाला विकली, तरी नवीन मालक ती प्रवेशिका मायबोलीवरून काढून टाकण्याविषयी असमर्थ असेल. (रद्द न करता येणारा परवाना)

तुम्ही त्या प्रवेशिकेचे एकमेव निर्माते नसाल, तर त्या प्रवेशिकेचे सर्व हक्क मायबोली.कॉमकडे असतील. मायबोली प्रशासन ती प्रवेशिका मायबोलीवर अथवा इतर कुठल्याही माध्यमांमध्ये अनिर्बंध वापरु शकते. मायबोली.कॉमच्या परवानगीशिवाय ती प्रवेशिका इतर कुठल्याही माध्यमात कोणालाही वापरता अथवा विकता येणार नाही.

यासंदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर कृपया मायबोली प्रशासनाशी अथवा संपादक मंडळाशी ईमेलद्वारे संपर्क साधावा. धन्यवाद.

Copyright of the work submitted to maayboli.com remains with the respective author or artist. By submitting your work, you are giving an unlimited, perpetual and irrevocable license to maayboli.com to publish on maayboli.com or wherever maayboli.inc wants to use it in any other medium.

If you are not the sole creator of the work, the copyright of the creation (in written / illustrated / audio / audio-visual format) lies with maayboli.com
'Diwali Sanwad' is a copyright of maayboli.com.

What it means :
* The copyright and ownership remains with the author/artist and they are free to use it in any way that they desire; such as sell or publish their work etc.
* However, by submitting their work, the author/artist has given the right to maayboli to publish on Maayboli web site or through any other media such as PDF, CD etc. in future. (unlimited)
* Maayboli is not obligated to remove the work from it's web site or any other media that has been used, though the author may want it done in future. (perpetual)
* Even though an author sells his/her copyright to a new owner, the new owner cannot ask maayboli to remove the work from maayboli web site. (irrevocable)

If you have any further questions related to the copyright issues, please e-mail the Sampadak Mandal. Thank you.

विषय: